Login

अनोखे कन्यादान

Ankokhe
सुनीता आणि तिचे मोठे कुटुंब सोबत गुण्या गोविंदाने रहात होते  एकच वाडा त्यात 4 वाटण्या झाल्या होत्या ,मोठे छोटे सगळे एकत्र पण तरी चुली वेग वेगळ्या होत्या , सासू सासरे ही वेगळे रहात होते, तसे ते 3 भाऊ होते.

मोठा जो सुनीताचा नवरा होता तो गावातूनच येऊन जाऊन नौकरी करत होता. मधला बातो पुण्यात नौकरी करत होता, आणि छोटा ज्याचे नुकतेच लग्न झाले होते. जो तो आपल्या पायावर उभा होता, सुनीता आणि तिचा नवरा श्रीधर तो सासू सासऱ्यांसोबत रहात,आणि सोबत सगळ्यात लहान तो ही यांच्यासोबत रहात होता.

लग्न थाटामाटात झाले, मुलगी गरीबा घरची केली होती, न हुंडा घेता, कारण ती शेतकऱ्याची मुलगी होती , आणि नवऱ्याला शेती काम करू लागेल म्हणून पसंत केली होती, थोडे मोठ्याचे पैसे येत होते आता मात्र छोट्याला जोपर्यंत नौकरी मिळत नाही तोपर्यंत तो शेती करणार असे त्याने ठरवले होते.

त्यात बायको पण DEd झाली होती पण नौकरीसाठी पैसा भरावा लागत होता, जो तिच्या वडिलांकडे नव्हता , आणि लग्नासाठी ही काही पैसे लागणार होते, म्हणून आले ते स्थळ पाहून न देता होतकरू, शिक्षित मुलगा पहिला, जो दिसायला ही योग्य असेल, त्याच्या घरची मंडळी ही शिक्षित असेल, त्याच्यावर काही जबाबदाऱ्या ही नसतील असा हवा होता. मुलाच्या घरच्यांनी ही सांगितले होते, मुलीला कही दिवस गावाकडे राहून शेती करावी लागेल.

लग्न होऊन काही महिनेच गेले नव्हते की लहान दिराचा accident मध्ये मृत्यू झाला ,ही बातमी कळताच सगळे हादरून गेले होते, आई वडिलांवर शोककळा पसरली, नवीन नवरीचे अजून हळद ही फिकी झाली नाही तोच तिच्यावर हे आभाळ कोसळले होते .

फार वय नव्हते तिचे ही,पण तिचे ही हाल बावरल्या सारखेच झाले होते .नवीन सासर, नवीन माणसे, नवीन घर, गाव ही नवीन ,फक्त नवरा तोच तिचा होता. समजून घरणारे कमी पण तीक्ष्ण नजरेने दोष देणारे ही खूप होते ,घरचे नाही पण गावातले तिला दोष देत आहेत असे वाटत होते तिला. कोणाकडे दुःख हलकं करावे असे कोणीच नव्हते.

मोठ्या जावेलाच मग मोठेपण घ्यावे लागले होते ,ते घ्यावे म्हणून सासुनेच तिला सांगितले होते ,कारण आता घरात तीच तिला समजून घेणारी होती, मधले तर आले आणि निघून गेले. तिचे आई वडील गरीब ते तिला घेऊन ही जाऊ शकत नव्हते. आता जे काही करायचे होते ते सासरच्यांना करायचे होते. ती अल्लड होती वय ही न समज होते. वाट होते लग्न करून देतील आई वडील तर आपण हातभार लावू पण ती अजून ही सावरली नव्हती, ती सावरवी ,तिला नौकरी लावून द्यावी किंवा लग्न करून द्यावे.

मोठ्या जावे तिला वारंवार ह्या नाजूक परिस्थिती साथ दिली तिच्या नजरेत तिचा लांबच भाऊ होता, जो स्वतः ही ह्याच दुःखातून गेला होता आणि त्याला ही कोणी तरी साथ देणारी हवी होती, त्याला नौकरी होती, आणि एक छोटी मुलगी ही होती. आपल्या मोठ्या  जाऊबाई  आपल्यासाठी ह्या कठीण समयी खूप सांभाळून घेतले आहे ह्याची खूप जाणीव होती. जावेने घरी सगळ्यांना ह्या स्थळाबद्दल सांगितले, सासू सासऱ्यांनी ते तिच्या आईवडिलांच्या कानावर घातले, आणि कन्यादान करण्यासाठी बोलवून घेतले.

आता कन्यादान करण्याची वेळ आली ,तेव्हा छोटी जाऊ म्हणाली, माझे कन्यादान माझी मोठी जाऊबाई आणि दादा करतील, कारण त्यांनी माझ्या आई वडिलांपेक्षा ही माझे खूप काही केले आहे, जे विसरण्यासारखे नाही, जर कन्यादान हे पुण्य असेल तर ते फक्त त्यांनाच जावे .??