अनोळखी दिशा भाग ६

प्रेम करण सोप असते पण ते शेवटपर्यंत निभावणे तितकेच महत्वाच असते. त्यात दोघांनी एकमेकांची साथ द्यायला हवी.

©®प्रज्ञा बो-हाडे

अनोळखी दिशा भाग ६

आपण पाहिले की अक्षयाला पाहायला घरी पाहुणे येणार होते. रिदांश आता कुठे आजारातून उठला होता. त्याने अक्षयाला फोन लावला. तिने फोन उचललाच नाही. शेवटी रिदांशने अक्षयाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. घरी गेल्यावर अक्षयाच्या आई-वडिलांना आमच एकमेकांवर खूप प्रेम आहे याची कबूली दिली. 

अक्षयाच्या घरचे भयंकर संतापले होते. अक्षयाचा भाऊ तर रिदांशला मारायला उठला होता. अक्षयाच्या वडिलांनी स्वत:च्या मुलाला जागीच थांबवले. आततायी पणा करुन प्रश्न सुटत नसतात. समजुतीने घ्यायचे असते थोडे.
वातावरण थोडे शांत होते. अक्षयाचे वडिल रिदांशला विचारतात तु अजून शिकतो आहेस. कमवणार कधी? माझ्या मुलीची जबाबदारी कशी घेणार आहेस तू. त्यात घरची परीस्थिती सध्या कशी आहे हे देखील अक्षयाने सांगितले आहे. पण फक्त केवळ प्रेम आहे म्हणून कुठे संसार चालतो का? जीवनाश्यक गरजा ह्या पूर्ण जरी करता आल्या तरी खर्च हा वाढतच जातो. तो कसा हाताळणार आहात.

रिदांश : काका, तुम्ही नका काळजी करु. कालच मी कामाची थोडी चौकशी केली. फार काही नाही पण आमच्याच शेजारी राहणा-या काकांच्या मदतीने एका कंपनीत मॅनेजरच्या असिंटंटची नोकरी ओळखीने मिळाली आहे. दोन दिवसात कामावर रुजू होणार आहे मी. दिवस कोणाचे थांबून राहत नाही. हळूहळू पोस्ट वाढत जाईल माझी.

अक्षया चे बाबा : हो का. शाब्दिक उदाहरणे उत्तम जमतात तुला. आमच्या मुलीला आम्ही लाडात वाढवले आहे. तिला अश्या खस्ता खाव्या लागणार असतील तर समोर खड्डा दिसतोय तरी त्यात कस काय ढकलू मी. एक बाप म्हणून माझ्या जागी येवून पहा.

रिदांश : मी अक्षयाला फुला प्रमाणे जपेन. तिच्या डोळ्यात कधीच अश्रू येवू देणार नाही.


अक्षया : हो बाबा. रिदांश बरोबर मी खरच सुखी राहिल. माझ त्याच्यावर तितकचं प्रेम आहे.

अक्षयाचे बाबा : प्रेमाची झापड तुमच्या डोळ्यापुढे फेर धरुन आहेत. आता प्रेम - प्रेम करताय. पुढे येणारी जबाबदारी, परिस्थितीतून मार्ग काढत असताना जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलतो. तुमच्या पेक्षा थोड जास्त जग पाहिल आहे मी.

रिदांश : सगळ मान्य आहे,काका. यावर मी एक सुचवू का?

अक्षयाचे बाबा : सुचव.

रिदांश : एक वर्ष थांबा अजून. मी मेहनतीने कंपनीत काम करतो. दिवसरात्र शिफ्ट करेल आणि अक्षयाच्या पात्र कसा आहे हे तुम्हांला सिद्ध करुन दाखवतो.

अक्षयाचे बाबा : आम्हांला याच वर्षी लग्न करायचे आहे. एक वर्ष तर थांबायचा विषयच नाही.

रिदांश मनातल्या मनात काहीतरी पुटपुटत,\"लग्न कस लावतात स्वत:च्या पोरीच पाहतोच मी.\"अचानक उभा राहतो आणि घराबाहेर निघून जातो. 

अक्षयाच्या घरातले रिदांशचे असे वागणे गृहित धरुन चालले होते. तो आता अक्षयाला विसरुन जाईल. या कल्पनेत विचार करत अक्षयाला ठरलेल्या दिवशी पाहुणे बघायला येणार या तयारीत सगळे मग्न होते.
तो दिवस अखेर उजाडला होता. अक्षया हिरव्या रंगाची साडी नेसून तयार होती. डोळ्यात आसवे जमा झाली होती. खिडकीतून बाहेर डोकावत रिदांश येईल आणि सर्वांसमोर घेवून जाईल अशी वेडी आशा लावत खिडकीच्या पाहत होती. पाहुणे मंडळींच आगमन झाले. ओळख करुन देणे, गप्पा मारणे यात पंधरा मिनिटे झाली होती. आता मुलीला बोलवा असे पाहुण्यांनी सांगितले.
अक्षया पोहे घेवून पाहुण्याच्या दिशेने जाणार त्याच क्षणी खिडकीतून कोणाचा तरी जोरजोरात ओरडाआरडा ऐकू येत होता. बघ्यांची गर्दी जमा झाली होती. अक्षयाला आवाज तर ओळखीचा वाटत होता. घरातले बाहेर कोण ओरडत आहे म्हणून बाहेर येतात.
हा., तर रिदांश आहे. पण तो दारु प्यायलेल्या अवस्थेत इथे काय करतोय? हा प्रश्न सर्वांना पडला. सगळ्यांना पाहून,
रिदांश : अक्षया फक्त माझी आहे. आमच एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे. ती माझ्या शिवाय इतर कोणाचीच होवू शकणार नाही. जो कोणी आमच्या मध्ये येईल त्याला मी सोडणार नाही.

अक्षयाचे बाबा : काय बोलतो आहेस तू.

अक्षया : जोरात रिदांशच्या कानाखाली मारते. तू खरा असा आहेस तर. बर झाल लग्न झाल्यावर तुझ हे रुप मी पाहिले नाही. आज तू माझे डोळे उघडलेस.

पाहुणे झाला प्रकार पाहून एक क्षणही न थांबता तिथून निघून जातात.


अक्षयाला रडू आवरेनासे होते, ती घरात जावून रडू लागते. अक्षयाचा रडण्याचा आवाज ऐकून रिदांश घरातल्यांना विनंती करतो. फक्त एकदाच मला शेवटचे सगळ्यांसमोर बोलायच आहे अक्षयाशी.

अक्षयाच्या घरातले रिदांशला परवानगी देतात.

रिदांश : मी तुला यापुढे नाही भेटणार. विसरुन जाण्याचा प्रयत्न करेल. आपली ही भेट शेवटची आहे आज. तू रडू नकोस. तू सुखात रहा मला दुसर काही नको.

अक्षया : आता मलाच तुझ्याशी लग्न करायच नाही. नको येवूस परत कधी माझ्या नजरेसमोर. तुझ्यामुळे आज माझ लग्न ठरल असत पण ते मोडल.

रिदांशची पावले जड झाली होती. कसबसे स्वत:ला सावरत रिदांश भरलेल्या आसवांनी घरा जवळचं राहणा-या मित्राच्या घरी जातो.
काही महिन्यातच अक्षयाच लग्न फिक्स होते. अक्षयाच नाव आता दुस-या कोणाशी तरी जोडल जाणार हे रिदांश सहन करु शकत नव्हता.
रिदांशने कोणत पाऊल टाकले असणार पाहुया पुढच्या भागात.

क्रमशः

🎭 Series Post

View all