Login

अनुभव एक, किस्से अनेक भाग ९

It's About A Vallari Who Is Dealing With Issues Which Arised In Her Life. Where In She Needs A Little Motivation To Face It Strongly And How She Comes Over The Situation.
अनुभव एक, किस्से अनेक- भाग ९ सुंदर गोष्टी 



नमस्कार ईरा वाचकहो, 

खरंच खूप सॉरी.  खूपच मोऽऽऽऽठा गॅप नंतर हा भाग पोस्ट केला.  बरिच कामे आणि धावपळ मुळे लिखाण अर्धवटच राहिलं. पटकन काहीतरी लिहून पोस्ट करायच मन नाही होत. उशिर झाला तरी चालेल पण मनासारखे लिखाण झाल्याशिवाय पोस्ट करावीशी नाही वाटत. आशा करते की समजून घ्याल. सॉरी वाचकहो... 

मागच्या भागात आपण पाहिले की वल्लरी कशी मानसिकरीत्या अगदीच तुटून गेली होती, त्यासाठी तिची पळवाट म्हणजे अमेरिकेत काम करण्याची मिळालेली संधी. तिथे ती नव्या लोकांना भेटते. नवीनच भेटलेली मैत्रीण आणि तिच्यासोबत च्या गप्पा... 

आता पाहूयात पुढे, 

जणू काही वल्लरी च्या तुटलेल्या मनाला सावरण्यासाठीच पावसाला सुरुवात झाली.  त्या पावसारुपी थेंबात जणू काही तिचे दुःखच बरसत असल्यासारखे धोधो पडत होता.  त्या पडणार्‍या पावसा सोबतच तीच मन सुद्धा हलके होऊ लागले होते.  पावसा सोबत हवेत चांगलाच गारठा सुटला होता. एलोरा ने वल्लरी ला घरात नेलं, कारण थंडी आणि वल्लरी चा छत्तीस चा आकडा होता.  हीटर ऑन करून तिला झोपवून एलोरा बाहेर हॉल मध्ये येऊन बसली.  डोक्यात विचारांच काहूर माजले होते. वल्लरी ची अशी अवस्था तिला बघवत नव्हती.  खूप विचारांती तिने काही ठरवले आणि तिथेच सोफ्यावर झोपून गेली.  

मध्यरात्री वल्लरी ला तहान लागली म्हणून रूम च्या बाहेर आली तर तिला एलोरा सोफ्यावर पाय पोटाशी दुमडून झोपलेली दिसली. ते बघून तिला कसेतरीच झाले.  पटकन एक ब्लँकेट आणून तिच्या अंगावर पांघरले. मनाशीच विचार करू लागली... 

" किती काळजी हिला माझी. मैत्रीण असूनही हिला माझी किती काळजी.  जणू काही माझी मोठ्ठी बहीणच. देवा माझ्या ह्या सुंदरशा मैत्रिणीला नेहमी सुखात ठेव.."...आपोआपच हात बाप्पा च्या मूर्ती समोर जोडले गेले.  

सकाळ झाली तशी वल्लरी चा गोंधळ सुरू झाला. जणू काही रात्री काहीच झाले नाही. पण तिला कुठे माहिती होते की एलोरा ने तिच्या नकळत खूप छान सरप्राइज प्लॅन केले आहे ते.  

दोघी पटकन आवरून ऑफिस ला गेल्या. ऑफिस मध्ये  गेल्या बरोबर सगळ्यांनीच वल्लरी ची विचारपूस केली.  

" ऊहूम् ऽऽऊहूम् ऽऽ आम्ही पण आहोत इथे.." एलोरा बोलली तशी सगळे हसू लागले. 

सगळ्यांनीच आता तर वल्लरी ला चलायच आमच्या सोबत करून धोशा लावला. 

" ठीक आहे मी येईन. पण एका अटीवर काही गोष्टींसाठी अजिबात फोर्स नाही करायचा. " वल्लरी. 

सगळे विचारात पडले.  

" जस की? " मॅक्स ने विचारलं.  
"पाण्यात जायच करून मला फोर्स नाही करायच. " वल्लरी.. 

'पण मी काय म्हणते' असे म्हणताच सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे काय म्हणते ह्या वर कान टवकारून उभे, 

'मी एक ठिकाण शोधलेय, तिथे आपण रणगाडे चालवू शकतो. फायर करू शकतो. मुख्य म्हणजे लायसेन्स वैगरेची आवश्यकता नाही. मज्जा येईल खूप. शिवाय मॅक्सचा वाढदिवस तिकडे साजरा होऊन जाईल. कशी वाटते ही कल्पना? ' सगळ्यांकडे बघत वल्लरी बोलली. 

'इट साऊन्डस् अमेझिंग्. लेटस् गो हिअर.' असे निकिने म्हणताच सगळ्यांनी दुजोरा दिला. 

' बॅक टू वर्क ' एलोरा असे म्हणताच सगळे कामाला लागले. 

काम करता करता वल्लरी ची तंद्री लागली. भूतकाळातील त्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणीत बुडाली. एलोरा ने येऊन तिला हाक मारली तरी तिची काही प्रतिक्रिया नाही बघून खांद्यावर हलकीशी एक थाप मारली. अचानक काहीतरी घडावे आणि तंद्रीतून बाहेर येऊन हरवलेल्या नजरेने वल्लरी बघत होती. 

" काय मॅडम, पुन्हा कुठे विचारांच्या गर्दीत फिरायला गेल्या? " एलोराने मिश्कीलपणे विचारले.  

नजर लॅपटॉप कडे वळवत वल्लरीने, " काही नाही गं. चल पटकन काम उरकून जाऊया घरी." 
काम संपवून दोघीही घरी निघाल्या. आठवड्याभराची लाँड्री, बॅकयार्ड, फ्रंट पोर्चमध्ये सगळे स्वच्छ करून,   दोघीही निवांत बॅकयार्ड मध्ये बसुन हाॅट चॉकलेट चा आस्वाद घेत गप्पा मारत बसल्या. 
"काय गं? कसला एवढा विचार करत होतीस तू दुपारी?." एलोराने विचारलं तशी वल्लरी बोलू लागली... 

"नात्याच्या सुरुवातीला, प्रेमाची कबुली दिल्यावर सगळेच कसे गुलाबी असते. त्या व्यक्तीशिवाय आजुबाजुचा विसर पडून जातो. रेहान...किती कौतुक असायचे त्याला. माझे वागणे, बोलणे, राहणीमान असो किंवा सवयी. काहीही करायचे असले तरी सोबत पाहिजे. सोबतच कामाला लागलो. त्यालाच जास्त आनंद झाला. का?  तर डोळ्यांसमोर असेन करून. मला पण त्यावेळी आनंद झाला विचार करून की,  आपली व्यक्ति सोबतच असेल. पण...." 

"पण काय? बोल ना." 

"पण जसजसे त्याला कामावरचे सहकारी माझ्याबद्दल बोलू लागले, तशी त्याला चिडचिड होऊ लागली. त्या लोकांना माझ्या कामाची पद्धत आवडत नव्हती. त्यांना त्यांच्या माणसासारखे हवे तसे कामचुकारपणा करायला मिळत नव्हता ना! रेहानला सगळे माझ्याबद्दल बोलतात म्हणून बदल हवा होता. मी का म्हणून बदल करावा? सगळे बोलतात म्हणून? आणि सगळेच परफेक्ट नसतात ना. त्याला माझ्यामध्ये बदल हवे वाटत होते. एक ना अनेक, कितीतरी. मी अशीच का राहते? अमुकतमुक व्यक्ति सारखे कपडे का घालत नाही? शूज असो वा वागणे." अगदीच खिन्नपणे वल्लरी सांगत होती. तिचे रेखीव डोळे तर पाण्याने भरून आले. 

' तुला माहिती त्याला मी कितीतरी वेळा सरप्राईझ द्यायचे. पण त्याच कौतुक सोडून मला असे जमत नाही वैगरे वैगरे चालू करायचा. मी त्याला समजायचे सुद्धा की असा विचार नको करूस म्हणून. फक्त छान आहे करून कौतुक करून बॅग मध्ये टाकून द्यायचा.बर्‍याच वेळा तर बोलायचा की मी दिलेल्या गोष्टी त्यांनी घेतल्या ह्यांनी घेतल्या. मला नाही म्हणता आले नाही. सॉरी वैगरे. वाईट वाटायचे. खूप भांडावेसे वाटायच. पण नाही ना. मी तस करू शकत नव्हते. कारण मिळणारा वेळ आधीच कमी.' 

एलोरा तिला जवळ घेऊन तिची पाठ थोपटून तिला शांत करत होती. तिला तिचे मन मोकळे करू देत अश्रू पुसत होती. 

" पण मी एवढी वाईट आहे का ग? मला नाही वाटत जगावेसे. खूप घुसमट होते. कोणाला सांगू शकत नाही. सगळ्या मैत्रिणीचे लग्न झाले ते त्यांच्या संसारात आहेत. मी त्यांना माझे दुःख सांगून त्रास देऊ इच्छित नाही. पण ही घुसमट नाही सहन होत आता." डोळ्यांतून येणारे अश्रू झरझर वाहतच होते. जणू काही तिचे मन सुद्धा त्या अश्रूंसोबत काही वेळा साठी का होईना रिते होत होते. 

एलोराला काहीतरी आठवले तसे, तिला पटकन आलेच सांगून बसुन रहायला सांगितले. परत आली तेव्हा तिच्या हातात "बेन अ‍ॅन्ड जेरीस्" चे दोन आईस्क्रीमचे टब घेऊन आली. तिला माहिती होते की, हिच्या उदासीपणा वर त्वरित उपाय म्हणजे हिची आवडती " चॉकलेट फझ ब्राऊनी" आईस्क्रीम. आता आईस्क्रिम वल्लरीचा वीक पॉईंटच म्हणा. मॅडम सगळे दुःख विसरून गेल्या आणि
"दे इकडे" म्हणत जवळजवळ ओढूनच घेतल तशी एलोरा हसत सुटली. 

"अग खादाडे, कोण म्हणेल की तू आत्ता धो धो पाऊस पडेल इतक रडली. जरा दमाने खा. कुठेही पळून नाही जाणार तुझी आइस्क्रीम. " 

" कुठे पळून नाही जाणार पण तू एकच घास म्हणत सगळ गट्टम करतेस. तू तुझी "कॉफी कॉफी बझ बझ बझ" आईस्क्रिम खा. काय ते नाव?  बझ बझ बझ! हा हा हा ". अगदी चिडवत होती वल्लरी. 

एव्हाना पाऊस थांबला होता. वातावरण अगदी आल्हाददायक झाले होते. तरीही ह्या दोघींच आईस्क्रीम खाणे चालूच होते. आईसक्रीम खाण्यात इतक्या व्यस्त होत्या की हवेतला गारवा अंगाला टोचे पर्यंत बसुन होत्या. जगावेगळेच होत्या दोघी. म्हणूनच लगेच ट्यूनिंग जमली. हवेत गारवा वाढला तस दोघी आत येऊन हीटर ऑन करून उरलेली आइस्क्रीम संपवण्यात व्यस्त होत्या. 

आइस्क्रीम संपली तशी एलोराने सक्त ताकीद देऊन झोपायला जबरदस्तीने पाठवले.
" जास्त विचार करत बसू नकोस. उद्या लौकर निघू. वाटेत एक काम आहे. ठीक आहे है?" करुन हिंदी मधेच शेवटचे वाक्य वल्लरीला बोलली. 

वल्लरी एकदम नाचतच तिच्याकडे आली, " वाह दिल खुश कर दिया. पोटोबा तर खुशच आहे. परत म्हण मला ऐकायचं आहे." 

बळेबळेच एलोराने तिला झोपायला पाठवले. आता ही जागी राहिली तर डान्स करायला सांगेल म्हणून भीती. 

ऐकेल ती वल्लरी कसली. आता तर हट्टालाच पेटली. अक्षरशः धोशा लावला. हिंदी मधून बोल करत. त्यातच स्पीकरवर दोघांचे आवडीचे गाणे प्ले केले. 

"दिल यह बेचैन वे रास्ते पे नैन वे
दिल यह बेचैन वे रास्ते पे नैन वे
जिन्दड़ी बहाल है सुर है ना ताल है
आजा साँवरिया आ आ आ आ
ताल से ताल मिला हो ताल से ताल मिला 

दिल यह बेचैन वे रास्ते पे नैन वे
जिन्दड़ी बहाल है सुर है ना ताल है
आजा साँवरिया आ आ आ आ
ताल से ताल मिला ओ ताल से ताल मिला 

तनका दिन तक दिन दिन तनाक दिन दिन
तकिता ट्किता दिक्ता डिना धूम
तनाक धूम तक डिना डिना धूम\" 

गाण्याबरोबर दोघींची पावले थिरकत होती. सोबतच नवी पहाट नव्या गोष्टी घेऊन सूर्य उगवत होता. 
     दुसर्‍या दिवशीची सकाळ धावपळीत झाली. रात्रीच जागरण दोघींना डोळ्यांवर बेतल. पण सोबत घालवलेले आनंदी क्षणापुढे कुठल्याही गोष्टी नगण्यच. 
सगळ्यांना भेटून वल्लरीने तिचा फिरायला जायचा प्लॅन सांगितला तसे सगळे जोरात कल्ला करू लागले होते. तिने ती जागा विचारपूर्वक शोधून काढली होती. सगळ्यांना आवडेल अशीच. 

क्रमशः 
@पूजा आडेप.


पाहूयात पुढच्या भागात नक्की कुठली धमाल करणार आहेत. भाग आवडल्यास लाइक, शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका. 

मागचा भाग 8 येथे लिंक वर क्लिक करून वाचू शकता. लिंक app वरची असल्याने app मध्ये open होईल. 
https://irablogging.page.link/Aiz4dUBgxrvCnkAQ8

🎭 Series Post

View all