Jan 28, 2022
मनोरंजन

अनिका 9

Read Later
अनिका 9

https://www.irablogging.com/blog/anika8_4975

"आशा बाई पाणी आणा ...."-आई

"अरे मोहन ,काय झालं रे बाबा हे .?."-आई .  सगळेच एकदम घाबरतात ..आणि प्रश्न सुरु करतात ...

मोहन बसतो .... "मोहन अरे पडला का कुठे ?"-आबा 

"काही नाही .घाबरू नका ...."-मोहन 

"घे पाणी पी ....आणि सांग बघू नक्की काय झालं ते ..?"-आई 

अनु ,श्रेया ,साहिल सगळेच बघत असतात ..मोहन पाणी पितो ....सगळे त्याच्या बोलायची वाट बघत असतात ...

"आग आई घाबरू नकोस काही नाही झालं ......थोडासा पडलो म्हणून लागलाय हे .."-मोहन 

"असं कस रे पडला .?.काय लागला ...कधी पडलास?"-आई 

"दादा ,तू खर बोलतोय ?"-अनु ..प्रश्नार्थक नजरेने विचारते 

"म्हणजे ,? जे झालं तेच सांगतोय ना ......रस्त्यावरून चालत असताना ...मागून आलेल्या एका बाईक मुळे मी पडलो ....बाकी काही झालं नाही मला .."-मोहन थोडासा चिडून  नजर चुकवत म्हणाला 

"बर बर ,असू दे , तू जाऊन जरा आराम कर ....जास्त कोणी त्याला काही आता विचारू नका ..साहिल जा त्याला त्याच्या रूम मध्ये सोडून ये ...."-आबा 

साहिल त्याला सोडायला जातो ...सगळे आप आपल्या रूम मध्ये जातात ..अनुला मात्र शंका येते ....मोहन ला झालेल्या जखमांवरून काहीतरी मारपीट झाल्याची शक्यता दिसत होती ....पण मोहन काही बोलला नाही .......

दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या टेबल वर सगळे जमले होते ...

"कस वाटतंय आता मोहन ?"-आबा पेपर खाली ठेवून त्याला विचारू लागले 

"बराय आता .."-मोहन ...

"पण दादा ,तू त्या बाईक वाल्याना पकडून दिल कि नाही ? चांगलं चोप द्ययच त्यांना...."-श्रेया 

"हो न पोलीस केस करावी अश्या लोकांवर ."-साहिल 

"अरे नाही ठीक आहे ..मुद्दाम नाही केलं त्यांनी ......त्यांनीच उपचार केले माझ्यावर डॉक्टरकडे नेऊन ...आणि तास हि एवढा काही लागलं नाही मला ....."-मोहन 

"देवाचीच कृपा म्हणायची ......अरे हो संध्याकाळी मृणाल चे काका काकू आणि मृणाल येणार आहेत तुला भेटायला ....."-आई 

"आई कशाला तिला लगेच सांगितलंस .....?"-मोहन 

"ओह हो हो कित्ती काळजी ...बाई बाई ...."-श्रेया उगीचच चिडवत 

"ये गप आज्जी बाई ..."-मोहन 

अनु मात्र फक्त हसत होती ,कोणत्यातरी गोष्टीचा विचार करत ......

"अरे ते येणारच होते आज पुढचं ठरवायला नको ..?  का आम्ही जाऊन सगळं बघून आलो ....आज ते रीतसर साखरपुड्याची तारीख सांगायला येणार आहेत ..."-आई ..आणि हो श्रेया अनु तुमचं काय ?आज थांबू शकता का घरी ?

"ह्म्म्म.मज्जा आहे मग एका माणसाची ....हो हो मी थांबणारच आहे ..बघू तरी आमची होणारी मृणाल वाहिनी कशी आहे ते ?"-ये अनु तू पण थांब मज्जा करू आज ?"-श्रेया 

"अ ...नाही महा माळ आज नाही जमणार खरं म्हणजे मला आताच निघावं लागेल एक कामी आहे ..जमाल तर लवकर येईन पण वाट बघू नका ...सॉरी आई ,सॉरी दादा .."-अनु निघायची तयारी करते 

"काय हि मुलगी म्हणजे म्हणजे न ....सारखी काय काम करते काय माहित ?  "-आई 

"अहो ,आता जबादादरी वाढलीये तिची ..टीव्ही रिपोर्टींग साधं नसत ..."-आबा 

"आबा तुम्ही कधीच तुमच्या लाडक्या लेकी बद्दल ऐकून घेत नाही ..."-श्रेया 

अनु ऑफिस ला पोहचते ....कालच्या गोष्टींबाबत केदारशी चर्चा करायची असते म्हणून ती त्याच्या केबिन कडे जाते ,हलकेच नॉक करते आणि दरवाजा उघडते .. दोन मिन तिथेच थांबून जाते ..केदार च्या केबिन मध्ये एक मुलगी असते ती वळून बघते 

" येस ,what  do you वॉन्ट?"- मोनिका (ती मुलगी )

"सॉरी ,केदार सर ..."-अनु बोलणार पुढचं तेवढ्यात ती मुलगा म्हणते 

"आपल्या सुपर विसर च्या केबिन मध्ये येताना नॉक करून यावा एवढा माहित नाही का तुला ? .... काय काम आहे एवढं एवढा?आम्ही मीटिंग मध्ये आहोत बघतेस न ना...नंतर  ये ...."-मोनिका 

"मी नॉक केलं होत mam ..त्यांनीच बोलावलं होत म्हणून आले होते .."-अनिका 

"किती बोलतेस ...?आम्ही कामात आहोत नंतर ये ..."-मोनिका 

"बोलणं हेच माझं काम आहे मॅम ..."-असं बोलून आणि केदार कडे थोडं रागाने बघत अनु तिथून निघून जाते ...खाली येते आपली डेस्क वर बसते 

"हेय, काय ग काय झालं ? रागावलीस कोणावर ..?'-रेवा 

"काही नाही असाच ...."-अनु 

"अरे...काय झालं ? तू सरांच्या केबिन मध्ये गेली होतीस का ?'-रेवा 

अन नुसतच रेवा कडे बघते ....रेवा लाही समजते काही तरी बिघडलं ते ....तेवढ्यात तिला मोनिका केदारच्या केबिन मधून बाहेर पडताना दिसते ....

"हाय रेवा ,काम कास चाललंय ? आज तू मंत्रालयात जाऊन ते रिपोर्टस घेऊन ये ...."-मोनिका 

"ओह हाय ,हो मी जाणार आहे ...."-रेवा 

मोनिका तिच्या केबिन कडे जाते.

"हि कोण आहे ?'-अनु

"अरे हो तुझी ओळखच नसेल ना ...हि मोनिका ..actually हे चॅनेल जयनाचं आहे त्यांची हि मुलगी ....त्यामुळे इथे हीच थोडा जास्त बॉसिंग असत ....तू जॉईन झाली तेव्हा हि दिल्ली ला होती तिच्या घरी ......कधी कधी असते तिकडेच .."-रेवा

"ओह ,अच्छा म्हणजे हे चॅनेल हीच आहे तर ..."-अनु

"हो दोन पार्टनर आहेत  एक हिचे वडील मिस्टर घोष आणि दुसरे म्हणजे मिस्टर पंडित ....ते इथे येत असतात ती केबिन त्यांची सध्या ते भारताबाहेर गेले आहेत म्हणून तुझी ओळख होऊ शकली नाही ..ते खूप छान आहेत पण ....कामाबद्दल सिरिअस आहे फार ...त्यामुळे सध्या मोनिका आणि केदार ह्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत ..केदार ला सध्या वर्क लोड जास्त आहेत ..संध्याकाळच्या prime शो आणि चॅनेलच मार्केटिंग असं बराच भूमिका असतात त्याच्या ....."-केदार 

"आणि मग मोनिका काय करते ...फक्त watch ठेवते का ?"-अनु थोडं मिश्किल पने बोलते ...

"आग नाही ग तीच हि काम आहे technical गोष्टी बघते थोड्याफार ...न्युज scheduling  असं बारच असत .."-रेवा 

"ये काय चाललंय ?चाल ना कॉफी पिऊ .."-ओमी तिथे येतो 

"कुठे होतास ? तू अजून मला कालचे फोटोज नाही दिले .."-रेवा 

"देतो ग , चाल कॉफी पिऊन येऊ .... अनु तू पण चल ,फ्रेश होशील ....मस्त "-ओमी 

अनु smile करत जाणयासाठी निघते तेवढ्यात डिस्क वरचा फोन वाजतो ...केदार केबिन मध्ये बोलावतो ..

रेवा आणि ओमी जात ती केदारच्या केबिन मध्ये जाते ..दारावर नॉक करते .....

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Anuradha Pushkar

Writer ,former lecturer ,Home maker

I like reading stories ,inspirational books . i love visiting new places ....