अनिका 7

journey of girl

https://www.irablogging.com/blog/anika6_4814

कार चादरवाजा उघडला आणि तिला बसण्याचा इशारा केला .....ती आश्चर्यचकित झाली होती .ती कार केदार ची होती ...

"थँक्स सर पण मी जाईन रिक्षाने .."-अनु 

"मिस पाटील खूप उशीर झाला आहे .ह्यावेळी इथे काही मिळणार नाही ..माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता ...बसा .कमीतकमी एक बस स्टॅन्ड पर्यंत तरी सोडतो ..."-केदार 

अनु बसते ...आणि कार चालायला लागते दोघेही गप्प असतात ...ऑफिस कडचा भाग सुनसान असतो ..ऑफिस मोठं असल्याने थोडं शहराबाहेर  असते .तिकडे मोजून ४, ५ ऑफिसेस असतात ...त्यामुळे केदारच म्हणणं हि बरोबर होत ...

"आज तुम्हाला खूपच उशीर झाला ..काही खास बातमी ..?"-केदार 

त्याला सांगू कि नको ह्या विचारात असताना पुन्हा केदार म्हणतो ," आज तुमच सादरीकरण छान झालं ..मुलाखत  छान झाली ...keep it up."-केदार .

"थँक्स ,सर "-अनु 

"मिस अनिका .तुम्हीआधी जिथे काम करायचा तिथे तुमचं कामाचं स्वरूप कस होत ? कोणत्या बातम्या करायला तुम्हाला जास्त आवडत ..."?-केदार 

"सर ,जिथे मी काम करायचे तिथे फार मुक्तपणे माझे विचार मी मांडत होते ...तिथे स्वतंत्रता होती ....मी जास्तकरून क्राईम  रिपोर्टींग करत होते ...."-अनु बोलत असताना मध्येच केदार विचारतो ,

"म्हणजे  आपल्या कडेस्वातंत्र्य नाही असं वाटतंय का तुम्हाला?"-केदार 

"नाही तस नाही ....मी सहज बोलले ....जे होत ते .... सॉरी "-अनु 

"नो नो ,dont say sorry,  मी खरंच विचारतोय ? तुम्हाला जे वाटत ते तुम्ही बिन्दास्त माझ्याशी बोलू शकता ...तुमचे मत आणि विचार नक्की शेअर करत जा ....आणि हो आपण जेवढे चांगले सहकारी असू तेवढच आपला टीम वर्क छान होईल असं मी मानतो ....त्यामुळे सगळ्यांशी मी मैत्रीपूर्ण वागण्याचा प्रयत्न करतो ..पण कधी कधी मी ज्या पदावर आहे त्यासाठी तसाच अनुकरण मला करावं लागत ....."-केदार इतका मोकळे  पणे हि बोलू शकतो हे बघून अनुला नवलच वाटत होत ........तेवढ्यात अनुला फोन येतो 

"हॅलो ,अनु कुठे आहेस ?'-आई 

"हो आई मी येतेच आहे १० मिन पोहचेन घरी .."-अनु 

"घरी सगळे काळजी करत असतील ...आज उशीर झालाय तुम्हाला ...."-केदार 

"हो ,न नाही म्हणजे आधी हि मला उशीर होत होता कधी कधी पण इथे जॉईन केल्यापासून पहिल्यांदाच उशीर झालाय म्हणून आई च फोन होता ....तुमचे घरचे हि वाट बघत असतील नाही .."-अनु ने घाबरतघाबरत सहज विचारलं ..

केदार फक्त खिन्नपणे गालात हसला ....अनु ला त्याने तिच्या घराजवळ सोडलं ...

"चला  न सर ,घरी .."-अनु 

"पुन्हा केव्हा तरी येईन ..बाय ..गुड night .."-केदार निघून गेला .अनु त्याच्या गाडीकडे बघत होती तो दिसेनासा होईपर्यंत ...

"काय मग ,कुठे होतात आपण ?..नाही  म्हणजे  आज फोन हि नाही केला ..."-आई 

"सॉरी आई ,आज जरा उशिरच झाला ..अग केदार नि म्हणजे माझ्या बॉस नेच सोडलं मला इथे ..बाकी तू सांग कार्यक्रम कसा झाला ..कुठे आहेत सगळे ..?"-अनु 

"हो का अग बाई ,बर झालं ..आग कार्यक्रम छान झाला ..मुलगी खरंच चांगली आहे ..अजून मोहन काही बोलला नाही पण मला माहित आहे त्याला आवडली आहे मृणाल.."-आई

बोलत बोलता अनु च जेवण झाल आणि ती रूम मध्ये गेली ....तिला आलेला तो फोन त्यावर ती विचार करू लागली .... 

"काय झालं असेल ?त्या बिल्डर ने आत्महत्या का केली असेल ? केदार ला ह्याबाबती नक्कीच माहिती असेल ...त्यादिवशी त्याच्याक सगळीच माहिती होती ...मग कशाला त्याला सांगू ? कर्जात बुडालेला,पैसे घेऊन लंपास झालेलं ,केली असेल आत्महत्या पण हा झालं प्राथमिक अंदाज .....फोन वर पिंटू म्हणत होता कि घातपात झाला आहे ...महान नक्की काय ?कास शोधून काढायचं ....

ह्याच विचारात असताना तिला झोप लागली जागआली उशीर झाला होता त्यामुळे आज बाईसाहेबांचा मॉर्निंग वॉक होणार नव्हतं या..सगळं यावरून खाली आली ..

"काय मग,आज काल आपली भेटच होत नाही ...का चाललं काम ?"-आबा

"हो न आबा ,काल उशीर झाला थोडा ....काम छान सुरु आहे .नवीन शिकण्यासारखं बराच आहे ..."-अनु

"हं पण बघ बार का तू इतकी व्यस्त होऊ नकोस आपल्याला शॉप्पिंग ला जायचं आहे ,खूप काम आहे आत घरी ..लग्न आहे न आपल्या दादाचं .."-श्रेया मस्करी करत बोलत होती ..मोहन ऐकत होता ...सगळेच हसले

"अरे हो ,दादा तू बोलला नाहीस हे मला ...."-अनु

"तू होतीस कुठे? बोलायला ...."-मोहन

"ये पण तुला माहित आहे का ?मृणाल बोलताना थोडं अडखळते आणि डोळे थोडेसे तिरळे आहे बाकी ती छान आहे .."-श्रेया

"ये गप ,काहीतरी काय ?तू पण नव्हतीस ..तू तर तिला बघितलं पण नाही उगीच बोलते ...की छान डोळे आहेत तिचे तिरळे बिरले काही नाही .."-मोहन बोलत होता आणि दोघी हसत होत्या ..आई पण बघतच होती ..

"हो का ,म्हणजे आपल्याला खूपच आवडले दिसते मृणाल ...अ,अ काय हो न ?"-श्रेया

" तस काही नाही मी आपलं तुझ्या शंकेचं निरसन केलं ."मोहन 

"ओह म्हणजे तुला ती नाही आवडली ,ठीक आहे दादा आपण दुसरं बघू ..."-अनु 

"अरे मी  असं कधी  म्हणालो ,"-मोहन 

"म्हणजे आवडली न ..."-आई 

मोहन नुसताच हसतो ..."हो पण अजून थोडा मला वेळ हवाय ...आणि सगळं जमलंच तर मग रजिस्टर लग्न करेन मी  मान्य असेल तर ठीक नाहीतर लग्न नाही ..."-मोहन 

"अरे हो ,हो आधी ठरू  तर देत ....ते बघू आपण पुढे ...तू वेळ घे .."-आबा बोलत होते मध्येच साहिल बोलतो 

"हो आणि तिला हि वेळ दे ....."-साहिल " अजून काही द्यायचं असेल तर दे बर का ?आम्ही नाही विचारणार "-श्रेया मध्येच खोडी काढत ......

"ये बस करा रे ,,आताच सगळं छळणार का?थोडं नंतर हि ठेवा .."-आई 

"आई,नंतर साठी बराच aआहे आजून ...."-अनु 

"बघ ना ,लाडका लेक लगेच बाजू घेते आई त्याची .."-श्रेया 

सगळं खेळी मेळित सुरु होत सगळे आप -आपल्या कामाला गेले आवरून ....

अनुच्या डोक्यात तेच सुरु होत आणि त्यातही तिने शोध मोहीम सुरु केली होती ..तिचे आज चे काम  रिपोर्टींग करायला ती बाहेर पडली ...काम यावरून ती लगोलग तो बिल्डर जिथे राहत होता तिथे गेली ...आजू बाजूच परिसर छान होता .घर हि मोठं होत ..watchman कडे चौकशी करू लागली ..कोण ,कुठं कास येत.जात...हे सगळं ती तपासून बघत होती ....तेवढ्यात तिला तिथे केदार दिसला .....केदार ने डोळ्यावरची sunglasses काढले ..आणि त्यांची नजरा नजर झाली ..केदार  काहीच न बोलता तिथून निघून गेला....

अनु विचार करू लागली ......."आकडू ,,काळ तर इतका छान बोलत होता आज साधं smile पण नाही ...त्या आवडलं नसेल कदाचित मी इथे आलेलं ....हि स्टोरी त्याची आहे असं तो समजतो ...आणि आपण हि इथे माहिती काढायला आलोय हे त्याला आवडला नसेल ........."अनु आपल्याच विचारात ,अंदाज लावत चालत होती थोडं पुढे आल्यावर अचानक ती थांबली .....

क्रमशः

  

🎭 Series Post

View all