अनोखे नाते भाग 1

Nate raktapalikadle

अनोखे नाते...भाग 1

एके दिवशी सकाळी सकाळी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला.
“पार्सल...
आतून एका मुलीचा आवाज आला,
"जरा थांबा, मी येतेय.."

दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी तो माणूस( कैलास)  वैतागला. आणि जोरात म्हणाला, 
"कुणी आहे का घरात ? पार्सल द्यायचे आहे.."
आतून मुलीचा आवाज आला, "काका, दारा बाहेर ठेवा मी घेते.."

"तसे चालणार नाही, पेमेंट पण घ्यायच आहे हो..
पाच मिनिटे पुन्हा शांतता. आता कैलास रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. दारातली मुलगी पाहून कैलास शॉक्ड झाला. दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती. काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो कैलास वरमला. त्याला त्याचा वागण्याचा राग यायला लागला. तो काहीही न बोलता पार्सल देऊन पैसे घेऊन तो निघून गेला.
नेहा पंचवीस वर्षाची तरुण मुलगी. ती चार पाच वर्षाची असताना आई बाबा अक्सिडेंट मध्ये गेले, ही एक तेवढी वाचली.  पण दोन्ही पायांनी अधू झाली. आजीनेच नेहाचा सांभाळ केला, तिची खूप काळजी घेतली.
नेहा अभ्यासात खूप हुशार होती पण अक्सिडेंट नंतर ती शाळेत जाऊ शकत नव्हती, मग एक प्रायवेट शिक्षक घरी येऊन शिकवायचे आणि नेहा घरूनच परीक्षा द्यायची. पहिला नंबर कधीच चुकवला नाही तिने.
दोन पायांनी अधू असली तरी स्वतःची सगळी कामे करायची.
बारावीत राज्यातून पहिली आली पण अपंग असल्यामुळे तिला त्याचा लाभ मिळाला नाही, तिची फसवणूक करण्यात आली.


 अधून मधून तो  कैलास नेहाला भेटायला यायचा, आता मात्र तो न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते.
 दिवाळी जवळ आलेली.. सगळीकडे छान तयारी सुरू होती.  त्या दिवशी नेहाने  पाहिले की तो  अनवाणी पायानेच चाललाय. ती काही बोलली नाही. मात्र  तो गेल्यावर दाराजवळच्या मातीत त्याच्या पावलाचे ठसे उमटले होते, त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले. नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चांभाराकडे तो कागद देऊन एक सुंदर चप्पल जोड खरेदी केली.

एक दिवस तो त्या मुलीच्या घराजवळ आला. आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून त्याने केला आणि तिला आवाज दिला. नेहाने दार उघडला. तिच्या हातात सुंदर पॅकिंगचा बॉक्स होता. तो तिने त्याला दिला आणि सांगितले, ही माझ्याकडून तुला दिवाळीच गिफ्ट आहे. पण घरी जाऊन बॉक्स उघड.

घरी येऊन त्याने बॉक्स उघडला. त्यात सुंदर चप्पला, त्याही त्याच्या मापाच्या पाहून त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले.

क्रमशः

🎭 Series Post

View all