A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session06087cdf902a9194bd3e100cbb34d8df950a87227202b6d7e6d10739f43597e96372d965): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Anubhav
Oct 26, 2020
प्रेम

अनुभव

Read Later
अनुभव

अनुभव:- 

"अनुजा!
अगं ऐ अनु! मी आली आहे बघ"
रिया ने आवाज दिला पण अनु तिला रूम मध्ये नाही दिसली.
रिया शोधत शोधत  गेली तर ही
बाल्कनीत एकटी उभी राहून दूरवर त्या समुद्राकडे , क्षितिजाकडे बघत असलेली अनु तिला दिसली .
हळूच अगदी दबक्या पावलांनी ती तिथे पोचली.
जवळपास 10 मिनिटे रिया  एकटक तिच्या चेहरयाकडे बघत होती , पण तिच्या तिथल्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा अनु ला नव्हती.
अनु आपल्याच विश्वात रमली होती , थोडे खट्याळ, थोडे गोड हसू तिच्या चेहऱ्यावर विलसत होते. अनुला असे आनंदात बघुंन रिया ला आनं होत होता आणि त्याहीपेक्षा जास्त आश्चर्य वाटत होतं. खूप दिवसांनी त्या दोघी एकत्र आल्या होत्या. अगदी घट्ट मैत्रीणी होत्या त्या फक्त आपापल्या व्यापात अडकून पडल्याने  फोनवरून बोलायच्या. 
अनुजा ,एक हुशार, चंट, खिलाडू मुलगी . तिच्या बोलक्या स्वभावाने सगळ्यांना आपलंसं करणारी. रिया आणि अनुजा शाळेपासूनच्या मैत्रिणी अगदी इत्यंभूत  एकमेकींशी बोलणाऱ्या. पण गेली काही वर्षे अनु पार बदलून गेली होती. एकलकोंडी , रागीट आणि चिडचिडी जो तिचा स्वभाव मुळातच नव्हता . कोणाला भेटणं नाही , कुठे जाण नाही फक्त व्याप निभावायचा इतकेच ती करत होती. मग एके दिवशी अचानक नाहीशी झाली . गेले  जवळपास चार वर्ष तिचा काही पत्ता नव्हता आणि जशी गेली तसाच अचानक फोन 2 दिवसांपूर्वी फोन करून तिने रिया ला एका बीच रिसॉर्ट ला बोलावले तेही 4 दिवसांची रजा घेऊन ही ताकीद देऊनच. आनंद , काळजी , हुरहूर या सगळ्या भावना एकाच वेळी मनात आल्या आणि लगेच भराभर सगळं आवरून रिया सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचली. हे सगळं क्षणात मनात येऊन गेलं आणि रिया पुन्हा वास्तवात आली.
" अनु " तिच्या खांद्यावर हात ठेऊन स्वतःचे असणे जाणवून दिले .
"रिया" आनंदाने रिऍक्ट होत अनुने घट्ट मिठी मारली "केव्हा आलीस? मला कळलेच नाही बघ!"
रिया एकदम खळखळून हसत म्हणाली "आत्ता आले तुझ्यासमोर"
हातातील बॅग, पर्स खाली टीपॉयवर ठेवत   रिया ने स्वतःला सावरले आणि फ्रेश होण्यासाठी गेली.
बाहेर आली तर मस्त गरम वाफाळलेला कॉफी चा मग हातात देत अनु म्हणाली"थँक्स  रिया , कुठलाही प्रश्न न  विचारता, मी उद्या  पोहोचते म्हणालीस आणि आलीस सुद्धा. मला माहित आहे तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत , सगळं बोलेन, सगळं सांगेन , थोडं रिलॅक्स हो आणि मला ही जुळवून घेऊ दे कसे काय आणि कुठून सुरू करू."
" अनु, प्रवासाचा सगळा क्षीण निघाला , तुला बघून आणि सोबत मस्त कॉफी घेऊन " हसत रिया म्हणाली.
थोड्याच वेळात छान गरम बटाटे वडे , कांदा भजी, व्हेज कटलेट्स आणि ग्रील सँडविच असा हाय टी मेनू वेटर ने आणला . शांतता खुप काही बोलत होती , सोबत छान रोमँटिक गाणी सुरू होती हसत जुन्या शाळेच्या गप्पा रंगात आल्या होत्या. 
एक शब्दही रिया तिला काही विचारात नव्हती , फक्त बोलू देत होती.
समुद्र किनारा अगदी जवळ होता. Hi Tea झाल्यावर संध्याकाळी चालत दोघी फिरायला निघाल्या , तो वारा , त्या लाटांचा आवाज छानसा तो संधीप्रकाश जणू मुद्धाम हे सगळं साधले जात होतं.
त्या लाटा अंगावर घेत, भिजत ,ओले होत जणू पुन्हा अनु लहान झाली होती . 
तिचे अस हे वागणं , तिला निरखत रिया छान observe करत होती आणि ती म्हणेल त्याला साथ देत होती.
दमून थोड्या वेळाने त्या दोघी वाळूत बसल्या.  बाजूला वाळूत हात फिरवत अनु मनाची तयारी करत होती .
" आज जवळपास चार वर्षाने आपण भेटतोय. तूला खूप काही विचारायचं आहे हे मला माहित आहे , मलाही खूप बोलायचं आहे . मी अचानक का गेले? कुठे होते आजवर ? अचानक का तुला फोन केला ? काय केलं चार वर्ष? अनेक प्रश्न भेडसावत असतील तुला, हो ना?"
" अनु , तुझी प्रचंड काळजी वाटत होती. बरं वाटलं खूप काल तुझा आवाज ऐकून . राहिले हे सगळे प्रश्न तर त्याचे उत्तर तू देणार आहेस हे मला माहित आहे. तुला आनंदी बघून खूप बरे वाटतंय ,तुला आज मी पुन्हा लहान झालेलं बघितलं खूप शांत वाटतेय.  मी काहीच विचारणार नाहीय . तुला जे बोलायचं , सांगायचं ते तू बोल , मी फक्त ऐकण्याच काम करणार आहे. तू पार कोलमडली होतीस , जगायला धडपड करत होतीस , कोंडली होतीस , या पलीकडे का आणि कसं हे तूच सांगू शकशील."
"रिया , कुठून सुरवात करू कळत नाहीय . तुला आठवत का ग,  आपण कधी बोलायचो की काय हवं आयुष्यात ते?"
"अनु ,मुक्त बागडणारी तू , तुला हवं होतं फक्त मुक्त आयुष्य ज्यात फक्त आणि फक्त प्रेम असावं ."
थोडंस हसत अनु ने सुरवात केली " आणि बघ न काय पुढ्यात आलं ते !
माझं आयुष्य हे फक्त देणं दिल्यासारखं सुरू होते. प्रेम काय ते माहीत झालच नाही कधी. व्याप पुरे करायचे फक्त!  काम असो की शरीर असो,  का तर बांधले गेलो म्हणून, खूप रडायचे की का हे असे? का यातून सुटका नाही? नको होते मला जगणेच. कोणीतरी फक्त डोक्यावर हात ठेवावा , प्रेमाने बोलावे इतकीच माफक अपेक्षा होती ना!  काय चूक होती यात ?"
हलकेच अनुचा हात हातात घेत रिया ने  कुरवाळला. 
" नोकरी करायचीच होती ,का तर तोच एक मार्ग होता स्वाभिमान जपण्याचा.ते करत होते पण सगळं कृत्रिम वाटत होतं. कंटाळा आला होता सगळ्याचा. नको ऑफिस मधले दुतोंडी लोक नको झाले होते . कोणी नको होते की जे मला ओळखतील वीट आलेला सगळ्याचा  , म्हणून एक दिवस केली हिम्मत आणि निघाले नवीन जग शोधायला जिथे मला कोणी ओळखणार नाही आणि काही विचारणार नाही. कुठे जायचे , काय करायचे काहीच मनात नव्हते. होती ती फक्त उद्विग्नता ,संताप आणि एक प्रयत्न करण्याची इच्छा.
जिथे कधी गेले नाही अस ठिकाण शोधून 4 दिवस फक्त शांत व्हायचे हे ठरवून मोबाईल सुद्धा बंद केला का तर कोणी फोन करू नये , काही विचारू नये. 
शांत निवांत असे ठिकाण जिथे फक्त निसर्गाची कूस असावी म्हणून नागरहोले नॅशनल पार्क च्या एका रिसॉर्ट चे तिकिटं बुक केलं आणि निघाले.
फक्त झोपावे खूप शांत इतकेच काय ते मनात होते , प्रवास सुरु झाला त्यातही कोणी जास्त सोबत नको म्हणून  1st AC चे तिकीट काढले होते. बाहेर निसर्ग दिसत होता पण मनापर्यंत पोहोचत नव्हता . मजल दरमजल असे करत , कोणाशीही काहीही संवाद नाही , काही खाणे पिणे नाही  असा तो प्रवास मी पूर्ण केला. ठरल्याप्रमाणे मला पीक करायला रिसॉर्ट ची गाडी आली होती , त्यामुळे तेही सहज झाले आणि रिसॉर्ट ला पोहचले.
तिथे जात असताना मात्र जे बघत होते , ते सृष्टी सौंदर्य, अफलातून biodivesrsity याने माझे भान पूर्णपणे हरपून गेले बघ . मनातले सगळे सावट जणू धक्का लागल्याप्रमाणे बाजूला होत गेले. 
खूप सिम्पल पण खुप छान असे ते ठिकाण होते. छान ती 'कबिनी' नदी ,हिरवेगार जंगल , उंच उंच झाडे जणू मी निसर्गाच्या कुशीत शिरले होते.
तिथे पोचल्यावर मस्त गरमागरम कॉफी घेतली, छान फ्रेश झाले,  पोर्च मध्ये बसून हलकासा आहार घेतला आणि खूप दिवसांनी कोणतीही गोळी न घेता शांत झोप लागली तेही पोर्च मधल्या सोफ्यावर. कधीतरी झोप लागली आणि मध्येच कोणीतरी वावरतेय अस जाणवलं.
मी डोळे किलकिले करून बघितले तर कोणी एक माणूस माझ्या अंगावर ब्लॅंकेट टाकत होता.
 मी दचकले आणि ओरडले
" कोण तुम्ही ? मला हात लावायची हिम्मत कशी झाली?"  या आवेगाने मी रागावून बघितले तर जणू त्याला कळले या अविर्भावात " खूप थंड वाटते इथे रात्री. तुम्ही गेल्या तासभारपासून इथे आहेत , मी बघतोय केव्हाचा . पण इतकी शांत झोप कशी मोडावी म्हणून फक्त ब्लॅंकेट टाकायला आलो. " चक्क मराठीत बोलला  तो. 
मी फक्त "ओके" इतकंच बोलले आणि उठून रूम मध्ये जाऊन धाडकन दार लावून घेतले आणि बेड वर झोकून दिले स्वतःला. थकव्यामुळे की  मनाच्या शांततेमुळे माहीत नाही पण खूप गाढ झोप लागली त्या दिवशी. 
पहाटे जागी झाले ती पक्षांच्या किलबिलाटाने.
उठून छानसा आळस दिला आणि दार उघडले तर तोच व्यक्ती समोर पोर्च मध्ये समोरील झाडाकडे बघत होता. मला खंत वाटली आणि जाणीव झाली की कालचा त्याचा उद्देश वाईट नव्हता. याच विचारात फ्रेश व्ह्यायला गेले . मस्त गरम पाण्याने चेहरा धुतला , आणि फ्रेश होऊन तशीच नाईट ड्रेस वर रुम च्या बाहेर आले. तिथल्या केअरटेकर ला सांगून कॉफी पोर्च मध्येच मागवली आणि छान निसर्गाचा अनुभव घेत दिवसाची सुरवात केली. कालचा तो व्यक्ती कोण असेल हा विचार सारखा मनात येत होता , तेवढ्यात  कसला तरी मोठा आवाज झाला मी दचकून मागे पाहिले तर एक लहान मुलगी घाबरून उभी होती आणि तिच्या बाजूला एक झाडाची  मोठी फांदी पडली होती आणि एक माणूस खाली पडला होता.जे कोणी होते ते एकदम धावत गेले " जॉय , हाऊ आर उ माय सन?" म्हणत एक वयस्क त्याला उठवायला  बघत होता. 
त्याला लागले होते तरी हसत " हे माय ओल्ड मॅन , आय आम गुड " म्हणत उठला.
कपडे झटकले ,वर मान केली तेव्हा लक्षात आले की हा तो कालचाच व्यक्ती ज्याने आज या लहान मुलीला फांदीपासून वाचवले होते. 
त्याचे नाव जॉय इतके तर कळले होते. 
हसत बाजूने जात असताना "एक्सक्यूज मी , आय आम सॉरी फॉर येस्टरडे अँड  थँक्स." मी म्हणाले.
फक्त गोड स्माईल देऊन तो निघून गेला. थोड्या वेळाने मी बाहेर फेरी मारावी म्हणून रूम बंद केली आणि रिसॉर्ट च्या मेन गेट पर्यंत  चालत आले आणि तिथून गार्डन एरिया कडे वळाले. छान रंगीबेरंगी फुलझाडे , मुलांचे झोपाळे , उंच उंच झाड आणि कानावर येणार पाण्याचा खळखळाट ,मन प्रसन्न करत होता. मागून 'हाय'असा आवाज आला बघते तर तो जॉय होता.
" काल तू गोड झोपली होतीस , उठवावेसे वाटत नव्हते पण इथली हवा, गारठा सोसणार नाही म्हणून न विचारता तसे केले . नजरेतील राग समजू शकतो कारण एक अनोळखी एकदम जवळ का आला हा प्रश्न अगदी साहजिक आहे. "
" तुम्हाला मराठी कसे येते आणि मी मराठी हे कसे कळले?"
पुन्हा तेच मिश्किल हसत " अनुजा जोशी , बरोबर ना?"
माझ्या नजरेत खूळ प्रश्न बघून " मी जॉय , म्हणजे आनंद माझे नाव. जन्माने मराठी पण वाढलो इथे त्यामुळे मराठी येते. इथला कारभार जरी दुसरे बघत असले तरी मी या रिसॉर्टचा दत्तकपुत्र आहे. म्हणजे माझे बाबा इथे मॅनेजर होते , एका अपघातात ते गेले आणि त्यांचे मित्र असलेले इथले मालक म्हणजे सकाळचे ते ओल्ड मॅन माझे काका यांनी मला आधार दिला. त्यांना मी आणि मला ते असे आम्ही बांधले गेलो."
पहिल्याच भेटीत खूप मोकळेपणाने तो बोलत होता आणि मला त्याचा तो मोकळेपणा , चांगुलपणा भावत होता.
हसत थोड्या गप्पा झाल्या , तोवर सूर्य छान वर आला होता आणि पोटात कावळे ओरडायला लागले होते. जणू हे त्याला जाणवत होते.
 " मला तर खूप भूक लागलीय ,छान गरमगरम इडली सांबार चा वास येतोय मी तर जातोय " म्हणत उठला आणि चालायला पण लागला. नकळत मी पण त्याच्या मागोमाग निघाले.
त्याच्या त्या नि:संकोच वागण्याने , बोलण्याने मलाही मोकळे वाटत होते आणि हसत , दिलखुलास मनाने मी त्याच्या सोबत वेळ घालवत होते. प्रत्येक वेळी त्याचे वागणे कधी मिश्किल पणे , तर कधी अगदी मॅच्युरिटी ने तर कधी मैत्री वजा अधिकार वाणीने तो सगळ्यांशी खूप छान वागत होता . माझ्यासाठी हा खूप नवीन अनुभव होता ज्या मधून शिकायला मिळत होते आणि कुठेतरी जो वेगळेपणा अनुभवण्यासाठी आणि नवीन काही शोधायला बाहेर पडले ते मिळत होते. 
नकळत त्याचा सहवास आवडत होता आणि तिथले रम्य वातावरण , साधे सिम्पल आयुष्य हवे हवेसे वाटत होते. 
काही दिवसांसाठी आलेली मी आता जवळपास महिना व्हायला आला होता.
आणि एकहि दिवशी मला "काय मग अनुजा मॅडम , कश्या आहेत ? आमच गाव , परिसर , लोक कशी वाटतात?" जॉय मिश्कीलपणे बोलत होता.
" जॉय , खर तर तुम्हाला हे नाव अगदी शोभत. तूम्ही दुसऱ्याला आनंद देता कायम , हसू आणता निर्जीव चेहऱ्यावर . तूम्ही खर तर इथला जीव आहात. परिसर , लोक  जागा म्हणले तर हेच मला हवे होते असे वाटते. आयुष्यात कधी काय हवे हे कळले नव्हते पण आता वाटत आहे की कदाचित हेच आणि असेच काही."
"काय म्हणताय मॅडम , चक्क माझी तारीफ!"
"आधी बघा, आपण समवयस्क न ? मला सगळे माझे जवळचे अनु म्हणतात , तुम्ही पण तेच म्हणा . मला आवडेल."
"ओके , मॅडम म्हणजे अनु , थोडा वेळ लागेल पण म्हणतो.
तू पण मला जॉय च म्हण फक्त.
मी हसून मान डोलावली.
पण काय म्हणताय ? सगळं ठीक ना , नाही एक विक म्हणून आलीस आणि आज महिना झाला तरी तुझं बुकिंग सेम आहे."
नकळत त्याने विषयाला हात घातला होता , थोडं ओशाळून " नाही म्हणजे मला कुठे जायचे ते ठरले की जाईन मी. का रे तुला काही प्रॉब्लेम आहे का?"
" अनु असे नाही , तुला योग्य वाटले तर बोल नाहीतर नको. पण मला जितके कळते त्यावरून काहीतरी वेगळे हे मला पहिल्यापासून जाणवते आहे. तू एक चांगली व्यक्ती म्हणून थोडी काळजी वाटत होती म्हणून बोललो . माफ कर जर तुला तुझ्या वैयक्तिक गोष्टीत बोललो असेल तर." आणि हसत तो कोणीतरी हाक मारली त्या दिशेने लगेच गेला.
मी पण पुन्हा माझ्या पूर्व विचारावर आले , मधल्या काळात मी कोणाला आठवले नव्हते आणि फोन म्हणशील तर मी बंदच करून ठेवला होता. 
न जाणे का पण जॉय न माझे नकळत छान बॉंडिंग जमले होते.
"जॉय " मी हाक मारली तसा तो मागे फिरला " मी बोलू का तुझ्याशी? तुझे काम झाले की मला त्या गार्डन ला भेटशील का?"
"ओके मॅडम" हसत तो गेला.
तासाभराने रूम च्या दारावर नॉक झाले "येऊ का? मी जॉय".
"अरे ये ना. किती वाजले रे?"
"5 वाजत आलेत! एक काम कर ना!  तू फ्रेश हो आणि ये बाहेर . मी थांबतो बेंच वर आहे बाहेर , मग छान कॉफी घेत बोलू ,मी तयारी सांगतो तशी."
त्याचे बोलणे आवडले मला , 15 मिनिट मध्ये फ्रेश होऊन छान तयार होऊन मी बाहेर आले तर लॉनवर मस्त कॉफी आणि टोस्ट ब्रेड बटर ची तयारी झाली होती.
हसत त्याने स्वागत केले आणि कॉफी आणि तयार ब्रेड टोस्ट हातात दिले , मस्त ते  अनुभवत मी सुरवात केली .
" जॉय ,मी पुण्यात  लहानाची मोठी झाले. माझे आयुष्य हे बऱ्यापैकी आनंदात, मोकळे गेले . मी एक स्पोर्ट्स पर्सन होते त्यामुळे इतर मुलींसारखे मला नाही जमले कधी. आयुष्यात जगण्यासाठी आणि आनंदासाठी प्रेम हीच एक भावना गरजेची या विचाराची मी होते. पुढे एक  कंपनीमध्ये चांगल्या पोस्ट वर काम पण केले. पण आयुष्यात पुढे जे आले त्याने मी पार खचून गेले. खूप प्रयत्न केला सगळे नीट करण्याचा , सांभाळण्याचा पण नाही रे जमले. जो ही भेटला त्याला फक्त स्वतःचा स्वार्थ हवा होता, आपले असो की परके . शेवटी एक दिवस हिम्मत केली आणि निघाले स्वतःचं जग शोधायला जिथे मी ही मीच असेन आणि स्वार्थी लोक जे माझ्यापासुन लांब असतील. इथे आले पोचले तुला भेटले , इथली लोक बघितली , इथला निसर्ग , जीवन खूप भावले .मला हेच हवे होते का हा प्रश्न मला पडतोय. ज्या पासून पळत होते तेच नेमके आज तू विचारले."
जॉय ने पहिल्यांदा थोडं गंभीरपणे बघितल आणि विचारले  , " का सांगितले मला हे सगळे? मी पण तर परका न? "
" असे म्हणू शकतोस , पण तरीही भावला तू ! निर्मळ वाटला मनाचा. जे कोणाशी बोलले नाही ते तुझ्याशी बोलावेसे वाटले. का हे मला ही माहीत नाही . तू काही मार्ग दाखवू शकशील हे वाटले ."
"अनु,  तयारी असेल तर तू इथे कायम ही राहू शकतेस. मला ही कंपनी होईल , काम कर , मला ह्या व्यापात जॉईन हो आणि सुरू कर नवीन आयुष्य. तुझं पूर्व आयुष्य काय मला माहित नाही आणि गरज नाही त्याची , एक छान मैत्री झाली आहे आपल्यात बघू आणखी कुठे नेते हे आयुष्य. "
"किती छान आणि पटकन मार्ग दाखवला रे! बोल काय पोझीशन देतो तुझ्या या रिसोर्ट मध्ये , बायोडाटा देऊ का?"हसत म्हणाले.
"हो , तो तर लागेलच ना, त्याशिवाय आम्ही कोणाला जॉब देत नाही! "खट्याळ हसत तो त्याच्या त्या डॅड शी बोलायला गेला.
तोवर मी रूम मध्ये जाऊन माझा लॅपटॉप सुरू करून फॉर्मलिटी पूर्ण केली .
रात्री मस्त सगळ्या स्टाफ सोबत नव्याने ओळख झाली ती माझी तिथली अडमिन इंचार्ज म्हणून. 
मोकळ्या मनाने जेवण झाले " थँक्स जॉय माझ्या नव्या आयुष्याच्या सुरवातीसाठी."
"वेलकम माय डिअर फ्रेंड !" असे म्हणत त्याने मला विश्वास दिला.
दुसऱ्या दिवशी पासून नवीन उत्साहात , नव्या दमाने आयुष्य सुरू झाले . हळू हळू तिथंली भाषा कळायला लागली. खूप साधे लोक आहेत ग ते , दोन शब्द प्रेमाने बोलले की ते लगेच आपले समजतात . प्रेमळ, साधे आयुष्य खूप छान सुरु होते.
आयुष्यातील बराच काळ पुढे गेला आणि
एक दिवस अचानक जॉय ने मला माझ्या सोबतीने आयुष्य जगायला आवडेल का असे डायरेक्ट विचारले. 
मी त्याला म्हणाले "मी एकटी जगतेय पण नावाचे लेबल माझे नाहीय , दुसऱ्याचे आहे". 
त्यावर पुन्हा  तेच विचारले आणि म्हणाला "मला तू व्यक्ती म्हणून आवडलीस आणि अनु म्हणूनच तुला विचारतोय. लेबलच महत्वाचे राहिले नावाचे तर त्याने मनात आणि त्यामुळे निर्माण झालेल्या नात्यात फरक पडतो असे मला वाटत नाही."
आज जवळपास दोन वर्ष झालीय आम्ही एकत्र राहातोय. कसलाही स्वार्थ नाही, अवास्तव अपेक्षा नाही.  फक्त ओढ  एकमेकांच्या सोबतीची आणि जो अनुभव हवा होता तो फक्त प्रेमळ आयुष्याचा जो आज मिळतोय. 
आयुष्य असेच पुढे कायम राहावे हीच एक ईच्छा.
 प्रतीक्षा म्हणशील तर जॉय च्या म्हणण्याप्रमाणे एक छान से मुल दत्तक घ्यायचे ज्याला खरी प्रेमाची आणि आधाराची आवश्यकता असेल.
जसा त्याला आधार मिळाला तसाच आपण कोणाला द्यावा आणि त्याचे आयुष्य मार्गी लावावे ही त्याची ईच्छा मला मनापासून पूर्ण करायची आहे."
"आयुष्याच्या ह्या सगळ्या उतार चढावामध्ये फक्त तू होतीस की जी सतत  आठवणीत  होतीस म्हणून तुला एकदा तरी नक्की भेट हा जॉयचा च आग्रह होता. 
म्हणून तुला फोन केला, पण फोनवर बोलणे योग्य नव्हते , तू समजून घेशील हा विश्वास होता म्हणून तुला भेटायला बोलावले आणि पुन्हां एकदा लहान झाल्यासारखं काही क्षण उपभोगावे असेही वाटले."
रिया स्तब्ध  होऊन थोडी विचारात सगळं ऐकत होती. ज्या अनुला आपण गमावले ती आज पून्हा नव्याने भेटली असेच तिला वाटत होते. " अनु खर तर हे  सगळंच थोडं धक्कादायक आहे पण मला हा धक्का सुखद वाटतोय. तुला जो आयुष्याचा 'अनुभव' आला तो खरच खूप सुंदर आहे. उशिरा का नसो तुला तुझा मार्ग मिळाला यातच मला आनंद आहे . मलाही आवडेल तुझ्या जॉय ला भेटायला , जेव्हा कधी तुला योग्य वाटेल मला बोलावं मी नक्की येऊन भेटेन आणि हो मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. "
छान चांदणं वर आलं होतं चंद्र प्रकाश पसरला होता, दूरवर फक्त अंधार आणि समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता ती निरव शांतता सुखावत होती . 
दोघी मैत्रिणी हळूहळू चालत एकमेकींच्या हात हातात धरून आज खूप वर्षांनी मोकळेपणानं एकत्र आल्या होत्या.
पुढचे 4 दिवस छान छोट्या मोठ्या गोष्टी सांगत, लहान मुलींसारखे बागडत, समुद्राच्या किनाऱ्यावर घोड्यावरून फेरी मारत, संपूर्ण वेळ एकत्र घालवून पुन्हा नक्की भेटण्याचे ठरवून पुन्हा आपल्या मार्गाने निघाल्या. रिया शहराच्या तर अनु तिच्या शांत सरळ प्रेमळ आयुष्याच्या जिथे स्वतःला हरवून जगण्यात तिला तिचा 'आनंद' नव्हे 'जॉय'वाट पहात होता.
रियाला सुद्धा कळले होते की अनु ला तिच्या आयुष्याचा खरा 'अनुभव' तिच्या 'जॉय' मध्ये मिळाला होता!
- ©®अमित मेढेकर

Circle Image

Amit Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!