अनोळखी भाग -२

True love is priceless.

तशी ती marine lines ला बऱ्याचदा यायची. कारण अनोळखी अश्या या मुंबई मध्ये याच ठिकाणी अनोळखी असूनही रोज पाहण्यात येणारे, फक्त नजरेलाच का होईना पण ओळखीचे असे वाटणारे काही चेहरे दिसायचे. त्यात एक वृद्ध आजी आजोबा होते जे रोज न चुकता ६ च्या आसपास तिथे यायचे. बहुदा संध्याकाळच्या गार वाऱ्यासोबत एकमेकांसवे जगलेल्या क्षणांना आठवणीच्या सुंदर माळेत गुंफण्याचा प्रयत्न करत असावेत आणिआणखी देखील असेच खुप जण.

         आज सायली कठडयावर येऊन बसली आणी लाटांच्या गुंजारवासोबत बाकी आसपासच्या लोकांना न्याहाळू लागली. त्यात तिला दूरवर ऐके ठिकाणी असाच एक कठडयावर बसलेला एक व्यक्ती दिसला. तश्या रोज दिसणाऱ्या ओळखीच्या अश्या वाटणाऱ्या चेहऱ्यांपैकी हा नव्हताच पण तिच्याच प्रमाणे तो देखील एकटा बसलेला असल्याने तीचं  लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं एवढंच. पुन्हा एकदा लाटांच्या आवाजात सायली गुंगली. घरी जाण्यासाठी उशीर झाला असल्याने ती तशीच विचारात उठून घरी जाण्यासाठी निघाली. चर्नी रोड via दादर बोरीवली आणी शेवटी तासभराच्या प्रवासानंतर ती विरार ला तिच्या रूमवर पोहोचली. तशी सगळ्यांना नावडती असणारी मुंबईची गर्दी तिला खुप आवडायची. कारण विविध स्वभावाची विविध भाषेची विविध चेहऱ्याची माणसं त्यानिमित्ताने रोज पहायला मिळायची.

       बाहेरुन येताना थोडं खाऊन आल्यामुळे आजही भूक नव्हतीच पण सवयीप्रमाणे  आजही ती मेसवाल्या काकुंना डबा करू नका असं सांगायचं विसरलीच. काकुंचा फोन आला व ती भानावर आली आज काही कारण दिलं तर काकू घरी फोन करतील मग पुन्हा आईचं बोलणं ऐकावं लागेल त्यापेक्षा तिने डबा घरी आणला व कसाबसा संपवला.

    जेवत असताना विचार करता करता अचानक तिच्या लक्षात आलं उद्या शनिवारआहे म्हणजे उद्या पुन्हा सुट्टी. लहानपणी खुप आवडीची असलेली ही सुट्टी मुंबई ला आल्यापासून सायली ला आवडेनाशी कधी झाली हे आठवून मग ती स्वतःच गालातल्या गालात हसली.दोन दिवस पुण्याला यावं म्हणाल तर आईबाबा ही कोण्या एका आत्याच्या मुलाच्या लग्नाला गेले होते त्यामुळे तिला असाच दिवस काढण्याशिवाय पर्याय नव्हता मग तिने मस्त planning केलं शनिवारच. सकाळी सगळी कामं आवरुन मस्त shopping आणी मग आपलं आवडतं marine...perfect plan.

क्रमशः

🎭 Series Post

View all