अंशू ची लूट

It's a small kid festival and celebrate with lots of happiness

अंशू ची लूट

अंशुमन माझा मुलगा,बघता बघता 2वर्षाचा झाला,कसे दिवस गेले कढलेच नाही...तसे बघायला गेले तर ही अंशू ची दुसरी लूट पण मागल्या वर्षी मी त्याची लूट केली नाही म्हणजे पहिल्या वर्षी दूध भरून वाटी चे वाण देण्याची पद्धत आहे असे मला आईने सांगितले...

आणि म्हणूनच या वर्षी मी अंशू ची लूट केली,,
मकरसंक्रांतीच्या दुसरा दिवस म्हणजेच लुटीचा दिवस,आता लूट म्हणजेच काय??असा प्रश्न पडला असेल तर लूट म्हणजे लहान मुलांचे चॉकलेट,बिस्कीट, ड्राय फ्रूट ,बोर,गाजर,ऊस,.. अशे पदार्थ घेऊन त्याचे न्हाणे करणे होय.

अगदीच साध्या पद्धतीत लूट करण्याचे आम्ही ठरविले, लुटीच्या दिवशी सकाळीच यांनी(अंशू चे बाबा) चॉकलेट, बिस्कीट,ड्राय फ्रूट इत्यादी आणले.,गाजर,बोर ऊस वैगरे आधीच होते,..जवळपास सर्व च तयारी छान  झाली होती...

संध्याकाळ ची वेळ होताच,अगदीच लगबगीने मी लुटीच्या तयारीत लागले,..त्या दिवशी अंशू ला मस्त पैकी छान कुर्ता ड्रेस घातला...किती गोड दिसत होतं माझं पिल्लू त्या दिवशी,,त्याला बघतच राहावे असे वाटत होते,..अंशू ही थोडा मस्तीखोर आहे न्यू ड्रेस त्याने घालू दिला पण तयारी काही करू देईना...इकडून तिकडे तर तिकडून इकडे सारखा धावत होता,, कसं बसं त्याला धरलं अन् पावडर लावलं...

तयारी झाल्याबरोबर त्याला कळले की आज काहीतरी विशेष आहे,म्हणून त्याचीच सारखी धावपळ सुरू होती,मम्मा मम्मा...करीत सारखा माझ्या मागे फिरत होता..

जास्त वेळ न लावता मग मी आजूबाजूच्या लहान मुलांना बोलावून आणले व सोबतच काही बायांना सुद्धा,...अंगणात गर्दी होताच अंशू थोडा घाबरलाच पण लहान मुलांना पाहून सावरला..त्याच्या वयोगटातील मुलं त्याला फार आवडतात,त्यामुळे लहान मुले दिसली की त्याला फार आनंद होतो....

मध्ये पाट ठेवला अन् त्या पाटावर अंशू ला बसविले तर अंशू एक सेकंद सुद्धा पाटावर बसायला तयार नव्हता,,तो सारखा लहान मुले जिथे बसली होती,तिथेच त्यांच्यासोबत बसत होता.

कसेबसे त्याला बसविले आणि ओवाळून घेतले,सोबतच काही बायांनी पण ओवाळले...आणि त्याची लूट केली..सुरवातीला चीरंजी ची मुठ,नंतर चॉकलेट,नंतर बिस्कीट,नंतर गाजर बोर अशा मुठी अंशू च्या टोक्यावर टाकल्या....

हे असं माझ्या डोक्यावर एका मागोमाग एक काय टाकत आहे,असा प्रश्न कदाचित त्याला पडला होता,,थोडा तो अरबडला,,आणि लगेच उभा झाला....मग तो उभा असताना च काही मुठी त्याच्या डोक्यावर टाकल्या...

त्याला ही वेगळीच गंमत वाटत होती,तो खूप आनंदी होता,,इतर मुलांनी लुटण्यासाठी केलेली गडबड,,या सर्व प्रकारची त्याला फारच मज्जा वाटत होती...

अतिशय साध्या पद्धतीत केलेली लूट,अंशुसाठी खूपच विशेष होती,..असे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते..आणि त्याच्या लुटीतून मलाही फारच आनंद मिळाला...त्याला आनंदी पाहून आम्ही पण खूप आनंदी झालो होतो....


Ashwini Galwe Pund