Feb 29, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

अनोळखी दिशा भाग २

Read Later
अनोळखी दिशा भाग २

©®प्रज्ञा बो-हाडे

अनोळखी दिशा भाग २

मनाची कशीबशी समजूत काढून रिदांशने स्वत:ला गावी जाण्यासाठी राजी केले. वाढदिवस दरवर्षी येत राहतो. पुढच्या वर्षी सगळी कसूर भरुन काढूया. यापेक्षा अजून मोठी गिफ्टची यादी तयार करुन ठेवूया. 

गावाला आजूबाजूला शेत असल्याने थंडी चांगलीच जाणवत होती. दिव्या आणि विहान घराच्या बाहेर पडायचे नावच घेत नसायचे. रिदांशने गावी अल्पावधीतच नविन मित्र बनवले होते. त्यांच्या बरोबर तो शेतात जावून शेकोटी बनवू लागला.
कधी तर रात्रभर त्यांच्या बरोबर राहून दुस-या दिवशी घरी यायचा. गावतल्या ओळखींच्या लोकांनी गावातल्या उनाड पोरांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. रिदांशच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली होती.
परिस्थिती हालाखिची असल्याने गावची पोर मिळेल ते काम करत असायची. मिळालेल्या पैशातून पोटाची भूक भागवू लागली. काम कधी मिळायच तर कधी नाही. तुटपुंज्या पैशात पोट भरायचे नाही. लहान वयातच पोर व्यसनाच्या आहारी गेली होती. काम मिळेल तसे दुरच्या तालुक्याला आठवडाभरासाठी राहावे जावे लागायचे.
राहण्याची सोय स्वत:लाच करावी लागायची. आडोश्याला सतरंजी आणि बांबूच्या मदतीने झोपडी करुन तिथे राहावे लागायचे. लहान वयात सिगारेटचे व्यसन लागून गेले. काहीजण तर गुटखा, दारुच्या देखील आहारी गेले होते.

रिदांश गावी या पोरांबरोबरच राहत असे. हि पोर सकाळी आपल काम आवरुन रिदांशला भेटायला शेतात घेवून जावू लागले. तिथे रिदांशला सिगरेट ओढण्याची इच्छा होती. सुरवातीला घाबरणारा रिदांश नंतर मात्र सिगरेटच्या धूरात जणू आपले वाढदिवस साजरा न होण्याच दु:ख विसरायला लागला होता.

शहरात जाण्याचा दिवस जवळ येवून ठेपला. रिदांशला गाव सोडून जावस वाटत नव्हत. मित्रांना भेटायला वरचेवर गावी येणार या बोलीवर रिदांशला शहरात घेवून जातात.

रिदांशच मन अस्थिर होत असायचे. त्याच्या मनात गावाला जायची ओढ निर्माण होत होती.गावाला गेल्यावर मनसोक्त फिरता येत असल्याने रिदांश गावी जाण्याची एकही संधी सोडत नव्हता.घरातल्या प्रत्येक व्यक्तिला रिदांशचे वागणे कळत नव्हते. एरव्ही टापटिपीत राहणारा, सगळ माझ्याच आवडीच हव अस म्हणणारा, गावाला रिदांशच्या आवडीचे पदार्थ मिळायचे नाही तरी गावी जाण्याची ओढ का निर्माण होत असेल ठावूक नसायचे?
रिदांश जसा मोठ होत आहे तसा त्याच्यात जबाबदारीची जाणिव वाढत चालली आहे अशी समजूत सरतेशेवटी निघते.

तो वाईट काम करत तर., नसेल ना? असा मनात कोणच्याही आला नाही. गावची ओढ, तिथल्या निसर्गाच्या प्रेमात पडला असावा अंदाज लावत घरातले खूश असायचे.

एकदा विहानच्या मनात येते यावेळी सुट्टीला आपण रिदांशला न कळवता तो गावी गेला की चार-पाच दिवसांनी गावी जावून त्याला धक्का द्यायचा. ठरल्याप्रमाणे विहान नंतर गावी जातो. जे दृश्य पाहतो त्यावर तो कधीच विश्वास ठेवू शकणार नव्हता.
गावच्या पोरांबरोबर शेकोटी समोर सिगरेट ओढताना रिदांशला पाहतो. आत्ता जावून रिदांशच्या कानाखली द्यावी हा विचार विहानच्या मनात रेंगाळत होता. प्रवास करुन थकवा जाणवत असल्याने उद्या सकाळी या विषयावर बोलू असे मनाशी बोलत विहान झोपी जातो.
इकडे रात्री आपल्या भावाला गावी आलेला पाहून रिदांश घाबरतो. आपल्याला सिगरेट ओढताना पाहिले तर नसेल ना. असंख्य प्रश्नाच काहूर मनात माजले होते. दिवस उजाडला तसे विहान हाक मारु लागला.

विहान : रिदांश इकडे ये. मला बोलायच आहे तुझ्याशी.

रिदांश : ( गोंधळलेल्या अवस्थेत) काय झाल दादा. कधी आलास तू् , मला सांगितल का नाही. मी स्टाॅप वर आलो असतो घ्यायला.

विहान : हो का. मला तुझ अस रुप बघायच होत म्हणून कदाचित देवाने अक्कल दिली असावी.

रिदांश : अस काय बोलतो. काय झाल.

विहान : या करता तुला गावाला यायच असत का? सिगारेट ओढायला कोणी शिकवल तुला.लहान आहेस पण वाईट गोष्टी कश्या काय आत्मसात कराव्या वाटल्या. जरा सुद्धा आमच्या बद्दलचे विचार मनात आले नाही का?


रिदांश : मला माफ कर दादा. पुन्हा नाही वागणार अस.

विहान : आपण उद्याच गाव सोडायच आहे. आता थांबण्यात अर्थ नाही.

रिदांश : चालेल दादा.


विहानला दुखरी बाजू समजली आहे. याच रिदांशला वाईट वाटत होते. आता आपल्यावर कावळ्या सारखी नजर ठेवून २४ तास देखरेख ठेवेल याचा अंदाज घेत रिदांश सुधरला असल्याचे नाटक करत असतो. विहानची खात्री पटे पर्यंत रिदांश गावी गेलाच नाही.
या सहा - सात महिन्याच्या कालवधीत रिदांश वेळेवर शाळेत जात असतो. कबड्डीचे शिक्षक रिदांशला कबड्डी खेळण्यासाठी सिलेक्ट करतात. रिदांश आता कबड्डी खेळण्यात मंत्रमुग्ध झाला होता. आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून रिदांश कबड्डी कडे पाहू लागला.
रिदांश आता जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धेत शाळेला बक्षिस मिळवून देवू लागला. शिक्षक खूश झाले. आत्तापर्यंत कोणत्याच संघाने शाळेला पहिल्या क्रमांकाने जिंकू दिले नव्हते. रिदांशची कामगिरी वाखण्याजोगी होती. रिदांशचे घरी कौतुकसोहळा सजला होता.
रिदांशचा वाढदिवस करता न आल्याची खदखद घरच्यांना देखील होती. कबड्डी जिंकून ट्राॅफीला घरात आणलेला क्षण सुवर्ण अक्षरात कोरता यावा म्हणून मोठ सेलिब्रेशन रिदांशच्या नकळत ठरवले गेले. रिदांशला जसा वाढदिवस साजरा झालेला वाटत होता तसाच मनाप्रमाणे वाढदिवस नाही पण जिंकल्याचा सोहळा साजरा करण्यात आला होता. रिदांशला खूप आनंद झाला.


घरच्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोण आता बदलला आहे. ते आपलाही विचार करतात. आपणही त्यांच्या मनाचा विचार करुनच इथून पुढे वागायला हवे.
रिदांश सर्वांचे बोलणे ऐकून घेवू लागला. घरात छोटी-मोठी मदत स्वत:हून करु लागला. रिदांशच बदलणार वागण पाहून आई-बाबा निश्चिंत झाले. रिदांश कब्बडी खेळा बरोबर अभ्यासही मन लावून करु लागला.
डिस्टिंकशन मिळवून रिदांश पास झाला. आवडत्या काॅलेज मध्ये अॅडमिशन सहज मिळाले. अभ्यासाची गोडी निर्माण झाल्याने रिदांश हुशार विद्यार्थीं पैकी एक समजला जावू लागला.
सगळ्यांचा रिदांश मित्र बनला. अवघड वाटणारे विषय सोपे करुन रिदांश समजावू लागला. आता मित्रांबरोबर अनेक मैत्रिणी देखील नव्याने नुकत्याच झाल्या होत्या. त्यातलीच एक म्हणजे अक्षया.


अक्षया फक्त मैत्रिण बनून राहणार रिदांशच्या आयुष्यात., की पुढे जावून कोणत नव्या नात्याची चाहूल., हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pradnya Pavan Borhade

Home Maker

मनातल्या भावना कल्पकतेने गुंफूण कथांच्या माध्यमात मांडायला आवडते.

//