अनिका 11

journey of a girl

https://www.irablogging.com/blog/anikaa-10-_5143

भाग १० साठी वर क्लिक करा ..

अनु एकदम खुशीतच घरी पोहचते ..आबा बसलेले असतात ..

"या या ,अनु बाई ...छान केलीत हो बातमी ..."-आबा 

"थँक यू  आबा ,"-अनु ..

"हो तर दिवस भर धावपळ ,नुसती ...किती मेहनत घेते आपली पोर ..छान तर होणारच .."-आई 

"आई ,आग किती कौतुक करणार आहेत दोघे ...बर ते जाऊ दे ,,मला सांग आमची होणारी वाहिनी काय म्हणते ? तारीख ठरली असेल न ..."-अनु 

"हम्म ,तुझी आठवण करत होती ...तारीख ठरली आहे ..ह्याच महिन्याची ..साखरपुडा आणि दुसऱ्या दिवशी लग्न ..."-आई 

"काय ?ह्याच महिन्यात ..अ ग तयारी कशी होईल ..?"-अनु 

"बाई रजिस्टर लग्न आहे ..मोहन रावांची इच्छा माहित  आहे न ..पण मी मात्र काही कार्यक्रम तरी करणारच आहे ..घरातलं  पहिलं कार्य आहे .."-आई .

"हो तर आणि श्रेया मॅडम कुठे आहे ..शॉपिंग ला गेली कि काय ?"-अनु 

"आहे आहे ,रूम मध्ये आहे ."-आबा हसतच ..

अनु फ्रेश होऊन मोहन ला भेटायला जाते ..

"दादा ,कसा आहे तू ?"-अनु

"मी छान ,तू सांग ..इतकी व्यस्त असतेस कि आम्हाला भेटच नाही .."-मोहन

नाही  रे दादा ,असं काही नाही ..  मग वाहिनी काय म्हणाली .."-अनु 

"काय म्हणाली ? अग ह्याने तिला बोलूच दिल नाही ...आपला दादा इतका रोमँटिक आहे हे आज मला कळलं .."-श्रेया तिथे आली होती दूध घेऊन 

"आलीच परत ,काय ग तूला काय आज काम नाही का दुसरे ..? सारखी घिरट्या घालतेय मांजरी सारखी .."-मोहन .

भुवया उंचावून "मंजिरीसारखी म्हणतोस मला तू ?  माझी तर किंमतच नाहिये ह्य घरात ?"-श्रेया थोड्या नरजातीच बोलते 

"अरे रे , रुसला वाटत एक पिलल्लू .." - अनु तिचे गाल ओढत ...

तिघेही हसायला लागत ..घरात आता लग्नाची लगबग सुरु होती .लग्न जरी रजिस्टर होत तरी रिसेपशन  साग्रसंगीत होणार होते ..शेवटी आबा पाटीलच्या घरचे कार्य होते ... मोहन ची तब्बेत हि बरीच बरी झाली होती. अनु चे काम दिवसेंदिवस वाढत होते ....अनु अन केदार हे कॉम्बिनेशन जरा जबरदस्त होते ....बातमी आणि संचालन सगळं जमून भन्नाट बातम्या देत होते .केदार चा स्वभाव काही बदलला नव्हता ...अनु ला अजून हि केदार कळला नव्हता .. पण काम चालू होते ..

"रेवा ,ओमी प्लिज रिसेपशन न ला यायचं हं .."अनु ऑफीस मध्ये निमंत्रण देत होती ... तिने सुट्टीच अर्ज हि केला होता ..

"मिस पाटील ..दोन दिवस सुट्टी ,पण मग तुमच्या बातम्यांचा काय होणार ?"-केदार 

"माझं  शोध कार्य  तस चालू राहील ..घरी लग्न आहे आणि मी तुम्हाला निमंत्रण द्यायला आले आहे ... तुम्ही आलात आम्हला खूप आनंद होईल .."-अनु 

"नक्कीच प्रयत्न करेन .."-केदार . तेवढ्यात केदार च्य दारावर कोणीतरी ठोठावते ..

" ओह  तू ,तुमचं झालं असेल तर केदार मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे .."-मोनिका 

"हो हो ,मी निघत च आहे ..बाय .."-अनिका  केबिनच्या बाहेर जाते 

"हिला नेहमी इतक काय काम असत केदार ?जेव्हा बघावं तेव्हा तुझ्या अवतीभवतीच असते ."-मोनिका 

"jelous , काम असतात तेव्हाच ती येते ...उगीचच नाही घोळत इथे .."-केदार 

"तुला काय म्हणायचंय ,म्हणजे मी इथे उगीचच येत असते .."-मोनिका चिडक्या स्वरात 

"मी असं म्हणालेलो नाही ...बर बोल काय काम होत ."-केदार लॅपटॉप मध्ये बघत बोलतो 

इकडे आनीक  जुन्या ऑफिस च्या मित्रांना पण बोलावते ...आजचा दिवस कामत आणि निमंत्रणातच गेलेला असतो ...

घरी आल्यावर बघते तर पाहुणे आलेले असतात ...

"काय मग आज्जी आत्या कशी आहेस ?"-अनु 

"मी बरी आहे ग ..तू काय बाई आजकाल टीव्ही वर दिसतेस ..जपून राहा हो ..."-आजी आत्या .आबासाहेबांच्या आत्या ज्या जवळच एका गावात राहत असतात ..खूप मोठं वाडा असतो  त्यांचा दापोलीला ..घरी फक्त तीन माणसं त्यांचा नातू जो कि मोहनच्या वयाचाच असेल , किंबहुन वर्षाने मोठा राम ,त्या स्वतः आणि त्यांच्या घरची काम करणारी ,शांता  अक्का ...

"काय मग आत्या रामच काय चाललंय ?तो नाही आला "-आबा 

"येईल हो ,त्याच काय ,घर अन गाव भरच्या भानगडी ..गावासाठी जीव ओवाळून टाकतो अगदी बापासारखा ..."-आज्जी आत्या ..

"हो न ,आज भाऊजी असते तर ,किती बार झालं असत नाही ....रामच्या लग्नाचाही बघावं मीइ तर म्हणते .."-आई 

"आ फार बघू हो ,पण तो तयार असायला हवा न ....नाहीच म्हणतो ..."-आत्या ..

"बघू मी समजावेंन त्याला ,येऊ द्या उद्या .."-आई 

सगळ्यांचं जेवण होत .आई  आत्यानं साड्या दाखवतात ..आत्या कश्या वाटल्या साड्या ..

"छान आहेत हो ,,काय ग सविता मुलीला वडील नाहीये म्हणे ...काका , च्या घरी राहते "-आत्या 

"हो न एका अपघातात गेले ...इथे काका कडे राहते ..आई गावाकडे असते ... पण मुलगी गुणी आहे हो..शिकलेली आहे ,"-सविता बाई .

"चला झोप आता..सगळं काही आजच बोलणार आहे का ? उद्या अजून पाहुणे येणार आहेत... परवा लग्न आहे आपल्या मुलाचं "-आबा .

दुसऱ्या दिवशी सगळी गडबड असते .घरच केळवण ,आहेर बाहेर सगळी जय्यत तयारी असते .....राम सुद्धा येतो 

"राम ,काय हे /आत्या म्हणत होत्या कि तू लग्न करणार नाहीस म्हणे .."-आई 

"काकू ,लग्न म्हणजे मोतीचूर चा लाडू ..आपल्याला नाही भो खायचा ...."-राम 

"असं कास ,अरे सोबत हवी असते प्रत्येकालाच ..आम्ही किती दिवस पुरणार .."-आई 

"झालं लागली माझ्या म्हतारीसारखी बोलायला ...अग सुखाने जगू दे जरा मला ,लग्नानंतर कोणी सुखी होत का ?'-राम 

"नाहीतर काय ?सगळे दुःखीच वाटता का तुला ? काय हो तुम्ही सांगा न काही "आई -

"मी काय बोलणार बाबा , लग्नानंतर आमची काय बिशाद कि आम्ही तुमच्यापुढे बोलायचं ...."-आबा मस्करी करत बोलले ..

"काही हि काय बोलता मुलांसमोर .."-आई आणि सगळेच हसायला लागतात ...

इकडे अनु ऑफिस मध्ये असते .

"मिस पाटील त्या मॉडेल च्या हत्येचं काही धागेदोरे सापडलं का ?' केदार 

"नाही सर म्हणजे काम सुरु आहे ..केस तशी सोपप्पी वाटतं असली तरी बरेच मुद्दे आहेत ...आपण दिलेल्या बातमीनुसार तिने आत्महत्या केली पण तिला तिच्या बॉयफ्रेइन्ड ने भाग पडला असं आपला अंदाज आहे ...त्याची माहिती जेव्हा काढली तेव्हा असं कळलं कि त्याच एक लग्न झालेलं आहे .."-अनु 

"ते तर मलाही माहित आहे ..नवीन काय सापडलं तुम्हाला ते सांगा .."-केदार माधेयच तीच बोलाण तोडत म्हणाला 

"तेच तर म्हणतेय न अजून पुरेशी माहिती मिळाली नाही ...तीच बॉयफ्रेइन्ड ड्रग आडिक्ट आहे, पण पुरेसे पुरावे नाहीत अजून म्हणून तर थांबलीये .."-अनु

"ओह ,नाहीतर त्याचा आतापर्यंत पारडं फाशी केला असता तुम्ही नाही का ?"-केदार हसायला लागतो ..

"अ.. ह हा .."-अनु हि हसते ...केदार जेव्हा असं हसतो तेव्हा तो खूप छान दिसतो त्याच डोळे खूप काही बोलत असतात ..चेहऱ्यावर हलकी smile असते ..पण काय आहे असं कि केदार च्या बतीत काहीच निष्कर्ष काढता येत नाही ...त्याच्या परिवारात कोणीही नाही ...एक भाऊ आहे पण तो दुसऱ्या शहरात असतो इथे हा एकटाच .....

अर्ध्या दिवसाचं काम संपवून अनिका घरी येते ,संध्याकाळी घराची  रुपरेषाच बदलेली असते ... सगळीकडे रोषणाई ... हसण्याचा खिदळण्याचं आवाज ....पाहुणे ..सगळेच असतात .मोहनची तर खेचून खेचून वाट लावलेली असते, .... आशीर्वाद बांगला आपल्या नव्या सुनेचं स्वागत करायला एकदम सज्ज झालेला असतो ..... आनीक लॉन मध्ये फोनवर बोलत असते तेवढ्यात तिच्या खांदयावर कोणीतरी हात ठेवतो ,

"तू,..."- आश्चर्याने अनिका...

....................................................................................................................................................................................

क्रमशः 

भाग १-

https://www.irablogging.com/blog/anika-1_3669

भा २ 

https://www.irablogging.com/blog/anika-2_3802

भाग ३-

https://www.irablogging.com/blog/anika-3_3901

भाग ४ 

https://www.irablogging.com/blog/anika-4_4668

भाग-५ 

https://www.irablogging.com/blog/anika5_4716

भाग-६ 

https://www.irablogging.com/blog/anika6_4814

भाग-७ 

https://www.irablogging.com/blog/anika7_4935

भाग-८ 

https://www.irablogging.com/blog/anika8_4975

भाग-९ 

https://www.irablogging.com/blog/anika-9_5070

🎭 Series Post

View all