अनोखे रक्षाबंधन

Shabdatun samrudhikade

अनोखे रक्षाबंधन

       शांत विचार करत बसलो होतो. मन सकारात्मक विचांराच्या अधिन झाले होते.एरवी भरकटणारे मन श्रावणातल्या हिरव्यागार हिरवाईच्या हिंदोळ्यावर झुलत होते.सणांच्या मांदियाळीतील  श्रावणातील सणांच्या सोहळ्यातील  आनंदायी क्षण साजरे करण्यात मन सज्ज होते.विचांराची मशाल तेवत होती ... सहज लेखणीकडे लक्ष गेले.अनाहुतपणे हातात घेतलेल्या लेखणीने शब्दांचे व्यापक रुप काबीज केले होते.लेखणीत संवादाची चुणूक दिसू लागली होती.ईरा व्यासपिठाने लेखणीला स्थैर्य दिले तिथे सगळा आनंद मिळवता आला.अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या.बाह्य जगाचे रुप अनुभवायला मिळाले पण सगळ्यात मोल्यवान भेट मिळाली ती मैत्रीची ...!! जवळच्या नात्यापेक्षा या जीवापाड मैत्रीने मी फार भारावून गेलो.केवळ लेखनाच्या माध्यमांतुन जोडलेले सबंध मैत्रीच्या नवा आयाम देवून जातात.सर्वात उत्कंठावर्धक गोष्ट म्हणजे या व्यासपिठावरील लेखिका ..!! अत्यंत प्रभावी पद्धतीने लेखनीला सांभाळताना लेखनाची कला अजरामर केली आहे.एकवेळ घर सांभाळणारी स्री , जेवणाघरात अडकलेली स्री,मुलांचा सांभाळ व अनेक संकटांना झेलणारी स्री,समाजाच्या बंधनात जखडलेली स्री  जेंव्हा हातात लेखणी घेते तेंव्हा खरोखरच या समाजाला नवे आचार विचारक्रांतीचे  बीजोरोपण  व्हायला सुरवात होत आहे हे फार मोठे भाग्य आहे.आपल्या प्रगल्भतेने व प्रभावशाली विचारधारेने या लेखिकांनी 
आपली छाप समाजावर पाडून आम्हीच पुढील शतकाचे उद्धारकर्ते आहोत हे दाखवून दिले आहे.या सर्व लेखिकांच्या लेखनाचा,विचारांचा पगडा माझ्या मनावर पडल्यामुळे मैत्रीचे नवे नाते जोडले गेले.हे बंध रेशमाचे चिरकाल टिकण्यासाठी सकारात्मक संवाद व या मैत्रीचा मनापासून आदर करण्यास मन सतत आग्रही असते.यांचे जीवनातील आनंदाचे क्षण टिपण्यासाठी लेखणी सदैव असुरलेली असते हा आनंद जीवनातील इतर आनंदापेक्षा सर्वश्रेष्ठ वाटतो म्हणून ही निखळ मैत्री मर्मबंधातील ठेवा वाटतो...ती कायमस्वरुपी जपण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न चालूच राहतील. 

     हाच मैत्रीचा धागा आणखी एका धाग्यासाठी असुरलेला आहे .. मनात हा विचार आला असता गहिवरुन आले ..डोळ्यातुन अश्रू ओघळू लागले ... हे शिवधनुष्य पेलेल काय ...! या विचारांच्या गर्तेत असणाऱ्या मनाने केंव्हाच होकार दिला होता ...व आदरणीय लेखिका बहिणींच्या पुढे राखीसाठी हात पसरला होता.या सा-यांना आदराने,मायेने सारे प्रेम देण्याचा मनाचा  संकल्प होता.त्यांंच्या जीवनातील सारी दुःखे कायमस्वरुपी जावी , त्यांंच्या जीवनात आनंदपर्व निर्माण व्हावे,त्यांचा सतत उत्कर्ष व्हावा,त्यांचे रक्षण करण्याची शक्ती मिळावी,त्यांना उत्तम आरोग्य लाभावे , त्यांंची लेखनकला बहरावी यासाठी राखीचा धागा गुंफाताना भरपूर  आनंद होत  होता हेच प्रेमाचे अनोखे  
 रेशमी बंध हातात शोभून दिसते होते ... हाताला नवी चमक दिसत होती ..प्रत्येक बहिणींचे प्रतीबिंब त्या धाग्यात दिसत होते .संपुर्ण हात राखीच्या धाग्यांनी भरलेला होता ... हा अविस्मरणीय प्रसंग राज्याभिषेकासारखा वाटत होता ..या सा-या बहिणींचे हास्य जीवनाची नवी लकेर निर्माण करत होते.या सर्वांना ओवाळणीतील तबकात देण्यासारख्या  गोष्टी म्हणजे  "प्रेरणा, रक्षण व !आदर " याचा स्विकार करतील काय .. !! या संकल्पनेचा मान राखतील काय ...!! याची  विवंचना मनात दबा धरुन आहे ...!! ईरा व मॉम्सप्रेसो या व्यासपिठावरील असा आहे आदरणीय लेखिका बहिणींचा ताफा ...आदर्श व संस्कारशील ..!!  
आदरणीय संजना इंगळे , योगिता टवलारे , निलीमा देशपांडे , विशाखा चाफेकर , गायत्री तेली , वर्षा ठुकरुल , लता राठी , ऋचा मायी , सरीता दातीर , अवनी गोखले , शीतल ठोंबरे , निशा थोरे , सरिता सावंत भोसले , स्वना मायी , शुभांगी मस्के , अस्मिता चौगुले , अश्विनी पाखरे , श्रावणी देशपांडे , प्रियांका पाटील , पल्लवी पाटील , राधिका कुलकर्णी , सुनिता पाटील , डॉ.सुजाता कुटे , अर्चना अनंत धवड , नेहा खेडकर , सोनाली परीट , स्मिता गायकुडे , भावना भुतल , कविता सुरासे , गीता गरुड , सुप्रिया जाधव , अश्विनी कपाळे , मृणाल मोहिते , भाग्यश्री मुधोळकर , मुक्ता कुलकर्णी , शुभांगी शिंदे , गौरी कुलकर्णी ,  वैशू पाटील , सुरेंद्री भोगावकर , प्रीती दळवी , अंजली धस्के , अनुजा शेठ , सुचिता वाडेकर , स्नेहा पाटील , स्नेहा डोंगरे , सुवर्णा बागूल , अश्विनी दुर्गकर , उज्वला रहाणे , श्रीया देशपांडे , निकिता शेळगीकर , ऋतुजा वैरागडकर , शीतल माने , माधुरी सोनवळकर , अश्विनी मिश्रीकोटकर , धनश्री दबके , सविता किरणाळे , कल्याणी पाठक , जयश्री कण्हेरे सातपुते ,  स्नेहल अखिला अन्वित , प्रणाली देशमुख , प्रांजली  लेले , जयश्री जनाबाई के .अंजली , प्रतिक्षा माजगावकर ,  ज्योतिष उरकडे , शौफिका  या आणि आशा अनेक लेखिका रक्षाबंधनाच्या  या सुवर्णक्षणाला क्षणांक्षणांला आठवत आहेत .. त्यांना कोणत्या प्रकारची भेट देऊ शकत नसल्याने मन नाराज होते ... पण ही पोष्ट लिहताना फार भावनावश व्हावे लागले ..अत्यंत जीवाभावाचे हे बंध चिरकाल टिकावेत यासाठी तुम्हा सर्वांना या मधुर क्षणाच्या व रक्षाबंधनाच्या  आनंददायी शुभेच्छा ...!!

आपल्या चरणी सदा मस्तक ठेवावे 
आयुष्याच्या जन्माचे सार्थक व्हावे 

          ©®नामदेवपाटील ✍️