अनोळखी दिशा भाग ४

वाईट संगत चुटकीसरशी जडते.

©®प्रज्ञा बो-हाडे

अनोळखी दिशा भाग ४

घरातल्यांशी खोट बोलून मनात भिती तर वाटत होतीच. पाच दिवस मोकळ्या वातावरणात मित्रांना भेटून नव्या उत्साहात घरी परताव अशी भावना रिदांशच्या मनात होती. 

मित्रांना फोन करुन आधीच सांगितल्यामुळे त्यांनी सुद्धा पाच दिवस फक्त रिदांशच्या सान्निध्यात घालवायचे, असे मित्रांचे ठरले गेले.जवळपासच्या ठिकाणांना भेट देण्याचे ठरवण्यात आले.मित्रांनी आखलेल्या प्लॅनप्रमाणे रिदांश गावी पोहचल्यावर मित्रांनी निसर्गाच्या सान्निध्यात, जंगला मध्ये सफर घडवली. संध्याकाळ होताच मित्र सिगरेट आणि दारुचे व्यसन करु लागले.
रिदांशला ह्या गोष्टीचा सुरुवातीला राग येत होता. तो गाडीतच बसून राहिला. दोन दिवसांनी मात्र रिदांशची देखील सिगरेट ओढण्याची इच्छा झाली. तीन दिवस सतत सिगरेट ओढून रिदांशला बर वाटायला लागले होते.


इतक्यात एका मित्राने रिदांशला दारु पिण्यासाठी आग्रह धरला. नशेत धुंद असलेला मित्र काही केल्या रिदांशला आवरण्याच्या पलिकडे गेला. दोघांची यामध्ये कडाक्याचे भांडण होते. इतर मित्र देखील गावच्या मित्राचीच बाजू घेवून रिदांश बरोबर भांडू लागतात. लहानपणी ज्यांना हवे तेवढे पैशे आणून दिले ते आज माझ्याशीच भांडण करत आहेत. ते पण इतक्या दिवसांनी भेटल्यावर रिदांशला या गोष्टीचा भयानक राग आला. त्याने पुन्हा गावी न येण्याचा निर्णय घेतला.
स्वार्थी दुनिया झालीये हल्ली. स्वत:च्या मनाप्रमाणे इतरांना वागवायला पाहतात. दारुवर भांडण इतकेच नव्हे तर रिदांशकडे सर्व मित्रांनी मिळून पन्नास हजारांची मागणी केली होती.
आधीच वडिल गेल्यामुळे घरातली जबाबदारी अंगावर होती. वडिलांनी एका बिजनेसच्या गुंतवणुकीत कर्ज काढले होते. ते फेडायचे होते. पूर्वीसारखी परीस्थिती आता राहिली नव्हती. सर्व जबाबदारी भावावर पडली होती. त्याच्या नोकरीवरच सध्या घर चालत होते.


कोणत्या शब्दांत या मित्रांना समजवायच, आणि ते ही नशेत असताना. या पेक्षा दूर राहिलेल बर अस मत बनवून कोणाशी काही न बोलता रिदांश तिथून निघून जातो. घरी परतल्यावर दुस-या दिवशी काॅलेजला जाण्याचा दिवस उजाडला. अक्षया काॅलेजच्या गेटवर रिदांशची वाट पाहत उभी होती. रिदांश ला पाहताच जवळ जावून तिने गच्च मिठी मारली.

अक्षया : मला कळले, काकांचा अपघातात मृत्यू झाला. मी तुझ्याशी बोलण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. तू फोन उचलत नव्हता. आपल्या मित्रांना देखील विचारुन पाहिले. ते ही मला रुचेल अस उत्तर देवू शकत नव्हते. तुझी वाट बघण्या खेरीज दुसरा कोणताच उपाय नव्हता.

रिदांश : अस्वस्थ वाटत होत मला. कोणाशी काहीच बोलण्याची इच्छा नव्हती. एकट्याला काही महिने राहायचे होते.

अक्षया : या महिन्यात खूप गोष्टी घडून गेल्या. ज्या तुला सांगायच्या आहेत.

रिदांश : काय झाल? ठिक आहे ना सगळे. आज काॅलेजला येताना तुझ्याशी बोलायच ठरवलच होत मी. बर झाल तू गेट जवळच भेटली.

अक्षया : घरचे माझ्या लग्नाच पाहतात. मला तुला सोडून इतर कोणाशीच लग्न करायच नाही.

रिदांश : माझ पण प्रेम आहे तुझ्यावर. पण इतक्यात लग्न नाही करु शकणार. भावच आणि बहिणीच आत्ताच लग्न झाल. त्यात वडिल गेल्यामुळे परीस्थिती नाजूक आहे. काही वर्ष थांबता नाही का येणार.


अक्षया : मी घरच्यांना आपल्या बद्दल कल्पना दिली आहे. ते माझ्याकरता शिकलेला, कमवणारा मुलगा शोधत आहे. तू त्या रिदांशला विसरुन जा सांगत आहे. मी रडले,अनेक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला पण घरचे ऐकायला तयार नाही.
एकिकडे तू देखील फोन उचलत नव्हता. कोंडीत पकडले गेल्यासारखे माझा जीव कासाविस होत होता. तूच सांग काहीतरी.

रिदांश : मला विचार करायला वेळ दे.

असे बोलून रिदांश तिथून निघून जातो.


आधीच गावच्या मित्रांशी भांडण. त्यात अक्षयाच लग्नाच पाहतात. संकटे आले की चहूबाजूंनी पाठलाग करतात, याचा प्रत्यय रिदांशला आला होता. घरात आसरा, सहानुभूति मिळेल हि आशा देखील फोल ठरत होती. घरात भाऊ - वहिनी, दिव्याचे गुणगाण. कराव काय? अश्या परीस्थितीत आपल्या आवडीचा छंद जोपासावा असे रिदांशने मनोमन ठरवले. तो काॅलेजमधल्या कबड्डी टिमला पुन्हा जाॅईन झाला. प्रॅक्टीस चे निमित्त काढत काॅलेजमध्येच रात्रभर थांबू लागला. सगळी मुले घरी निघून जायची. रिदांश मात्र काॅलेजमधल्या नाईट ड्यूटीला असणा-या वाॅचमन काकांशी ओळख काढून त्यांना कंपनी देवू लागला. त्यांच्याशी ओळख वाढवू लागला.


वाॅचमन काकांशी वाढत जाणारी ओळख रिदांश करता घातक तर ठरणार नाही ना? पाहूया पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all