अनोखं नातं

मैत्री
#अलख

*अनोखं नातं*

अगदी जिवलग सख्या दोघी .
जखम एकीला तर कळ दुसरीला एवढं.
बालपणापासून तर अगदी साठी पर्यंत सोबत .
उन्हाळे - पावसाळे ,
सुख - दुःख ,
आनंद - विरह ...
सारं सारं सोबत अनुभवलं एकत्र .
पण ...
पण या नंतर नियतीला हे मान्य नसावं कदाचित .
म्हणूनच की काय हिला कॅन्सर डिक्टेत झाला .
अवघे काही महिने हातात ...
हिला आजारापेक्षा जास्त काळजी तीची ...
माझं जाणं ती पचवूच शकणार नाही
याची खात्री होती तिला .
मुद्द्यांम काहीतरी कारण काढून हिने भांडण उकरून काढले .
ते इतके विकोपाला नेले की ,
दोघी एकमेकींच्या सावलीलाही उभ्या नाही .
ही गेली ,
अवघ्या चार महिन्यात तिला सोडून कायमची ...
तिच्या लक्षात आला हीचा डाव
पण वेळ निघून गेल्यावर
आता मागे राहिलेली ती ...
ती राहू शकणार होती हिच्या शिवाय ?

*©®मीनल सचिन*