अनुभव एक, किस्से अनेक- भाग 3 उड्डाण.

It's About A Girl Who Over Comes With All The Situation Which Are Drowning Her Mentally And How She Inspires Others To Fight And Stand For Self.
\"अनुभव एक किस्से अनेक भाग 3 - उड्डाण 

नमस्कार ईरा वाचकहो, 
आपण मागच्या भागात पाहिले की रेहान कसा वल्लरी ला बोलून बोलून कशा प्रकारे तीच मानसिकरीत्या खच्चीकरण करत आहे.  

आता पुढे, 

रेहान ची ती भाषा आणि बोलायची पद्धत ऐकून आता वल्लरी एकदम थंडपणे म्हणाली, \" ही भाषा आणि वागणूक बदल नाहीतर तू मला कायमचं गमावशील. आणखी एक पक्षाताप करून पण मी परत येणार नाही.\" 

अचानक रेहान वागणूक एकदम प्रेमळ झाली. सॉरी वैगरे बोलत होता. त्याला माहिती होते वल्लरी ला एक \"सॉरी\" बोलून सुद्धा गुंडाळता येते. होतीच तशी वल्लरी. मनाने हळवी, राग सुद्धा मिनिटाच्या वर टिकला नसेल कधी. कारण ती अतिशय क्रोधित खूपच कमी वेळा झालेली असेल. आर या पार निर्णय असतात. अधिक मध्ये वैगरे प्रकार नसतो. म्हणूनच रागावर नियंत्रण खूप होता तीच.  तिला स्वतःला माहिती होता ती एकदा का ठरवला तर मागे वळून बघत सुद्धा नाही. मग ते वादळ का येई ना का. तरी पण दुसर्‍यांना समजून घेता घेता जवळपास स्वतः जगणं विसरून गेली. म्हणूनच तिला ह्या सगळ्या लोकांपासून दूर खूप दूर जायचे होते.  

ह्या सगळ्या मध्ये रेहान च्या डोक्यात वेगळ्याच योजना चालू होत्या. तात्पुरतं वेळे साठी \" तू सांभाळून जा घरी आणि पोहोचल्यावर फोन किंवा मेसेज कर. \" - रेहान वल्लरी ला बोलला. 

आता वेध लागले उड्डाण चे. सगळ्या गोष्टी जसे की खायच्या आणि तिथे वातावरणा नुसार लागणारे कपडे वैगरे सगळी तयारी झाली. दिवस उजाडला उड्डाणाचा. अमेरिके ला जाण्याचा. आई- बाबा, बहीण कार मधून वल्लरी ला विमानतळावर सोडण्यासाठी निघाले.  साधारण साडे तीन तासांचा प्रवास. पुण्याहून मुंबई विमानतळ गाठण्यासाठी. प्रवास अगदी मजेत चालू होता. अधून मधून रेहान ला मेसेज द्वारे अपडेट करत होती वल्लरी. 

त्यात ही तो शुभेच्छा देण्याऐवजी परत तिला मनाला टोचेल असे बोलू लागला. 

रेहान- \" चाललीस मला सोडून तिकडे. आता तिकडे तू कोणाला पण पकडले तरी काय समजणार ना इथे?.\" 

वल्लरी पण वैतागून बोलली, \" मग नाही जात मी. घरीच बसते. माझे गरजा पूर्ण करू शकणार आहेस का? आणि एक पण शब्द मला घाणेरडा वापरायचा नाही भविष्यात सुखाने जगता यावे यासाठी चालली आहे मी. \" 

रेहान - \" बर बर...नीट रहा. कोणासोबत खिदळत बसू नकोस. पार्टी वैगरे ला जाऊ नकोस. येणार्‍या जाणार्‍या ला कंपनी मध्ये हाय-हॅलो करत बसू नकोस. \" 

सूचनांचा नुसता भडीमार केला त्याने तिच्या वर.  त्यामुळे तिची लवकरात लवकर देश सोडायची इच्छा झाली.  

तीन -साडे तीन तासांच्या प्रवासा नंतर मुंबई विमानतळावर पोहोचले. आत मध्ये प्रवासी सोडून बाकीच्या लोकांना प्रवेश बंद होता. जास्त वेळ कार थांबू शकत नसल्याने आई वडील आणि बहिणीने प्रवासा साठी आशिर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. 

जास्त वेळ इकडे तिकडे न घालवता सरळ एअरलाइन्स च्या चेक-इन काऊंटर ला वल्लरी ने मोर्चा वळवला. दोन्ही बॅगा चेक-इन ला देऊन हातामध्ये एक छोटी बॅग आणि डॉक्युमेंट्स ची एक सॅक एवढेच जवळ ठेवले. सिक्युरिटी चेक करून इमिग्रेशन साठी त्या वळणावळणाच्या रांगेत जाऊन उभी राहिली. तिचा नंबर येई पर्यंत इकडे तिकडे निरीक्षण चालू होते. इंटेरियर, लाईट्स आणि दुरूनच इमिग्रेशन काऊंटर नंतर दिसणारा मोठ्या अक्षरात \"Duty Free\" रोमांचित करत होता. डिस्काउंट किंमत  तर अगदी इकडे या करून बोलावत होते की काय वाटत होते. एकदाचा नंबर आला.  इमिग्रेशन ऑफिसर ला योग्य ती कागदपत्रे सादर करून जुजबी प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर एक शेवटी फोटो घेतल्यावर, आभार मानून शेजारच्या गेट मधून बोर्डिंग गेट कडे रवाना झाली.  अरे अरे...तिला तर आधी duty-free दुकाने पार करून आणि खायची रेस्तराँ पार करून बोर्डिंग गेट कडे पोहोचायचे होते. जवळपास सगळच आकर्षित करत होते. तिने पण चला जरा फेरफटका मारुन मग जाऊ करत परफ्यूम, मेकअप आणि मग अल्कोहोल आणि चॉकलेट एकाच दुकानात असल्याने तिथे पण जाऊन चॉकलेट चे प्रकार बघत होती. अल्कोहोल बाटली च्या अगदी सेम पण छोट्या छोट्या त्या बाटल्या पाहून तिला कोण ती गम्मत आणि आश्चर्य पण वाटले. तिकडून काढता पाय घेऊन पुढे रवाना झाली. ज्वेलरी, बुटीक, आर्ट & क्राफ्ट, बेकरी,  अत्यावश्यक गोष्टी, मेडिकल आणि मनी एक्स्चेंज अशी दुकाने बघून क्षणभर तिला मॉल मध्ये आहोत की काय वाटून गेले. 
आता फूड कोर्ट कडे तिने अक्षरशः धाव...हो धाव च घेतली. फूड तिचा वीक पॉईंट. फूड कोर्ट मध्ये कॉमन बसायला खुर्च्या आणि टेबल मध्य भागी मांडून बाजूने सुंदर अश्या रोपांची मोठया कुंड्या होत्या. काचेच्या जवळ थोड्या उंच बार टेबल आणि खुर्च्या होत्या. जेणेकरून खाताना पिताना बाहेर विमानाचे टेकऑफ आणि लँडिंग बघता येतील. त्यासोबतच सुंदर फ्लॉवर स्टाइल मधला हँगिंग आणि मंद प्रकाश. बाजूला गोलाकार मध्ये सगळे खायची रेस्तराँ ची चंगळ आणि वर्दळ होती. ह्या सगळ्यांन पासून थोडासा दूर मिनी गार्डन होता. त्या हिरवाई ने वेढलेले झाडे पाहून तिकडे खूपच प्रसन्न वाटत होतं. ती जागाच अशा ठिकाणी होती की कसल्याही प्रकारचा गोंगाट ऐकू येत नव्हता. थोडावेळ बसुन मग स्टारबक्स मध्ये जाऊन तिची आवडते \"चॉकलेट चिप फ्रेप्पुचिनो\" ऑर्डर केली. तोपर्यंत आजुबाजूला बर्गर किंग, मॅकडोनाल्ड, स्ट्रीट फूड, सबवे, बार, शावरमा  चा मेन्यू बघत \"वांगो\" च्या काऊंटर ला पोहोचली. तिकडे काचेच्या काऊंटर मध्ये सामावलेले दाक्षिणात्य पदार्थ अशा प्रकारे सजवून ठेवले होते की, पाहून तोंडाला पाणी सुटले. भानावर येत तिने तिची ऑर्डर घ्यायला गेली. हातात ग्लास पकडूनच बोर्डिंग गेट कडे चालू लागली. बोर्डिंग साठी अजून वेळ होता तर आई ला फोन करून सांगितले. रेहान ला एक मेसेज पाठवून दिला. कारण फोन केला तर त्याची टोचून बोलणारे शब्द ऐकायची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून तिने फोन फ्लाइट मोड वर सेट करून एअरपोर्ट च्या  वाय- फाय ला कनेक्ट केला. पण ऑनलाईन दिसणार नाही अशाप्रकारे सर्च इंजिन चालू केला. साधारण 10 मिनिटांनी बोर्डिंग ची घोषणा झाली. सीट नंबर झोन पद्धती मध्ये विभागले होते. अजून दोन मिनिटात झोन 1 फर्स्ट आणि बिझनेस क्लास साठी बोर्डिंग सुरू झाली. विमानात जाऊन 8A विंडो सीट जवळ जाऊन हँडबॅग वर च्या हॅट रॅक मध्ये ठेऊन, बिझनेस क्लास सीट वर निवांत बसुन आजूबाजूचे निरिक्षण करत होती. सौम्य अशी प्रकाशयोजना. एका ओळीत चार च सीट होत्या. छान डिप डार्क ब्राऊन सीट विथ लोगो हवी तशी आरामदायक करण्यासाठी काही बटने होती. पायांना सुद्धा आरामदायी वाटेल अशी व्यवस्था होती. पाय पसरून झोपता येईल अशी रचना होती. डाव्या बाजूला आर्मरेस्ट च्या इथे प्रेस केलं की जेवणासाठी ट्रे बाहेर येत होता. समोरच TV स्क्रीन विथ रिमोट आणि बरेच काही मनोरंजन करणारे चित्रपट, गाणी, गेम्स, ऑन बोर्ड चॅट आणि केबिन क्रु ला बोलावण्यासाठी ऑप्शन होते. बाजूलाच एका छोट्याश्या बॅग मध्ये मिनी टॉयलेटोरीज् , एक जोड हेडफोन सेट, नोटपॅड विथ पेन आणि त्या शेजारीच खाण्यासाठी छोट्या बॉक्स मध्ये ड्राय फ्रूटस् ठेवले होते. बाजूला एका कप्प्यात एक जोड मऊ मुलायम स्लाइड इन व्हाइट फूटवेअर, उबदार डार्क ब्राऊन ब्लँकेट विथ अजून एक छोटी उशी आणि एका छोट्या बॅग मध्ये छान झोपेसाठी आय स्लीपिंग मास्क, आवाज कमी करणारे नारिंगी रंगाचे इअर बडस् , पेपर मिंट च्या गोळ्या होत्या. एवढ्यात केबिन क्रु ने येऊन छानशी स्माईल देत दिलेल्या वेलकम ड्रिंक्स चा आस्वाद घेत बाहेरच निरीक्षण करत होती. लोडिंग मुळे धक्के सौम्य धक्के जाणवत होते. वल्लरी ला कधी एकदा विमान टेक-ऑफ करतं अस झाल. तिला आजूबाजूच काहीच भावेनास झालं. 

फायनली केबिन क्रु ने ऑल आउट बोर्ड ची घोषणा करून डोर क्लोज म्हंटल्यावर वल्लरी ला झालेला आनंद वर्णावा! पूर्ण विमानात आता अंधार होता. फक्त सीटबेल्ट आणि नो स्मोक साइनेज चा प्रकाश होता. एकदाचे विमान रनवे वर आले. ती लाइटिंग बघून डोळे दिपले. परमिशन मिळताच विमानाने उड्डाण केले. रात्री दिसणारी मुंबई, समुद्र आणि विमानतळ तो नजारा डोळ्यात जितका साठवता येतील तितका साठवत नव्या जीवनाच्या दिशेने निघाली वल्लरी. मागे सोडून सगळे त्रास, सगळी बंधने, जवळच्या लोकांना सोडून...दूर अनोळखी देशात निघाली. उड्डाण फक्त विमानाने च नाही तर तिच्या मानाने पण केले. पुढे काय होईल चा विचार करणं सोडून देत जेवणाचा asvad घेऊन झोपेच्या आधीन झाली. 

तीन - साडे तीन  तासांच्या प्रवासा नंतर अबुधाबी च्या विमानतळावर पोहोचली. पुढच्या विमानप्रवासा साठी आगमन एरिया मध्ये वल्लरी पोहोचली, तिकडे सिक्युरिटी चेक क्लीअर करून पुढे निघाली. बॅग्स अंतिम डेस्टिनेशनला पोहोचणार होत्या म्हणून काळजी नव्हती. पुढे चालत तर होती पण एवढं मोठ्ठ विमानतळ बघून ती स्तिमित झाली. डायरेक्शन बघत परत एकदा सिक्युरिटी चेक क्लीअर करत पुढे निघाली. आता तर खूप सारे दुकाने होती. काय नव्हते तिकडे? खाली मोठाली उंची घड्याळे, बूट, कपडे, हिरे, सोनं, लगेज बॅग्स, पुस्तक, मनी चेंज, अगदी कार च दुकान सुद्धा होतं. कार तिकडे बुक केली की घरपोच देणार. चमचम करणारी दुसरी दुनियाच आणि वरच्या मजल्यावर फूड कोर्ट. उगाच नाही लोक गुणगान गात असे वाटून गेले. 

ह्या सगळ्या गोष्टीं मध्ये जास्त वेळ न दवडता बोर्डिंग गेट कडे कूच केले. हाये रे देवा!  पुन्हा एकदा सिक्युरिटी चेक क्लीअर करायच होता. पण त्या आधी परत एकदा अमेरिकेचे चे अधिकारी सगळे कागदपत्रे तपासून घेत होते. अमेरिकेला जाणारे सगळ्या प्रवाशांची पुन्हा एकदा कडक तपासणी. वल्लरी पुढे जातच होती की तिने आजुबाजूला पहिल. पूर्ण जागा CCTV आणि अचूकतेने लोकांची गर्दी नियंत्रण केलेली होती. ज्यांनी duty-free बॉटल घेतल्या होत्या त्या फेकण्यासाठी सांगितले.  बापरे!  किती ते नियम. सगळ क्लेअर करून बोर्डिंग गेट कडे जात होती तर तिच्या लक्षात आले की तिथे सुद्धा अजून खूप सारे दुकाने आहेत. तेव्हाच तिने ठरवले की खरेदी बोर्डिंग गेट ला जाणार आहोत तेव्हाच शेवटी करायची.  

परत एकदा चौदा तासांच्या प्रवासासाठी वल्लरी उत्सुक झाली. एक एक मेसेज आई आणि रेहान ला पाठवून विमानात प्रवेश केला. पण इतकी दमून गेली की बसल्या बरोबर झोपेच्या आधीन झाली. दोन तासांनी जाग आली तेव्हाच तिला कळलं की आपण आता ढगात आहोत. सुंदर तो नजारा डोळ्यात साठवत होती की केबिन क्रु ने ब्रेकफास्ट आणून दिला. बिझनेस क्लास सीट असल्याने पाहिजे तेव्हा जेवण मागवायची सोय होती. ब्रेकफास्ट करून मस्त परत एकदा ताणून देत झोपेच्या आधीन झाली.  

क्रमशः 

चला तर पाहूयात पुढे काय होते?  तुम्हाला काय वाटते?  कसं झालं असेल लँडिंग आणि बाकीचे सोपस्कार?  नक्की कळवा हा भाग कसा वाटला? 

©️ पूजा आडेप.















































































































\"अनुभव एक किस्से अनेक - प्रारंभ \" भाग 2 

नमस्कार ईरा वाचकहो,  
प्रत्येक भागासाठी एक व्यक्त होणारा उप-शब्द आहे. \"अनुभव एक किस्से अनेक-\" हा कथेचा मुख्य शीर्षक आहे.  
आपण मागच्या भागात पाहिले होते की, कशी वल्लरी मायदेशी वर्षभराने परतली. तिची हुरहुर थोडक्यात आपण बघितलीच आहे. आता कथा थोडीशी मागे जाणार आहे. सुरुवातीच्या दिवसांत म्हणजेच कसा प्रारंभ झाला तिच्या प्रवासाचा... 

साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट, वल्लरी आणि रेहान दोघे एकाच कंपनी मध्ये सोबत काम करत होते. दोघे ही पाच वर्षे झाली रिलेशनशीप मध्ये होते. घरीही दोघांच्या एकमेकांबद्दल माहिती होते. दोघांनीही कंपनी भविष्याच्या दृष्टीने अमेरिकेमधील कंपनी साठी प्रयत्न सुरू केले.  

नशिबाने म्हणा किंवा देवाची इच्छा वल्लरी ची निवड झाली. आपसूकच रेहान च्या मनामध्ये एक इर्षे सोबतच असुरक्षितता निर्माण झाली. ज्यापासून वल्लरी अनभिज्ञ होती. 
वल्लरी ने ठरवले की मागे वळून नाहीच पहायचे आणि थांबायचे पण नाही. कारण तिच्यासाठी अमेरिका चा जॉब एक पळवाट सोबतच एका घुसमटून जगत असलेल्या मनासाठी शांतता होती. तिला कोणीच म्हणजे कोणीच नको होतं. अगदी आई वडील आणि बहीण सुद्धा! 

जस- जसे कागदपत्रांची पूर्तता होत आली तशी वल्लरी ची उत्सुकते सोबतच धडधड ही वाढू लागली होती. ती तिचा अमेरिका व्हिसा चा अनुभव रेहान ला सांगत होती  खूप उत्सुकतेने, पण रेहान वेगळ्याच विचारात हरवून गेला होता. मनामध्ये खूप काही चालू होतं त्याच्या... 

शेवटी रेहान बोललाच तिला - \" झालं तुझ्या मनासारखं ना?  तुझी तर मनापासून इच्छा नव्हती ना माझे पण तुझ्यासोबत व्हावे म्हणून? तू नक्कीच मनापासून प्रार्थना नसशील केली असणार म्हणूनच नाही झाल माझं.\" 

वल्लरी  - \"...अं?\" मिश्र नजरेने त्याला बघत ऐकत होती. 

रेहान - \" तुझं काय आता! तू आता मुक्त पक्षी आहेस. तिकडे गेलीस की काही पण करा. कोणी विचारणारे नाही की बोलणारे नाही.\" 

वल्लरी च्या डोक्यात एकच कळ गेली. तिरीमिरीतच रेहान ला बोल्ली,\" खबरदार रेहान!  एक अजून शब्द नाही. एवढ्या वर्षांच्या नात्यामध्ये तू मला एवढेच ओळखतोस का? मी एकदा ऐकून आणि खपवून घेतलं तुझ्या शिव्या आणि माझ्याशी अनादरनीय वर्तन. आता अजिबात नाही.\" 

तीच उत्तर ऐकून रेहान चा रागाचा पारा अजून वाढला.  
\" तुला जॉब मिळाला म्हणून तुझी जीभ पण खूप बोलायला लागलीये. माझ्यामुळेच तुला हा जॉब लागला.\" 

हे ऐकून तर वल्लरी चक्कर येऊन पडायची बाकी होती. तिने सुद्धा आता प्रत्युत्तर द्यायचे ठरवले. परिणामांची चिंता न करता. 

वल्लरी - ( रागातच) \" हाहा...तोंड पहा आरशात.  म्हणे तुझ्या मुळे जॉब लागला. असं कोण होतं रे तुझ्या ओळखीच तिकडे? चल मी मानते की होतं कोणीतरी तर मग तुला का नाही लागला बरं? मुलाखत मी दिली. मेडिकल माझं झालं. व्हिसा साठी मुलाखत मीच दिली. सगळ्या कागदपत्रांची पूर्तता सुद्धा मीच एकटीने केली. तू काय केलंस? काहीच नाही शिवाय एक मुलाखत ती पण सोबत आलास फार मोठे उपकारच म्हणायचे.\" 

रेहान ला तिचे बोलणं अक्षरशः झोंबत होतं. ती बोलत असलेलं प्रत्येक वाक्य खर असलं तरी त्याने तिला टोचून बोलणं अजिबात कमी केला नाही. आधीच वल्लरी च्या मनातून जवळपास उतरलेला रेहान अजूनच जास्त उतरत होता. रेहान च्या मते वल्लरी च पान पण नाही हलू शकत त्याच्या शिवाय.  यामुळेच कदाचित तो अजून जास्तच नियंत्रण करू पाहत होता. 

अगदी तुसडेपणाने रेहान तीला ,\" चल निघ तू. मला तुझे तोंड पण नाही पहायचाय.\" 

क्रमशः 

पाहूयात पुढच्या भागात वल्लरी काय करते?  तुम्हाला काय वाटते वाचकहो?  नक्की टिप्पणी करा.  

©️ पूजा आडेप. 






















































































🎭 Series Post

View all