©®प्रज्ञा बो-हाडे
अनोळखी दिशा भाग ९
परीक्षा जवळ आली असल्याने रिदांश स्वत:ला झोकून देवून अभ्यास करतो. काॅलेजच्या ह्या वर्षी चांगल्या मार्कांने पास व्हायचे. आता पर्यंत अक्षया साठी नोकरी करण्याचा विचार रिदांशच्या मनात चालला होता. रिजल्ट लागला की, त्या मार्कांनी अजून चांगल्या कंपनीत नोकरी करण्याच स्वप्न रिदांशने उराशी बाळगले.
परीक्षेतील पेपर रिदांशला उत्तम गेले. आता यश आपल्यापासून काही दूर नाही. शिवाय घरावरच गरीबीची संकट देखील दूर होणार आहे. ह्या दोन्ही आनंदाच्या बातम्या एकाच दिवशी दिल्या तर काय अमृत तुल्य योग बनेल याचा रिदांश विचार करत असतो. नोकरीच्या शोधात रोज घराबाहेर पडू लागतो. रिजल्ट काही महिन्यात लागेल त्या आधी पेपर आत्ताच दिले असे सांगून मुलाखत देवू लागतो.नामांकित काही कंपनी वाल्यांनी मात्र रिजल्ट येईपर्यंत थांबायला लावले होते. जी कंपनी रिदांशला आवडत होती तिथे रिजल्टची वाट बघावी लागणार होती.
अखेर तो रिजल्टचा दिवस उजाडला.
रिदांश सकाळ पासून कासाविस होता.जर मनाप्रमाणे मार्क नाही मिळाले, तर कसे होईल. आणि दुसरीकडे पेपर, तर चांगले गेले होते. पण., शेवट पर्यंत काय होईल सांगता येणार नाही.
रिजल्ट हातात येताच रिदांशला काय करावे आणि काय नको अशी अवस्था झाली होती. मनाप्रमाणे मार्क आणि आवडती नोकरी मिळणार होती. बोलवण्यात आलेल्या दिवशी रिदांश कंपनीत मुलाखतीला गेला. मुलाखत उत्तमरीत्या पार पडली. रिदांशला काम मिळाले.
रिदांशचा आनंद गगनात मावेनासा झाला. हीच ती योग्य वेळ जिथे नोकरी लागण्याचा आनंद आणि पूर्वजांच्या दागिन्यांविषयी बोलावे.
जर अजून काही महिने थांबलो तर हरकत काय अश्या विचारात रिदांशला कंपनीत काम करुन सहा महिने देखील पूर्ण होतात.
या काळात आॅफिस मधले काही लोक रिदांश बरोबर राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. रिदांशला त्रास देण्याकरता काम नसताना देखील आॅफिसमध्ये रात्रभर थांबवून ठेवायचे. त्यात नविन असल्याने रिदांशला काही बोलता येत नव्हते. पण आता कायमस्वरुपी कंपनीत काम करणारा अस पत्र हाती आले. कोणी काही बोलले तरी आपण प्रतिकार करु शकतो. याची जाणीव रिदांशला झाली.
आता मात्र न थांबता रिदांश सर्व काही सांगणार होता. उद्याचा सूर्य रिदांशच्या आयुष्यात सुवर्ण अक्षरात कोरावा असा मंगलमय ठरणार होता.
पण हे काय.,रिदांश त्या दिवशी घरी आलाच नाही. विहान आणि आई सैरभैर झाले. पुन्हा तर कोणत्या वाईट संगतीत अडकला तर नसेल ना? याची काळजी दोघांना वाटत होती.
पोलिस ताबडतोब घाटाजवळ येतात. तिथे काही सुगावा हाती लागतो का? हे पाहण्यासाठी पोलिस आजूबाजूला शोध घेतात. डोंगराच्या गर्द झाडीत देखील पोलिसांची शोधाशोध सुरु होते.
तपासा अंतर्गत एक पोत दृष्टीस पडते. ते पोत त्या गर्द झाडीतून सापटीला आणण्यात येते. त्यात काय असेल? या विचारांनी खरतर हैराण व्हायला होते. हॅंण्डग्लोज घालून ते पोत उघडण्यात येते. त्या पोत्यात पोलिसांना रिदांशची डेड बाॅडी मिळते.
गुन्हा दाखल केला जातो आणि तपास करण्यास सुरवात केली जाते.
कोणी केला असेल रिदांशचा असा हदय पिळवटून टाकणारा खूण. पाहूया अंतिम भागात.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा