अनिका 1

Its story about journey of girl

वेळ रात्रीचे ११ वाजले होते ...

रस्ता तसा सुनसान होता ..एखादीच  गाडी त्या रस्त्यावरून  जात होती ...रातकिड्यांचा किर्रर्र   आवाज सुरूच होता ...आकाशात चंद्र तेवढा सगळंच बघत होता ...अनु  रस्त्यावरून धावत पळत होती ..सगळीकडे अंधार होता ..जिकडे वाट फुटेल तिकडे फक्त पळतच सुटली ...आपल्यामागे कोण आहे ?कोण नाही? ह्याचा कानोसा घेत घेत ती पळत सुटली होती. एका ठिकाणी एक झोपडी दिसली .एक कंदील  चालू होता, तिला तेवढाच आशेचा किरण दिसला आणि ती त्या झोपडीच्या जवळ गेली  . आत मध्ये बाळाचा आवाज येत होता तिने आवाज दिला 

"कोणी आहे का ?"-अनु 

तिचा आवाज ऐकून एका माणसाने दार उघडले ..त्याच्या मागे एक बाई हातात  एक छोटं मुलं घेऊन उभी होती ..

"कोण हवाय ?कोण तुम्ही ?"- तो माणूस .

"मला जरा पाणी मिळेल का ?मी रस्ता चुकले आहे ?"-अनु 

"तो पाणी आणून देतो ..अनु  घट- घाट पाणी पिते ..

"मी थोडावेळ बसू का ?"-अनु 

"हो हो बसा,इतक्या रात्री इकडे कुठे आला होता ?"-माणूस 

"ते मी माझ्या मैत्रिणी सोबत आले होते इकडे ,पण मग मी चालत चालत रस्ता चुकले ....मी फोन केला आहे त्यांना ते येतीलच मला घ्यायला ...

तोपर्यंत मी इथे थांबले तर चालेल ना ....?"-अनु 

"व्हय जी चाललं ....खूप रात्र झालिया ..बसा तुम्ही इथं .."-माणूस 

बराच वेळ गेला आणि मग एक गाडी त्या झोपडीच्या जवळ आली...त्या गाडीतून एक मुलगा आणि एक मुलगी उतरली ...

ते इकडे तिकडे बघत होते गाडीच्या आवाजाने  अनु बाहेर आली आणि त्या मुलीच्या गळ्यात पडली 

"अनु  ,कुठे होतीस तू ? तू ठीक आहेस ना ....?"-सोनम 

"हो मी ठीक आहे ,मला काहीच सुचत नव्हता सो मी तिथून पळून आले ..."-अनु 

"अग  पण इतका रिस्क घ्यायची  काय गरज होती  ?काही झालं असत म्हणजे ......बर तुझा  फोनही लागत नव्हता "-श्री 

"एक मिनिट नंतर बोलूयात .....थांब जरा .."-अनु .."अच्छा मी निघते  आता तुम्ही मला इथे थांबायला जागा दिली त्याबद्दल धन्यवाद ..हे घ्या .."-अनु  काही पैसे काढून देत होती ,

तेवढ्यात तो माणूस म्हणाला ,"नाही  नाही ताई,हे नको ,,हे कशासाठी ?आम्हाला नको .."-माणूस 

"अहो राहू द्या ...माझ्याकडून त्या बाळासाठी खाऊ घ्या ...आज तुम्ही मला खूप मोठ्ठी  मदत केली आहे ....येते मी .."-अनु  अस बोलून श्री आणि सोनम बरोबर गाडीत बसून निघून जाते ....बरीच रात्र झालेली असते ..ते सगळे हॉटेल वर पोहचतात ..आणि अनु आणि सोनम त्यांच्या रूम मध्ये  जातात ..  अनु फ्रेश  होऊन  बेड वर पाठ टेकते ...सोनम तर कधीच झोपी जाते .सगळेच खूप दमलेले असतात ..दिवस भर कॅमेरा ,धावपळ ,माहिती ,लोक, खूप काही घडलेले असते त्या दिवसात ...

सकाळी दारावर टक टक होते आणि अनुला जाग येते ..बघते तर ९ वाजलेले असतात ....

"बाप रे ,उशीर झाला ...ये सोना उठ ..उठ बाई लवकर ...उठ .."-अनु असं म्हणत दार उघडायला जाते ..एक वेटर चहा कॉफे घेऊन आलेला असतो ..ते सगळं अनु घेते आणि बाथरूम मध्ये जाऊन ब्रश करून सगळं उरकून येते ..तोपर्यंत सोनम उठते ...तीही फ्रेश होऊन येते 

दोघीही ब्रेकफास्ट करतात आणि श्री ला फोन करतात ....श्री पण त्यांच्या रूम मध्ये येतो ......

"काय मग झाली का झोप?"-श्री 

"काय रे ,एक तर रात्री ह्या मॅडम मुळे  नुसतीच धावपळ झालीये ..कसली झोप ..? मला तर अजून झोपायची इच्छा आहे ....."-सोनम 

"हो का .? किती भयानक प्रकार होता तो ....तिथून पळ  काढला नसता  तर आज दिसले असते कि नाही कोण जाणे ?"-अनु 

"अग पण तू इतकी रिस्क का घेते ?काही झालं असत म्हणजे ?मी म्हणालो होतो ना जाऊ नको म्हणून ....."-श्री 

"ती ऐकणार आहे का ?ती तिच्यासोबत आपल्याला पण घेऊन डुबेल..बाकी काय ?"-सोनम 

"अरे ..आपल्या कामामध्ये रिस्क तर आहेच ..आणि जोखीम असेल तरच मजा असते ना ....'करणा  पडता है यार'....अशीच कोणती बातमी  नाही मिळत ....माहित  आहे ना ..बॉस ने काय सांगितलाय ......"-अनु .

आणि ते  तिघेही सगळं आवरून  त्याच्या ऑफिस कडे निघतात ....  ऑफिस मध्ये पोहचल्यावर तिघेही आप- आपल्या कामाला  सुरवात करतात ..

............................................................................................................................................................................................

प्रिय वाचकहो , मी एक नवी कथा घेऊन आलेली आहे ...माझ्या इतर कथांप्रमाणे  ह्याही कथेला तुम्ही प्रतिसाद द्याल हि अपेक्षा करते ..हि कथा  काल्पनिक कथा आहे ,ह्या कथेतील कोणत्याही पात्राचे नाव,प्रसंग ह्याच वास्तविक जीवनाशी  तसा संबंध  नाही पण एखादे दुसरे प्रसंग हे सत्य घटनेतून घेतलेले असतील ....तुम्हाला कथा आवडल्यास नक्की माझ्या नावासहित शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवत  राहा ..माझ्या साठी त्या अनमोल आहेत ...तुम्ही माझ्या इतर लेखांसाठी मला फोल्लोव हि करू शकता ....चला तर मग अनिका  सोबत नव्या प्रवासाला ............!

🎭 Series Post

View all