©®प्रज्ञा बो-हाडे
अनोळखी दिशा भाग ७
सकाळी उठून रिदांश मित्राच्या घरातून निघून स्वत:च्या घरी येतो. घरी सगळे त्याची वाट पाहत असतात. रात्रभर कुठे होतास हा प्रश्न विचारुन सर्वजण हैराण होतात. मित्राचा अॅक्सिडेंट झाल्याने रात्रभर दवाखान्यात होतो असे रिदांश सांगतो. आई काळजीपोटी बोलते, थकला असशील तू्. आराम कर. नाहीतर परत आजारी पडशील.
असेल काहीतरी म्हणत रिदांश ब्लॅंकेट ओढू लागतो. पिशवी खाली पडते. रिदांश ब्लॅंकेट घेवून झोपायला जातो. पहाटे अचानक त्याला जाग येते. त्याचे लक्ष त्या पिशवीकडे जाते.
सकाळी उठून रिदांश मित्राच्या घरातून निघून स्वत:च्या घरी येतो. घरी सगळे त्याची वाट पाहत असतात. रात्रभर कुठे होतास हा प्रश्न विचारुन सर्वजण हैराण होतात. मित्राचा अॅक्सिडेंट झाल्याने रात्रभर दवाखान्यात होतो असे रिदांश सांगतो. आई काळजीपोटी बोलते, थकला असशील तू्. आराम कर. नाहीतर परत आजारी पडशील.
आई : तुझ्या कपाटात असेल बघ की.
रिदांश : सापडत नाही म्हणून विचारत होतो. दुसरे आहे पण मला ते मल्टीकलरच हव आहे.
आई : ते का? अरे ते तर त्या कपाटाच्या वर ठेवून दिले आहे बघ. स्टूल घेवून काढावे लागेल तुला.
रिदांश : आणतो मी स्टूल. पण तेच हव आहे. कपाटावरुन ते ब्लॅंकेट खाली घेताच आपल्या रुम मध्ये गेल्यावर ते ब्लॅंकेट झटकत असताना एक छोटिशी पिशवी खाली पडते.
असेल काहीतरी म्हणत रिदांश ब्लॅंकेट ओढून झोपी जातो. पिशवी खाली पडते. रिदांश ब्लॅकेट ओढून झोपी जातो. पहाटे अचानक त्याला तहान लागते. पाणी पिण्यासाठी टेबलावरचे पाणी प्यायला तो जातो.त्याचे लक्ष त्या पिशवीकडे जाते.
तो पिशवी उघडून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात त्याच्या हाताला एक कागद लागतो. रुम मधली मोठी लाईट लावत तो कागद पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या कागदावर एक कोड लिहलेल असते. शेवटी एक नकाशा आखलेला असतो.
त्यापुढे पूर्वापार चालत आलेल्या दामले परिवाराच्या मंदिरातल्या गावच्या देवीच्या मूर्तीचे चित्र होते. मूर्तीच्या मागच्या बाजूला गोलाकार चिन्ह करुन काहीतरी सूचित करण्याचा प्रयत्न करत असावे.
गावाला जायचे तरी कसे? कारण काय सांगायचं घरी? आधीच मित्रांशी पण भांडण झाल आहे? त्या नंतर काहिच बोलण झाल नाही?
रिदांश सरतेशेवटी घरी गावाला आपल्या जागेवर कोणती तरी नोटिस आली आहे. ते जरा पाहून काही दिवसांकरता शेतीची अवस्था पण बघून येतो. शेतात दुसर काही लावता येते का ते पण पाहतो. आमच्या काॅलेजचे एक प्रोजेक्ट देखील आहे. ते सुद्धा करता येईल.
विहान : मी पण येतो तुझ्या बरोबर. एकट्याला कस जमणार तुला. ती नोटिस, प्रोजेक्ट.
रिदांश गावाला जातो. दोन दिवस उलटून जातात. ठरल्याप्रमाणे रिदांश देखील रोज फोन करत असतो. विहान रिदांशला न कळवतच गावी जातो. रिदांश नक्की करतो तरी काय? हे पाहत असताना, रिदांश खरच शेतीची देखरेख करताना आढळतो. वहि आणि पेनाच्या साहाय्याने मंदिराजवळ फिरताना दिसतो. कदाचित प्रोजेक्टच्या निमित्ताने काम चालू असणार या समजूतीत विहान असतो. दिवसा तर उत्तम काम सुरू आहे रिदांशचे. रात्री काय करत असावा? पुन्हा व्यसन तर जडले नाही ना? हे पाहण्याकरता विहान तिथेच लांब पाहत उभा असतो.
रिदांशला पूर्वापार चालत आलेल्या मंदिराच्या मूर्ती जवळ काही सापडणार आहे का? पाहूया पुढच्या भागात.
क्रमशः