अनोळखी दिशा भाग १

आपल्या डोळ्यासमोर अश्या काही घटना घडतात की नाईलाजाने गुन्हा घडत जातो.

©®प्रज्ञा बो-हाडे

अष्टपैलू लेखक महासंग्राम

तिसरा राउंड रहस्य कथा

      कथामालिका काल्पनिक स्वरुपात रचण्यात आली आहे. वास्तवाशी त्याचा काही सबंध नाही. 

    अतिशय श्रीमंत कुटूंब म्हणून नावारुपाला आलेल दामल्यांच घरकुल अगदी दृष्ट काढण्यासारख होत. कुटूंबात अमेय आणि स्पृहाला दोन मुल विहान आणि रिदांश. एक तरी मुलगी घरात असावी. सुख-दु:ख जाणून घेणारी. अस सासू-सास-यांच मत. मुली शिवाय घराला शोभा नाही. एरव्ही समाजात घराला वारस हवा म्हणून नवस करतात. पण इथे तर परीस्थिती मात्र निराळीच बघायला मिळत होती.

स्पृहा आणि अमेयला जोडीने कुलदैवत खंडोबा आणि तुळजाभवानीला नवस करायला सांगितले. देवदेवितेने काही महिन्यातच कौल दिला. दिव्याच्या रुपात घराला सुखा च्या ओंजळींनी भरुन टाकणारी राजकुमारी जन्माला आली.

सगळ्यात लहान परी म्हणून आजी-आजोबा, नातेवाईक, आई-बाबांचा लाडोबा च झाली होती दिव्या. तिने तोंडातून नाव काढताच सगळ्या गोष्टी हजर होत असायच्या. विहान घरातला मोठा मुलगा. रिदांश आणि दिव्याच्या आवडींना स्वत:चीच आवड मानून जगू लागला. 

रिदांश च याबाबत नेमके उलट मत बनत चालले. दिव्याच्या होकारात विहान साथ देत आहे. दिव्या मुलगी आहे, म्हणून तिच एवढे घरात लाड का? करतात हा प्रश्न रिदांश ला पडत असे. त्याला दिव्याचा प्रचंड राग येत असे. कोणी घरात नसल्यावर दिव्यावर मारहाण देखील रिदांश करत असायचा. आणि जर कोणाला याबद्दल काही सांगितले तर., पट्याने अंगावर वळ उठण्यात येतील अशी भिती दिव्याच्या मनात सतत घर करुन राहत असायची.

रिदांश बरोबर घरी थांबण्याची वेळ आली की दिव्याला अक्षरश: घाम फुटायचा. विहान अनेकदा दिव्याच वागण नोटिस करु लागला. इतर वेळी मनमोकळेपणाने वागणारी दिव्या रिदांश बरोबर असताना कावरी बावरी होत असायची.


विहान : तू रिदांश बरोबर असताना इतकी घाबरलेली का असतेस? तुला काही बोलतो का तो.

दिव्या : नाही दादा. तो माझी चांगली काळजी घेतो.

खर सांगितल तर पट्टयाने खावा लागणारा मार सतत डोळ्यासमोर येत असायचा.

रिदांश म्हणजे स्वत:चच म्हणने खर करणारा. पैशाची धुंदी, माज तर त्याला लहानपणापासूनच जडलेला. घरात कामाला येणाऱ्या मावशी आणि काकांना तो, अरे.. इकडे ये.अशा एकेरी नावाने संबोधत असायचा. बुट पायात घालून देणे. नाश्ता रुम मध्ये आणून देणे अशा आॅर्डर रिदांश त्यांना देत असे.


त्यांनी काम केल्यावर टिप देखील देण्यात रिदांश ने कसर सोडली नव्हती. स्पृहा ने अनेक वेळा समजून, मार देवून रिदांशला सुधारण्याचा प्रयत्न केला. अमेयच्या अनेक युक्त्या फोल ठरल्या. रिदांशला खोलीत बंद करुन, एक दिवस उपाशी ठेवून पाहिले. त्याच्यात काही बदल होईल अस कोणालाच वाटत नव्हत.
त्यापेक्षा तो आहे तसाच त्याला स्विकरावं अश्या मतावर सर्वजण ठाम राहिले. दिव्या वर त्याने भलतीच मर्जी संपादित केली होती. आपल्याला हव तस घरच्यांनी वागाव या करता दिव्याला टारगेट करुन मी म्हणेल असच बोलायच, जे रिदांशला खाण्याची इच्छा होईल तेच पदार्थ जेवणात वाढले जावे असे दिव्याला धमकावत असायचा.
घरामध्ये दिव्या सांगेल ती पूर्व दिशा मानली जायची. दिव्याला आपल्या बाजूला करुन घेतल्याने रिदांशने केलेल्या चूका तो सरळ दिव्यावर ढकलत जावू लागला. बिचारी दिव्या घरच्यांच्या नजरेत दोषी ठरु लागली.

रिदांश हातचलाखीने प्रूफ गोळा करत, कधी मोबाईल मध्ये फोटो काढून दिव्याला वेठिस धरु लागला. म्हणतात ना सत्य बोलले जाईपर्यंत खोट जग फिरुन येत. तसच काहीस दिव्याच्या बाबत घडू लागले. 

दिव्याचा वाढदिवस पुढच्याच महिन्यात होता. अजोबा दिव्याला टेबल-खूर्ची घेणार होते. बाबा सायकल, मोहित मामा परीचा ड्रेस घेणार होता. सगळ्यांची वाढदिवसाची जय्यत तयारी सुरु होती. नातेवाईकांना फोन करुन आमंत्रण देणे सुरु होते. दिव्या आता दहा वर्षांची होणार होती.
केकची आॅर्डर, डेकोरेशन अलिशान हाॅटेल मध्ये ठेवण्यात आले. दिव्याच्या सर्व मित्र-मैत्रिणीला बोलवण्यात आले. फोटोग्राफर, गाण्यांचा कार्यक्रम, डान्स, गेम खेळण्यात आले.

दिव्या वाढदिवसाच्या या झगमगाटात रमून गेली होती. सार स्वप्नवत वाटत होत तिला. वाढदिवस जल्लोषात पार पडला. अगदी पेपरमध्ये देखील अनोखे सेलिब्रेशन म्हणून दिव्याचा फोटो आणि कार्यक्रमातील निवडक बातमी छापून आल्या होत्या. लहान असून आजीने दिव्याला सोन्याची दिलेली चेन रिदांशला आवडले नाही. दिव्यापेक्षा आपलच लाड व्हायला हवे. असेच त्याला सतत वाटत असायचे. दिव्याचा घरात जन्म झाला तस आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही या काळजीने तो कासाविस होत असायचा.

आपल्याही वाढदिवसाचे असेच सेलिब्रेशन होणार या विश्वात रिदांश खुशीत गाजरे खात होता. यावेळी आजोबांकडून क्रिकेट सेट, आजीकडून ब्रेसलेट, आई-बाबांकडून कोटचा डिझायनर ड्रेस आणि बाईक घेण्याचे आधीच आयोजन आखत होता.

त्यात गावी राहणा-या महादू काकांचा वृद्धापकाळाने मृत्यू होतो. घरातल्यांची गावी जाण्याची तयारी सुरु असते. तिथली जमिन विकून कायमस्वरुपी शहरातच स्थायिक होण्यासाठी दोन आठवडे गावी राहण्याचा आजी-आजोबांचे बोलणे बाबांनी मनावर घेतले.

आता कसला होणार वाढदिवस साजरा? रिदांश चिंतेत होता. दिव्या नशिब घेवून जन्माला आली तिच्यावेळी नाही झाल काही अस. रिदांश खूप चिडलेला होता. रागाने त्याने खूर्ची आपटली. टेबलवरची फुलदाणी खाली फेकून दिली.

स्पृहा ने समजूत काढली आपण पुढच्या वर्षी जोरात वाढदिवस साजरा करुया. आता करणे बरोबर वाटणार नाही. समजून घे.

रिदांश : माझ कुणाला काही पडलेलच नसत. माझ्याच बाबत होत अस.

पुढच्या भागात पाहूया गावाला रिदांश गावाला जाणार तेव्हा त्याच आयुष्य कश्या स्वरुपाच वळण घेणार आहे. तो समजूतदार बनेल की.. आणखी बिघडणार आहे?

क्रमशः

🎭 Series Post

View all