अनोखे नाते भाग 2

Nate raktapalikdle

अनोखे नाते... भाग 2

दुसऱ्या दिवशी तो  नवीन चप्पल घालून  शोरूम मध्ये गेला. आणि मालकाकडे जाऊन म्हणाला, " मला फंडातून कर्ज हवे आहे"
साहेब म्हणाला,  
"अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे. पुन्हा आता कशाला ?

तो म्हणाला, "मला जयपूर फूट (लाकडी पाय) घ्यायचे आहेत. त्यासाठी हवे आहेत."

मालक: "पण तुझ्या घरचे तर सर्व  धडधाकट आहेत. मग हे जयपूर फूट कुणासाठी?
तो : "मालक, जे माझ्या घरच्यांना उमजले नाही, ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे. माझे "अनवाणी" दुःख तिने कमी केले आहे. तिच्यासाठी मी किमान कर्जाने का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो. म्हणून कर्ज हवे आहे."

_मालकासह सर्व लोक निशब्द !! सारेच गहिवरलेले!!_
त्याने कर्ज काढले आणि लाकडी पाय विकत घेतले आणि नेहाला भेट म्हणून दिले.
लाकडी पाय बघून नेहाला खूप आनंद झाला. ती ते पाय लावून इकडे तिकडे फिरू लागली, तिचा आनंद गगनात मावेना इतकी प्रचंड खूश होती नेहा.
एक दिवस नेहा अंगणात बसली होती. बाजूला काही मुले खेळत होती. खेळता खेळता चेंडू नेहाच्या पायाजवळ आलं, नेहा उठली तिने तो चेंडू उचलून त्या मुलांना दिला.
ती मुलं हसायला लागली, तिची टिंगल करायला लागले.
“ये तू खेळायची हौस करू नकोस, तुला काय धावता येणार आहे का?”
सगळी मुले हसायला लागली.
नेहा आत आली आणि खूप रडली.
आजीने तिला समजावून शांत केलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा उठली, देवाला नमस्कार केला आणि बाहेर पडली.
नेहा एका मोठ्या ग्राऊंड वर गेली, तिथे जोरात चालायला लागली.  चालता चालता पाय अचानक दुखून आला आणि ती खाली बसली.
ती कन्हावत होती.
पायला हात धरून,
“आई..आई ग..”
कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला.
तिने मागे फिरून बघितलं तर मागे कैलास उभा होता.
त्याने तिला हात दिला, ती बघतच राहिली.
त्याने तिला उठवलं,
“धाव नेहा, मी तुझ्या मागे आहे. तू हरणार नाहीस.”
तुला ती कविता माहीत आहे.
हरिवंशराय बच्चन यांची कविता मी तुला ऐकवतो.

वृक्ष हो भले खडे,
हो घने हो बडे,
एक पत्र छाह भी,
मांग मत,मांग मत,मांग मत
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ

तू न थकेगा कभी
तू न रुकेगा कभी
तू न मुडेगा कभी
कर शपथ, कर शपथ, कर शपथ
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ

यह महान दृश्य है,
चल रहा मनुष्य है,
अश्रू श्वेत रक्त से
लथपथ, लथपथ, लथपथ
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ...

ही कविता ऐकवून त्याने तिच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला.

क्रमशः

🎭 Series Post

View all