आणि सुटका झाली भाग 1

Ani


आणि  सुटका झाली

प्रिया,"आई हे बघ मला एक ऍड दिसली आहे ,यात शहरातील सगळ्यात मोठ्या कंपनीत मला मोठ्या हुद्द्यावर लागण्याचा खूप मोठा चान्स आहे, सगळे क्रायटेरिया अगदी माझ्या शिक्षणाशी जुळते आहेत...बघ पहिली अट कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हवंय त्यांना, सोबत 3 वर्षांचा।कोणत्या ही कंपनीत काम केल्याचा अनुभव... त्यात बारावीला 90 पेक्षा जास्त गुण हवेत, आणि गम्मत म्हणजे कॅण्डीडेट हा मुंबईचा हवा आहे... त्यात रहाणे, खाणे, ट्रॅव्हल्लिंग, ह्या सर्वांचा खर्च कंपनी स्वतः देणार आहे... आणि दरवर्षी इंक्रीमेंट 5 टक्के असणार...त्यात लॅपटॉप ही असणार आहे आम्हाला...आणि लॅपटॉप साठी आम्हाला फक्त 25 हजार भरायचे आहेत ,ते ही जॉईन होतांना.. आणि आपल्या बँक अकाउंट ची सगळी माहिती द्यायची आहे..."

आई ऐकत होती,तिला जरा ही कंपनी खोटी वाटत होती ,कारण तिचा अनुभव सांगत होता की इतके अस्वासने देणारी कंपनी एक तर fraud असणार किंवा त्यांना अक्कल नसणार...तरी ती प्रियाला म्हणत होती, " तू जरा खात्री करून घे...मला ही कंपनी काही बरोबर वाटत नाही...नेमकी कसली कंपनी आहे ,कुठे ह्याच ऑफिस आहे...आणि किती माणसे कामे करतात ,किंवा एकदा इंटरनेट वरून ही कंपनी खरंच अस्तित्वात आहे का ही खात्री करून मगच apply करशील...मी माझा अनुभव सांगते...बाकी तू शहाणी आहेस...थोडा कमी पगार का असेना तुला सध्या पण तुझी आत्ताची नौकरी चांगलीच आहे मी म्हणेन...त्यांना तुझ्या सारखे होतकरू candidate हवेत...आणि तुझा ही जम बसला आहे इथे... आणि तसे ही तुला आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत आणि त्यांनी तुझे नाव प्रोमोशन साठी सुचवले आहे..मग का उगाच काही थोड्या पैश्यासाठी तू ही हातची नौकरी सोडत आहेस... तू आधी खात्री करून मगच ह्या नौकरीला सोडशील..."

ती.... आई तू केलास ना माझा हिरमोड, लावलीस ना नाट, नको तिथे उगाच शंका घेतेस तू... अग सुरुवात झाली नाही तर तू मोडता घातलास...तुला काही कळत नाही..तू उगाच माझ्या निर्णयाचा आड येऊ नकोस...मी निर्णय घेतला आहे...आणि मी ह्या कंपनीला ही राम राम केला आहे... ती कंपनी ह्या कंपनीच्या तुलनेत खूप मोठी आहे...मी त्याबद्दल search करेन...पण नंतर निवांत... हो मी उद्या जाऊन आधी त्या कंपनी जाऊन इंटर्व्हियु देणार आहे आणि तसेच मी लॅपटॉप चे ही पैसे भरणार आहे आणि हे फायनल झाले आहे...आता मी मोठी झाली आहे... तुझे अनुभव तसे ही सरकारी नौकरीचे आहेत ते कॉपरपोर्टे ला लागू होत नाहीत.. सो तू फक्त माझ्या यशात सहभागी हो.."


प्रिया पाय आपटत निघाली, आणि तिने आपली सगळी कागदपत्रे सोबत घेतली, आईला नमस्कार ही केला नाही, ना देवाच्या पाया पडली...तशीच ती त्या कंपनीच्या कॅम्पस मध्ये थबकते...तिला ती मोठी इमारत ,तो मोठा लवाजमा... तिथे काम करणाऱ्याचे ते stylish कपडे... प्रत्येक जणांकडे तिची नजर रोखुन बघत होती...काही जण गाडीने येताना दिसत होते.. ते पाहून ती जणू स्वप्नच बघू लागली...मी ही ह्या कंपनीत लागले म्हणजे माझी ही लॉटरी लागणार आहे, माझी ही एक गाडी असणार, मला ही हा असा पेहराव करून ऑफिसमध्ये यावे लागणार..मग मी ही style मारणार... मग ह्या हाय फाय मुला मुलींमध्ये आपले उठणे बसने होणार... त्यांच्या सोबत मग मीटिंगस..पार्टी...कुठे टूर...ह्या गोष्टी हळूहळू होत जाणारच.. आणि त्यासाठी मनाची तयारी करावी लागणार.. मला जशी life style हवी होती ती अगदी तशीच आहे... नाहीतर तेच ते पंजाबी सूट...आणि ते boring लोक...कमी शिकलेले... त्यांच्यासोबत काम करणे कठीण झाले होते... त्यात माझ्या बरोबरीचे असे कोणी ही नव्हते तिथे... आता हे सगळे माझ्या बरोबरीचे आहेत...माझ्या क्लास चे आहेत.. लायकी अगदी बरोबरी वाल्यांची असावी हे नेहमी वाटत ते आता खरे होत आहे...


खूप आनंदात होती आज कारण आज तिला हवी तशी कंपनी मिळाली होती, सगळ्या दृष्टीने ह्या कंपनीत तिला तिच्या लायकी नुसार पगार आणि इतर सुविधा मिळणार होत्या..

तिच्या शिक्षणाच्या नुसार तिला अश्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळणार होती ज्यांचे शिक्षण तिच्या इतकेच झाले होते...


मोठ्या श्रीमंत बापाची ही पोरं होती... काही तर बिनधास्त मन मौजी होती... त्यांची style ,राहणीमान, त्यांच्या गाड्या... हरएक गोष्ट तिला आकर्षित करत होती...तिचे ऑफिस मुंबईच्या मोठ्या नावाजलेल्या भागात होते...तिथे उंच उंच इमारती होत्या... आणि आजूबाजूला किती तरी मोठी मोठी ऑफिस होती...


तिला सगळ्यांची खूप भुरळ पडली आणि तिला हेच आपले आयुष्य आहे त्याचा आपण इतके वर्ष शोध घेत होतो....बाकी सब झूठ वाटत होते... तिला जणू on the top of the world अशी भावना येत होती.. तिला जग जिंकल्या सारखे वाटत होते..

प्रिया ने ठरवले ,आता इथून कुठेच पुन्हा नौकरी करिता जायचे नाही...आता आपल्या स्वप्नाला कोणी किती ही fraud म्हटले तरी सोडायचे नाही...मग भले ही काही करावे लागले तरी हरकत नाही..

तिला आता वाटू लागले होते की ,तसे ही जंग में सब जायज है.... मला माझ्या गरिबीला हरवायचे आहे... माझ्या साधे पणाला कल्टी द्यायची आहे... हे कपडे ही सगळी गरिबीतली छटा दूर करायची असेल तर मला इथेच काम करायचे आहे...

प्रिया मनाशी बोलत होती, आईने मला ही नौकरी करू नको असे जरी सांगितले असेल तरी तिचे तिच्या दृष्टीने एक वेळ बरोबर ही असेल पण तिने तिचे जग फक्त घर आणि ऑफिस पुरते सीमित ठेवले आहे ,आणि तिचे जग कायमस्वरूपी माझ्या भवती फिरत ठेवले आहे .


माझी आई माझ्या काळजीत ती कायम झुरत असते.. मला ह्या जगाच्या रीत भाती पासून लांब ठेवण्याचा तिचा हट्ट असतो ,म्हणते जग खूप वाईट आहे ग ,आता च्या ह्या जगात मुलींना लगेच भुरळ घातली जाते...

मुली जर त्या चमकत्या जगाच्या चका चौंद मध्ये कधी हरवून जातात हे त्यांचेच त्यांना कळत नाही..वाट हरवली की पुन्हा घरची वाट त्यांना सापडत नाही, आणि सापडली तरी त्या पुन्हा घरच्या वाटेने सगळे विसरून येत नाहीत... तू माझा जीव आहेस तुला जर काही झाले तर मी कुठे तुला शोधू...एक चूक आणि आयुष्य बरबाद होते..मुलीची इज्जत काचे सारखी असते.. मला अनुभव आहे .. असे प्रियाच्या आईचे तिला नेहमी सांगणे असे..


आई माझी साधी ,तिचे जग छोटे, तिचे विचार छोटे... आणि तिची नौकरी छोटी...ती घाबरते ह्या मोठ्या फसव्या जगाला म्हणून माझ्या काळजीपोटी ती मला ही नौकरी नको करू म्हणते पण मी हीच नौकरी करणार आहे...


आईच्या सांगण्याचा न जुमानता प्रियाने हे पाऊल उचलले होते... खरंच हे योग्य होते का तिच्यासाठी की आईला खरंच बाहेरच्या जगाचा अनुभव नव्हता...की तिला काही माहीत होते त्या कंपनी बद्दल...आई उगाच काळजी करत नव्हती..ती काही तरी लपवत होती...जे तिला माहीत होते... का प्रियाला त्या माहोल मध्ये नौकरी करण्यास आई नकार देत होती...

क्रमशः....,???

🎭 Series Post

View all