अंतर राहू दे

Anter



श्यामराव retire झाले

आणि त्यांनी ठरवलं आपला संसार झाला नाही ,मनासारखे मालतीला जगू दिले नाही

काटकसर करून मन मारून ती त्यांच्या संसारात साथ दिली होती...संसार करायचा हौस मौज करायची राहिली ती राहिलीच..

आता रिटायरमेंट च्या मिळालेल्या पैस्यात उरलेली संसाराची सुरुवात पुन्हा नव्याने करायची होती त्या मागे कारण ही तसेच होते..जे मालतीला कळू द्यायचे नव्हते...

रिटायरमेंट म्हणजे जणू शाप म्हतारपणात..आपल्या घरी आपणच चोरी करून रहातो असे मनात सारखे येत...आता हात पाय थकले तर ताकत ही शिल्लक राहत नाही अंगात.. दुसरी नौकरी आता होने शक्य नाही... कोणी आयते बसून खातो असे म्हंटले तर ते सहन होणार नाही...

त्यांना माहीत होते 60व्या वर्षी निवृत्ती म्हणजे अजून किमान दहा वर्षे तरी मी स्वतः सगळे करू शकतो..मी आधार घेणार नाही..मला कोणाची भीक नको..उपकाराचे शब्द ,किंवा टोचून बोलणे नको.. सून किती ही चांगली शोधून आणू म्हणालो तरी ती लेक होऊ शकत नाही.. तिच्या मर्यादा असतात ...

मग त्यांनी ठरवले..मालतीला हे सुख आता तरी देऊ..

लग्न ही साधे झाले होते, मालतीची आई वारली आणि सगळे विधिवत होणारे लग्न साधे करावे लागले... तिला आई मागे कोणी नव्हते.. मग शायमराव यांनी आपला 5 महिन्याच्या पगारात स्वतः लग्न लावून घेतले..

श्यामराव यांना ही आईवडील नव्हते आणि म्हणून त्यांनी ठरवले होते लग्न करायचे तर मालती सोबतच..


मालतीने श्यामराव यांच्या सोबत नेटाने संसार केला ,कुठे कधी काही कमी पडले याबाबत कधीच तक्रार नाही केली...जे जसे असेल त्यात निभावत राहिली..

नौकरीच्या पैशात गावाकडे घर घेतले होते ते ही आणि जमीन थोडी फार ती काही कारणामुळे विकावी लागली. त्यातील उरलेल्या पैस्यात मुंबई मध्ये चाळीत घर घेतले...चाळीत कुठे प्रोजेक्ट येणार आणि बिल्डर ती चाळ विकत घेऊन जास्त fsi देऊन दुप्पट जागा देणार होता...

आता कुठे आयुष्याच्या शेवटी मोठया घराचे स्वप्न साकारणार होते... स्वप्नापासून सत्य जास्त दूर नव्हते.. त्यात आता घर असल्यामुळे मुलासाठी स्थळ ही येऊ लागली होती..बाबा निवृत्त होत आहेत त्यामुळे त्याने त्यांच्या आलेल्या पैशात आपल्या लग्नाचा बार उडवायचे ठरवले होते..

बाबांनी ही काही न बोलता मालतीच्या आग्रहाखातर त्याला मोठी रक्कम देऊन मोकळे झाले होते..हातात काहीच रक्कम शिल्लक होती..ती त्यांनी त्यांच्या म्हटरपणात कामी येईल म्हणून ठेवली होती... ती मात्र मुलाला माहीत नव्हती...

एकीकडे चाळी पडून घर तयार होऊन त्याचा ताबा देण्याची वेळ आली होती...आता सगळे खुश होते...बाबा आई यांच्या डोळ्यात एक चमक दिसत होती...ते सगळे ह्या तीन रूम च्या फ्लॅट मध्ये रहाणार होते...

इकडे मुलाचे लग्न झाले आणि सून घरात आली, आलेली सून कशी आणि कुठे झोपणार म्हणून सासू सासरे हॉल मध्ये झोपत होते.. काही दिवसात सुनेचे नवखेपण सरले...गुणाची म्हणता म्हणता तिने रंग दाखवणे सुरू केले.. आणि ती सासू सासऱ्यांना घरातून बाहेर काढण्याची कारणे शोधू लागली.. घर छोटे पडते..आम्हाला पूरत नाही.. आता बाळ ही येणार...पगार कसा पुरणार..तुम्ही दोन जण मग कसे भागणार... तुम्ही ही कसे बसे राहत आहात.. तुमचे हाल बघवत नाही...मग तुम्ही इथे रहा आम्ही दोघे इतर कुठे तरी घर बघू...आम्ही तिकडे रहायला जाऊ म्हणतो..

आता दोघांना वाटले निदान मुलगा तरी सुनेची समजूत काढेल..वेगळे राहण्याचे खुळ तिच्या डोक्यातून काढेल...पण तो ही तिचीच बोली बोलत होता.. त्याने ही तिच्या विचाराला साथ दिली...तो ही मुद्दाम म्हणून लागला आई बाबा आम्हाला इथे जागाच पुरती होत नाही.. मग आम्ही ठरवले कुठे तरी छोटे पण आमचे आमचे असे घर घेऊन राहू...तिला ही मोकळीक ,त्यात तुमचा ही आमच्या मोकळेपणा अडथळा नको..कुठे जरा बोलव म्हटले की आवाज तुमच्या पर्यंत येतो..हसायचे म्हंटले की तुम्हाला त्रास होतो.. बाहेर फिरायला जायचे म्हंटले की तुम्ही जागेचा असतात... आम्हाला काही बाहेर जेवायचे म्हंटले की तुमची सोय करून जा...त्यापेक्षा आम्ही बाहेर राहू...

मुलगा हे बोलत असतांना आई बाहेर मंदिरात गेली होती...तिच्या समोर न बोलता त्याने बाबाकडे ही अडचण बोलून दाखवली...बाबा गप्प होते... त्यांना त्यांच्या बोलण्याचा अर्थ हळूहळू समजत होता... मुलाला वाटत होते की बाबा ने म्हणावे हे घर आणि तुम्ही इथेच रहा आम्ही गावी जातो...

मुलाला वाटले बाबांनी आधी सगळे पैसे दिलेच आहेत आता घर सोडून जातो म्हंटलो की म्हणतील तुम्ही नका जाऊ आम्ही जातो..आणि घर आपल्या ताब्यात देतील...आई असती तर एक वेळ ती म्हणाली असती आम्ही इथे रहातो तुम्ही तुमचे मार्ग शोधणे सुरू करा... पण बाबा आईला समजावतील आणि तिला पटवून घेऊन जातील गावाला..आणि मग आपल्या राजा राणीचा संसार करू..आई बाबांना नित्याने भेटत जाऊ पण अगदीच सोबत नकोच ते... बाबा समजून घेतली ही माझी condition... उद्या परिवार मोठा होईल मग मुलांना ही जागा हवी..हे कारण सांगितले तर पटण्यासारखे आहे..

बाबा आता मालतीची येण्याची वाट बघत होते, तसे त्यांनी मुलाच्या मनातले काय ते हेरले..मग आपणच वेगळे राहू..मालतीला हवे असलेले सुख देऊ.. आपला संसार सुखाचा तेव्हा तर होता पण तिचे मन मारून ,पण आता तिला कोणते ही दुःख नको म्हणून वेगळे राहू ,भले ही गाव नको पण इथे छोट्या चाळीत जाऊ, भाड्याने.. तिची सगळी हौस भागवायची ह्या कारणाने तिला पटवून नव्या संसाराचा नावाखाली आपणच बाजूला होऊन म्हणजे तिला दुःख नको...मुलाने बाहेर काढले हे तिला पचणार नाही...उपयोग होता तर बाप हवा होता..आता उपयोग नाही तर तुम्ही ही नको ही टोचणी तिला पोखरून टाकेल.


बाबा बाहेर जाऊन थांबले ,डोळ्यात अश्रू होते, मन खिन्न झाले होते... शेवटी कोणी कोणाचे नसते एक बायको सोडली तर..तीच काळजी घेणारी असते... म्हणून अश्रू जणू डोळ्याच्या कडा ओल्या करत येत तर होते पण गळत नव्हते..

मुलाची बायको, "हे तू अगदी योग्य केलेस अगदी लवकर सांगितले बाबांना ,आता आईला तू नलो सांगू बाबा सांगतील "

नवरा, "अग असे वागणे ठीक वाटत नाही, आई बाबा जड होने ,की आई बाबाला आपण जड होत आहे हा विचार कर ,मी त्यांना बाहेर नाही काढणार ,मी स्वतः घर शोधणार आहे.. आणि आपणच बाहेर निघू...तू तयारी कर. "

बायको, "तू मूर्ख आहेस का ,आता तू काही बोलू नकोस बघू बाबा काय म्हणतात ,ते जर स्वतः निघत असतील तर उत्तम आहे "

तितक्यात आई बाहेरून येते, ती आपल्या आहो कडे बघून हबकते, तिला काही तरी असे दिसते जे या आधी कधी पाहिले नव्हते, नवरा रडत होता ,त्याला श्वास घ्यायला ही त्रास होत होता, तिने त्याला पाणी पाजले आणि घरात नेले.

मालतीने विचारले , "आहो काय झाले,का असे उदास आहात तुम्ही ,काही दुखत आहे का ,की काही मनाला खात आहात तुम्ही तुमच्या.."

श्यामराव , "मालती खूप दैनित संसार केलास तू माझ्या सोबत ,तुला आई नव्हती म्हणून वाटलं हवे ते सुख देईन मी तुला..पण ते कधीच नाही शक्य झाले माझ्याकडून..पण आज वाटते तुला पहिल्या भेटीत जे नाही देऊ शकलो ते आजपर्यंत जे जे काही नाही देऊ शकलो ते ते सगळे देणार आहे बघ... नवरा म्हणून कधीच तुझ्या अपेक्षेला खरा नाही उतरलो..पण आज मी आपल्या मुलाकडून शिकलो एका नवऱ्याने आपल्या बायकोच्या सुखासाठी काय करायला हवे ते... त्याने माझे बंद डोळे उघडले बघ... तो त्याच्या बायकोच्या सुखासाठी धडपडत आहे इतके के तो आई वडील यांना ही बाजूला करत आहे, मी तर खूप वर्षांपूर्वी हेच करायला हवे होते... तुझ्यासुखासाठी तुझा जीव वाचवायसाठी त्याला डावलायला हवे होते.. पण तू म्हणालीस मुलं महत्वाचे तेच आपल्या म्हतारपणाची काठी असते.. आधार असेल...पण त्याने तर बायकोसाठी आधार ही काढून घ्याचे ठरवले आहे.. मग म्हणून मी एक विचार केला आहे... पहिल्या पासून ते आज आत्तापर्यंत तुला ज्या ज्या गोष्टीला मन मारून मुरड घालावी लागली त्या सगळ्या गोष्टी आपण करायच्या... अगदी तुला मी जुन्या बाजारातून भांडी आणली होती पैसे नसल्याने तरी तू काहीच म्हणाली नाहीस.. दोन साड्यावर तू वर्ष काढलेस तरी काहीच बोलली नाहीस... पण आता तसे नाही होणार ,अगदी नव्या घरापासून ते नव्या भांड्यांपासून ,हव्या तितक्या साड्या घेऊ...आणि आपण नवीन घरात जाऊ..."

मालती ,"अहो इतके पैसे नाहीत आता आपल्या गाठीशी.. आणि आता मलाच कसली हौस नाही फक्त तुम्ही त्रास करून घेऊ नका ,आराम करा मी करते काय करायचे ते.."

आई बाबांचे बोलणे मुलगा ऐकत होता, त्याला त्याच्या वागण्याची बोलण्याची लाज शरम वाटली, त्याने आता डाव पलटवायचा ठरवला, तो सरळ बायको कडे गेला आणि म्हणाला आपण आजच जात आहोत हे आई बाबांचे घर सोडून, तुझ्या हक्काच्या घरी, तुझ्या माहेरी...कळव त्यांना आम्ही दोघे कायमचे येत आहोत.आम्हाला बाबांच्या घरात नाही रहायचे...आपल्याला ही मान सन्मान आहे..

बायको, "अरे वेडावलास काय ,डोक्यावर पडलास का ,इथे आपला हक्क आहे ते सोडून माझ्या आई बाबांच्या घरी का जायचे आपण, त्यांना का म्हतारपणात त्रास उगाच, दोन दोन ओझे का त्यांच्या माथ्यावर...ते त्यांचे घर आहे ..आपण तिथे जाऊन रहाणे शोभत नाही... त्यांच्या हक्कावर आपला काय हक्क रे "

तो, " आता कशी बरोबर बोलीस तू ,तुझ्या आई बाबांच्या घरावर आपला काय हक्क म्हणतेस ना तर मग माझ्या आई वडिलांच्या घरावर आपला तरी काय आणि कसला हक्क म्हणवतेस तू, तुझ्या आई वडिलांना त्रास नको मग माझ्या आई वडिलांना का त्रास, चल भर बॅग आपण आज कुठे ही राहू पण इथे नको .."

आई बाबा हे त्यांचे बोलणे ऐकत होते, त्यांना लेकाने बाहेर बोलावून घेतले ,म्हणाला, "बाबा आई तुम्ही तुमचा संसार नव्याने सुरू न करता पुन्हा हाच संसार पुढे चालू ठेवा ,आम्हाला आता निरोप द्या, माझ्या बायकोला मोठे घर बघतो ,आणि त्याचे भाडे दोघे मिळून भरतो ,त्यासाठी ती आता नौकरी करणार म्हणते.. आम्ही जवळच असू तुमच्या आणि आधी मधी येऊन भेटत जाऊ... तुम्हाला आता इथेच मोकळे रहाता येईल...अगदी कोणाचे ही दडपण नसेल.."

आई, "अरे पण आपण राहू शकतो इथे "

बाबा ,"मालती त्याने निर्णय घेतलाच आहे तर त्यांना ठरवू दे, कारण आता ह्या संसारात मला माझी कोणाला अडचण झालेली आवडणार नाही."

मुलगा आई बाबांचे आशिर्वाद घेऊन आपले समान घेऊन बाहेर पडतो ..

तो कधी कधी आई बाबा कडे येत असतो ,सून ही येते आणि त्याचे आई बाबां प्रति त्याचे सगळे कर्तव्य पार पाडत असतो पण दोन घरातील अंतर ठेवून..