अंतरंग भाग 3

Devika starts to interact with Vivek to understand what's in his mind but how he responds do read in this blog

अंतरंग:-भाग 3

कॅन्टीन मध्ये चहा आणि वडापाव खाल्ल्यानंतर सगळ्यांच ठरलं की आज मॅटीनी शो ला जायचं, इथे विवेक म्हणाला की " मी नाही येऊ शकणार!"
देविका ला वाटलं की आता हाच चान्स आहे ती म्हणाली " आपण पिक्चरला नको यायला, मला तुला एक ठिकाणी न्यायचे आहे येतोस का?"
"कुठे?"
"मी नेणार आहे ना तर तुला कळलेच कुठे ते!"
तो आधी काहीच बोलला नाही, नंतर म्हणाला " आज काय सगळेच लेक्चर बंक करायचेत का?"
"तुला पाहिल्यानदाचं सांगितले होते, एक दिवस लेक्चर बंक केल्याने काय होईल? काहीतरी बोलता तर येईल!"
"तुला काय बोलायचे आहे माझ्याशी? तू सारखा मला बोल बोल म्हणतेस!"
"चल तू एका ठिकाणी मग मी सांगते!"
सगळ्या ग्रुप ला टाटा बाय करून हे दोघे पार्किंग ला आले, तो म्हणाला इथे बोलायचे आहे का?"
"नाही रे! इथे कसे बोलेल मी! तुझी गाडी काढ की माझी काढु?"
"नाही मी माझी काढतो! "असे म्हणून त्याने गाडी काढली आणि दोघे जण निघाले. 
तो थोडा पुढे सरकून बसला याची तिला गंम्मत वाटली...
"अरे मी काही चिकटत नाही आहे तुला...नीट बस की"
"नाही असे नाही...पण मला ताठ बसायला आवडते.."
ती हसली आणि म्हणाली, "जो पर्यंत मी सांगते तो पर्यंत या रस्त्याने चालवत राहा." 
त्याने मान डोलावली"
"इथून सरळ, पुढे सिग्नल ला उजवीकडे, मग इकडून डावीकडे,  मग परत सरळ मग इंडिकेटर देत उजवीकडे, मग सरळ असे करत करत ते पूर्ण शहराला मागे टाकून पुढे हायवेला लागले.
"काय ग मला पळवून न्यायचं काही विचार वगैरे नाही ना? "
"तसाच विचार आहे! तुला कस कळलं रे?"
"शहराच्या बाहेर आलो आहे तर कळले तेवढं!" ....
ती खळखळून हसली.
तो गाडी चालवत राहिला...
पुढे गेल्यावर एक बोर्ड होता ज्यावर लिहिले होते ' थीम पार्क'. 
ती म्हणाली" इथे आत गाडी घे."
गाडी आत घेतली तोवर तिने तिकीट काढले आणि दोघेही जण आत गेले.
तिथे एक छोटासा आर्टिफिशियल धबधबा होता आणि त्याच्या बाजूला सिटिंग होते, तिथं दोघे जाऊन बसले.
तो तिच्याकडे बघत असताना ती म्हणाली, 
"हाय! माझं नाव देविका!"
"हाय, माझं नाव विवेक!
" चला ओळख तर झाली."
"याच्या आधी नव्हती का?"
"कुठे होती? एक क्लास मध्ये असताना फक्त नोट्स देणे किंवा कॅन्टीन ला भेटायचं इतकीच तर ओळख होती."
"अच्छा, बरं आता झाली ओळख! "
"हो झाली!"
"मग आता?"
"आता तू माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मोकळा."
"अच्छा म्हणून तुला ओळख करून घ्यायची होती का?"
"मग तुला काय वाटलं?"
"मला वाटलं काही विशेष नाही. तू मला इथे बोलावलं तर काही असेल म्हणून?"
"नाही! तुला एक स्पष्ट विचारू विवेक?"
"हो विचार न!"
"तू जसा दिसतो तसा तू नाहीस! "
"म्हणजे?"
" म्हणजे हेच की तू दाखवतो वेगळं आणि आहेस वेगळा" 
तो हसला. 
"तुझ्या घरी कोण कोण असत?"
"मी आणि माझी आई!"
"आणि वडील?"
"ते तर लहानपणीच गेले."
"आई काय करते?"
"आई घरी ट्यूशन घेते."
"अच्छा म्हणजे तुझ्यावर तुला जवाबदरीची जाणीव आहे म्हणून असा वागतो का?"
"नाही, असे काही नाही"
"तुला कोणी भाऊ बहीण?"
"कोणी नाही!"
"मग एकटाच असताना इथे कॉलेज मध्ये शिकत असताना तुला जबाबदारीची इतकी जाणीव की तू जगणे  सोडलं!"
" का तुला असे वाटत की मी जगणं सोडलंय?"
"कारण मला वाटतंय की तू तुझ्यामध्ये आत खूप काही दडवून ठेवलय आणि ते मला हवय."
"का तू कोण की त्या जखमांवर फुंकर मारणार आहेस की बरी करणार आहेस?"
"हे बघ तू मला फ्रेंड मानत असला किंवा नाहीस तरी मी तुला फ्रेंड मानलय. जो एवढा त्रासात आहे अश्या माझ्या फ्रेंड ला बरं करायचं ही माझी ईच्छा आहे! माझी ईच्छा चुकीची आहे का?"
"ईच्छा चुकीची नाही पण यातून काही वेगळं अपेक्षित नाही ना तुला?"
" म्हणजे?"
" म्हणजे हेच की मी तुला सांगितल्यानंतर तू मला तुझं दुःख सांगावं आणि मग आपण एकमेकांना भेटत राहावं आणि दुःखावर फुंकर मारता मारता आपण एकमेकांच्या जवळ यावं!"
"ओह गॉड!  तू असले विचार करतोस? मला नव्हतं वाटलं तू असे विचार करत असशील. मला वाटलं की तुझ्या काही जखमा जर मी बऱ्या करू शकले तर मला आनंद होईल !"
"पण जर तुला माझ्याबद्दल काही माहीतच नाही तर तू कशावरून सांगते की मला काही जखमा आहेत?"
"तुझ्या वागण्यातून दिसत!"
"तुला चेहरा वाचता येतो?"
"हो येतो!"
"काय लिहिलंय चेहऱ्यावरती?"
"हेच की तू खूप काही लपवून ठेवलं आहेस!"
"का लपवून ठेवलं असेल मी?"
"मला तरी वाटत की परिस्थिती मुळे!"
"म्हणजे काय?"
"परिस्थिती तुझ्यादृष्टीने बरोबर नसेल आणि त्या वेळी काही गोष्टी घडल्या त्याचे तुला वाईट वाटलं असेल!"
"वाईट वाटण्याचं आणि लपवून ठेवण्याचं कारण काय?"
"तुला कोणी ऐकणारे कान मिळाले नसतील!"
"पण मी तुला माझं आयुष्य का सांगू? असेल काही माझ्या आयुष्यात कुठली गोष्ट घडली असेल किंवा नसेल ती मी तुझ्यापर्यंत का पोचवू?"
" कारण मला तुला मदत करायची ईच्छा आहे!"
"मदत करणारी तू कोण?"
" अरे मी तुझी फ्रेंड आहे असं का नाही समजत तू?"
"हे बघ पहिलं तर बळजबरीने मला म्हणायच की तुला त्रास होतोय, दुसरी म्हणायचे की मला सांगच!  मग नाही सांगितले की म्हणायचे  की मी तुझी फ्रेंड आहे ! हे काय चालवलाय काय? 
मी व्यवस्थित कॉलेज ला येतोय जातोय, कोणाच्या अध्यात मध्यात नाही. आजसुद्धा तू मला क्लास बाहेरून इशारे करतेय म्हणून मी बाहेर आलो. कॅन्टीनमध्ये पण तू मला सांगतेय की चल माझ्याबरोबर. 
मी सगळ्या गोष्टी करतोय याचा अर्थ असा नाही ना की मी बळजबरीने हेच सांगावं की मला काही त्रास होतोय. 
मला काही त्रास होत नाही आणि होत जरी असला तरी मला नाही वाटत की मी तुला सांगावं!"
"अच्छा म्हणजे मी तुझ्याशी हे वागून चुकतेय का?"
"हो तू चुकतेयस! मी तुला तुझ्या आयुष्यातले काही विचारात नाही तू पण मला विचारू नकोस आणि ते विचारण्या एवढे मी तुझ्याशी क्लोज पण नाहीय!"
"त्याच्या या बोलण्याने देविकाच्या डोळ्यात एकदम पाणी तरळलं ती म्हणाली " ठीक आहे चल मला सोड."

 त्याने पण गाडी काढली आणि तेवढ्याच रिजिड पणे तिला कॉलेजमध्ये तिच्या गाडीजवळ पार्किंग ला सोडलं आणि निघून गेला. 
ती त्याच्याकडे थक्क होऊन फक्त बघत होती, तिच्या डोळ्यात प्रचंड पाणी होते आणि मनात खूप वाईट वाटत होतं.
तिने आपली गाडी काढली आणि गाडी काढून निघाल्यावरती ती पुढे जाणार पण डोळ्यातल्या पाण्याने तिला धोका दिला....
 समोरचे काही दिसलं नाही आणि तिची गाडी धाडकन एका लोखंडी खांबावर धडकली, गाडी खाली पडली आणि हेल्मेट नसल्याने तिच्या डोक्याला मार लागला आणि ती एकदम बेशुद्ध पडली.....
आजूबाजूचे लोक तिकडे धावले आणि कोणीतरी अँमब्युलन्स ला फोन लावला...
भरपूर गर्दी तिथे जमली होती ज्यात फक्त विवेक नव्हता...!

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all