Jan 28, 2022
मनोरंजन

अनिका 8

Read Later
अनिका 8

https://www.irablogging.com/blog/anika6_4814

https://www.irablogging.com/blog/anika7_4935

(भाग ६ व ७ साठी वर क्लिक करा )

बघते तर समोर केदार  दिसला ..... कार च्या बाहेर उभा ,एक हात खिश्यात आणि एक कार वर ,डोळ्यावर sunglasses ,एकदम रुबाबदार ...स्मार्ट व्यक्तिमत्व ....

 हा इथे का थांबला असेल ? नक्कीच आज खरडपट्टी होणार असं दिसतंय.ह्याच विचारात अनु असताना केदार तिला हात हलवत हाय म्हणतो ..तीही हाय चा इशारा करते .....अनु जवळ आल्यावर तो sunglasses काढतो ..ती त्याच्याकडे बघत असते ..

"सो,मिस पाटील ..काही माहिती मिळाली कि नाही ..?"-केदार 

"नाही ,,,अम्म म्हणजे असच आले होते मी इकडे ,बोलता बोलता ....पण काहीखास कळले नाही ...."-अनु 

"चला बसा ,"-केदार गाडी बसण्यासाठी सांगतो ..

"अं ..काय ?कुठे बसू ?"-अनु न समजल्यासारखं विचारते 

तो कार चा दरवाजा उघडत  .."कार मध्ये....मी सोडतो तुम्हाला ...नाहीतर परत उशीर होईल..."-केदार

"नाही म्हणजे ..मी जाईन ..तस हि मला काम आहे एके ठिकाणी .... "-अनु 

"मिस अनिका पाटील .... चांगल्या आणि सुंदर मुलींना खोटं बोलता येत नाही म्हणतात ....वेल इथे काही दुसरं वाहन मिळेल असं वाटत नाही ....निर्णय तुमचा आहे ....एका ओळखीच्या व्यक्ती बरोबर प्रवास करायचा कि अनोळखी लोकांसोबत रिस्क घ्यायची .."-केदार तिच्या डोळ्या डोळे घालून बोलत होता तेवढं बोलून तो ड्रायविंग सीट कडे गेला आणि त्याने दार लावला ...तरी हि तो २ मिन थांबला जणू काही त्याला माहित होत कि अनु येईलच ...आणि अनु जास्त विचार न करता त्याच्या गाडीत बसली ...कार चालू झाली ..दोघे हि गप्पच होते ..

"मिस पाटील ...शर्मा बिल्डर चा खून झाला असेल का ?कि खरंच आत्महत्या ..?काय वाटत ?"-केदार ने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला ..

"मी काय सांगू सर ..म्हणजे प्राथमिक माहिती वरून तर हि आत्महत्या दिसते ..."-अनु 

"तुम्हाला  खरच असं वाटत ?नाही म्हणजे सांगायचं नसेल तर नका सांगू ..इट स ओके "-केदार पुन्हा कार चालवायला लागलं लागला...काहीतरी विचार करून अनु ने सुरवात केली ,

"खर म्हणजे मला वाटत कि हि आत्महत्या नसावी ....अजून मला कारण नाही माहिती पण एकंदरीतच असं वाटत कि जो माणूस इतके सारे प्रोजेक्ट्स करतो त्याला काहीतरी अंदाज असेल ..तो असा पळून नाही जाणार ,दुसरी गोष्ट त्याच्या जाण्याने कोणाला तरी खूप मोठा फायदा नक्कीच होऊ शकतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे शर्मा बिल्डर हा डावखुरा होता ...."-अनु

"त्याचा इथे काय संबध ?म्हणजे पहिले दोन पॉईंट्स ठीक आहे पण तिसरा काय संबंध ..?'-केदार न समजल्यासारखं विचारॅट होता 

"सर ,गोळी त्याच्या डोक्याच्या उजव्या बाजूला लागली आहे ..जी व्यक्ती डाव्या हाताने काम करते ती उजव्या हाताने स्वतःला गोळी का मारेल ? "-अनु च्या चेहऱ्यावर एक वेगळाच हास्य होत ..काहींत उलगडल्याच ,जिंकल्याचा ..

"ब्रावो , अनिका ,हेच ,हेच तर ते ..मला माहित होत कि तुम्ही असे केसेस हॅन्डल करू शकता ..ग्रेट ..nice move ...माझा हि  हाच अंदाज होता .... तुम्ही ह्या केस बद्दल अजून काय माहिती मिळते का ते बघा ..उद्या रात्रीच्या शो मध्य आपण ह हि खास  बातमी दाखवू ..... सकाळी मला भेटा म्हणजे आपल्याला पुढचं काम नीट करता येईल .."-केदार 

अनु च्या घराजवळ गाडी थांबली ....

"आपल्याला ..?"-प्रश्नार्थक अनु 

"हो...का नाही आवडणार माझ्या सोबत काम करायला ....नाही म्हणजे एकतर हि बातमी तुम्ही हि आणली होती आणि मीही ...त्याबाबतीत आपल्या दोघांना जितकं माहिती आहे तितका ऑफिस मध्ये कोणाला नाही ....म्हणून मी म्हणालो ..चालेल न .."-केदार 

"नक्कीच done ..उद्या भेटते ..बाय -अनु 

आज चक्क केदार  smile करत बाय म्हणाला ... केदार ची कार गेली .अनु खुशीतच घराच्या पायऱ्या चढली . 

"ओह हो हो ..क्या बात ?क्या बात ? आज काहीतरी खास वाटत ..?"-साहिल 

"खास ..काय खास?"-अनु 

"नाही म्हणजे ,हसत हसतच आगमन झाले आपले .."-साहिल 

"काहीतरीच काय ?असच ..आबा आणि आई  कुठे आहेत? आणि आज आपण घरी कसे? "-अनु

"ये मी घरीच असतो ......आई आबा बाहेर गेलेत येतीलच .."-साहिल

"हो का ,रोज तुझ्या पार्ट्या बाहेर असतात ,बर ते जाऊ दे ......श्रेया काय करतेय ?   "-अनु 

"काय करणार बसली असेल रूम मध्ये फेसबुक बघत ......"-साहिल ...

"जस कि तू बघतच नाही ..... दादा कुठे आहे ..?"-अनु 

"तो हि बाहेर गेलाय ...."-साहिल. तेवढ्यात साहिल चा फोन वाजतो ....अनु हि जाऊन फ्रेश होऊन येते ..आशा बाई जेवायचं गरम करतात आणि अनु ,साहिल ,श्रेया सगळे गप्पा मारत मारत जेवतात ....

"ये आई  आबा नाही तर मजा येत नाही ..हो न ?'-श्रेया 

"हो न खरंय अगदी ......कुठे गेलेत काय माहित ? तुम्हाला काही सांगितलं  का आशा काकू .."-अनु. 

"नाही .म्हणजे म्हणाले कि थोड्यावेळात येतो म्हणून .."-आशा बाई 

साहिल फोन मध्येच व्यस्त होता ....हात धुवून श्रेया आणि अनु सोफ्यावर बसले आणि तेवढ्यात आई आबा आले ....आई म्हणत अनु एकदम गळ्यातच पडली 

"अग काय ग हे ,असं अचानक .."?-आई 

"काही नाही .. असच ,कुठे होतीस तू ? आज घरी आले तर तू नव्हतीस ...इतकं कस तरी वाटलं ना ....."अनु 

"हो का, वेडाबाई ...काहीपण असत तुज .तुम्ही सगळे रोजच जाता बाहेर तेव्ह कुठे असत ग हे आई प्रेम .."-आई उगीचच थट्टा करत ..सगळे सोफ्यावर बसन बोलत होते ....

"आग आम्हाला जावं लागत ...मला हि नाही आवडत जायला तुला सोडून ..."-श्रेया दुसरीकडून येऊन बासून बोलत होती 

"हो का...मग लग्न केल्यावर काय होईल आपलं ..तेव्हा तर जावंच लागेल ....."-आई हसत बोलत होती ..आबा फक्त बघत होते ...

"हे काय आणलं ? कुठे गेला होतात ?तुम्ही दोघे ..?"-साहिल मध्ये येत म्हणाला 

"अरे ,हो ..हे पेढे घ्या आधी ...एक आनंदाची बातमी आहे .....घ्या तोंड करा .."-आबा 

"अग बाई ,ह्या पोरींच्या नादात राहिलच खर..आशा बाई ..जरा देवासमोर साखर ठेवा बघू .."-आई

"काय काय ,सांगा न आधी काय झालं ?"-श्रेया

"कसली बातमी ?"-अनु

"मोहन आणि मृणाल दोघांचं लग्न जमवलंय .....त्याचे हे पेढे .."-आई

"काय दादाच लग्न ..ये ये ..."-श्रेया आणि अनु

"आज मेरे भाई कि शादी है .."-साहिल

सगळेच धिंगाना घालतात ..... 

"अरे हो हो ....हळू  जरा ..आताशी लग्न जमलाय ..आधी साखरपुडा आणि मग लग्न ...."-आबा 

ये आप मस्त मज्जा करू ..उद्याच शॉपिंग ला जाऊ "-श्रेया 

"झालं ,काही हि झालं कि शॉपिंग सुरु ह्यांची .."-साहिल 

"ये ,गप रे ...तू पण एखादा शर्ट .."-अनु श्रेया ला ओळ मारत .....सगळं काही हात खेळात चालू होत ...तेवढ्यात मोहन दारावर येतो ,त्याला लागलेलं असत ....हाताला पट्टी बांधलेली असते ..डोक्याला हि छोटी जखम झालेली असते...तो मध्ये येतो.

"दादा ,अरे दादा काय झालं ?"-अनु

....................................................................................................................................................

वाचकहो तुम्हाला हि कथा आवडत असेल तर नक्की अभिप्राय कळवा ..तुमच्या प्रतिक्रिया ह्या आमच्यासाठी प्रेरणेचा काम करतात ......आम्हाला नवीन हुरूप येतो ...मला नक्की सांग तुम्हाला हि कथा कशी वाटतेय ....thank you ....

 

.......................................................................................................................................................................................क्रमशः:

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Anuradha Pushkar

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....