अनुभव एक, किस्से अनेक- भाग 4 नवारंभ
नमस्कार ईरा वाचकहो,
मागच्या भागात आपण बघितले, फक्त विमानच नाही तर वल्लरी च मन सुद्धा उड्डाण करत होते. तिचा विमानप्रवास, विमानतळ आणि वेगवेगळ्या नवलाई बघत प्रवास सुरू असतो.
आता पाहूयात पुढे,
एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ती ही की आता अमेरिकेत संवाद हा इंग्लिश मधूनच केला गेलाय. पण वाचकांच्या सोयीसाठी मराठी मधून असणार आहे. धन्यवाद!
एकदाचं विमान सॅन फ्रान्सिसको आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. केबिन क्रु ने अनाऊन्समेंट करत तापमान, स्थानीय वेळ, दिवस जुजबी माहिती पुरवली.
वल्लरी च मन कधीच अमेरिकेत पोचले होते. मोबाईल मध्ये आपोआप नेटवर्क मुळे स्थानीय वेळ अपडेट झाली. बाकी बरेच गॅझेट मोबाईल ला कनेक्ट असल्याने आपोआपच सगळे अपडेट झालं.
खरं तर सगळ्यान पासून दूर एकटी कल्पना करूनच तीच मन थुईथुई नाचत होतं आणि उदासपण झालं. उदास ह्या साठी की, आईच्या हातच जेवण नाही मिळणार. खूप दिवसांनी एक शांतता अनुभवत होती. जणूकाही काहीतरी गवसल्या सारखे. मिश्र भावनांचा अनुभव घेत, विमानातून बाहेर आली तोच अंगावर सर्रकन काटा आला, दिवसा तिला चांगलीच हुडहुडी भरली. पटकन सोबत आणलेला ओव्हरकोट घातला. सूर्य नारायणच दर्शनाची शक्यता कमीच होती.
सगळ्यात आधी वॉश रूम मध्ये जाऊन फ्रेश झाली.
\"आहा! कित्ती छान. हे वॉश बेसिन ला कोमट गरम पाणी. हात तर अजिबातच काढू वाटेना.\" स्वतःशीच बोलत चेहरा धुवून घेतला. प्रवासाचा सगळा शीण निघून गेला. वल्लरी साठी मेकअप एक काजळ आणि लिपस्टिक. तेवढ्यावर सुद्धा तिचा चेहरा अगदी उठून दिसायचा. उभा चेहरा, अधोरेखित करणारी हनुवटी, कान त्या थ्री इडियट्स मधल्या आमीर सारखे किंचित बाहेर, त्यात मोत्याचे कानातले, नाक अगदी सरळ तर शेंडा गोलाकार, हसली की एका गालावर खळी. समोरचे दोन दात सशासारखे हसत आणि बोलत असेल तर खूपच क्युट दिसायचे, ब्राऊन डोळे मासोळी सारखे आकार असलेले, रंग मध्यम गोरा आणि ओठांवर स्मित.पटकन काजळ आणि mac ची रुबि वू लिपस्टिक लावून, घनदाट ब्लॅक आणि ब्राऊन मिश्रित केसांचा वर चंबू बांधुन बाहेर इमिग्रेशन च्या दिशेने चालू लागली. लोकांच्या नजरा तिच्या कडे कमी आणि केसांन कडे जास्त होते. तिच्या केसांचा चंबू डोक्यापेक्षा जरा मोठाच दिसत होता.
\"अरे यार किती ही थंडी? इतकी थंडी पण असते?! ऐकुन होते आज तर अनुभवत आहे. कसे काय हे लोकं राहतात एवढ्या थंडी मध्ये काय माहिती!\" वल्लरी विचार करत च चालत आजुबाजूला निरीक्षण करत स्वयंचलित वाॅकवे वर जाऊन थांबली. आपोआप पुढे जाणारा बेल्ट आणि त्याच बाजूच्या भिंती वर त्याविषयी चा इतिहास बघत जाताना गम्मत वाटली. आगमन हॉल मध्ये येऊन इमिग्रेशन च्या लाइन मध्ये नंबर यायची वाट बघत उभी होती.
नंबर आला तसा ती पटकन काऊंटरपाशी जाऊन उभी राहिली.
वल्लरी- \" गुड मॉर्निंग Mr. Alex !\"
इमिग्रेशन अधिकारी Alex - (तिच्या निरीक्षण शक्तीच कौतुक वाटलं) \" गुड मॉर्निंग मिस. कृपया आपला पासपोर्ट द्यावे. \"
Alex साठीच्या आसपास असलेला अमेरीकन, भारदस्त व्यक्तिमत्व , पोट सुटलेल, निळे डोळे, गोरा रंग, उंच चेहर्यावर किंचित लालसर छटा, पांढरे केस , नाकावर असलेला चष्मा, चेहर्यावर थोडेसे गंभीर भाव आणि अनुभवी नजर.
वल्लरी ने पासपोर्ट दिला तस Alex ने नाव बघून तीच नाव उच्चारायच्या आधीच,
Alex - तुझ्या नावाचा उच्चार नक्की कसा आहे? (बर्याच वेळा नावाचा उपचार चुकल्याने गमतीदार गोष्टी झालेल्या होत्या)
वल्लरी ह्या प्रश्नाने बावरली, पण लगेच सावरत तिने उत्तर दिले- \" इट इज प्रोनाउन्सड् अॅज \" व ल्ल रीऽऽ\"
Alex - \"ओके! मिस वॅली. हे बरोबर आहे?
वल्लरी मनातल्या मनात डोक्यावर हात मारत, \" देवा!\"
वल्लरी ने हलकेच मान डोलावून \"हो\" म्हंटले. आता त्याला बरोबर उच्चार करत बसलो तर वेळ जाणार होता.
Alex - \" तूम्ही भारतीय मान डोलावून का बोलता? बर्याच वेळेस बघितले पण कळत काहीच नाही. हाहाहा.... असो. तुज्या कंपनी आणि कामाचे स्वरुप सांग बघू. \"
वल्लरी - \" माझी कंपनी कॅलिफोर्निया मधील सॅन फ्रान्सिसको मध्ये आहे. मी डायरेक्टर of सेल्स अँड मॅनेजमेंट पदावर आहे. सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन अजून कसे उत्पन्न वाढवता येईल काय-काय नवीन उपयोगी आणि परवडणाऱ्या गोष्टी लोकांसाठी आणता येतील वैगरे अजून बरेच काही आहे.\"
Alex - \" तुला काही सामान वैगरे डिक्लेअर करायचे आहे का? जसे की जिवंत प्राणीपक्षी, मांस, नाशवंत वैगरे? \"
वल्लरी - \" सगळे कंपनी सील पाकिटे आहेत. त्या व्यतिरिक्त कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वैगरे आहेत. \"
Alex - \" गुड. घरी कोण कोण आहे? काय काम करतात? \"
वल्लरी- \" घरी आई, बाबा आणि एक लहान बहीण आहे. आई एका कंपनी मध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजर असून , बाबा व्यावसायिक आहे...बहीण अजून पदवीधर परीक्षा देत आहे...\"
Alex - \" मग तुला हा जॉब का करावासा वाटला? इतक्या दूर? \"
वल्लरी- \" कारण मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप वाव आहे असे वाटते. म्हणून मी स्वतःला सुद्धा चॅलेंज केले आहे. \"
Alex - \" ठीक आहे...\"
पासपोर्ट वर इमिग्रेशन एंट्री चा शिक्का मारून पासपोर्ट परत दिला. ग्रीन लाइट लागली तशी वल्लरी इमिग्रेशन काऊंटर च्या पुढे येते तोच Alex ने तिला गाठलं.
वल्लरी सोबत थोड्या गप्पा मारून तिला तिच्या आयुष्याच्या नवारंभासाठी शुभेच्छा देऊन निघून गेला....
एक मोठ्ठा श्वास घेऊन वल्लरीने लगेज घेतले आणि बाहेर चालू लागली. एक नवीन जीवन जगण्यासाठी....
तिच्या नावाचा बोर्ड बघून ड्रायवर ला हसून अभिवादन केले. त्याने लगेज कार मध्ये पटकन ठेवून तिला बसण्यासाठी कारचा दरवाजा उघडला. वल्लरी ला खूप बरे वाटत होते. कार मध्ये थंडी वाजत नव्हती.
लवकरच कंपनी ने राहण्यासाठी दिलेल्या घरी पोहोचली. ... फ्रेश होऊन निवांत बघूयात घर करून वल्लरी झोपेच्या अधीन झाली. प्रवास, जेटलॅग आणि टाइम झोन बदलल्याने पटकन झोप लागली ....
क्रमशः
वाचकहो, तुम्हाला काय वाटते? कसा असेल तिचा पुढचा प्रवास? बघूयात पुढच्या भागात..
© पूजा आडेप.