अनोखे नाते भाग 3

Nate raktapalikdche

अनोखे नाते...भाग 3

ती धावली, आणखी धावली आणि धावतच सुटली.
थकून एका जागी बसली.
तो पुन्हा तिच्या जवळ गेला.
न थकेगी तू
न रुकेगी तू
कर शपथ कर शपथ कर शपथ...
तिने स्मितहास्य केलं आणि ती उठून उभी झाली.
पुन्हा जोमाने धावली. एका मुलीने नेहाला बघितलं आणि ती तिच्या घरी आजीला सांगायला गेली.
“आजी..आजी.” ती मुलगी धापा टाकत म्हणाली.
“काय धाड भरली, वाघ धावला का मागे?” आजीने विचारलं.
“आजी तुझी नातं पळत सुटली आहे.”

“अग काय बोलतेस तू?”
“खरं सांगते आज्जे.” असं म्हणून ती परत गेली.
आजी घाबरली, पोरीला काही झालं तर..

थोड्या वेळाने नेहा धावत धावत घरी गेली. 
“आजी.....”
“पोरी कुठे होतीस? बरी आहेस ना? तुझ्या पायाला दुखत तर नाहीना?”

“आजी तुझी नातं बरी आहे. आजी मला धावता येते, मी धावू शकते आजी.”
दोघी एकमेकांना बिलगून खूप रडल्या.
त्यांच्यातलं प्रेम बघून कैलासचे पण डोळे पाणावले.
एकदा पेपर मध्ये एक पाम्प्लेट आलं, त्यावर राज्यस्तरीय धावण्याची स्पर्धा होती

नेहाने भाग घेण्याचा निश्चय केला.

स्पर्धेला एक महिन्याचा अवधी होता. नेहाने प्रॅक्टिसला सुरुवात केली. ती रोज सकाळ- सायंकाळी ग्राऊंड वर जायची.
गावातली मुले हसायची तिच्यावर. पण कुणाचाही विचार न करता, मनाला वाईट वाटू न देता, तिने प्रयत्न सुरू ठेवले.
धावता धावता तिच्या पायला दुखापत झाली, शहरातल्या चांगल्या डॉक्टरकडे दाखवलं. त्यांनी पायला बँडेज बांधून दिलं. आणि धावायचं नाही अशी सक्त ताकीद दिली.
पण नेहाला हे काहीच मान्य नव्हत. दोन दिवस तिने आराम केला आणि पुन्हा धावायला सुरवात केली.
धावण्याचा स्पीड वाढवला. कैलास रोज तिचा उत्साह वाढवायला यायचा. तिच्या साठी फळ आणायचा. रोज पाच ते सहा तास ती धावायची.
बघता बघता स्पर्धेचा दिवस उजडला. नेहाने सकाळी उठून, आवरून देवाला नमस्कार केला. आजीचा आशीर्वाद घेतला. आणि कैलास सोबत स्पर्धेच्या ठिकाणी गेली. तिथले स्पर्धक बघता नेहा डगमगली. पण तिला ती कविता आठवली आणि तिने आत्मविश्वासाने छाती फुलवली.

क्रमशः

🎭 Series Post

View all