अनिका 13

story of girl

https://www.irablogging.com/blog/anikaa-12_5524

https://www.irablogging.com/blog/anika-11_5299

भाग ११ साठी वर क्लिक करा ..

आबा ,साहिल , राम श्रेया सगळे हॉल वर पोहचतात ...सगळी तयारी कशी सुरु आहे ते बघतात .... पाहुणे यायला सुरवात झाली ,थोड्याच वेळात मृणाल आणि मोहन हि येतात ..मृणाल ने सिल्क ची साडी घातलेली असते ..  नाका मध्ये नथ, कानात मोठे हलके झुमके , कपाळावर बिंदी ,ओठांवर मरून  कलरची लिपस्टिक एकंदरीतच सुंदरशी नवं वधू आणि जोडीला मोहन मोती कलर च्या शेरवानी मध्ये उभा असतो ...श्रेया आणि अनु हि मस्त दिसत असतात ...सगळे  जण वर वधू ना भेटून आशीर्वाद देतात ...अनुच्या ऑफीस चे मित्र हि येतात .. श्री ,सोनम ,रेवा ओमी सगळेच आलेले असतात ...तेवढयात केदार हि येतो ... एकदम casual लुक असतो.हातामध्ये  एक फुलांचा बुके असतो ...त्याची नजर अनिका वर पडते ..अनिका चे केस मोकळे सोडलेले असतात ,कानात मोठी झुमके,ओठांवर हलकी लिपस्टिक ,काळेभोर डोळे ..आणि हलका केशरी रंगाचा घागरा ...केदार तिच्याकडे बघत असतो. ..ती सोनम आणि रेवा शी बोलत असते तेवढ्यात तीच लक्ष केदार कडे जात .हलका फुलका casual लुक छान दिसत असतो ..दोघांची नजरा नजर होते ,अनु त्याला receive करायला जाते ..

"या ना प्लिज ,खूप छान वाटले तुम्हाला इथे बघून ..."-अनु.  केदार हलकेच हसतो आणि वर वधू ना भेटतो अनु ओळख करून देते ..बाकी मग तो रेवा ,ओमी आणि श्री ,सोनम ह्यांना पण भेटतो .खूप छान गप्पा सुरु असतात 

"सर ,you are looking सो स्मार्ट .."-रेवा 

"ओह थँक्स रेवा .."-केदार .बऱ्याच गप्पा टप्पा  आणि ओळखी पाळखी मध्ये समारोह छान पार पडला ..आज केदारही बरच खुलला होता ..ऑफिस मधला केदार आणि आजचा केदार दोन वेगळे आहेत असं वाटत होत . तेवढ्यात अनुला दुसरीकडे बोलावतात ...अनु जाते पण केदार च तिच्याकडे अधून मधून लक्ष असत ..आबा तिची ओळख एक दोन लोकांशी करून देतात तेवढयात तिथे सॅम पण येतो आणि अनिका शी गप्पा मारायलालागतो ..अनु आणि समीर दोघही हसत हसत एक दुसऱ्यांची खेचत असतात आणि गप्पांमध्ये मध्ये रममाण होतात ...इकडे केदार हे सगळं बघत असतो ....थोड्या वेळाने केदार जायला निघतो.तो रेवा ला सांगून तिथून निघून जातो ..

इकडे अनु इकडे तिकडे बघत असते .

"काय ग कोणाला शोधतेस ?"-रेवा 

"अन काही नाही ग असाच  ,तू घे न काही चल .."-अनु 

"तो गेला .."-रेवा मुद्दामहून तिची प्रितिक्रिया बघण्यासाठी ..

"हो का ..कोण तो ?"-अनु काहीच काळात नाही असा दाखवते 

"तोच तो ज्याला तुझी नजर शोधते सारखी ..केदार .."-रेवा गालातच हसत तिला सांगते ....

"हो का ,ठीक आहे ...वेल जातांना सांगायची पद्धत नाहीये बहुतेक त्यांच्यात .."-अनु 

"अं ह ..ते काय आहे न तुम्ही व्यस्त होतात ना दुसऱ्यांच्यामध्ये ..मग कोणाला सांगणार नाही का ...."-रेवा टोमणे मारत बोलत असते ..अन काही कळत नाही ..पण रेवा गालात हसत असते ...

"वैसे लागता है आग दोनो तरफ बराबर है .."-आणि रेवा हसायला लागते ..तशी अनु हलकेच लाजते ....

सगळं समारोह आटोपून सगळे जण घरी परतात ..खूप दमलेले असतात .सगळे दुसऱ्यादिवशी सत्यनारायण असते म्हणून लवकर उठून तयारी करायची असते ...दमून भागून सगळे झोपी जातात ...पण मोहन ला मात्र हि रात्र खूप मोठ्ठी भासत असते ....

"इंतेजार भाई ,सब्र का फल मिठा होता है भाई ...इंतेजार करो .."-श्रेया मोहन ला उगीचच चिडवत असते ....

दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजेची तयारी सुरु असते ......मृणाल मस्त पैकी जांभळ्या रंगाची पैठणी नेसते ,त्यावर हातभार चुडा ,नाकात नाथ ,गळ्यात मंगल सूत्र ,राणी हार ,जणू काही लक्ष्मी सारखाच तेज तिच्या चेहऱयावर झळकत होत ...मोहन आणि मृणाल पूजेला बसतात ...पूजा छान पार पडते ...जेवण ते आटोपून सगळे बसलेलं असतात .

" हम्म, आत सांग वाहिनी कुठं कुठं जायचं हनिमून ला ..?"-श्रेया च परत सुरु होत 

"ये काय हे ..श्रेया .  बघावं तेव्हा एकाच तिला त्रास देऊ नको हा ."-आई 

"ये आई ,झाली ना आता पूजा ..आता विचारू दे ...तू थांब जरा ..भाई एकतर उतावीळ झालाय ...कालची रात्र तर खूपच मोठ्ठी होती त्यात .."-श्रेया बोलतच होती,सगळे हसत होत तेवढ्यात मोहन तिला एक टपली देतो ...

"आग तू कितीक ,तुझी जीभ किती लांब ..केवढं बोलतेस ?जरा शांत राहा .."-मोहन .तिकडे मृणाल लाजून पाणी पाणी झालेली असते 

"हम्म दादा ,तू न गोव्याला जा ..मस्त पैकी बीच वर मज्जा कर ....तिथे त्रास द्यायला कोणीहीयेणार नाही ...दिवस पाण्यात मज्ज करा ..संध्याकाळी रेतीवर नाव कोरा ....हातात हात घालू वल्क घ्या ..व्वा मस्तच ना .."-साहिल कोणत्यातरी विश्वात गुंग होऊन बोलत होता ...

"ओ राजे .या घरी या ...तुम्हाला हनिमून ला जायला वेळ आहे अजून .."-अनु साहिल ला चिडवत बोलते 

"हो न पण हे ऐकून तर वाटतंय कि लवकरच तीही वेळ येईल साहेबांची ....काय रे ..आहे का कोण .?."-मोहन 

"ये हो ..सांग  न रे साहिल ..भाऊ ,सांग रे .."-श्रेया आपला मोर्चा साहिल कडे वाळवते ..

"ये काही काय ? दादा उगीचच विषय बदलू नकोस ..माझं सांगेन मी नंतर ...आता  तुझं बोल .."-साहिल 

"आमच काय बाबा .. ह्या पतंग्याची दोरी आत ह्यांच्या हातात आहे ..ते नेतील तिकडे जाऊ .."-मोहन मृणाल कडे बघत बोलतो ...मृणाल "इश्श .."- तिथून उठून रूम मध्ये जाते  ..सगळे हसत हसत गप्पा मारत असतात ...

दुसऱ्या दिवशी मोहन आणि मृणाल गोव्याला जाणार असतात, हनीमून ला ...लग्न छान झालेलं असत सगळे पाहुणे हि घरी गेलेलं असतात.. घरी आता राम आणि आत्याबाई असतात पाहुण्यांपैकी ...मंजू मावशी तर सत्यनारायण आटोपून लगेचच निघाल्या होत्या .....अनु हि ऑफिस ची तयारी करून ठेवते ..

प्रिय वाचकहो , मागच्या काही दिवसांपासून काही मेडिकल कारणांमुळे अनिका चे भाग पोस्ट करू शकले नाही त्यासाठी क्षमस्व  आहे .....ह्यापुढे ह्या कथेचे भाग तुमच्यापर्यंत वेळोवेळो पोहचतील ह्याचा मी नाकी प्रयत्न कारेन ...तुमच्या प्रतिक्रिया मला नवनवीन गोष्टी लिहण्यास प्रेत देतात तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया देण्यास विसरू नका ..धन्यवाद ! 

   

🎭 Series Post

View all