ये... मस्तच.... हि माझी आहे .."-अनु गाडीवर हात फिरवत म्हणाली . तिचे डोळे अजूनही गाडीच्या डिझाईन आणि कलर वर होते.
"हो ,हे तुमच्याच साठी आहे बहीणा बाई .."-साहिल आणि मोहन एकदम बोलले.
तेवढ्यात मृणाल आरतीची थाळी घेऊन आली आणि आईकडे देत म्हणाली "गाडीची पूजा करा आई ".
सगळ्यांना खूप आनंद झाला , राखीची एवढी छान भेट पाहून अनु तर उडतच होती पण एक जण नाराज होत . सगळे हसत होते पण ती मात्र हातावर घडी घालून उभी होती ,
"अरे बाप रे ,दादा ते बघितलं का ? साहिल.
मोहन भुवया उंचावून बघतो..आई आबा गालात हसत असतात.. तिकडे श्रेया मात्र खूपच रागवलेली असते..
"अरे बाप रे.. साहिल काही तरी अस फुस्स फुस्स आवाज येतोय न? बघ तर जरा मांजर आहे का तिकडे"मोहन मिश्किल हास्य करत..?
"ये हो ते बघ..हे हाड... हाड ग ..जा तु.. शू.. जा.. शू"साहिल..आणि सगळेच मोठ्याने हसायला लागले तस श्रेया पाय आपटत निघायला लागली.. अनु ने तीचा हाथ तसाच पटकन पकडला आणि चावी तिच्या हातात ठेवली..
श्रेया च्या डोळयात आनंदाश्रू तरळले..
"वेडा बाई ही आपल्या दोघांची आहे.."अनु
"हम्म्म. पण ह्यांनी मला काहीच नाही दिलं...."तोंड वाकडं करत श्रेया बोलत होती.
मोहन ने तिच्या डोक्यावर टपली मारली आणि काही ड्रेस चे बॅग्स तिच्या हातात ठेवल्या..
"बघ आता हे देणार का तु अनुला?.. विसरलो म्हणे.. आम्ही तुला कस विसणार बच्चा..?"मोहन. खुप प्रेमाने अन् लाडाने तिला समजावत होता.
श्रेया पटकन त्याच्या गळ्यात पडली.. "थँकयू दा "श्रेया
"ड्रेस ने पोट भरलं वाटतं.. बरं आहे आता हे गोव्याचे तिकीट नकोच द्यायला.."साहिल..
"श्रेया डोळे मोठे करून त्याच्या हातातून घेण्यासाठी पुढे झाली आणि दोघांची मस्ती सूरु झाली..
राखी चा कार्यक्रम जोरदार झाला होता..
सगळेच खुशीत होते.. तिकडे युगराज ही खुप आनंदात होता... आजचा दिवस त्याच्यासाठी ही खास होता..
दुसऱ्यादिवशी रम्य, सुंदर सकाळ होती.. आदल्या दिवशी चा आनंद अजुनही होताच..अनु तर आज स्वतच्या गाडीवर जाणार होती.. मग काय स्वारी फारच खुशीत होती.
सगळे आटोपून खाली आले . नाश्ता करू लागले..मोहन फोनवर बोलत बोलतच खात होता... शेवटी फोन संपला आणि मग त्याने तो ठेवला. तशी त्याची अन् आईची नजरा नजर झाली.. केव्हापासून आई आपल्याला बघत आहे हे त्याच्या लक्षात आले च नव्हते. तो उगाच च हसला फक्त..
"उद्यापासून जेवणाच्या टेबल वर कोणीही फोन हातात घेणार नाही.."आई दरडावून बोलत होती..
"सारख काय रे फोन मध्ये असता..घर आहे ना हे मग.. जसा तुमचा नोकरी आणि कामाचा वेळ तसा कुटुंबाचा पण असतो ना वेळ... सगळं बाजुला सारून कुटूंब म्हणून जरा एकमेकांशी बोला...ते काही नाही फोन बंद म्हणजे बंद.."आई श्रेया च्या डोक्यावर टपली देत..कारण श्रेया च्या पण हातात फोन होता आणि ती काहितरी त्या फोन मध्ये करत होती.
"अग, आई रागवू नकोस.. महत्वाचा होता म्हणून बोललो..पण तु म्हणतेस ते ही बरोबर आहे.."मोहन
"ह्म, तर मग मोबाईल बंद म्हणजे बंद...."आई
सगळे आप आपल्या कामाला निघुन गेले..
अनु आणि श्रेया आज सोबतच निघणार होते.. त्या दोघी बडबड करतच चप्पल घालुन निघाल्या आईने मागून टोकल,
"ये पोरीनो, जपून जा जरा, गाड्या वेगाने पळवू नका.."आई
"हो, आई.. काळजी करु नको."अनु.
अनु आणि श्रेया निघाल्या.. अनुने श्रेया ला कॉलेज ल सोडलं आणि ती ऑफिस ला आली.
आजचा दिवस मस्त होता... रेवा भेटून सगळं सांगीतलं..आणि बाकी कामाला सूरवात करतच होती की मोनिका ने तीला बोलावून घेतलं..
अनु गेली"मॅम,मी आत येऊ का?"
"ओह, प्लीज या या.. सुट्टी संपली असेल नाही का..?"मोनिका
अनु ने थोड साशंकतेनेच मान हलवली.. तीला कळत नव्हतं की ही नेमक काय म्हणणार आहे..
"मग आताकामाला लगुया का?"मोनिका तिरकास पणे बोलतं होती.."काय झालं पुढे तुमच्या प्रोजेक्ट च"? मोनिका
"कोणता प्रोजेक्ट...?"अनु ने विचारले.
मोनिका ने एक जळजळीत कटाक्ष टाकला"विसरलीस का... जुन्या केसेस चा...तु एक रिपोर्टर आहे ईथे.. विसरली असशील म्हणून आठवण करून देत आहे.."मोनिका
"ओह, अच्छा.. ते काम सुरू आहे.. काही नावं काढली आहे.. त्यांच्यासाठी आज बाहेर जाऊन माहिती काढणार आहे.."अनु
"कोणती नावे आहेत.. लिस्ट द्या लवकर आणि कामाची रूपरेषा पण.."यू मे गो नाऊ"मोनिका
अनीका ने मोठ्ठा श्र्वास सोडला आणि कामाला लागली. नकळतपणे केदार च्या केबिन कडे लक्ष गेलं.. तेव्हढ्यात रेवा ने खांद्यावर हात ठेवला
"काही उपयोग नाही.. तिकडे बघुन.. केदार सर आज नाहीये.. सिटी बाहेर गेलेत.."रेवा
"ओह..जाऊ दे ना मग.. मला काय.."अनु
"हो का..ते दिसतच आहे"रेवा. आणि दोघीही हसल्या..
आज चा दिवस खुप व्यस्त होता...अनु बाहेर गेली आणि काही केसेस चि माहिती काढली..इकडे रेवाच ही काम सूरू होत.. अनु आणि रेवा कामावरून निघाले आणि अनुने तीला कॉफिसाठी चल म्हणाली...
"वाह, अनु राखी जोरात झालिये तुझी... गाडी तर मस्त आहे."रेवा
कॉफी ची ऑर्डर देऊन दोघी बोलत बसल्या होत्या...
"ही ग मोठ्यच सरप्राइज मिळालं.. मला ना खुपचं भारी वाटतंय पण...."अनु मस्त खुशीत होती..
"हम्म.. पण आता कार मधून जाता नाही येणार मग कोणीतरी दुसरं रुसणार बुवा.."रेवा तीची खेचत म्हणाली...रेवा केदरच्या रुसण्याबाबत बोलत होती..
दोघी मस्त मुड मध्ये होत्या...दुसऱ्या टेबल उठून समिर तिकडून निघाला होता..अनु ने त्याला हाक मारली..तेव्हा त्याच लक्ष गेलं..
त्याने जवळ येऊन दोघींना हाय केलं...रेवा खाली बघुन कॉफी पित होती..
"हे तु इथे कसा बस ना.."अनु
"काम होत..तुम्ही माझा करा मी निघतो."समिर निघाला..पण पुन्हा मागे वळला आणि रेवाला उद्देशून म्हणाला...
"आय एम सॉरी रेवा... त्यादिवशी साठी.. माझा काही उद्देश नव्हता तुला दुखवायचं पणं तरिही माझी चूक झाली.. आणि तस ही फिलिंग दोन्ही कडून असायला हव्या..एका कडून असून काही उपयोग नाही हे कळलय मला.."समिर फारच हाथ राखून बोलला आणि निघून गेला..
अनिका ने रेवाच्या हातावर हाथ ठेवून तीला डोळ्यांनीच धीर दिला.दोघी ही आवरून घरी परतल्या...
क्रमशः

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा