आणि परत तु ये

अतूट नाते

विषय :- काळ आला होता पण...
फेरी :- राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा*


" रावी अशी रडलीस तर कस होईल बाळा, आता तुला शांत राहायला पाहिजे. अश्या अवस्थेत स्वतःची काळजी घ्यावी ग. " तिचे बाबा तिला समजावत असता. आताच तिला आठवा महिना चालू झालेला असतं.आणि ती अश्या अवस्थेत आय.सी. यू. च्या बाहेर बसली होती कारण तिचे आजोबा तीचा बेस्ट फ्रेंड आणि तिच्या आयुष्यातल्या सगळ्यात खास व्यक्ती आता मारण्याच्या दारात उभा होता.



काल रात्री तिच्या सोबत फोन वर एक तास बोलून मग आजोबा झोपायला गेले पण अचानक रात्री त्याच्या आवाजाने सगळे त्यांच्या रूमच्या दिशेने धावत गेले आणि समोरचा दृश्य बघून सगळ्यांच्या काळजात धस्स झाले कारण आजोबा जमिनीवरती पडलेले होते डोळे बंद आणि जीभ बाहेर अशा अवस्थेत होते.



" बाबा काय झालं तुम्हाला ?" असं बोलून त्यांचा मोठा मुलगा राजू त्यांच्या दिशेने गेला त्यांनी त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही.त्यांनी लगेच त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल सुद्धा केलं.डॉक्टर त्यांच्यावर लगेच उपचार चालू केले. 


अर्ध्या तासांनी डॉक्टर बाहेर आले होते. त्यांनी सांगतले की त्यांच्या मेंदूची मेन नस क्रॅक झाली आहे आणि त्यामुळे ते कोमा मध्ये गेले आहेत. ते आता काहीच हालचाल करत नाही आहेत. आम्ही योग्य ती ट्रीटमेंट त्यांच्यावर करू, पण अश्या केस मध्ये मेमरी लॉस होण्याची शक्यता जास्त असते.


घराच्या लोकांनी ठरवलेलं असतं की रावीला यातली एकही गोष्ट सांगायची नाही कारण तिचं आत्ताच आठवा महिना चालू असल्याने तिला जास्त टेन्शन देऊ शकत नव्हते, पण तिच्या नवऱ्याला म्हणजे सुमितला फोन लावताना नेमका त्याने फोन स्पीकरवर ठेवला आणि आजोबांची बातमी रावीला कळाली आणि ती सुमितच्या मागे लागून आता हॉस्पिटलमध्ये आली होती. तिने आयसीयूच्या काचेतूनच आत मध्ये तिच्या आजोबांना बघितलं आणि तेव्हापासूनच ती रडत होती. सगळी लोकं प्रयत्न करत होते की तिला शांत करण्याचा पण ती कोणाचेही ऐकत नव्हती.


सगळ्यांनी तिला जबरदस्ती घरी पाठवली आणि तीपण खूप मुश्किलने घरी जाण्यासाठी रेडी झाली. तशातच एक दिवस गेला आणि अचानक डॉक्टरांनी सांगितलं की तिचे आजोबा सध्या सिरीयस कंडिशन मध्ये आहेत.


डॉक्टर आपले 100% देऊन त्यांच्यावर उपचार करत होते पण ते कोणत्याच ट्रीटमेंटला हवा तसा रिस्पॉन्स देत नव्हते. आता तर डॉक्टरांनी पण हात वरती केले होते. जे होईल ते देवाच्या भरोशावरती, असंच त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं होतं.


" बाबा मला एकदा आजु ला बघायचा आहे प्लीज तुम्ही डॉक्टरांशी बोला ना...."रेवा म्हणाली.

" अग पण तू आत मध्ये जाऊन स्वतःला त्रास करून घेशील आणि त्याचं असर बाळा वरती होईल..."रेवाचे बाबा तिला समजावत म्हणाले.

"नाही मी स्वतःची आणि बाळाची नक्की काळजी घेईन पण प्लीज मला एकदा आजु ला बघायचं आहे. "रेवाने वडीलांना विनंती केली.


 परिवाराने केलेली खुप सगळी विनंती मान्य करून शेवटी डॉक्टर तिला आतमध्ये पाठवण्याचं निर्णय घेताला. ती आतमध्ये जाते तसं ती खूप अस्वस्थ फील करू लागते कारण खूप सार्‍या मशीन, नाकावरती ऑक्सिजन मास, अंगावरती हॉस्पिटलचे कपडे अशा अवतारात तिचा आजु म्हणजे आजोबा तिथे बेड वरती झोपला होते.



ती हळूहळू त्यांच्या जवळ जाते आणि त्यांच्या हाताला आपल्या हातात येते आणि आपले नाजूक ओठ त्यांच्या हातावरती ठेवून ती भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघू लागते.

"आजू..! बाहेर डॉक्टर बोलतात की तुमचा पेशंट काहीच रिस्पॉन्स देत नाही आहे, त्यांनी आता त्यांचे सर्व प्रयत्न करून सुद्धा तू काहीच रिस्पॉन्स देत नाहीस म्हणून त्यांनी आता सगळं देवावरती ठेवल आहे.पण मला नक्की माहिती आहे की तू नक्की उठशील कारण तू माझा स्ट्रॉंग आजु आहेस आणि तुला उठावंच लागेल कारण तू मला फोन वरती बोलला होतास ना की तू माझ्या बाळाला हातात घेऊन गावभर फिरणार आहेस. \"बघा माझ्या रावीचं बाळ\", \"माझं पतवंड\" ,मग तू असं कसं करू शकतोस ? तू असं अर्धवट आम्हाला सोडून नाही जाऊ शकत आणि मी तुला जाऊ पण देणार नाही. ऐकतोस ना रे ! देवाचं मला माहिती नाही पण तुला ठीक होण्याचा कारण तूच हो .तुला काही झालं तर आमच्या जीवनाला काहीच अर्थ उरणार नाही रे आणि तू तर माझा बेस्ट फ्रेंड आहेस; मग असं बेस्ट फ्रेंड ला अर्धवट सोडून कोण जातं का रे ?"उठ ना रे!"

 रेवा आता कंठ दाटून बोलत होती. डोळे काटोकाठ भरलेले होते .ती त्यांचा हात आपल्या हातात घट्ट पकडून ती बोलत होती पण समोरून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता.


पण अचानक तिच्या हातात असलेल्या त्यांचा हात हलतो. मशीन वरती बिप बीप आवाज चालू होते. तशी ती घाबरून तिच्या नवऱ्याला आवाज देते. रेवाचा नवरा डॉक्टरांसोबत आतमध्ये येतो आणि डॉक्टर काहीच वेळात ट्रीटमेंट चालू करतात.

 डॉक्टर सांगतात की आजोबा आता उपचारांना रिस्पॉन्स देत आहेत आणि त्यांनी असाच बेस्ट रिस्पॉन्स दिला तर ते नक्कीच ठीक होतील.


"रावी बाळा आज फक्त तुझ्यामुळे माझे बाबा ठीक होत आहे. बघ यमराज पण त्यांना घेण्यासाठी आला होता पण तुमच्या दोघांचं घट्ट नातं बघूनच तो परत जात आहे कारण जरी त्यांचा काळ आला असावा तरी वेळ आली नव्हती. त्यांना त्यांच्या पतवंडांना खेळवायचे आहे."रेवाचे बाबा तिला म्हणाले .

रावीनेही रडत होकारात मान हलवली आणि बाबांना मिठी मारली.


*समाप्त*

लेखिका :- मनाली दायते (Mau ❤️✍️)

जिल्हा :- अंधेरी ( मुंबई )