नव-याने बायकोच्या प्रेमपत्राला दिलेले उत्तर

sometimes speak openly so that misunderstanding between relation will get clear.

नव-याने बायकोच्या प्रेमपत्राला दिलेले उत्तर

प्रिये ,

तू एवढा पत्र लिहिण्याचा खटाटोप केला,मग मलाही वाटले ,उत्तरही पत्रानेच द्यावे नाही का.

तू माझ्यावर प्रेमाने जे माझ्यावर आरोप केले,त्यातही मला तुझं प्रेमच दिसून आलं ,तू या पामरासमोर निदान आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत,म्हणजे आता पंचवीस वर्षांनी का होईना,आपल्यात मैत्रीच नात फुलल्ं आहे ,आज त्याच नात्याने मी तुला पत्र लिहायचे ठरवले.

पूर्वीच्या काळात असं पत्र लेखन व्हायचं,आज मी तुझ्यामुळे लिहीत आहे,तर धन्यवाद तर म्हणायलाच हवे नाही का.

तू माझ्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी मापटं ओलांडून माझ्या घरात आली आणि माझं पूर्ण घर आनंदाने भरून गेलं ,तू आयुष्यात आली ,माझा यशाचा आलेख चढत गेला आणि मी कामात व्यस्त झालो ,यात माझं तुझ्याकडे दुर्लक्ष झाले,हे मी मान्य करतो.

इतकी वर्ष लग्नाला झाली आणि अजुनही माझ्या मनातलं तुला कळालं नाही ,म्हणून मलाही दु:ख झालं,जसं तुला झालं.मान्य आहे ,मी बोलून नाही दाखवलं पण माझ्या डोळ्यांत तुला नाही का दिसलं,डोळे तर खोटं नाही बोलू शकत.

मी तुला स्टॉपवर सोडवायला आल्यावर, तुला जर एवढं छान वाटलं असतं,असं मला माहित असतं तर नक्की सोडायला आलो असतो ,ते माझं चुकलच्ं.

सगळ्या निर्णयात गृहित धरलं हे ही चुकलं,पण त्यालाही जबाबदार तू आहेस ,असचं म्हणेल ,तुला आठवतंय,मी तुला काही करताना नेहमी विचारायचो ,पण तुझं एकच उत्तर ठरलेलं असायचं,तुम्हाला योग्य वाटतय ना मग करा,म्हणून मग मी तुला गृहित धरत गेलो .

दिल्लीला गेलेलो तेव्हा ,वर्कलोड इतका असायचा आणि त्यात तू विचित्र प्रश्न विचारायची ,सगळ्यां समोर काय उत्तर देणार,म्हणून शांत रहायचो ,याचा अर्थ सगळा असा लावला तू.

मी जिथे काम करत होतो ,तिचं आणि तुझं नाव सारखं असणं,केवळ एक योगायोग, ती आधीच बुक होती,म्हणजे तिला बॉयफ्रेंड होता ,नाहीतर मीच पटवली असती,वाचून हसलीस ना .

गिफ्टच्या बाबतीत तू एवढी भावनिक असशील ,हा विचार मी कधी केला नव्हता ,त्याबद्दल पामरास क्षमा करावी. 

एवढे प्रयत्न करुन यश येत नव्हते ,तर मी हताश व्हायचो आणि तुला माझ्या मनातील घालमेल दिसू नये म्हणून मी दुसरीकडे तोंड करून झोपायचो,त्याचा तू एवढा वेगळा अर्थ काढशील असं मला वाटलं नव्हतं.

राहिली गोष्ट तुझ्या आईवडीलांसोबत बोलण्याची त्यांचे आणि माझे विषय वेगळे असतात ,गेल्यावर मी तेवढं तर विचारतो,कसे आहात ,असाही मी जास्त कुणाशी काही बोलत नाही,मग त्यात राग येण्यासारखं काही नाही.जेव्हा त्यांना माझी गरज असेल ,तेव्हा मी कोणताच विचार न करता तिथे असेल ,हे मात्र सांगू शकतो.

मला खरचं तुलना केलेली आवडत नाही ,पण त्यांच्या कडे बघून तू वजन कमी करण्यास प्रोत्साहित होशील ,  या हेतूने बोलायचो .आणि तुझी लाज वाटली नाही कधी ,पण तूच विचार कर ,मी तरी कधी ऑफिसच्या कार्यक्रमाला गेलो का ?, मीच नाही जायचो तर तुम्हाला नेणे दूरच राहिले,मला नाही आवडत गर्दीत तुला माहित आहे ना.

तू तुझ्या जगात खुश आहेस ,ठिक आहे ,मी नाही म्हणणार तुला काही,तुला ज्या गोष्टीत आनंद मिळतो ते कर ,पण आता लॉकडाउन मध्ये तुझा पगार अर्धा झाला आहे ,माझा कमी झाला आहे ,म्हणून मी म्हटलं,मला नव्हतं वाटलं की ,तू ही गोष्ट एवढी मनाला लावून घेशील.

बायकांच मन समजण,खूप कठीण असतं,असं म्हणतात ,हे काही चुकीचे नाही ,आज त्याचा प्रत्यय आला,एकीकडे नव-यावर आरोप करायचे आणि दुस-या बाजूने मी तुमच्या शिवाय जगू शकत नाही ,असही बोलायच,मी मनकवडा नाही ,तुझ्या मनातलं कळायला,अशी कधी कधी पत्रातून व्यक्त होत रहा ,माझी चूक असेल तर मी सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेल.

माझं जग म्हणजे तुम्हीच आहात,तू माहेरी जातेस ,तेव्हा घर खूप खायला उठतं ,मग काय दोन दिवसांनी,सुट्टी मिळाली की ,मीही येतो .तुझ्या माहेरचे हसत असतील,पण मी तेवढा विचार नाही करत ,मला तुम्ही सगळे डोळ्या समोर हवे असता.मी अशी अपेक्षा करतो की,तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहे.

जसं तू लिहिलं ना ,फक्त तुमचीच 

तसचं ,

फक्त तुझाच

पत्रातील भावना आवडल्या असतील,तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.

रुपाली थोरात

🎭 Series Post

View all