Mar 03, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

अनोळखी दिशा भाग ३

Read Later
अनोळखी दिशा भाग ३

©®प्रज्ञा बो-हाडे

अनोळखी दिशा भाग ३

पाहताच क्षणी प्रेमात पडाव इतका रिदांश आता देखणा दिसत होता. उंचपुरा, गोरापाण. हुशार, सर्वांशी मिळून मिसळून राहणारा.प्रत्येक विषय समजावून सांगताना दैनंदिन जीवनातल्या घडामोडींची उदाहरणे देत असल्यामुळे विषय चुटकीसरशी लक्षात राहू लागले.

कितीही वेळा एकच प्रश्नाचे उत्तर सांगाव लागाले तरी रिदांश कंटाळत नव्हता. म्हणतात की वयाने मोठ झालो की जबाबदारीची जाणिव आपोआप होते. अक्षयाच रिदांश वर जिवापाड प्रेम जडले.


अक्षया काही न काही कारण काढून रिदांश च्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असायची. हळूहळू रिदांशला अक्षयाच आपल्यावर प्रेम आहे ही गोष्ट लक्षात आली. अनेक वेळा प्रयत्न करुन रिदांश आपल्याकडे पाहत नाही. त्याच दुसर कोणत्या तरी मुलीवर प्रेम असणार अस अक्षयाला वाटत असतानाच, समोर जे दृश्य दिसले ते पाहून वाचकहो, तुम्हांला पण हेच वाटणार की, मनात आणलेल खरच सत्यात उतरलय की काय. याचा नजरेसमोरच दृष्टांत झाला.
रिदांश त्याच्या बाईकवर एका मुलीला घेवून काॅलेजला आला होता. अक्षयाला या गोष्टीचा खूप राग आला होता. आठवडाभरासाठी रिदांश बरोबर अबोला धरला. या काळात रिदांशला मात्र अस्वस्थ वाटू लागले. सतत अक्षया अवतिभवती असायची. प्रेमाने विचारपूस करायची. काय हव नको ते आपुलकीने पाहायची. या सर्वाची जाणिव होत रिदांशला आपलही अक्षयावर प्रेम जडले की काय? अस प्रश्न चिन्ह उभ राहिले होते.
शेवटी न राहवून आज अक्षया शी बोलून प्रेमाची कबूली देण्याच रिदांश ठरवतो. अक्षयला एक दिवस एकटीला पाहून रिदांश काॅलेजच्या गेटवर थांबवतो. खरतर अक्षयाला देखील रिदांश शिवाय करमत नव्हते. पण करणार काय? त्याच्या मनात नक्की काय चालू आहे समजणार तरी कसे. या करता अक्षयाने ह्या युक्तीचा वापर केला होता.


अखेर रिदांशने प्रेमाची कबुली दिल्यावर त्या दिवशी काॅलेजला बाईकवर बसून आलेली मुलगी कोण होती? हा प्रश्न कुतूहलाने विचारलाच. रिदांशने हसण्याची भूमिका घेत. ती मुलगी अनोळखी होती. तिच्या पायाला चमक निघाल्याने फक्त काॅलेज पर्यंत सोडवण्यची विनंती करत होती. उभ राहताना देखील त्रास होत होता.
ठिक आहे म्हणत गालातल्या गालात हसत अक्षया ने प्रेम स्विकारले. रिदांश आणि अक्षया आता डेट वर जावू लागले. दोघे एकमेकांसोबत छान वेळ घालवू लागले. पिक्चर, बाहेर जेवायला जाण्याचे बेत दिवसाड किंवा आठवड्याने ठरु लागले.
रिदांश पिक्चर पाहून फिल्मी झाला असावा. तो अक्षयाला कॅडबरी, गुलाबाची फुले, ज्वेलरी, ड्रेस असे गिफ्ट देवू लागला. अक्षया प्रेमाची आठवण म्हणून जिवापाड जपत होती. अक्षया देखील रिदांशला शर्ट, वाॅलेट गिफ्ट करु लागली.


प्रेमाचे वारे सुरु असताना एक दु:खद घटना घडते. ज्या घटनेमुळे प्रेमाचे धागे काही काळा साठी विखुरले गेले होते. अमेयचा अपघातात मृत्यू होण. जिवाला घोर लावणारी. अमेय कंपनीच्या कामा करता स्वत:ची गाडी घेवून गेलेला असतो. काम करुन घरी येत असताना, ट्रकशी टक्कर होताच गाडी अक्षरश: चिरडली गेली होती.
काही समजण्याच्या आतच अमेयचा मृत्यू होतो. घर कोलमडून गेल होत. अशा अवस्थेत आपल दु:ख एका बाजूला तर नव्याने बहरलेल प्रेमा च्या भेटिची उत्कंठता दुस-या बाजूला.
अशी द्विधा मन:स्थिती रिदांशची झाली होती.
वडिलांचा अचानक झालेला मृत्यू रिदांश सहन करु शकत नव्हता. अश्यातच गावावरुन काही माणसे रिदांशच्या घरच्यांना भेटायला आली. त्यात गावचा मित्र मनोज देखील आला होता. मनोजला पाहताच रिदांशला आठवण झाली ती लहान असताना गावाला भेटलेल्या त्या आठवणींची.


ज्या आठवणीत रिदांशची वाईट बाजू लपलेली होती. त्यातूनही सावरत रिदांश परत त्या मार्गाला जावू नये म्हणून विहान त्या गावावरुन आलेल्या मनोजला भेट झाल्यावर गावी जाण्याचे सुचवतो.
रिदांशला विहानचे वागणे थोडे खटकले. पण हि वेळ विरोध दर्शवणारी नाही हे जाणताच मनोजला काहि ईशारे करत रिदांश थांबवून घेतो. घरात शोकाकूल वातावरण असताना देखील रिदांश मनोजला एक हाॅटेल मध्ये राहण्याची व्यवस्था करुन देतो.
खरतर मनोजला रिदांशकडून पैशाची काही सोय होईल का? विचारने तो रिदांकडे आला होता. रिदांश त्याच क्षणी चेक देवून टाकतो. मनोजला रिदांश पैशे द्यायला इतक्या सहजासहजी तयार होईल असे वाटत नव्हते.


पाच महिन्यात पैशे परत करतो असे सांगून दुस-या दिवशी मनोज गावी निघून जातो. मनोज आता वरचेवर पैशाची मागणी करु लागला. कष्टाने उभे केलेलं साम्राज्य लयास जायल कितीसा वेळ लागतो, नाही का? रिदांश वडिलांच्या मृत्यू नंतर पूर्णतः बदलून गेला. पुन्हा पूर्वी सारखा वागू लागला.सतत चिडचिड, राग व्यक्त करत होता. विहान एकटाच धावपळीचे काम करत होता. वडिलांच्या मागे घराला सावरावे हि इच्छा मनाशी धरुन दिव्याच लग्न वर्षाच्या आत करुन देण्याचा निश्चय पक्का झाला.


या घटनेवर दिव्याने एकच तगादा लावून धरला. घरात आधी सून यायला हवी. मगच दिव्या लग्न करुन जाणार होती. विहान लावायला गेला बहिणीच लग्न पण स्वत:च्या लग्नाचा प्रस्ताव स्विकाराव अशी परीस्थिती निर्माण झाली होती.
आई देखील दिव्याच्या हो ला हो म्हणत सून घरात आणण्याचा हट्ट धरु लागली. घरातल्यांपुढे विहानला काही बोलता येत नव्हते. सरतेशेवटी विहानचे लग्न लावण्यात येते.


त्यांचा संसार सुरु झाला. आता तरी राणी सरकार लग्नाला तयार आहेत ना? विहानच्या प्रश्नाला दिव्याने लाजून होकार दिला. थाटामाटात दिव्याच लग्न पार पडल.
दिव्या जरी घरातून गेली असली तरी सुंदराच्या रुपात सून नाहीतर मुलगीच लाभली होती. सगळे सुरळीत चालले होते. इकडे रिदांशच्या डोक्यात मात्र नको त्या विचारांनी थैमान मांडले होते. आपल्याकडे कोणाचच लक्ष नाही. आईला फक्त विहान आणि वहिनीच दिसतात.


मला आपल म्हणणारं कोणी राहिलच नाही घरात. काॅलेजची सहल जाणार होती. रिदांशला खरतर गावाला जायचे होते. काय कारण सांगून गावाला जाव ह्या प्रश्नाच उत्तर काॅलेज च्या सहलीला चाललो आहे, अस सांगता येईल.
घरच्यांना रिदांशने गावी जाणे फारसे रुचत नव्हते. पुन्हा नको त्या व्यसनांच्या आहारी जाण्यापेक्षा तो गावापासून अलिप्त राहिलेलाच बरा.
एकांत वाट्याला आल्यावर रिदांशला सारखी आपल्या गावच्या मित्रांची आठवण येत होती. अखेरीस रिदांश सहलीच निमित्त काढून गावी जाण्याच्या तयारीला लागतो.


गावाला गेल्यावर रिदांश परत व्यसनाच्या आहारी जाईल का? गावच्या मित्रांशी इतक्या वर्षांनी ठरलेली भेट शेवटची भेट तर ठरणार नाही ना? हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pradnya Pavan Borhade

Home Maker

मनातल्या भावना कल्पकतेने गुंफूण कथांच्या माध्यमात मांडायला आवडते.

//