Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

अनोळखी दिशा भाग ५

Read Later
अनोळखी दिशा भाग ५

©®प्रज्ञा बो-हाडे

अनोळखी दिशा भाग ५

गावातल्या मित्रांशी वाद झाल्यावर जवळच अस कोणीच वाटत नसताना काॅलेज मध्ये नाईट ड्यूटीला असणा-या वाॅचमन काकांनी मित्रासारखी साथ दिली. रिदांशची सुख-दु:ख ऐकून घेवू लागले. काका प्रेमळ आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवत रिदांश स्वत: बाबत घडलेल्या सर्व गोष्टींचा उलगडा करु लागला. आता रिदांश कायमच सोबत करणार. या भीतीने शांत असणारे वाॅचमन काका सावरले. त्यांनी या थंडिच्या तडाख्यात सिगरेट ओढायला सुरवात केली. 


रिदांश : काका, तुम्ही हे काय करता.

वाॅचमन काका : कधी करत नाही. पण आज थंडी खूप आहे. तू ओढतोस की नाही.

रिदांश : आता नाही फारशी ओढत.

वाॅचमन काका : घे आज माझ्या बरोबर.

रिदांश : नको. मला गावच्या मित्रांची आठवण होईल. आधीच त्यांच्याबद्दलचा राग माझ्या मनातून जात नाही.

वाॅचमन काका : जाईल रे घेवून तर बघ.

वाॅचमन काकांच्या शब्दांना भुरळ पडत रिदांश सिगारेट ओढू लागतो. हळूहळू वाॅचमन काका रिदांशला दारुच्या देखील आहारी लावतात. रिदांश दारुच्या इतक्या आहारी जातो की, आठवड्यातून दोनदा घेतल्यशिवाय त्याला चैनच पडत नसे.
काॅलेजमध्ये कबड्डी स्पर्धेची तयारी सुरु असते. रिदांश नेमकी दारु पिवून सरावाला गेलेला असतो. तिथे उपस्थित असलेल्या दुसरा गटाच्या मुला बरोबर रिदांशचे काही वाद होतात. रिदांशने माफी मागितली नाही तर त्याला स्पर्धेतच नाही तर, या काॅलेज मधून काढण्यात येईल अशी धमकी देण्यात येते.
रिदांश दुखावला जावून मनातल्या मनात परत कधीच कबड्ड खेळणार नाही असे ठरवून त्या दुस-या गटातल्या मुलाची माफी मागतो. आणि तडख घरी निघून येतो. आपल्या खोलीत जावून दार बंद करुन झोपी जातो.


रिदांश सतत दारु प्यायलाने आजारी पडतो. काॅलेजला आठवडाभर जात नाही. काॅलेजमधले वाॅचमन काका चौकशी करायला घरापर्यंत येवून पोहचतात. रिदांशची विचारपूस करुन तिथून निघून जातात. जाताना लवकर बरा हो. तुझ्याशिवाय घ्यायला बर वाटत नाही. असे बोलतात. चपापलेल्या अवस्थेत रिदांश म्हणतो. काका, काय बोलताय. मी बरा झालो की बोलू आपण.
इतक्यात डाॅक्टर कडे नेण्यासाठी विहान रिदांशला बोलवायला येतो. हे बोलण विहानच्या कानावर पडत. आत्ताच काही बोलायला नको म्हणून विहान रिदांशला डाॅक्टर कडे घेवून जातात.
रिदांशला डाॅक्टर दारु न पिण्याचा सल्ला देतात. घरी ही बातमी नव्याने समजते. सिगरेट ओढण्याचे व्यसन ठावूक होते. पण आता दारु देखील प्यायला सुरु केली हे ऐकून विहानला वाॅचमन काकांचे शब्द आठवतात.
डाॅक्टर रिदांशला आराम करण्याचा सल्ला देतात. घरी दारु विषयी आईला सांगू नको असे रिदांश विहानला विनवणी करतो. यावर विहान एक अट घालतो. पुन्हा कधी दारु ला स्पर्श देखील करायचा नाही. हे सगळ कधी पासून सुरु आहे.


या प्रश्नावर काही न बोलता चुकून एका मित्राच्या वाढदिवसाला घेतली आणि नंतर सारख घ्यावस वाटले. कधी दारुच्या आहरी गेलो समजलच नाही अस रिदांशच्या बोलण्यात कुठेतरी खोट्या पणाचे सूर गवसत होते.
डाॅक्टरांनी काही दिवस घरी आराम करण्याचे रिदांशला सुचवले. याच संधीचा फायदा घेवून विहान नक्की कोणत्या करणाने रिदांशवर ही वेळ आली याचा शोध घेण्याकरता काॅलेजला जातो.
चौकशी अंती नाईट ड्यूटीच्या वाॅचमन काकांविषयी समजते. रिदांशचे काही कब्बडी मित्र सांगतात, "रिदांश या वाॅचमन काकांसोबत जास्त राहायचा. त्या वाॅचमन काकांना गाठून विहान सत्य गोष्टीचा उलगडा करतो.
त्यात वाॅचमन काकांनी रिदांशला पिण्यास भाग पाडले हे कळताच, ताबडतोब नोकरी बदलून घ्यायची अशी धमकी विहान ने त्या वाॅचमन काकांना दिली. नाहीतर, या गोष्टी काॅलेजच्या प्रिन्सिपल ला सांगण्यात येतील.


वाॅचमन काका : थोड्या दिवसांचा अवधी द्या मी दुसरीकडे सोय करतो माझी. दया करा माझ्यवर.

विहान : रिदांश काॅलेजला येण्याच्या आत तुम्ही काॅलेज सोडल पाहिजे. अन्यथा काय होईल तुम्हांला चांगलच माहित आहे.


बदनामी होण्यापेक्षा काॅलेज सोडलेलच बरे. अश्या समजूतीत वाॅचमन काका निघून जातात. रिदांश पूर्णपणे बरा होतो. काॅलेजला पूर्वीसारखा आल्याने संध्याकाळ होताच नेहमीचे वाॅचमन काका न दिसता दुसरेच इसम दिसत होते.
त्यांच्याशी विचारपूस करता, त्यांची दुसरीकडे ट्रान्सफर झाल्याचे समजले. रिदांश दु:खी झाला. आयुष्यात काय सुरु आहे याचा थांगपत्ताच लागायला मार्ग सापडत नव्हता. माझच बाबतीत का घडत असे? लहानपणी तर दु:ख भोगल आहे? आणि परत असेच दिवस दिसणार आहेत का मला? या विचारांनी रिदांश सुन्न होतो.


इतक्यात अक्षयाला पाहायला मुलगा येणार असल्याचे काही मित्रांकडून समजते. तरीच अक्षया आपल्याशी काही संपर्क करत नसावी. असे रिदांश चे मत बनते.


अक्षयाचे पाहायला आलेल्या मुलाशी लग्न होईल का? की रिदांश अक्षयाच्या घरी जावून अक्षयाला पाहायला आलेल्या कार्यक्रमात व्यत्यय तर नाही ना आणणार? जाणून घेवूया पुढिल भागात.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pradnya Pavan Borhade

Home Maker

मनातल्या भावना कल्पकतेने गुंफूण कथांच्या माध्यमात मांडायला आवडते.

//