अंतरंग भाग 6

The communication between Vivek and Devika goes on and on with limitless gupshup...What they talk do read in this blog

अंतरंग :- (भाग 6)

"काय रे तू कधी डब्यामध्ये खिचडी नव्हती मागितली! आज कसे काय?"
"अंग आई काल तुला नाही का सांगितले की माझ्या फ्रेंडचा  ऍट ऍक्सिडेंट झाला... तिकडून डिमांड आहे.... की कढी आणि खिचडी हवी आहे म्हणून."
"असं का बरं बरं. नीट घेऊन जा हां सांडू नकोस!....."
तो हॉस्पिटलमध्ये पोहचला तर तिच्याजवळ तिची आई बसली होती, "नमस्ते काकू कशा आहात?"
" मी ठीक आहे बाळा, काल दिवसभर तुझी खूप मदत झाली आणि आज पण तू परत आलास?"
"अहो काकू, आम्हा कॉलेजमध्ये असलेल्या मुलांना काय वेळच वेळ असतो की.... आणि आता आमच्या फ्रेंड ला जर बरं नाही तर आम्ही थांबलं पाहिजे ना.... ही आमची पण ड्युटी नाही का? सगळेच जर आई बाबा करायला लागले तर फ्रेंड्स काय कामाचे!"
....
त्या नुसत्या हसल्या..
ती म्हणाली " आई तू जा आता. तू रात्रभर इथे थांबली आहेस तू जा  आवर आणि दुपारनंतर ये."
तो त्यांना सोडायला खाली गेला " काकू काही काळजी करू नका...हा माझा फोन नंबर आहे...एक चिट्ठी त्यांच्या  हातात देत म्हणाला,  काही वाटलं तर मला फोन करा, आज जर डिस्चार्ज देणार असेल तर मी तुम्हाला सांगतो तेव्हा तुम्ही या."
अशा पद्धतीने तो काकूंना सांगून वरती आला. 
आल्यावर ती म्हणाली,  सगळ्यात पहिल्यांदा तुला एक सिक्रेट सांगते.....
"काय...?"
"माझे खरं नाव...निलांबरी आहे" 
"मग...हे नाव..."
"हे कागदोपत्री आहे...पण मला मला या नावाने कोणीच हाक मारत नाही. तू हाक मारशील?
"हो नक्की... नीला...!
.नीला wow.... actually हे छान आहे...आता तू मला नीला च म्हण"
"ओके..नीला..." तो हसून म्हणाला....
ती पण हसली आणि म्हणाली...चला आता तू पूर्ण माझ्या सोबत थांबत आहेस."
तो फक्त हसला.
"आज मी तुझ्याशी खूप बोलणार आहे!"
"हो म्हणून तर मी थांबलोय."
"तुझ्याबद्दल बोलणार आहे!"
"अरे बापरे म्हणजे काय बोलणार आहेस?"
" म्हणजे हेच की तुझ्याबद्दल मला जाणून घ्यायचे आहे."
" अंग तू किती वेळा मझ्याबद्दल विचारायचा प्रयत्न करते आहेस पण तुला माहीत आहे ना की मी काही बोलत नाही."
"अरे का पण स्वतःला अस लपवून ठेवले आहेस?"
"हे बघ स्वतःच्या गोष्टी स्वतः च हँडल करायच्या असतात, चांगल्या असो किंवा वाईट. जे काही अनुभवलं आहे त्यातून शिकायचं असते. भूतकाळ आपल्याला  मोठा अनुभव देतो त्याला वर्तमानात आणायचं नसते आणि भविष्यात जाताना त्या भुतकाळाला घेऊन जायचं नसते......
"मला फिलॉसॉफी नकोय....तुझ्याबद्दल बोल.."
" तुला किती माझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे ना!  किती ओळखायचं आहे ! आणि मुळात या सगळ्याच काय कारण आहे?"
"कारण मला तुला दुःखात नाही पाहायचं आहे!"
"  पण मी दुःखात नाहीच आहे!"
"तू खोटं बोलतो आहेस! तू दुःखात आहेस आणि हे दाखवत नाही आहेस. 
"आणि पुढे..?"
"त्यातून तुला काढून मला तुला आनंदी करायचं आहे."
"का?"
" एक चांगला मुलगा कुठल्याही विचारांमुळे वाया नको जायला."
"तुला वाटतंय की जो मुलगा अभ्यास करतो, लेक्चर अटेंड करतो तो वाया जाईल?"
" हो जाईल, कारण तो त्याचे आयुष्य नाही जगणार! त्याचे आयुष्य जगणं तो विसरला म्हणून तो वाया जाईल!"
" आणि या वाटण्यामागे तुझी भूमिका आहे की तू हे अनुभवलं आहेस नीला?"
"माझी भूमिका पण नाही आणि मी अनुभवलं पण नाहीय! पण मला जे कळतं समजत त्यावरून मी सांगते की तुझ्या आयुष्यात जे घडलं ते तू तुझ्या अंतरंगात दडवले आहेस. 
तुझे अंतरंग ओपन कर विवेक ते जाणण्याकरिता मी आहे! 
ते केल्यावरती मी मदत करायला आहे ते तुझं दुःख जे आहे त्यावर मी फुंकर मारायला तयार आहे . त्या दुःखातून तुला बाहेर काढायला मी तयार आहे."
" एवढं सगळं का पण नीला?"
"कारण, मला तुझ्यासाठी काहीतरी करायचंय..."
"का पण...?"
"कारण हा विश्वास ठेवा तू तुही मला तुझ्या मनातलं मला सांगू शकतो."
"सांगेन कधीतरी!"
"कधीतरी नाही आज! आता वेळ आहे!"
"निला... तू का अश्या गोष्टीच्या मागे पडली आहेस?"
"कारण मी हट्टी आहे..."
"आणि तुला वाटते की तुझ्या हट्टीपणापुढे माझे काही चालणार नाही...?"
"नाही चालणार...किंवा मी नाही चालू देणार..."
तो काहीच बोलला नाही.......
.......
"चल खिचडी खाऊन घे...."
"मी नाही खाणार..."
"का..?"
"कारण मी हट्टी आहे..."
"प्लिज ..नीला..."
"नाही...."
"Ok.. मी सांगतो....पण पहिल्यांदा तू खाऊन घे..."
"प्रॉमिस?.."
"प्रॉमिस.."
तिने हसून डबा उघडला...आतल्या गरम खिचडी चा सुगंध तिला भावून गेला...
सकाळी खिचडी कढी खाण्याची तिची पहिलीच वेळ होती पण या वेळेला ती खिचडी तिला अत्यंत रुचकर लागत होती...
तिचे होईस्तोवर तो शांतपणे तिच्याकडे बघत बसलेला..
"प्लिज चहा आणतोस...? तोपर्यंत मी फ्रेश होऊन येते..."
तो खालती कॅन्टीन ला चहा आणायला गेला तोपर्यंत तिने स्वतःचे थोडे आवरून घेतले..केसांवरून कंगवा फिरवला आणि त्याची वाट पाहत बसली...
त्याने थर्मास भरून चहा आणला होता....थर्माकोल च्या कपात ओतून देत असताना तिने जाहीर केले....
"आता नो मोबाईल.. नो कॉल्स....फक्त तुझे बोलणे"
यावर त्याने उदास स्माईल दिली..
"हे बघ.. हेच ते उदास असणे तुझे...तू असा उदास असतोस ना तेच मला नकोय...
"ओके... मी बोलतोय नीला.."
"मी ऐकतेय..."
"हे बोलण्याच्या आधी तुला एक प्रॉमिस मला पण करावे लागेल.."
"हेच ना की हे मी कोणाशीच कधी बोलायचे नाही..."
"हो..हेच!
"पक्का प्रॉमिस..

"नीला, जे मी तुला सांगायला जातोय ते माझ्या मनात खूप खोलवर दडलंय..आज ते बाहेर काढतोय...तुझ्यासाठी.. तुझ्या हट्टापायी... यातले बरेचसे माझ्या आईला पण माहिती नाही आहे...पण आज तुझ्यापाशी बोलतोय.."

"निश्चिन्त राहा विवेक, मी हे सगळे माझ्यापाशीच ठेवेन...या सगळयाचा उपयोग मी तुला नॉर्मल आणण्यासाठी करेन...मी जीवापाड प्रयत्न करेन की तू खऱ्या अर्थाने तुझे आयुष्य जगू शकेन...आणि या सगळ्याच्या बदल्यात माझी कसलीही अपेक्षा नाही..मला काहीही नकोय....

"थँक्स! कुठून सुरुवात करायची हे कळत नाही पण तरीही प्रयत्न करतो..!
जेव्हापासून कळायला लागले तेव्हापासूनच आई प्रचंड कष्ट करताना दिसली..बाबा एका कपड्याच्या मिल मध्ये होते....मी लहान असतानाच त्यांचा एक अपघात झाला आणि त्यात ते गेले.. आई नोकरी करायची आणि काटकसर पण...या काटकसरीने मला जवाबदारीची जाणीव झाली...खूप लहान असताना मला काही करता यायचे नाही पण सातवीत असताना एका लायब्ररी मध्ये मी मदतनीस म्हणून कामाला लागलो...तिथे मी शाळा सुटल्यावर जायचो..थोडे पैसे मिळायचे त्यातून थोडेफार काही भागायचे..
तिथे मला वाचायची आवड लागली...तिथे असताना मी खूप पुस्तके वाचून काढली आणि त्यामुळेच मला जीवनाचा दृष्टीकोन लवकर समजायला लागला..त्यात माझ्या लक्षात आले की आमची परिस्थिती खुप सामान्य आहे त्यामुळे मला अंथरूण पाहून पाय पसरायचे आहेत..
तेवढ्यात आत डॉक्टर आले आणि त्यांचे बोलणे थांबले...
"कसे आहे आज?"
"छान वाटतंय..."
"गुड गुड..."
त्यांनी बेसिक काही गोष्टी चेक केल्या आणि सिस्टर ला instructions देऊन निघून गेले...
सिस्टर ने विवेक च्या हातात एक चिट्ठी दिली आणि त्याला ती औषधे आणायला सांगितली...

"ए कुठे चाललास..?"
"कुठे म्हणजे.. औषधे आणायला.."
"आण नंतर..आधी बोल माझ्याशी.."
"अं हं... औषधे महत्वाची ..पहिले ती आणु देत मग बोलूयात...
असे म्हणून तो तिथून गेला आणि निलांबरी तो यायची वाट पाहत बसली....

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all