Jan 28, 2022
कथामालिका

अनिका 18

Read Later
अनिका 18

https://www.irablogging.com/blog/anika17_6011

पार्ट १७ साठी वर क्लिक करा ..

कॅफे एशिया ..एका क्लब मध्ये वरचा फ्लोर वर "आय tv"  ची आजची पार्टी होती ...कॅफे एशिया 'हे एक असे resturant होते जिथे दोन फ्लोअर होते . समोर च्या बाजूला म्हणजे आत आल्यावर छोटे, मोठे कोफी टेबल होते...मागच्या बाजूला डाईनिंग टेबल फॅमिली साठी ,किंवा मोठ्या ग्रुप पार्टी साठी arrange करण्यात आलेले होते ...आणि वरच्या फ्लोअर वर एक पार्टी हॉल आणि क्लब म्हणजे डान्स ,लाऊड मुसिक ,कॉकटेल ,,आणि ग्लास पार्टीशन .....कॅफे एशिया तस मोठं होत ..खाली म्हणजे फर्स्ट फ्लोअर वर भिंतीवर भारतीय संस्कृती दर्शवणारे काही पेंटिगन्स होते ...आणि वरच्या फ्लोअर वर आर्टीस्टीक आणि नव युगाचे दर्शन घडवणारे पेंटिगन्स आणि stutues होते. 

अनु,रेवा आणि ऋचा तयार होऊनच पार्टी ला पोहचले ..एव्हाना त्यांचे कोलीग्स पण पोहचले च होते .आता फक्त उत्सव मूर्ती पंडित सर आणि केदार बाकी होते ...केदार चा ७ चा शो आटोपलं कि मग तो येणार होता..तिघी  सुद्धा  हॉल क्लब मध्ये एंटर झाल्या ..छानस पार्टी music सुरु होत ..music वर lights चा खेळ सुरु होता ..या तिघींना पाहून मोनिका त्यांच्याजवळ आली ..मोनिका ने रेड कलर चा गुडघ्यापर्यंतचा वन पीस घातला होता कानात मोट्ठे रिंग  होते ..ओठांवर लाल रंगाची गडद लिपस्टिक होती ,ती बोल्ड अन beautiful  दिसत होती ..

"हाय,कुठे होतात ?पार्टी तर केव्ह्च सुरु झाली  ..."-मोनिका ,अनिका कडे बघत बोलली आणि हाताला पेयाचा एक सिप घेतला ..

"अजून कुठे ,अजून तर सर यायचे आहेत ना ..?"-अनु पटकन म्हणाली ....

मोनिका ने फक्त एक smile  दिली....तेवढ्यात आशुतोष सर आले ... मोनिका जाऊन त्यांना भेटली ,ग्रीट केलं आणि एकच गलका उडाला ...दोन मिन साठी music बंद झालं ...ते बोलू लागले ."वेलकम ऑल...एन्जॉय युअर time ...मज्जा ,मस्ती करा पण उद्या ऑफिस ला यायचं हे लक्षात असू द् द्या."-आणि ते हसायला लागले .."-music परत सुरु झालं ...त्यांनी पण ड्रिंक हातात घेतला आणि बार चेअर वर बसले ..ओमी आणि बाकी काही लोक गप्पा मारत होते ...पंडित सर पण सगळ्याशी जाऊन भेटत होते ...ऋचा बाकीच्यनमध्ये कधी मिक्स झाली कळलंच नाही ...रेवा पण इतर काही लोकांशी बोलण्यात गुंग झाली ...अनु आता बार काउंटर च्या जवळच्या चेअर वर बसली बाकीच्यांचा डान्स बघू लागली ...तिला तस बसलेलं पाहून पंडीत सर तिच्या जवळ आले ,

"हाय ,मी आशुतोष पंडित ..हह्या चॅनेलच एक पार्टनर ...आपण सकाळी भेटलोच होतो ..."-पंडित स्वतःची ओळख करून देत .

अनु पटकन उभी राहिली आणि हातात हात घेऊन ग्रीट केलं .

"हॅलो सर ,मी अनिका पाटील ...... फील्ड न crime रिपोर्टर "-अनु 

दोघे हि बसले आणि गप्पा मारू लागले ...

"सर सकाळ साठी सॉरी ..ते मी दुसऱ्या एका गोष्टीत होते सो ..."-अनु 

"इट्स ओके ...नॉट to  वरी .ते माझ्या लक्षात आलंच .....कोणावर तरी राग होता बहुतेक ...हो न "-पंडित 

"हयांना कस कळलं ....अनु हा विचार करतच होती ...

"हे बघा मिस .. मी ऐकलंय तुमच्याबद्दल ..तुम्ही एक खूप चांगल्या रिपोर्टरआहात म्हणून तुम्हाला  सांगतो ..आपण आपल्या कामावर असताना इतर कोणत्याही गोष्टीचा परिणाम आपल्यावर होऊ देऊ नये ....एकावेळी एकच काम करावं .."-पंडित बोलत होते आणि त्यांची नजर दारावर गेली.केदार आला होता ..सगळं काम निपटून .....ब्लू कलर ची जीन्स ,ब्राउन कलर चे शूज ,ऑफ orange कलर चा light कलर  टी शर्ट   एकदम कूल आणि हॅण्डसम दिसत होता ..

"हेय केदार ,माय बॉय ..प्लिज come जॉईन us ..पंडित तिथूनच बोलले ..अनु पण त्याच्याकडे बघत होती केदार ने हलकी smile चेहऱ्यावर ठेवली त्याची हि नजर अनु वरून हटत नव्हती ...नेहमी  सिम्पल कुर्ता आणि leggging ,किंवा जीन्स आणि लॉन्ग कुर्ता घातलेली अनु आज लॉन्ग ब्लॅक कलर च्या वन पीस मधेय होती ...तिचा गाउन ब्लॅक कलर चा sleev लेस होता आणि फ्रंट कट चा होता ..केस स्ट्रेट केलेले न मोकळे सोडलेले होते ,कानात लोम्बतया design चे घातलं होत, तिच्याकडं बघत बघतच तो त्या दोघांच्या जवळ आला .अनिका ने नजर हटवली..

"हॅलो सर, ..हॅलो अनिका "-केदार  

"अनु ने एकदम शॉकिंग नजरे न पाहिलं आणि smile दिली .आज पहिल्यादा त्याने अनिका म्हणून संबोधल होत ..केदार आणि पंडित सर बोलत होते ..अनु ला थोडं अवक्वर्ड वाटत होत पण ती तिथून जाऊ शकत नव्हती ..पंडित सरांचा फोन वाजला आणि ते बाजूला जाऊन बोलू लागले ..अनिका  ची तिथे थांबायची इच्छा नव्हती ,

"excuse मी ,"-म्हणत ती जायला निघाली ..केदार अजूनही तिच्याच कडे बघत होता ..त्याने तिला थांबवलं 

"अनिका ,i hope you dont mind .....नावाने हाक मारली तर .."-केदार ,ती मागे वळून फक्त बघत होती ..तिच्या चेहऱ्यवरचे भाव बदलत  होते....काळे काजल घातलेले  डोळे बराच काही बोलत होते ..ती काहीच बोलत नाही हे बघून तोच परत काहीतरी बोलावं म्हणून परत बोलला ,

"..सो सरांशी ओळख झाली असेल न ....कसे वाटले सर ..?"-केदार 

त्याच्याकडे नजर देऊन "छान आहेत ..कमीत कमी समोरच्याची बाजू ऐकून घेतात .."-दुसरीकडे बघत अनु बोलली.. 

"अच्छा ,म्हणजे मी ऐकून घेत नाही असाच न .."-केदार .तिने एकदम नजर त्याच्यावर रोखली ..तो असं हि म्हणेल हे तिला वाटलंच नव्हतं तोअजूनही तिच्या डोळ्यात बघत होता ..एका हातात जूस आणि दुसरा हात पॅन्टच्या खिश्यात नजर अनु वर ...

"तिने उत्तर द्याच टाळलं...

"आज छान दिसताय...फक्त ह्या हातात एखाद ब्रेसलेट असत तर अजून छान दिसलं असत .."-केदार एकदम casualy बोलून गेला ..तस तिचा पारा परत चढला ....

"तुम्हाला माझ्यावर ओरडायला मज्जा येते न ..... दुसऱ्यांवर आपली बॉसगिरी दाखवायला खूप छान वाटत न .....मी जे काही करते ते चुकीचेच करते असाच हो न ..म्हणजे बघा न मी काय घालायचं काय नाही ते पण मला ठरवता येत नाही ....नाही का ?.."-अनु सकाळपासूनच राग आत्ता बाहेर काढत होती .....मुद्दा काहीच नव्हता पण राग होता आणि तो आता बाहेर पडत होता विनाकारण ...आणि केदार तिच्या कडे बघत होता एकटक ..मोनिका च लक्ष होत केदारवर ...

"you know व्हॉट मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये .."-अनिका ,आणि तिथून निघून गेली ...केदार मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत होता ...

"हाय केदार ,. काय मग कसला विचार करतोय ?. आता काय केलाय  तिने ?"-मोनिका ...

"कोणी ?"-केदार 

"तिनेच जिच्याकडे तू एकटक बघत आहेस ...."-मोनिका त्यावर नजर रोखून ..

केदार ने मग मोनिका च्या डोळ्यात डोळे घालून बोलायला सुरवात केली .."मी कोणाकडे बघतोय ?किंवा नाही ..कोणाकडे बघायला हवं ते माझं मला ठरवू देत..... प्लिज .."-केदार .एवढं बोलून निघायला लागला .

"काय आहे तिच्यात ? ती समोर आली कि तू बदलतोस ?काय शोधतोस तिच्या डोळ्यात ..?ती एवढं फटकन बोलते तुला आणि तरी हि तू सॉरी म्हणतो .."-मोनिका ..

केदार थांबतो ,मग वळून मोनिका कडे बघतो हलकीच smile देतो   "leave it mona ...."म्हणतो आणि पुढे जातो ....मोनिका फक्त बघत असते ......

पार्टी जोरात सुरु असते ....डान्स फ्लोअर वर डान्स आणि music सुरु असते ..अनिका ,रेवा ,ओमी, पिंटो ,,सगळेच हसत हसत गप्पा मारत असतात ..केदार मात्र एकटा असतो ..अधून मधून अनु कडे त्याच लक्ष असत आणि तीच हि त्याच्याकडे पाहणं सुरु असत ..रेवा निघायच्या तयारीत असते ..

"हेय काय हे ,,कुठे निघालीस ?"-अनु 

"सॉरी यार फ्रेइंड्स मला निघायला हवं ....अजून एक काम आहे जाता जात .."-रेवा 

"अरे काय यार ..मी पण निघणारच आहे थांब न थोडं ..प्लिज "-अनु तिला विनवण्या करत होती ...कारण रेवा गेल्यावर ती मात्र एकटी पडणार होती ....ऋचा च काय ती सगळ्यांसोबत इसिली मिक्स होऊन जात होती ....

"सॉरी अनु ,मला निघायलाच हवं ..मी उद्या भेटते न .... आणि हो न्यू जोईनी च गिफ्ट उद्या दाखव मला ..."-रेवा 

त्यांच्या ऑफिस मध्ये ज्या लोकांना  ऑफिस जॉईन करून ६ महिन्यापेक्षा जास्त झाले आहेत त्यांना एक गिफ्ट दिल जायचं  ..

"बाय ..."-अनु ने रेवा ला बाय केलं ... रात्रीचे ९ ,सव्वा ९ वाजले होते पार्टी जवळ जवळ संपायच्या तयारीत होती ..अनु ला एक फोन आला ...आणि ती तडक निघाली .....खाली येऊन रिक्षा किंवा टॅक्सी बघणार तोच केदारची गाडी येऊन उभी राहिली ....

ती शॉक होऊन बघत होती ....

"मिस पाटील वेळ नाहीये ..लवकर बसा..बाकीचे प्रश्न नंतर विचारा ....."-केदार ..तशी अनु पटकन बसली .

"सीट बेल्ट लावा प्लिज ."-केदार ....

अनु ने सीट बेल्ट लावला ....तिला बरेचशे प्रश्न पडले होते , केदार अचानक कसा समोर आला ? आपण कुठे निघालो ?आपल्याला आणि त्याला एकाच ठिकाणी जायचे असेल का?  ती ते विचारणार ,

'सर ,.."-अनु ....

"मिस अनिका ह्यावेळेस तुम्हाला खूप सारे प्रश्न पडले असतील ..पण एकच सांगतो जसे तुमचे खबरी आहेत किंवा असतील तसेच माझं हि नेटवर्क आहे ..त्यामुळे मला हि तसाच एक फोन आला आणि तुमची हालचाल बघता मला जाणवलं कि आपण एकाच बातमीच्या मागे आहोत ....."-केदार ड्राईव्ह करत तिच्याशी बोलत होता ....

ती फक्त त्याच्याकडे बघत त्याच ऐकत होती ...तो  फार फास्ट ड्राईव्ह करत होता कारण त्यानं लवकर पोहचायचे होते ....

"आणि हो  घरी फोन करून कळवा  तुम्हाला उशीर होणार आहे ते .."-केदार .

अनु ने फोन पर्स मधून काढला आणि घरी कॉल केला ..साहिल ने फोन उचलला ..

'हॅलो साहिल मला urgently एक बातमी कव्हर करायला जायचं आहे ....त्यामुळे यायला खूप उशीर होईल ......हो ..सिटी पासून थोडं लांब आहे नंतर मी लोकेशन पाठवेन तुला ....हो....हो...काळजी करू नकोस .(तेवढ्यात आई फोन हातात घेऊन बोलायला लागते ...)..आई आग काळजी करू नकोस ...हो ..आहेत माझ्या सोबत काळजी घेणारे ....."-अनु 

तिच्या ह्या वाक्यावर केदार एकदा तिच्याकडे बघतो आणि त्याला गालातच हसू येते .... आणि तो परत ड्राईव्ह करू लागतो ..

ती फोन ठेवून काचेतून बाहेर बघत असते .......

   क्रमशः

प्रिय वाचकहो ,

तुमस सर्वाना रामनवमीच्या शुभेच्छा ..देव करो अन जगावर आलेलं हे संकट लवकर दूर होवो ...तुम्हा सर्वांना निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...

वाचकहो ,मला माहित आहे कि कथा पोस्ट करायला कधी कधी खूप उशीर होतो ..पण काय करणार सध्या खूप साऱ्या गोष्टी एकसाथ घडत आहे ..आणि त्यात भर म्हणजे इंटरनेट चा प्रॉब्लेम ..पण तरीसुद्धा मी लवकरात लवकर कथेचे पार्ट पोस्ट करण्याचा प्रयत्न कारेन ... असं असताना हि तुम्ही आतापर्यंत ह्या कथेशी जोडलेलं आहेत त्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून आभार ...तुम्हाला कथा आवडल्यास नक्की प्रतिक्रिया द्या ..तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासारख्या नवोदित लेखकाला लिहण्यास प्रेरणा देतात .... धन्यवाद !

©अनुराधा पुष्कर.. 

   

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Anuradha Pushkar

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....