Jan 28, 2022
मनोरंजन

अनिका 12

Read Later
अनिका 12

https://www.irablogging.com/blog/anika-11_5299

भाग ११ साठी वर क्लिक करा ...

(आतपर्यंत आपण पहिले कि अनिका  च्या घरी लग्नची तयारी सुरु असते ...मोहन आणि मृणाल हे लग्नबंधनात अडकणार असतात ...ऑफिस मध्ये अनिका आणि केदार मिळून चांगल्या  बातम्या देत असतात .... त्यांची एक छान टीम टायर झालेली असते ...अनिका फोन वर बोलत असताना तिच्या खांद्यावर अचानक कोणीतरी हात ठेवतो ...आत पाहूया पुढे ..)

"तू "-अनिका आश्चर्याने .

"हो मी ,का येऊ नाही शकत ?'- ती व्यक्ती 

"हं आत वेळ मिळाला का तुला ? इतके दिवस झाले परत येऊन आणि आज भेटतोस .. ."-अनु खुश होऊन एकदम बोलत होती 

"आग त्याच काय आहे न ..बाबानी मला मोहन दादाच्या लग्नाबद्दल सांगितलं आणि आबांनी बोलावलंय असे हि म्हणाले होते ,अर्थातच ह्या गोष्टीला महिना होऊन गेला ..माझा हि सगळं कोर्स संपत आला होता मग काय गाशा गुंडाळला आणि आलो कायमचा .. पण आल्यनानंतर जेट lag  होता मग काय म्हंटल भेटू ८,१० दिवसात .."-समीर 

"काय कायमचा ?म्हणेज तू आता कायम छळणार ..?अरे देवा "-अनु मस्करी करत 

"नुसतं छळणार नाही काही ...त्रास हि देणार ....हा हा हा .. आणि काय ग मला म्हणतेस पण तू तरी ठिकाणावर असतेस का ?एक फोने पण नाही केलास तू ?"-समीर आणि  अनु दोघे हि हसायला लागतात .

"अरे हो नवीन काम आहे  न ,म्हणून  जरा व्यस्त होते .."-अनु 

"हेय सॅम कधी आलास रे आणि बर झाल तू आलास ...आता मज्जा येईल ,,जाम बोरं होत रे आजकाल "-श्रेया 

"हो का ,चला तुला तरी मी आल्याचा आनंद आहे नाहीतर बाकीच्यांना तर त्रासच झालाय .."-सॅम  अनु कडे बघून ..अनु ,श्रेया ,समीर तिघांची मस्ती सुरु होती ...समीर बाकी घरच्यांना भेटला 

"काय मग समीर ,कस चाललंय बाकी सगळं ? इथे येऊन कस वाटतंय "- आबा 

"छान ,म्हणजे आपल्या देशात जी जादू आहे न ती बाकी कुठे हि नाही ...तिकडचं छान आहे सगळं पण आपला देश ,आपली लोकं ती आपलीच लोक .."-समीर 

"अरे बाबा आत तू कायमच आलास ना ..कि जाणार आहे परत .. नाही म्हणजे कोर्स संपलं ना कि आहे अजून पुढे काही "- आई 

"नाही काकू ,संपवून आलोय आता सगळं आणि इथे आता नवी सुरवात करणार आहोत .."-समीर 

समीर देशमुख हा त्यांचा कॉलोनीत राहणारा अगदी घरोब्याचे संबंध असणारा मुलगा होता ,आबा आणि त्याचे वडील खूप चांगले मित्र होते ... समीर देशाबाहेर एक विडिओ शूटिंग अँड फोटोग्राफी चा कोर्स करण्यासाठी गेला होता ..

इकडे जय्यत तयारी सुरु होती ...सकाळी सकाळी घरच्या घरी हळदीचा कार्यक्रम पार पडला ..  मोहन ला सगळ्यांनी हळद लावून खूप त्रास दिला.राम हि मोहन सोबतच होता ..अनु ,श्रेया ,साहिल ,समीर सगळेच अगदी हळदीची होळी खेळत होते ...कॅमेरा समीर च्या हातात होता.भरपूर फोटोज काढणं सुरु होते ...हळद दोन्हीकडे घरच्या घरी लावली गेली गेली होती ...सगळं झाल्यावर मोहन तयार होऊन आला ...आई  ने त्याला ओवाळले ..घरच्या मंदिरात सगळ्यांनी दर्शन घेतले ....आई,आबा ,मोहन ,साहिल,राम रजिस्टर ऑफिस मध्ये जाण्यासाठी तयार झाले, अनु आणि श्रेया घरीच स्वागताची तयारी करणार होते ... 

मोहन ,आबा ,आई ,साहिल ,राम मुलाकडून आणि मृणाल ,तिची आई ,काका काकू आणि तिचा चुलत भाऊ शुभम हे  रजिस्टर ऑफीस मध्ये उपस्थित  होते. दोघांनी सह्या केल्या एकमेकांन हार घातला आणि मोहन आणि मृणाल लग्न करून सात जन्माचे सोबती झाले . सगळे जण नव्या नवरीला घेऊन घरी आले. दरवाजवर सुंदर अशी रांगोळी काढली होती. फुलांच्या पाकळ्यांनी पूर्ण पायावाट सजवली होती ..दारावर नवीन तोरण होते ..दरवाजात माप ठेवलं होत ..आई आत गेली .अनिका  ने ओवाळायचं ताट अगदी छान सजवलं होत .. कुंकवाचे पाणी असलेल्या ताटात मृणाल ने हात भिजवून त्याचे छापे घरावर दिले. आईने त्या दोघांना ओवाळाल, आबा च्या चेहऱ्यावर संधान दिसत होते .

"सुनबाई ,माप ओलांडून घरात ये .."-आई 

मृणाल ने तिच्या नाजूक पायाने माप ओलांडलं आणि गृहलक्ष्मी ने प्रवेश केला ..जसा मृणाल आणि मोहन ने प्रवेश केला तास त्यांच्या डोक्यावर फुलाच्या पाकळ्या पडल्या ,

"वेलकम वाहिनी ,"-श्रेया ,अनिका एकदम ओरडल्या ....

मोहन आणि मृणाल घरातल्या देवांच्या पाय पडले . मोहनच्या आई वडिलाच्या फोटोला हि दोघांनी नमस्कार केलाआणि आई आबांच्या पण पाया पडले .आई आबा नि त्यांना एक पाकीट गिफ्ट केलं .

"सुखी व्हा ! हे घ्या उघडून बघा .आमच्याकडून एक छोटीशी भेट .."-आबा 

"अहो आबा हे कशासाठी ? तुमचे आशीर्वादच पुरे आहेत आम्हाला .."-मोहन.  

"असू द्या रे पोरांनो . अडीअडचणीत हेच कामाला येईल थोडासा हातभार .....आम्हाला दोघांना असं वाटले कि काही हि दुसरं गिफ्ट देण्यापेक्ष हेच दिलेलं बर.तुम्ही तुमच्या आवडीने ,किंवा गरज पडेल तेव्हा ह्याचा उपयोग करा .."-आई .

 आई च्य इशाऱ्यावरून  मृणाल ने गिफ्ट उघडून बघितलं.

आई आणि आबा ह्यांनी मोहन आणि मृणाल ला एक छोट्या रकमेची फिक्स्ड डेपोसिट करून दिल होत ..त्यांचं मत होत कि उगीचच काहीही देण्यापेक्ष हे दिलेले कधी  हि बर .....

मृणाल राम च्या पाया पडलायला गेली ,

"अहो नको ,माझ्या नको .."-राम .

"असं कस ,राम नात्यातून तुझी सुटका नाही ..."-आई

"भावोजी ,तुम्ही मला मोठ्या भावासारखे आहात ..मला नावानेच हाक मारा .."-मृणाल अगदी हळूच बोलली ..

"अरे बाप रे ,इतका हा मान ...मी एकच सांगेन  खुश राहा आणि मोहन ला खुश ठेव ..खूप चांगला मुलगा आहे तो ..नेहमी त्याच्यावरच विश्वास ठेव .."-राम .

ते दोघे पाया पडलेत म्हणून आज्जी आत्यानी तिला सुंदर असे सोन्याचे कानातले दिले 

"अरे वा ,आणि मला ग ?"-मोहन 

"तुला .. तुला तिची जबाबदारी .....तू तिला कधीच दुखावू नको ..गाठ माझ्याशी आहे ...तीच लवकर तुला मोठा गिफ्ट देईल बघ ..."-आज्जी आत्या 

"हम्म आणि हे आमच्याकडून ...."-अनिका ,साहिल आणि श्रेया 

"अरे वा ,मज्जा आहे मग तर बघू जरा .."-मोहन ने अगदी हसत खेळात गिफ्ट ओपन केलं .."अरे ,थँक्स "-मोहन 

"इश्श ,,"-मृणाल एकदम लाजलीच ....

"ये वाहिनी तू खूप छान दिसतेस ग ..लाजल्यावर ...कित्ती  लाजतेस ...."-श्रेया 

अनु,श्रेया आणि साहिल ने त्यांना हनीमून पॅकेज गिफ्ट केलं होत ...त्या गोवा आणि उटी हे दोन पर्याय होते ...

"वाहिनी,सांग ना कुठे जाणार आहेस..हनीमूनला ?"-अनु..

"ये काही काय ?अजून तिला जरा बसू देत ,मग विचार प्रश्न .. आणि हो उद्या सत्यनारायण झाल्याशिवाय काहीही नाही ...."-आई  

"हो हो ..झालं आई ची सून माझी लाडकी सुरु झालं बर का ?"-श्रेया 

"हो आता आपलं काही खर नाही श्रेयु .."-अनु 

"हो न ,आत काय बुवा ..वहिनी फक्त आपली .."-साहिल 

"ये काय रे ,थट्टा करता या म्हतारीची ....उगीचच .."-आई 

सगळं वातावरण एकदमछान होत ,

"चला पोरांनो संध्याकाळची तयारी आहे न ....मी आणि साहिल पुढे हॉल वर जाणार आहोत ..तुम्ही लवकर या ..."-आबा 

"ए , हो चला आटपा लवकर ...श्रेया मृणाल ला तिच्या खोलीत घेऊन जा आणि संध्याकाळच्या तयारी साठी मदत कर ...."-आई 

"अरे थांबा ..एक महत्वाची गोष्ट राहिली न अजून ...पाठीमागून आवाज आला 

"आग  ताई तू ,  किती उशीर केलास ?"-सविता बाई 

"आग हो ग काय करू काम च तेवढा ..पण बघ आले न संध्याकाळ व्हायच्या आधी .."- मंजू मावशी (सविता बाईंची मोठ्ठी बहीण )

"अरे वा ,या या .. सुनबाई ह्या तुमच्या  मंजू मावशी बर का . जरा जपून हो थोडी खाष्ट आहे म्हातारी ."-आबा  मस्करीत ओळख करू देत ..

मृणाल आणि मोहन पाया पडतात ,,मावशी मृणाल ला थांबवतात ,"हो तर ,, सविता एक साधी सुधी आहे .तशी मी नाही हो ...ए सुनबाई नाव घे आधी ..मगच आशीर्वाद .. आन हो मोठा घे बर का .."-मंजू मावशी 

"हा .आता कसं ..हो न मोठा उखाणा मोठा आशीर्वाद ...-आज्जी आत्या .सगळेच हट्ट करू लागले. 

"नाकात नथ ,पायात  जोडवी ,पैठणी नेसले लक्ष्मीसारखी ...

केसात गजरा कपाळावर कुंकू , सासू माझी आई सारखी ...

 नाजूक पैंजण पायात बांधले ,मोहन रावांच्या नावाचे मंगळसूत्र गळ्यात घातले ...

ताठ मानेने मिरवणार मी अशी ,,पाटलांची सून नव्हे तर मुलगी आहे जशी ...."-मृणाल ने लाजतच उखाणा घेतला 

"वा छान सुनबाई छान ...हे घे मुलीसारख्या सुनेला आमचे भरभरून आशीर्वाद ..असाच सुखाने संसार करा ..."-मंजू मावशी ..आणि त्यांनी हि मृणाल ला गिफ्ट दिले ..

"हे बराय ..सगळे गिफ्ट्स फक्त तिलाच .."-मोहन 

"मग काय तर, तुझं काय तू बाहेर राहणार ..घर हे लक्ष्मी ने बनत ....आमची काळजी आमची हि लेक घेणार आहे ..आणि आता तुला पण नाव घ्यायचं आहे बार का ?"-मंजू मावशी 

"ये हो हो .दादा मस्त पैकी होऊन जाऊ दे .."-अनु 

"ये छे ,काहीहि काय ? गप "-मोहन 

"मोहन राव आपलीकडे स्त्री पुरुष समानता आहे ...चला चला होऊन जाऊ द्या .."-राम 

मोहन खूप नाही नाही म्हणता होता पण तरी हि त्याला घाय्वाच लागला ,

"ठीक आहे ठीक आहे ,घेतो 

भाजीत भाजी मेथीची ,मृणाल माझ्या प्रीतीची .."-मोहन 

"ये काय रे किती जुने जुने घेतोस ?-आई 

"ये मला जे आलं ते घेतलं बार का ..."-मोहन 

"असं नाही दादा नवीन घे ...."-श्रेया आणि मावशी सगळेच ऐकायला तयार नव्हते ...म्हणून मग मोहन पुढे अजून एक घेतो 

"ये आत हे शेवटचं बर का ..

हसरं ठेवू घरकुल आपलं मी आणि तू 

मृणाल दिल से आय लव्ह यू .."-मोहन ..मृणाल अगदी लाजून पाणी पाणी झाली होती ....

"वा मस्त पैकी जोडलंय..."- श्रेया .

"काय बात है ?भाई .."-अनु

गृहप्रवेश एकदम छान झाला होता ...आता संध्याकाळची तयारी होती ..बरेच पाहुणे मंडळी येणार होते ...संध्यकाळी  reception असत ...त्यासाठी आबा,साहिल ,राम आणि श्रेया पुढे जाणार असतात ....अनु मृणाल सोबत आणि मोहन सोबत जाणार असते ....

क्रमश:

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Anuradha Pushkar

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....