अनोखी राखी

आणि ती हसली

अनोखी राखी

घरोघरी पकवान्नांचे सुवास दरवळत होते.प्रत्येक घर आणि घराची मालकीण नटूनथटून तयार होते. दारा पुढे रांगोळ्या काढल्या होत्या. बहिणी दारात उभ्या राहून भावांची वाट बघत होत्या. कार,स्कूटी, मोटरसायकल, किंवा पाई जसे ज्याला जमेल तसे भाऊ ही गडबडीत बहीणीच्या भेटीसाठी आसुसले होते.
नीरजा मात्र एकटीच खिडकीतून हे सगळं बघत उदास बसून होती.
लहानपणी तिचे वडील गेले आणि ती जेमतेम तेरा वर्षांची झाली आणि आई ही गेली. दोन लहान भाऊ तिचा फ्रॉक धरून फिरायचे. ती आजूबाजूला जी कामं मिळतील ती करत त्यांचे आणि आपले पोट भरायची.शिक्षण पाच इयत्ता. नोकरी काय करणार?
दोन वर्ष गेली आणि शेजारिणीने तिला तिच्या नकळत अशा मार्गावर ढकढललं जिथे भरपूर पैसा मिळायला लागला. सौदा शरीर विक्रीचा होता. एकदा ह्या मार्गावर गेल्यावर परत येणं अशक्य. हळूहळू ती पांढरपेशा लोकांच्या गरजा भागवू लागली. एकापेक्षा एक उंची हॉटेलमध्ये तिच्यासाठी रूम्स बुक असायचे.
महागडे कपडे, त्यावर मॅचिग दागिने,परफ्यूम्स, सैंडिल्स,पर्सेस सगळंच येऊ लागलं. ब्यूटी पार्लर,मसाज पार्लर हे ही आलंच.हा बदल फक्त नीरजामध्येच आला नाही तर घरात ही हा बदल दिसू लागला.घरात सुबत्ता आली. आता मोठा फ्लैट घेतला. सुख सोयींनी तो सजला.नोकर ठेवले गेले. भाऊ खुश.
अनेक वर्ष अशीच गेली. भाऊ चांगल्या कॉलेज मधून उच्च पदवीधर झाले. मोठमोठ्या पदावर विराजमान झाले.
आता खरं तर नीरजाला ते काम करण्याची इच्छा नव्हत,पण ती ते एकदम सोडू ही शकत नव्हती. तिने आता आपले क्लायंट कमी केले होते.
अनेकदा नीरजाला वाटायचं तिचे भाऊच म्हणतील
" ताई! आता आम्ही कमावतो तू आपली नोकरी सोड आणि आरामात घरी बस."
पण हे प्रत्यक्षात होत नव्हतं.
एकदा नीरजा फाईव स्टार हॉटेलमध्ये शिरली. ती आपले उंच टाचेचे सैंडिल घालून, हातात पर्स आणि गाॅगल लावून, नाजुकपणे चालत येत होती. तिचे इतर कुठेच लक्ष नव्हते. तिने लाडिकपणे हसत रिसेप्शन वरून रूमची किल्ली घेतली आणि लिफ्टकडे वळली.लिफ्ट मधून निघून ती रूममध्ये शिरणार आणि तिला शंका आली कोणीतरी आपला पाठलाग करत आहे.तिने वळून बघितलं तर कोणीतरी वळून परत निघून गेलं. ती आरामात रूममध्ये शिरली.
काही तासांनंतर परत बाहेर आल्यावर तिला मघासचीच व्यक्ती पाठफिरवून चालू लागलेली दिसली. हा काय प्रकार आहे? कोण आहे हा व्यक्ती आणि का बरं माझा पाठलाग करतो आहे हे तिला कळेना.
ती घरी पोहोचली. बेल वाजवली. दार उघडलं गेलं आणि दोघं भाऊ हाताची घडी करून रागातच तिच्या समोर उभे राहिले.टाळ्या वाजवत तिचे स्वागत करत म्हणाले
"या! या! ताई साहेब. आपण आपली नोकरी करून प्रत्यक्षात आलात ?"
नीरजाला कळेना हा काय प्रकार आहे? तिने विचारलं
" काय झालंय? असं कां विचारता आहांत? "
आता मोठा भाऊ ओरडला
" लाज नाही वाटत का गं तुला असली घाणेरडी कामं करताना?"
एका क्षणात सगळा प्रकार नीरजाच्या लक्षात आला.
" ओह! तर तू माझा पाठलाग करत ‌होतास? काय रे मग तेव्हाच का नाही अडवलंस? मी इतकी वर्ष नित्य लाचार जगते आहे. माझं मन मला शिव्या देत असतं. पण एक दिवस माझे भाऊ मला आधार देतील आणि तू सोड आता नोकरी असं म्हणतील त्या दिवसाची वाट बघत होते.आज तू जर मला तिथेच अडवलं असतं तर? इतके दिवस कधीतरी तुम्ही विचारलं का की ताई! तू कुठे गं नोकरी करते? आम्हांला सुखात ठेवण्यासाठी, चांगल़ शिक्षण देण्यासाठी किती खस्ता खाणार? कधी? कधीतरी विचारलं? नाही न? आज तुम्ही आपल्या पायावर उभे राहिलात आणि प्रश्न विचारायचा अधिकार हातात घेतला?"
" हो ! कारण आम्हाला अशा बहिणीशी नातंच ठेवायचं नाही. उद्या आपले नातेवाईक,आमचे मित्र विचारतील तेव्हा आम्ही काय सांगायचं?" आता लहान भाऊ बोलला.
"वाह! आज खरं कळल्यावर हे दाखले. नाहीतर काल पर्यंत मी बहीण तिची कमाई, सगळं प्रिय होतं. हे मी काय मुद्दाम केलं नाहीये. मी पाचवी पास मला कोण नोकरी देणार होतं? तरी मी चार घरी धूणं भांडी करून पैसे कमवत होते. तुमची शिक्षणं तरी व्हावी यासाठी. तुम्ही सुखात रहावं यासाठी. इतकी वर्ष कधीच तुमच्या मनात आलं नाही की ताई कोणती नोकरी करते? तिला आता विश्रांती घे, नोकरी सोड असं म्हणावं हे एकदा तरी तुम्हाला वाटलं का? "
" ते सगळं जाऊ दे. आता आम्हांला तुझ्या बरोबर रहाता येणं शक्य नाही."
हे वाक्य ऐकून नीरजा एकदम स्तब्ध झाली. तासभर विचार केला आणि एका बैगमध्ये काही सामान घेऊन ती घरा बाहेर पडली. मागून दार लावण्याचा आवाज आला.

पाय नेतील तिथे चालत गेली आणि इथे पोहोचली.आज
इसमनीरजा आपल्या भाग्यावर खदखदून हसत होती. टाळ्या वाजवून स्वतः चं एकटेपण साजरं करत होती आणि एकांतवास भोग भोगत होतो ती.
गेल्या महिन्यात एका भावाचं लग्न झालं हे तिच्या कानी आलं होतं. तिला बोलावणं नव्हतंच म्हणा.
नीरजा ह्या आठवणीत अडकली असता अचानक बेल वाजली. तिने दार उघडलं समोर एक तरुणी उभी होती.
" तुम्ही नीरजा ताई ना?" तिने विचारलं.
नीरजा ने हो म्हणत तिला आत घेतलं.
"ताई मी स्वाती तुमची भावजय. तुमची पूर्ण कथा मला तुमच्या भावाने सांगितली. ताई ज्या बहिणीने आपलं सारं आयुष्य, पणाला लावून आपल्या भावांना घडवलं त्या बहिणीला राखी बांधण्याचा मान मला मिळवा म्हणून मी आले आहे. ताई मी तुम्हाला राखी बांधणार. तुमच्या भावांची भेट घालून देण्याची ओवाळणी ही मीच देणार." म्हणत स्वातीने पुढे वाकून नीरजाला नमस्कार केला. आणि…... दारातून दोघं भाऊ ही आत आले.

"ताई ! आम्ही चुकलो गं. तुझा आणि तुझ्या त्यागाचा एकदा ही विचार केला नाही. ते काम करताना तुला किती यातना सहन कराव्या लागल्या त्याचा ही विचार न करता तुला दु:खाच्या खाईत लोटून आम्ही निघून गेलो होतो पण स्वातीने आम्हाला समजावून आमची चूक दाखवून दिली. आज ही आम्ही येण्यासाठी थोडं मागे पुढे करत होतो तर स्वाती निघून तुझ्या कडे आली. मग काय आम्ही ही आलो. माफ करशील ना गं आम्हाला?" नीरजा ने दोघांना थोपटले, आणि ती हसली.
नीरजा ने ओवाळणी ची तयारी केली आणि पहिली राखी स्वातीला बांधली. तिनेच तर भावा बहिणींच्या नात्याची रक्षा केली होती.

राधा गर्दे
कोल्हापूर

अनोखी राखी

घरोघरी पक्वान्नांचे सुवास दरवळत होते.प्रत्येक घर आणि घराची मालकीण नटूनथटून तयार होते. दारापुढे रांगोळ्या काढल्या होत्या. बहिणी दारात उभ्या राहून भावांची वाट बघत होत्या. कार,स्कूटी, मोटरसायकल, किंवा पाई पाई, जसे ज्याला जमेल तसे भाऊ ही गडबडीत बहीणींच्या भेटीसाठी आसुसले होते.
नीरजा मात्र एकटीच खिडकीतून हे सगळं बघत उदास बसून होती.
लहानपणी तिचे वडील गेले आणि ती जेमतेम तेरा वर्षांची झाली आणि आई ही गेली. दोन लहान भाऊ तिचा फ्रॉक धरून फिरायचे. ती आजूबाजूला जी कामं मिळतील ती करत त्यांचे आणि आपले पोट भरायची.शिक्षण पाच इयत्ता. नोकरी काय करणार?
दोन वर्ष गेली आणि शेजारणीने तिला तिच्या नकळत अशा मार्गावर ढकललं जिथे भरपूर पैसा मिळायला लागला. सौदा शरीर विक्रीचा होता. एकदा ह्या मार्गावर गेल्यावर परत येणं अशक्य.
हळूहळू ती पांढरपेशा लोकांच्या गरजा भागवू लागली. एकापेक्षा एक उंची हॉटेलमध्ये तिच्यासाठी रूम्स बुक असायचे.महागडे कपडे, त्यावर मॅचिंग दागिने,परफ्यूम्स,सैंडल्स,
पर्सेस सगळंच येऊ लागलं. ब्यूटी पार्लर,मसाज पार्लर हे ही आलंच. हा बदल फक्त नीरजामध्येच आला नाही तर घरातही हा बदल दिसू लागला.घरात सुबत्ता आली.
आता मोठा फ्लॅट घेतला. सुख सोयींनी तो सजला.नोकर ठेवले गेले. भाऊ खुश.
अनेक वर्ष अशीच गेली. भाऊ चांगल्या कॉलेजमधून उच्च पदवीधर झाले. मोठमोठ्या पदावर विराजमान झाले.
आता खरं तर नीरजाला ते काम करण्याची इच्छा नव्हती पण ती ते एकदम सोडू ही शकत नव्हती. तिने आता आपले क्लायंट कमी केले होते.
अनेकदा नीरजाला वाटायचं तिचे भाऊच म्हणतील
" ताई! आता आम्ही कमावतो तू आपली नोकरी सोड आणि आरामात घरी बैस."
पण हे प्रत्यक्षात होत नव्हतं.
एकदा नीरजा फाईव स्टार हॉटेलमध्ये शिरली. ती आपले उंच टाचेचे सैंडल घालून, हातात पर्स घेऊन आणि गाॅगल लावून, नाजुकपणे चालत येत होती. तिचे इतर कुठेच लक्ष नव्हते. तिने लाडिकपणे हसत रिसेप्शनवरून रूमची किल्ली घेतली आणि लिफ्टकडे वळली.लिफ्ट मधून निघून ती रूममध्ये शिरणार आणि तिला शंका आली कोणीतरी आपला पाठलाग करत आहे. तिने वळून बघितलं तर कोणीतरी वळून परत निघून गेलं. ती आरामात रूममध्ये शिरली.
काही तासांनंतर परत बाहेर आल्यावर तिला मगासचीच व्यक्ती पाठफिरवून चालू लागलेली दिसली. हा काय प्रकार आहे? कोण आहे ही व्यक्ती आणि का बरं माझा पाठलाग करतो आहे? हे तिला कळेना.
ती घरी पोहोचली. बेल वाजवली. दार उघडलं गेलं आणि दोघं भाऊ हाताची घडी करून रागातच तिच्या समोर उभे राहिले.टाळ्या वाजवत तिचे स्वागत करत म्हणाले
"या! या! ताई साहेब. आपण आपली नोकरी करून प्रत्यक्षात आलात ?"
नीरजाला कळेना हा काय प्रकार आहे? तिने विचारलं
" काय झालंय? असं कां विचारत आहांत? "
आता मोठा भाऊ ओरडला
" लाज नाही वाटत का गं तुला असली घाणेरडी कामं करताना?"
एका क्षणात सगळा प्रकार नीरजाच्या लक्षात आला.
" ओह्! तर तू माझा पाठलाग करत ‌होतास? काय रे मग तेव्हाच का नाही अडवलंस? मी इतकी वर्ष नित्य लाचार जीवन जगते आहे. माझं मन मला शिव्या देत असतं. पण एक दिवस माझे भाऊ मला आधार देतील आणि तू सोड आता नोकरी असं म्हणतील त्या दिवसाची वाट बघत होते.आज तू जर मला तिथेच अडवलं असतं तर? इतके दिवस कधीतरी तुम्ही विचारलं का की ताई! तू कुठे गं नोकरी करते? आम्हांला सुखात ठेवण्यासाठी, चांगलं शिक्षण देण्यासाठी किती खस्ता खाणार? कधी? कधीतरी विचारलं? नाही न?विचारलं असतं तर मी माझी व्यथा ही सांगितली असती. आज तुम्ही आपल्या पायावर उभे राहिलात आणि प्रश्न विचारायचा अधिकार हातात घेतला?"
" हो ! कारण आम्हांला अशा बहिणीशी नातंच ठेवायचं नाही. उद्या आपले नातेवाईक,आमचे मित्र विचारतील तेव्हा आम्ही काय सांगायचं?" आता लहान भाऊ बोलला.
"वाह! आज खरं कळल्यावर हे दाखले. नाहीतर काल पर्यंत ही बहीण तिची कमाई, सगळं प्रिय होतं. हे मी काय मुद्दाम केलं नाहीये. मी पाचवी पास मला कोण नोकरी देणार होतं? तरी मी चार घरी धूणं भांडी करून पैसे कमवत होते. तुमची शिक्षणं तरी व्हावी यासाठी. तुम्ही सुखात रहावं यासाठी. इतकी वर्ष कधीच तुमच्या मनात आलं नाही की ताई कोणती नोकरी करते? तिला आता विश्रांती घे, नोकरी सोड असं म्हणावं .हे एकदा तरी तुम्हाला वाटलं का? " नीरजा बोलायची थांबली.
" ते सगळं जाऊ दे. आता आम्हांला तुझ्या बरोबर रहाता येणं शक्य नाही." दोघं भाऊ एकदमच बोलले.
हे वाक्य ऐकून नीरजा एकदम स्तब्ध झाली. तासभर विचार केला आणि एका बॅगमध्ये काही सामान घेऊन ती घरा बाहेर पडली. मागून दार लावण्याचा आवाज आला.

पाय नेतील तिथे चालत गेली आणि इथे पोहोचली.आज
नीरजा आपल्या भाग्यावर खदखदून हसत होती. टाळ्या वाजवून स्वतः चं एकटेपण साजरं करत होती आणि एकांतवास भोगत होती.
गेल्या महिन्यात एका भावाचं लग्न झालं हे तिच्या कानी आलं होतं. तिला बोलावणं नव्हतंच म्हणा.
नीरजा ह्या आठवणीत अडकली असता, अचानक बेल वाजली. तिने दार उघडलं समोर एक तरुणी उभी होती.
" तुम्ही नीरजा ताई ना?" तिने विचारलं.
नीरजा ने हो म्हणत तिला आत घेतलं.
"ताई मी स्वाती तुमची भावजय. तुमची पूर्ण कथा मला तुमच्या भावाने सांगितली. ताई! ज्या बहिणीने आपलं सारं आयुष्य, पणाला लावून आपल्या भावांना घडवलं त्या बहिणीला राखी बांधण्याचा मान मला मिळावा म्हणून मी आले आहे. ताई! मी तुम्हाला राखी बांधणार. तुमच्या भावांची भेट घालून देण्याची ओवाळणी ही मीच देणार." म्हणत स्वातीने पुढे वाकून नीरजाला नमस्कार केला. आणि…... दारातून दोघं भाऊ ही आत आले.

"ताई ! आम्ही चुकलो गं. तुझा आणि तुझ्या त्यागाचा एकदा ही विचार केला नाही. ते काम करताना तुला किती यातना सहन कराव्या लागल्या त्याचा ही विचार न करता तुला दु:खाच्या खाईत लोटून आम्ही वेगळे झालो पण स्वातीने आम्हाला समजावून आमची चूक दाखवून दिली. आज ही आम्ही येण्यासाठी थोडं मागे पुढे करत होतो तर स्वाती निघून तुझ्या कडे आली. मग काय आम्ही ही आलो. माफ करशील ना गं आम्हाला?" नीरजा ने दोघांना थोपटले, आणि ती हसली.
नीरजाने ओवाळणीची तयारी केली आणि पहिली राखी स्वातीला बांधली. तिनेच तर भावा बहिणींच्या नात्याची रक्षा केली होती.

©️ राधा गर्दे
कोल्हापूरअनोखी राखी