संध्याकाळ झाली ती चर्चगेट वरून आपलं ऑफिसमधलं दररोजचं काम आटोपुन घरी जाण्यासाठी निघाली.
सायली तशी अगदी मस्तीखोर, सगळीच कामं आपल्या वेगळ्या ढंगाने करणारी, मनसोक्त हसणारी, हसवणारी.तिचं संपूर्ण लहानपण पुण्यात गेलं.आई वडील आणि मोठी ताई असं छोटसं पण आनंदी कुटुंब.ताईचं लग्न झाल्यावर मॅडम नी नोकरीची जागा स्वतः निवडून घेतली. आई बाबा दोघेही पुण्यात च आणि सायली मुंबईला शिफ्ट झाली. तसं तिचं जवळचं असं कोणीच नव्हतं मुंबई मध्ये फक्त एक दुरची मावशी होती जी एकदोन वेळेस अगदी फक्त रात्रीच्या मुक्कामाला येऊन गेली होती बस.नंतर काही तिच्याशी संपर्क असा आलाच नव्हता. त्या मावशीला एक मुलगा आणी एक मुलगी. ते इथेच कुठे तरी जवळपास रहात होते पण कुठे मात्र काही माहिती नव्हतं. सायली अगदी बडबडी पण इथे तिचं बोलणं ऐकून घ्यायलाच कोणी नव्हतं त्यामुळे सायली थोडीशी अबोल झाली होती. फक्त आपण करतोय त्यापेक्षा काहीतरी वेगळ करावं या हेतुने ती मुंबईला आली होती. चर्चगेट वरुन निघाली लगेचच लोकल मिळाली पण तिला घरी जाण्याची अजिबात इच्छा नव्हती कारण एकटीच राहत असल्याने तिला घर खायला उठायचं. ती तरीही निघाली लोकल चर्नी रोड ला थांबली.मरीन लाइन्स म्हणजे सायलीच्या आयुष्यातील एकमेव अशी जागा जी तिला मुंबईतील एकटेपण विसरायला भाग पाडायची.ती निघाली. काही वेळात रोड cross करून कठडयावर एका ठिकाणी जाऊन बसली. लाटांचा आवाज ऐकून मन एकदम शांत झालं चेहऱ्यावर मस्त हसू उमललं..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा