अनिका 14

anu enjoys her work but her work is not at simple ..it has so many challenges

https://www.irablogging.com/blog/anika13_5782

भाग १३ साठी वर क्लिक करा 

अनु ऑफिस मध्ये पोहचते ..तिला कोणीही आजू बाजूच्या डेस्क वर दिसत नाही ...तेवढ्यात केदार तिला केबीन मधून बाहेर पडताना  दिसतो .दोघांची नजरा नजर होते . अनिका smile करते पण तो रागातच निघून जातो .ऑफिस मध्ये केदारच मूड खराब असतो .अनु ला काही कळतच नाही काय हो ते ....ती दुर्लक्ष करते आणि कामाला लागते ...केदारला ला काम परफेक्ट हवं असत ... तेवढ्यात रेवा बाजूला येऊन बसते .

"हेय ,हाय रेवा ..काय चाललंय ?कुठे होतीस तू ?"-अनु 

"काही नाही ग ...एक केस च काम होत ...त्यावरच   सुरु  आहे विचार पण माहिती अजून मिळाली नाही ..आणि तुझं तो खडूस ...त्याला सगळं लगेचच हवं असत ..."-रेवा बोलत होती 

"हेय शांत हो .पाणी पी ..काय झालाय नेमकं सांगशील का ?"-अनु 

"आग ती केस नाही का ..त्या मॉडेलची आत्महत्या ...."-रेवा 

"तीच काय ?ते तर मि बघत आहे न "-अनु 

तेवढ्यात केदार परत तिकडून जात  असतो आपल्या केबिन कडे ..

"मिस रेवा ,गप्पा नंतर मारा आणि जे काम सांगितलंय ते करा ...."-केदार एक कटाक्ष अनु कडे हि टाकतो ...आणि निघून जातो ..अनु ला काहीतरी खटकत ...ती लगेचच केदारच्या केबिन मध्ये जाते ...

"सर एक मिनिट ...मला जरा बोलायचं .."-अनु 

"काय बोलायचं ?पटकन बोला मला वेळ नाहीये .."-केदार 

"त्या मॉडेलची बातमी मी कव्हर करत होते मग ती रेवा कडे कशी गेली ?"-अनु 

"मिस पाटील...कोणती बातमी कोणी करायची हे आम्ही ठरवतो ..,मी कधी काय आणि का करतो हे मी कोणालाही सांगू इच्छित नाही ..आणि तस हि तुम्ही सुट्टी घेतली होती बातम्यांनी नाही ..ती तर प्रेक्षांपर्यंत पोहचवावीच लागेल  न .....म्हणून रेवा त्यावर काम करत आहे .... "-केदार रुक्षपणे बोलला आणि एक फाईल चाळत बसला .. अनु त्याच्याकडे बघतच होती "हा असा का वागतोय माझ्याशी ?'-स्वतःशीच विचार करत होती 

"अजून काही बोलायचं आहे ....नाहीतर पुढचं काही काम होतंय का ते बघा .... you  can leave now ...."-केदार दाराकडे हात करून बोलतो ..

अनु ला हि राग येतो आणि ती तावतवाने निघून जाते .

"काय ग ,काय झालं ?तुला पण रागवले का ?"-रेवा 

" दुसरं काही येत का त्यांना..?..काय झालाय त्यांना ..म्हणे दुसरं काही आहे का बघा ..."-अनु 

अनु ला एक फोन येतो आणि ती तडक  निघून जाते ....केदार पण घाईत खाली येतो आणि रेवा ला विचारतो ..

"मिस पाटील कुठे आहे ?"-केदार 

"माहित नाही सर ..तिला एक फोनआला आणि ती गेली लगेचच ...."-रेवा 

केदार विचार करतो आणि तो हि जातो ..इकडे अनु ला एक बातमी साठी फोन आलेला असतो ...ती त्या लोकेशन वर आलेली असते  ...एक झोपडपट्टी ला आग लागलेली असते ....ती तेथ जाऊन  बघते तर खूप आक्रोश असतो ..आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या आलेल्या असतात ...ती माहिती काढण्यासाठी काही लोकांशी बोलते ,

"आज्जी काय झालं हे ? कस झालं ?"-अनु 

"काय सांगू बाई ..आमच्या गरिबांच नशीबच फुटकं आहे .....सगळीकडं आग लागली ..सगळं बरबाद झालाय .."-आज्जी रडतच बोलत  होत्या ..

अनिका ने अजून एक दोन  लोकांची विचारपूस केली .......तेवढ्यात तिथे काहीमंत्री आले ..विचारपूस करायला 

"आले हे, सगळं संपल्यावर येतात हि लोक..."-गर्दीतही एक जण .

"नाही तर काय ..ह्यांचं काय जातंय ...?आमची घरं बरबाद झालीये .."- अजून एक जण 

"अरे ह्यांना पळवून लावा ..त्यांची सहानभूती नकोय आम्हाला .."-त्वेषाने एक जण ओरडला  तस बरीच लोक धक्का बुक्की करायला लागली ....गर्दीतल्या लोकांनी सगळ्यनावर हात धुवून घेतला .....आलेला मंत्री ..पत्रकार ससगळ्यांवर दगडफेक ..आणि मारामारी करू लागले ....अनिका सुद्धा ह्या गोंधळात अडकली होती ..तिला हि काही प्रमाणात धक्काबुक्की झाली होती ...आपल्या मोबाइल मध्य बरेच शूटिंग तिने केलं होत ....ते करत असताना अचानक एक दगड तिच्या बाजूने येत होता तीच लक्ष नव्हता पण तेवढ्यात एक  तरुणाने तिला जोरात मागे खेचलं ...आणि ती कोणाच्यातरी छातीवर आदळली .....तिला काही कळण्याच्या आताच हा प्रकार घडला ...तिने हलकेच वर बघितले ...तर तो तरुण इकडे तिकडे बघत तिला त्या गर्दीपासून बाहेर काढत होता ..दोघे हि गर्दीतून थोडास बाहेर आले ...anika त्याच्याकडं बघत होती आणि त्याची नजर हि अनिका वर खिळली होती ....जणू काही तो तिच्या चेहऱ्यात कैद होऊन गेला होता ....उंचपुरा ,देखणा तरुण .... कसला तरी आवाज आला आणि दोघेही तंद्रीतून बाहेर आले ..

"चला इथे थांबणं योग्य वाटत नाही .."-तो तरुण आनीक चा हात धरून तिला घेऊन गेला ...चालता चालता अनिका चा फोन वाजला ..

"हॅलो ,तू कॉल केला होतास .."-रोहित ऑफिसमधून ..

"हा हो,मी लाईव्ह फुटेज देत आहे ..कनेक्ट कर ..इथे एका झोपडपट्टीत आग लागली आहे ..आणि खुप गोंधळ मजला आहे ..लगेचच  ओमी ला पाठव ..कव्हर  करायला  तोपर्यंत मी पाठवलेले फोटो आणि शूटिंग रन करा "-अनिका ..एवढा बोलून अनिका न फोन ठेवला आणि त्या तरुणीकडे वळली पण तो तिथे नव्हताच ...अनिका ने न्युज कव्हर केली आणि परतीच्या रस्त्यात ती त्याच तरुणाबद्दल विचार करत होती, 

."कुठे  गेला कोण जाणे ?कोण असेल तो ?किती मदत केली त्याने माझी ...परत भेटेल का ? मी तर नाव पण नाही विचारलं साधं ..शी ..."-

अनिका ऑफिस मध्य आली ...तीन दिलेल्या बातमीने चांगलाच टी आर पी चॅनेल ला मिळालं होता .... तिचे  कलीग तीच कौतुक करत होते ..ती खुश होती ..तिच्या चेहऱयावर मस्त smile होत ...केदार वरून हे सगळं बघत होता ...

"काय बघतोयस एवढा मन लावून ?"-मोनिका केदार ला 

गालातच हसत .."काही नाही ..खऱ्या कामाचं समाधान आणि तेज काही वेगळच असत.."-तो अजूनही अनिका कडे बघत होता ...

अनिका आज खुशीत होती....ती बाहेर असल्यामुळे   तीच काम थोडं उशिरा आटोपलं ..सगळं आटोपून ती घरीजायला  निघाली .. केदार हि निघाला होता तो खाली आला आणि त्या दोघांची नजरा नजर झाली ...सकाळी खर तर त्यांच्यात काही वाद झाले होते आणि नंतर दिवसभर ते दोघेही कामात व्यस्त होते त्यामुळे बोलण्याचा चान्स च नव्हता ....आता दोघांमध्ये  शांतात होती ..काय बोलावे कोणी सुरवात करावी हे कळत नव्हते ...अनु आणि केदार जेवढ्या चांगल्या प्रकारे एक टीम होते तेवढेच त्यांच्यात वाद हि होत असत ....शेवटी केदार बोलला,

"आजबातमी छान कव्हर केलीत ....keep इट up .."-केदार

"हम्म ,थँक्स .."-अनिका डेस्क आवरू लागली  ....केदार ला वाटले ती सकाळच्या प्रकारावरून अजूनही नाराजीत आहे ..

"चला मी सोडतो तुम्हाला ..तसाही खूप उशीर झाला आहे .."-केदार 

"नको थँक्स ..मी जाईन ..मला सवय आहे .."-अनिका नजर टाळत बोलाली 

केदार २ मिन तिच्याकडे बघत होता ,"ठीक आहे .. बाय "- केदार निघून गेला ..तो गेल्यानंतर अनिका त्याच्याकडे २ मिन बघतच होती 

"how rude ..?निघून गेला ...परत एकदा विचारला असत तर काही बिघडला असत का ह्याच ...?पण नाही खडूस तो खडूसच ....कशाचा गर्व आहे एवढा काय माहित ..गेला उडत जा  ...जाईन मी ...पण कशी ?"-अनु स्वतःशीच विचार करत बाहेर  आली होती ....  काळे ढग आकाशात जमा होत होते ....  तिला एक हि ऑटो मिळत नव्हता ..

"बाप रे ,,आता काय करू कशी जाऊ ..लवकरच गाडी घ्यावी लागणार दिसतंय "-आणिका बडबडत असताना एक गाडी तिच्यासमोर येऊन उभी राहिली ....आणि गाडीचं दार उघडलं, ती गाडी केदार ची होती ..

"बसा आत.."-केदार 

"नको ..जाईन मी ..उगाच तुम्हाला त्रास .."-अनु 

"हं ..हे बघा मिस पाटील ..इतक्या उशिरा इथे काही मिळणं अवघडच ...त्यात पाऊस येण्याचे चिन्ह आहेत ..त्यामुळे माझं ऐकाल तर गाडीत बसा ,सोडतो मी तुम्हाला ...बाकी तुम्हाला जर इथेच थांबायचं असेल तर तुमची मर्जी .."-केदार तिच्याकडे एक भुवई उंच करून बोलत होता ..अनिका विचार करत गाडीत बसली ....

दोघेही निघाले ....

"किती rude आहे हा ...थोडासा नीट बोललं असत तर ..पण नाही माझी अपेक्षाच चुकीची आहे ....."-ती  काचेबाहेर बघत स्वतःशीच विचार करत होती आणि केदार तिच्या चेहऱ्यावरचे ते हावभाव टिपत होता ..त्याला थोडं हसू पण येत होत ...दोघांमधेय कोणी आधी बोलायला तयार नव्हत.. बाहेर पावसाच्या रिमझिम धारा सुरु झाल्या आणि गाडीत रेडिओवर छान गाणं सुरु झालं ...

"कुछ ना कहो ,कुछ भी ना कहो ...क्या काहना है ,क्या सुनाना है ,हम को पत्ता है ,तुम को पत्ता है ,समय का ये pal थम स गया है ,और इस pal मी कोई नाही है ,बस एक मे हू ,बस एक तुम हो ......"

नकळतपणे केदार आणि अनिका ची नजरा नजर झाली ..अनु ने नंतर परत बाहेर बघण्यास सुरवात केली ..केदार कसला तरी विचार करत होता ....

"सर ,"-अनु ने आवाज दिला आणि केदार च लक्ष तिच्याकडे गेलं ..

"सर ,  माझं घर आलं ..साइड ला घ्या प्लिज.. मी जाईन इथून ..."-अनु. केदारच्या लक्षात आलं कि अनिका च घर आलं ते आणि त्याने गाडी साईड ला घेतली ..अनु दरवाजा उघडणार तोच ,

"अनिका "-केदार 

अनु तशीच थांबली आणि केदार कडे बघू लागली ..तिचे ते काळेभोर डोळे केदारच्या डोळ्यात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होते कदाचित ..तेवढ्यात केदार परत बोलू लागला ,

"अनिका,आज बातमी छान केलीत तुम्ही ..पण जरा स्वतःची पण काळजी घेत जा ...जेव्हा अशी एखादी बातमी येते तेव्हा सोबत कोणालातरी घेऊन जायचं असत.....अश्या ठिकाणी काहीही होऊ शकत ......"-केदारच्या बोलण्यात तिच्यासाठी काळजी जाणावात होती ..

"हम्म ,नेक्स्ट time काळजी घेईन .. थँक you सर ..अँड थँक्स फॉर the लिफ्ट..."- अनु परत जाण्यासाठी म्हणून दरवाजा उघडू लागली 

"सॉरी ,"-केदार ..तिने परत पटकन मागे त्याच्याकडे बघितलं,

"हं .."-अनु 

"सॉरी ,सकाळी जे बोललो त्यासाठी सॉरी ..पण बातम्या कोणासाठी थांबत नसतात ....आणि आय know तुम्ही सुट्टीवर होतात ,,सॉरी "-केदार 

"हं ,,इट स ok सर .."-म्हणत ती गाडीतून उतरली आणि सरळ घराकडे गेली . केदार मात्र ती घराच्या गेट मध्ये जाईपर्यंत तिथेच होता ....जेव्हा अनु आत गेली तेव्हा च तो हि तिथून निघाला ...

क्रमशः

  ©अनुराधा पुष्कर.. 

🎭 Series Post

View all