Jan 28, 2022
कथामालिका

अनिका 22

Read Later
अनिका 22

अनु बराच वेळ झोपली होती तिला कोणी उठवले सुद्धा नव्हते ...आईनेच तशी ताकीद दिली होती ...पण मग तिला जाग आली पोटात कावळे पण ओरडत होते ..तसाही दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती ..तीन फोन उचलल आणि वेळ बघितली तर २ वाजले होते ....खाली गोंधळ ऐकू येत होता ...हसण्याचा खिदळण्याचा आवाज येत होता ..ती फ्रेश होऊन खाली आली  जिन्यातुनच ओरडली ,"दादू ,,,"-अनु 

आणि खाली यायला निघाली झपझप .."आग हो हो ,थोडं हळू ..आपला पाय बघ आधी .."-आई 

"दादा कधी आलास ....?"-अनिका. मोहन आणि मृणाल ट्रिप वरून आले होते ..

"कालच.. पण तू दिसलीच नाही .... आणि पायाला काय झालं ?"-मोहन .

"काही नाही रे "-अनु .

अनु अजूनही मोहन ला चिटकूनच होती ..

"ये अनु ,काय हे ..अग आता तू कशी काय चिटकतेस ग ?हि जागा आपली नाही .."-श्रेया मृणाल ला  बोलत होती  

मोहन हलकेच एक चापट मारतो श्रेया च्या दंडाला ....अनु पण मग सोफयावर बसते .

"ये आई भूक लागलीये ग .."-अनु 

"चला तर मग झाली का आठवण जेवणाची ,नाही म्हणेज आजकाल काय ना तुम्हाला झोपायची ,जेवनाचीकाही गरज आहे असं वाटत नाही मला ..."-आई हसतच म्हणत होती 

"ये आई दे ना ग, मग उपदेश दे ,तुम्ही  जेवला का सगळे .....?"-अनु 

"आग हो आत्ताच हात धुतले ...."-मोहन, मी पडतो जर वेळ ,तुमचं चालू द्या ..उद्या पासून काम सुरु होईल .तो आत जातो 

"दादू तू एकटा पडशील ना ..नाही म्हणजे तुला काही लागलंबीगल तर ...का वाहिनी ला पाठवू दे .."-श्रेया च आपलं चालूच होत ..

"थांब जरा ..खूपच बोलायला लागली आहे मनी म्याऊ ..बघतो तुला .."-मोहन तिच्यामागे धावतो पकडण्यासाठी   ....इकडे मृणाल किचन मध्ये जाते ...आणि अनु च ताट वाढून आणते 

"अग वाहिनी तू कशाला ?मी घेते ..आशा ताई आहेत न ..?"-अनु 

"बर का अनु ,आल्याबरोबर स्वयंपाक घराचं ताबा घेतलाय पोरीने ..."-आई 

"कशी आहे  वाहिनी ? कस वाटतंय इथे ? बस न ..बोलू आपण थोडावेळ ...."-अनु 

"कस काय ..  काय विचारतेस ?छानच ..चेहऱ्यावर कसा रंग चढलाय बघ ..."-श्रेया तिला लाजवतच बोलली ....आणि त्या तिघी हसायला लागल्या... ...

त्या तिघींचं छान चाललं होत. अनु ची झोप झाली होती ...त्यामुळं आत तिला झोप येणार नव्हती. बाकी सगळे आवरून आप आपल्या रूम मध्ये गेले. अनु ने टीव्ही चालू केला इकडे तिकडच्या चॅनेलवरून परत बातम्यांकडे वळली .....

कालची बातमी सगळीकडे सारखी सारखी येत होती आणि एक नाव अजून येत होत युगराज धर्माधिकारी "-तिने फोन उचलला आणि श्री ला लावला... 

"हॅलो श्री ,मला भेटायचंय ..आज भेटू शकतो का आपण ?"-अनु 

"हो चालेल न ..५ वाजत भेटूया .."-श्री.

अनिका आज श्री ला भेटायला जायचं म्हणून खुश झाली ..रूम मध्ये जाऊन ती तयार झाली आणि खाली आली .

"अरे हे काय ? स्वारी कुठे निघाली ? कालपासून तर आपण अजून भेटलोच नाही "-आबा नुकतेच आलं होते 

"काही नाही आबा असाच जरा ,श्रीधर ला भेटून येते आज ..बरेच दिवस झाले काहीच बोलणं पण झालं नाही .."-अनु 

'अनु आजच जायला हवाय का ?आराम कर एखाद्या दिवशी जरा "-आई ...

"नाही ग आई ,सकाळपासून आरामच चालूये ...बघ न ...थोडा कंटाळा पण जाईल ..."-अनु 

"बर बाई तू काही ऐकणार आहेस का? काळजी घे ,म्हणजे झालं "-आई. तेवढ्य मृणाल आबांसाठी चहा घेऊन येते ...

"नीट जा हो आणि फोनकर काही अडचण आली तर ...."-आबा 

अनु खांद्याला purse अटकवते आणि जाते ..

"ह्या पोरीच काही पाय घरात टीकत नाही  ..कस होईल पुढं काय माहित ?"-आई चिंतेच्या स्वरात 

"कसली एवढी चिंता करताय ? तिची काळजी नको ....ती समर्थ आहे प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायला....दादासाहेबांचा रक्त आहे ते ...."-आबा

"हो माहित आहे मला म्हणूनच भीती वाटते ..आजून बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात आहे म्हणून ठीक आहे . गुलदस्तातून बाहेर आल्यावर घरात वादळ उठले नाही म्हणजे मिळवलं .."-आई ल खूपच चिंता लागून राहिली होती ...मृणालच्या काहीच लक्षात येत नव्हत 

"कसली गोष्टी .. आई ?"-मृणाल 

"काही नाही ग सुनबाई ...तुमच्या आईसाहेबांना चिंता करायला काही कारणलागात का ?  ते सोडा ,आमचं चिरंजीव कुठे आहे दिसले नाही "-आबा नि विषय बदललं होता ..मृणालच्या हि  ते लक्षात आलं होत ..इकडं अनु एक कॉफे शॉप मध्य पोहचते ...श्श्री पण येतोच पाच मिनटात ...

"हाय श्री .."-अनु 

"हं बोला मॅडम ,आज कशी आठवण केलीत ? काय काम होत? "-श्री हाताची घडी घालत बोलला ...

 काय रे असं म्हणतो ...कामाशिवाय आप भेटू शकत नाही का ?"-अनु 

"नाही तस नाही भेटू शकतो पण भेटत नाही ना .."-श्री. हलकीच smile करतो. वेटर दोन कॉफी समोर ठेवून जातो ..

"श्री ,तुझं  लेख छान आहे ,वाचला मी  आज ....आणि तू काल  जी मदत केली त्यासाठी खरंच धन्यवाद .."- अनु

"अरे बस का आता ..हेच आहे का  बोलायला ..आपल ठरलाय ना अनु कि, आपण एकमेकांची मदत नेहमी करणार म्हणून  ..त्यात काय एवढ ?"-श्री कॉफीचा घोट घेत बोलत होता ....

"हो न , एक तर तू ती बातमी दिली आणि ते फोटो पण ...."-अनु 

"तू आभार प्रदर्शन साठी आली आहेस का? नाही न ..मग   ..दुसर बोल '-श्री 

"अरे माझ्या डोक्यात एक नाव घोळताय माहिती हवी होती .युगराज धर्माधिकारी "- अनु 

"त्याच काय ? कालच जे प्रकारण हो त त्याच्याच तर हॉस्पिटलच  होत ...बडी असामी  आहे .."-श्री 

"हो न ,पण आणखी काही ,  तू त्याच्याबद्दल बरीच इन्फॉर्मशन गोळा करत होतास न ९ ,१० महिन्यापूर्वी ..म्हणून विचारलं मी तुला "- अनु 

"हं .. तेव्हा त्याला यंग businessmen च पुरस्कार मिळालं होत आन त्या बद्दल लिहायच होत म्हणून काढली होती माहिती ...इतकं कमी वयात इतकं यश बरच काही सांगून जात ..."-श्री विचार करत बोलत होता  

" म्हणजे?"- अनु "

"म्हणेज काय आहे  न  एवढ्या कमी काळात एव्हडं यश सहज मिळत नाही ..त्याच्यामागं नक्कीच काहीतरी काळंबेरं असू शकत ..हा म्हणजे हा माझं अंदाज बर का .."-श्री 

"ह,इन्टेरेस्टींग ...मग तर हा काळंबेरं शोधालाच पाहिजे ..नाही .... तू मला त्याची माहिती जेवढी तुझ्याकडे आहे देशील प्लिज "-अनु..

"का नाही ...पण जरा सांभाळून .. हे इतका सोपं नाहीये ......काल पण जे झालाय  त्यात त्यांचाही हात असू शकतो .."-श्री 

"काय ?पण  ते हॉस्पिटल तर त्याचाच आहे न ...मग तो कस  काय?"-अनु 

"हा एक अंदाज आहे फक्त ...... आणि तस हि जर तिथं असं काही असेल जे लोकांसमोर येऊ नये असं वाटत असेल तर ....."-श्री 

"हं ..पॉईंट है .....देखते है ...कुंडली तो निकालनि पडेगी .."-अनु 

नंतर दोघे थोड्याशा गप्प मारतात आणि मग निघतात .. अनु ला तिथेच एका टेबल वर रेवा दिसते ...

ती रेवा कड जाते आणि जाऊन चकित होते तिथे रेवा आणि समीर बसलेले असतात ..

"हेय काय हे एकट्यानेच पार्टी चालली का ?सॅम तू कसा इथे ?"-अनु 

दोघेही थोडे चकित होतात ....

" अरे अनु बैस ना ....मी इकडे आलो होतो तर रेवा दिसली आणि मग काय बसलो इथेच गप्पा मारत .."-समीर 

"हो न , तू काय म्हणतेस ..इथे कशी ?"-रेवा पण अडखळत विचारते ..

"काही नाही रे एका मित्राला भेटायला आले होते ....आणि तुम्ही दिसलात ..बाय the way काही सिरीयस गप्पा होत्या का ?"-अनु 

"नाही ग का ? असं का विचारतेस ?"-समीर 

"नाही अचानक गप्प झालात ..असं वाटलं मला .."-अनु 

"छे ग ,काही पण काय ?"-रेवा 

थोडावेळ त्य्नाच्या गप्पा झाल्या मग सगळेच जायला निघाले ...

"सॅम तू घरी च जाणार आहेस न ..."-अनु सहजच 

"अ हो ,पण थोडासा काम आहे अजून बाहेर का ग ?"-समीर 

"नाही मला वाटलं तू सोडशील मला .....पण ठीक आहे मी आणि रेवा जातो ..चल रेवा .."-अनु 

रेवा तिच्यासोबत जायला निघाली ....इकडे समीर चा जीव कसनुसा होत होता ....खार म्हणजे समीर ला रेवा आवडायला लागली होती 

"अनु ,थांब न ...मी सोडतो तुम्हाला दोघीना ...काम काय ते तर होताच राहील ..."-समीर 

समीर कार घेऊन येतो ..सगळे गाडीत बसतात ...कोणी काहीच बोलत नसत अनु फक्त दोघांचं निरीक्षण करत असते ....कुठे तरी पाणी मुरतंय तिच्या लक्षात येत ...ते आधी रेवा ला सोडतात मग घरी निघतात 

"सॅम ,तू आणि रेवा आज खरंच अचानकच भेटले होते ना .."-अनु 

"हो ग का तेच तेच विचारतेस ..?"-सॅम 

"ओक ओके राहू दे .."-अनु 

समीर अनु ला घरी सोडतो ...

"काय मग स्वारी खाऊन पिऊन आलेली दिसते ...."-साहिल 

"ये गप रे ...थकले मी .."-अनु सोफ्यावर बसत म्हणाली 

"हम्म ,कोणी सांगितलं होत का जायला ? तुलाच घरी बसवत नाही .. सारखी बाहेर हिंडतेस .."-साहिल 

"ये काय ड्रमा लावलायस ..?काय हवंय ते बोल "-अनु 

"माझी पार्टी बाकी आहे ...."-साहिल 

"कसली पार्टी ?आम्हाला पण द्या .."-मोहन बाहेर येऊन बोलू लागतो ...

"काही नाही रे दादा असाच .खूप दिवस झाले बाहेर गेलोच नाही म्हणून ....आर पण श्रेया कुठे आहे ?"-अनु 

"त्या आजकाल आपल्या रूम मध्ये असतात बऱ्यापैकी ...."-साहिल 

"होणं बराय शांतात आहे .."-मोहन ..

"चला तुमचं चालू द्या मी पडते जरावेळ उद्या परत ऑफिस .."-अनु 

आजचा दिवस काहीसा आरामात गेलेला असतो ..राहून राहून रेवा चा आणि समीर चा विचार येत असतो .... अनु फ्रेश होते आणि मोबाइलला मध्ये गाणं ऐकत असते तर एक पॉप उप येतो .....श्री चा ई-मेल येतो तिला ..ती पटकन फाईल ओपन करते .....युगराज बद्दल ची बरीच माहिती त्या फाईल मध्ये असते ....तिला राहवत नाही आणि वाचायला घेते ...

"युगराज धर्माधिकारी ....स्वतःच्या हिमतीवर सगळं विश्व उभा केलेले ....मोठं मोठे हॉटेल्स ची चैन ,मॉल आणि हॉस्पिटल..असं बराच काही एक हाती सांभाळणारा ......दिसायला एकदा हिरो .....फॅमिल बद्दल काहीच माहिती उपलबद्ध नाही ..मूळ गाव "राजेवाडी "....यंग businessman चा पुरस्कार  चा मानकरी ....आजपर्यंत बरयाचदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला पण पुराव्याअभावी काहीच सिद्ध झालेलं नाही ...."-अनु एक एक माहिती वाचत होती आणि तिला त्या व्यक्ती मध्ये अजूनच इन्टेरेस्ट येत होता ... 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Anuradha Pushkar

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....