एक अनोखे बंध

Ek Anokhe


एक अनोखे बंध...

त्याने तिला बाहेर बागेत बसलेली पहिली होती ,तशी ती त्याच्या मनात भरली होती.. ती कोण असेल..?
ती तीच असेल का, जिला मी बघायला आलो आहे...?
ती तीच असेल तर माझ्या मनाने कौल दिला आहे मग आधीच.. ही तीच माझ्या स्वप्नातली सुंदर मोहक जिला बघताच मी भान हरपलो.. मला जशी हवी तशीच... कमाल होती ती...

तो तसा तिला बघतच राहिला काही वेळ..आणि मग कोणी तरी आवाज दिल्यावर तो आत गेला..

या बसा, तुम्ही दमला असाल, तुम्हाला पत्ता तर सापडला असेल ,की काही त्रास झाला...मुलीचे बाबा विचारत होते..

त्याचे लक्ष तिच्याकडेच होते. ती आता हार विणत होती..लांब सडक केस..मोकळे..गोरी..आपल्यात गुंग..तरी तिची देह बोली खूप काही सांगत होती..

त्याच्या मित्राने त्याला चिमटा काढला आणि तो भानावर आला.मग तोच म्हणाला."हो काही म्हणत होता तुम्ही, प्रवासाबद्दल ,तर प्रवास छानच झाला अगदी शीण हलका झाला..आणि आता पत्ता ही सापडला..अगदी तोच जो हवा होता "

मुलीचे बाबा , "मग काही चहा पाणी घ्या आणि काही खाऊन मुलगी बघण्याचा सोपस्कार उरकून घेऊ.."

तो... हो काही हरकत नाही..

तो मनात म्हणाला/मी पहिली आहे तशी पण आता जवळून पाहू../

सगळ्यांचे चहा पाणी जेवण झाले, तसे बाबांनी मुलगी दाखवायला सुरुवात केली, त्यांच्या बहिणीची...सगळ्यांना समोर उभे केले.. आणि स्वरूपला ओळख करून दिली...

त्याला ती मुलगी काही मनात भरली नाही.. त्याने तश्या अर्थाने तिच्याकडे एक नजर भरून ही पाहिले नाही.. त्याने नकारात्मक दृष्टीने तिथेच मान डोलवली...मित्राला समजले..

बाबा ही बघत होते..त्यांना ही समजले.. स्वरूप ला रेणू आवडली नाही ,ना त्यांनी तिला निरखून पाहिले..ना कोणता प्रश्न विचारला.. काय हवे ते तरी कळू द्यावे असे त्यांना वाटत होते...

बाबांच्या एकंदर लक्षात आले...स्वरूप अजून काही शोधत होते.. नेमके ते काय शोधत होते.. काय त्यांचे काही हरवले होते ते ही नीट कळत नव्हते.. तसे त्यांनी स्वरूप चे वागणे बिनचूक टिपले होते... त्यांनी पाहिले की स्वरूप यांनीची नजर कोणाला तरी शोधत होती...ती त्यांची नजर बाहेरच्या lawn मध्ये बसलेल्या ओट्याकडे जात होती...तिथे कोणी तरी बसले होते... गीता ,गीता बसली होती तिथे...म्हणजे जेव्हा स्वरूप आत आले तेव्हा त्यांना गीता दिसली होती..त्यांची नजर तिच्या वर पडली होती तर.. याचा अर्थ त्यांना गीता तर आवडली नसेल ना.. म्हणून त्यांची नजर तिला तर शोधत नसेल ना ??

गीता,आता तिथे नव्हती ,ती नजरे आड झाली होती, तिला काही कळले होते..तिला समजले होते की आलेला हा पाहुणा तिच्याकडे बघत होता..त्याची नजर तिच्या वरून हटत नव्हती..म्हणून तीच बाजूला झाली होती...

तो आता त्या मुलीला शोधत होता नजरेने आणि हृदयाने..मनात ती भरली होती..म्हणून इतर कोणी मुलगी त्याला भावात नव्हती..पसंत पडत नव्हती..त्याने गीता पहिली होती...कोण होती गीता जिला बघताच स्वरूप हरवून गेला होता, ती ही ह्या घरातली कोणी होती की अजून कोणी..काय नाते असेल तिचे ह्यांच्याशी..

स्वरूप बघत होता, तिला शोधत होता..तितक्यात त्याने मागे वळून पाहिले तर मुलीचे बाबा त्याच्या समोरच उभे होते..त्याची बोबडी वळली होती..जणू त्याची चोरी पकडली गेली होती..

बाबांच्या नजरेला त्याची बवरलेली नजर भिडली होती.. त्यांनी ती अचूक हेरली होती..तो काय शोधत होता हे त्याच्या नजरेतून मुलीच्या बाबाला कळले होते...

बाबा ,"स्वरूप जी तिला तुम्ही शोधत आहेत ती माझी मुलगीच आहे, ती आता आमच्या सोबतच असते, तिचे पती युद्धात शहीद झाले आणि ती विधवा होऊन घरी आली..ती परत सासरी गेलीच नाही"

स्वरूप हे ऐकत होता, त्याला ती मुलगी गीता आहे आणि ती ह्यांची मुलगी आहे इतकेच काय समजले होते.. तिचा भूतकाळ काय आहे, हे जाणून घेण्यात काही रस नव्हता.. त्याला ती आवडली होती इतकेच त्याला समजत होते..

तो लगेच म्हणाला ," बाबा तुमची हरकत नसेल तर मला गीताच्या आयुष्यात पुन्हा रंग भरायचे आहेत.. मला तिच्याशीच लग्न करायचे आहे.. तुम्हाला मान्य असेल तर मी लग्नाला तयार आहे, तिला जे सुख मिळाले नाही ते तिला परत द्यायचे आहे... तिला आयुष्यात सुखी ठेवायचे आहे.."

बाबाला क्षण भर काहीच सुचले नाही, पण त्यांच्या गावी नसले सगळे काही सुख त्यांच्या लेकीच्या नशिबात अवचित आले होते ह्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.. त्यांना आंनद मनू की अजून काही..काहीच कळत नव्हते... मुलीचे दुःख दूर करणार कोणी तरी तिच्या आयुष्यात येईल असे वाटलेच नव्हते...

बाबाने त्यांच्या बोलण्याला होकार दिला होता..
स्वरूप खूप खुश झाला होता.. त्याच्या मनाचा कौल अगदी योग्य ठरला होता

गीताला ही त्याला बघताच ,आपण खरंच काही पुण्य केले असावे ह्यात आता विश्वास बसला होता, आधीचा पती गेल्या नंतर तिने खूप दुःख सहन केले होते.. सासरी तिला छळले गेले होते.. तसेच बहिणीला कोणी बघायला आले की तिला समोर येऊ देत नसायचे.. पण आज तिचा दैव योग ठरला होता..म्हणून तिची गाठ स्वरूप सोबत बांधली जाणार होती..


लग्न अगदी साधे पण खास कौतुकाचे आकर्षण ठरले होते... हे लग्न जणू समाजासाठी एक आदर्श ठरले होते...एका सुखी संसाराला सुरुवात झाली होती..


©®anuradha andhale palve