अनिका 10

turn and twists of Anika

अनिका 

https://www.irablogging.com/blog/anika-9_5070

भाग ९ साठी वर क्लिक करा 

"may i come in ?"-अनु 

"एस प्लिज ,बसा ..काय घेणार ..?"-केदार 

(तुझ्याकडून एक सॉरी )अनु त्याच्याकडे बघत मनातच पुटपुटत असते .

"हॅलो ,मी तुम्हाला विचारतोय ?"-केदार

"नाही काही नाही ..थँक्स "-अनु .  केदार फोन उचलतो आणि दोन कॉफी ऑर्डर करतो ..

"तर  मिस पाटील तुम्ही काय सांगत होता काल ,त्याचा खून असावा ....बरोबर आहे तुमचा अंदाज ...माझ्या एका पोलीस मित्राने हि ह्याला दुजोरा दिला आहे ...आपण आपल्या रात्रीच्या ७ च्या बातम्यांमध्ये ह्याचा खुलासा करू ..त्यासाठी मी प्रोमोज रन करतो ..आपण आता पुढच्या तयारीला लागू ..."-केदार

"हो ठीक आहे .."-अनु

"गुड ,आपल्याला एका ठिकाणी जायचे आहे ..तिथे ह्याविषयी अजून माहिती मिळेल तुम्ही त्यावर रिपोर्ट तयार करा आणि मग आपण  लाईव्ह रिपोर्टींग करू .."-केदार .दोघेही कॉफी संपवतात आणि अनु बाहेर जाते ...थोड्याच वेळात केदार आणि अनु कार मध्ये बसून निघतात ...

इकडे घरी मृणाल आणि तिचे काका ,आई आणि काकू येतात ...मोहन  ला बघायला

"मोहन राव कस काय झालं हे ?"-काका

"चालता  ना बाईक चा धक्का लागला ....पण आता बरा आहे मी  .."-मोहन 

थोड्याफार गप्पा मारून सगळे रूमच्या बाहेर निघायला लागतात 

"आग ,तू बस इथेच..मी चहा,नाश्ता पाठवते .."-मोहन च आई मृणाल ला बोलते ..

"काय मग ?कास चाललंय ..?"-मोहन उगीच वीस बदलावा म्हणून बोलतो ..

"तुम्ही विषय बदलू नका ....किती लागलाय तुम्हाला ..."-मृणाल .तिच्या डोळ्यात मोहन बद्दलच्या वेदना अगदी स्पष्ट दिसत होत्या ..

"अरे मी काय मुद्दाम केलाय का ?ठीक आहे असं होत असत .."-मोहन 

"मोहन ,मी आधीच खूप गमावलाय . आता जर तुम्हाला काही झालं तर मी जगू नाही शकणार .."-मृणाल पाणावलेल्या डोळ्यांनी बोलत होती 

"अरे बाप रे ,असं आहे का ?इतक प्रेम आहे का आमच्यावरती .....पण मग हे फक्त म्हणण्यासाठी आहे कि अजून काही .."-मोहन 

"म्हणजे ,तुमचा विश्वास नाही का ?तुमच्यासाठी काही पण करू शकते मी ?"-मृणाल 

"हो का ,बघ बर का ...?मी काही मागितलं तर देशील ?"-मोहन तिच्या डोळ्यात बघून मिश्किल पने बोलत होता 

"चला ,तुमचं आपलं काहीतरीच ... हालत काय आणि बोलताय काय ?"मृणाल  लाजतच बोलली .. तिच्या चेहऱ्यावर खूप गोड हास्य फुललं होत ..दोघे हि हसत होते 

"मृणाल ,अशीच हसत राहा ..तू अशीच छान दिसतेस .."-मोहन 

"नॉक नॉक ,येऊ का ?नाही म्हणजे तुमच्या रोमान्स मध्ये अडथळा नाही आणायचा पण हे आई ने पाठवलाय ....लाडक्या सून बाईंसाठी .."-श्रेया त्या दोघांना चिडवतच बोलते ..मृणाल अजूनच लाजते ..

"तरी म्हंटल कबाब मे हड्डी अजून कशी आली नाही ..?"-मोहन श्रेया ला उद्देशून 

"ये हड्डी काय ? ओळख करून दे आधी ..तुझं झालं असेल प्रेम करून तर .."-श्रेया 

"इश्श , मी येतेच जरा .."असंम्हणात मृणाल उठायला जाते ,तोच मोहन तिचा हाथ पकडतो 

"क्या बात है भाई ,लगे रहो .."-श्रेया हसतच 

"आग थांब जातेस काय ? बैस इथे ..हि श्रेया घरातलं शेंडेफळ ..."-मोहन 

"माहित आहे मला ,सगळ्यांबद्दल ऐकलंय मी ,अनु ताईंना पण टीव्ही वर बघते ..आज भेटायचं होत पण त्या नाहीये ना घरी .."-मृणाल 

"हम्म आज काल आम्ह्लाला पण वाट बघावी लागते मॅडमची .."-मोहन.

छान गप्पा सुरु असतात ....तिकडे अनु आणि केदार त्यांच्या पोलीस मित्राला भेटायला जातात ..ते एका कॉफी शॉप मध्ये भेटतात ...

"हॅलो , केदार तू जे बोललं होता ते बरोबर आहे ....त्या बिल्डर चा खुनच झाला आहे ..तो डावखुरा होता ..आणि गोळी त्याच्या उजव्या बाजूला ला डोक्यात लागली आहे ....आम्ही चौकशी करतोय .."- इन्स्पेक्टर विजय 

"हो ,पण अजून काही माहिती ,,म्हणजे आज मी हि बातमी आमच्या चॅनेलवर ७ वाजता दाखवणार आहे ...त्यामुळे म्हंटलं तुला आधी कल्पना द्यावी ...."-केदार 

"नाही तस खास नाही .....बंगल्याच्या बाहेर काही ठसे मिळाले आहेत त्याचे रिपोर्ट्स येतीलच पण घरात कुठंही हाताचे काहीच छापे दिसले नाही ,फक्त शर्मा बिल्डर चे ठसे आहेत ..."-विजय 

"त्यांच्या मेंन डोअर च्या जवळ एक कॅमेरा आहे त्यात काही कळले नाही का ?"-अनु

"तुम्हाला कस माहित तिथे कॅमेरा आहे ..?"विजय

"ह्यांची नजर तीक्ष्ण आहे ,सगळं काही एका नजरेतच असत .."-केदार थोडी मस्करी करत बोलला ....सगळे हसले अनु चा राग हि तोपर्यंत निवळलं होता ...

"नाही त्यात खास असं काही नाही दिसलं ...."-विजय ..

"पण त्या दिवशी रात्री बाजूच्या बंगल्यात असणाऱ्या काकांना काहीतरी अस्पष्ट हालचाली दिसत होत्या ... त्यांनी जेव्हा समोर च्या रूममध्ये पाहिलं तेव्हा तिथे काहीतरी घडतंय असं दिसत होत ...त्यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळेस watchman पण तिथे नव्हता ...."-अनु इतक्या कॉन्फिडन्स न बोलत होती कि दोघेही तिचाच ऐकत होते ..त्यांची मीटिंग संपली आणि ते कार मध्ये बसले ..

"मिस पाटील ..तुम्ही ज्या काकांची गोष्ट सांगितली ती आपण लाईव्ह दाखवली तर ......"-केदार 

"हो का नाही ..?मी जाऊन बघते ..."-अनु 

"चला दोघे हि जाऊ .."-केदार त्याची गाडी त्या दिशेने चालवू लागला ..केदार आणि अनु शर्मा बिल्डरच्या बंगल्याजवळ आले ...शेजारी असणाऱ्या काकांकडे जाऊन बसले 

"काका ,त्यादिवशी जे तुम्ही मला सांगितलं ते तुम्ही टीव्ही वर सांगणार का ?"-अनु 

"नाही नाही ,आमचा जीव आम्ही धोक्यात नाही टाकणार ....."-ते काका 

"तुम्हाला काहीच नाही होणार ....काळजी करू नका ....तुमची ओळख आम्ही दाखवणार नाही हवं तर ...."-अनु त्यानं खूप मानवायचा प्रयत्न करत होती ..मध्येच केदार बोलला ..

"हवं तर तुम्हाला ह्याचा मोबदला पण देऊ .."-केदार 

अनु दोन क्षण त्याच्याकडे बघतच राहिली ..

"हे बघा आम्ही सगळं काही पैश्यासाठी करत नाही ..आमचं भागण्यापुरती आहे आमच्यकडे  .."-काका थोडं रागाने म्हणले 

"नाही काका तस नाही म्हणायचं आम्हाला ..सॉरी ..पण मी काय म्हणते जर तुमच्यामुळे एखाद्या माणसाला न्याय उलट असेल तर आपण ते करायला नको का ? तुम्हीच म्हणाल होता  न कि ते चान्गले व्यक्ती होते म्हणून ..मग तुम्हाला नाही का वाटत त्यांच्या मुलं हे कळावं कि त्य्यांच्या वडिलांचा मारेकरी कोण आहे ते ..?"-अनु ने गोष्ट सावरून घेतली आणि केदार  गप्प बसला तेवढ्यात त्याला एक फोन आलं म्हणून तो बाहेर गेला ...कास तरी अनुने त्या काका ची मनधरणी केली आणि काका तयार झाले ....

अनु बाहेर आली तिचा मूड खराब होता हे केदारच्यालक्षात आलं 

"सर तुम्ही असं बोलायला नको होत ,सगळेच लोक पैश्यासाठी काम करत नाही .."-अनु 

"मिस पाटील , रुपया पैसा आज खूप महत्वाचा आहे ..आणि मी फक्त ऑफर करून बघितला ...."-केदार 

"anyway ते तयार झाले आहेत पण त्यांचा चेहरा आपल्याला दाखवता येणार नाही .."-अनु 

"गुड ,मी पुढच्या गोष्टींची तयारी करतो तुम्ही इथून लाईव्ह coverage द्या .."-केदार 

असं म्हणून केदार जातो आणि अनिका तिची तयारी करते . थोड्यावेळात तिथे त्यांचा कॅमेरामन येतो ओमी ..आणि मग ते सगळी तयारी करतात इकडे news रूम तयार असते आणि केदार बातम्यांची सुरवात करतो ,

"नमस्कार ,आपल्या शहरता आज कोणीही सुरक्षित नाही . सामान्य माणूस असो व नामांकित बिल्डर असो .कोण, कधी,कुठे ,कस मारेल?हे कोणीच सांगू शकत नाही ...दोन तीन दिवसांपासून गाजत असलेली शरम बिल्डर आत्महत्या प्रकरणात आमच्या हाती काही धागे दोरे लागले आहेत....आमच्या टीम ने काही अश्या गोष्टी शोधून काढल्या आहेत ज्याच्यामुळे हि आत्महत्या नसून दुसराच काहीतरी आहे असे दिसून येते ..चला तर मग आपण थेट आमच्या  टीम शीच बोलूया ...."-केदार

"हॅलो ,अनिका पाटील ..काय सांगाल तुम्ही ?"-केदार

"मी आज शर्मा बिल्डर च्या घराच्या बाहेर आहे .आपण बघू शकता हे तेच घर आहे जिथे शर्मा बिल्डर ने आत्महत्या केली आहे असं सांगितलं गेलं होत पण ती एक आत्महत्या आहे कि आणखी काही हेच आता बघायचं आहे   .....आमच्या माहिती नुसार शर्मा बिल्डर हे डावखुरे होते आणि गोळी त्यांच्या उजव्या बाजूला लागली आहे .तर मग प्रश्न असा उपस्थित होतो कि एक डावखुरा माणूस आपल्या उजव्या बाजूला गोळी का मारेल? आणि कशी?...ह्या प्रश्नाने ह्या प्रकरणाची  दिशाच बदलून गेली आहे. आता आपण एका अश्या व्यक्तीला भेटणार आहोत जी आपल्याला ह्या बद्दल अजून काहीतरी महत्वपूर्ण  गोष्ट सांगू शकते...ह्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी आम्ही त्यांना दाखवू शकत नाही ....बोला सर तुम्ही काय सांगाल ?"-अनु

"हे बघा त्यादिवशी ह्या बंगल्यात रात्री काहीतरी खटपट सुरु होती .....तिथे watchmen हि नव्हता .....आणि सकाळी त्यांच्या आत्महत्येची बातमी आली ...."-काका

"पाहिलत दर्शकहो ,म्हणजे इथं काहीतरी असं घडलाय कि जे आपल्याला माहित नाही .....हि एक आत्महत्या असती तर हे  प्रश्न उपस्थित झालेच नसते ...." कॅमेरामन ओमी सह अनिका पाटील ...आय टीव्ही ...

अनु ने मस्त पैकी news कव्हर केली होती ...तिला केदारच्या मेसेज आला ,

"वेल done .."-

अनु खुशीतच होती .आजचा दिवस छान गेला होता ....

क्रमशः   

  

🎭 Series Post

View all