आणि ती.. तिला गवसली

तुझी लढाई तुलाच लढायची आहे....  you are your own healer.... मला माझी पहिली धाडसी, हट्टी, कुणाला न घाबरणारी वरदान बघायची आहे.... अगदी पहिल्या सारखी....... हे असं शापीत आयुष्य जगायला जन्माला आली नाहीस तू.......

खूपच धडाडी व्यक्तिमत्व होतं तिचं...... कोणी अंगावर आलं तर तिने घेतलं शिंगावर....अशी काहीशी.... जिद्दी..... हट्टी ....काहीतरी करून दाखवायची जिद्द ......करारीपणा,  डेरिंगबाज अशी होती ती...... स्कूल ग्रुपमध्ये कॉलेज ग्रुपमध्ये मुलींपेक्षा जास्त मुलांशीच पटायचं तिचं......दिसायला साधीशी.... जो कोणी पाहिल त्याला भुरळ पाडेल अशी सिम्पल साधी ...... पण स्वभावाने सोधी होती (मवाली वृत्ती ).....


पण परस्थिती सगळ्यांना बदलते..... तशी ती ही बदलली....... मवालीपणा  जाऊन मवाळपणा आला तिच्यात.... तिचं तिलाच कळलं नाही .....कधी ती इतकी बदलली....लग्न झालं आणि ती पूर्णपणे बदलली....

नवऱ्याचा राग....क्वचित कधी मार  सहन करत होती..खुप घाबरायची त्याला..आतातर पुरुषीस्वभाव तिच्या स्त्रीस्वभाववरती हावी झाला होता...... सततचा मार ,अपमान सहन करणं,  बोचणारे बोलणं ऐकून मात्र ती स्वतःला हरवून बसली होती...... तीचा धडाडीपणा हारवून बसली होती...

जिद्द संपली होती...काहीतरी करून दाखवायची ....बस्स आता अशी परिस्थिती आली होती... आला दिवस गेला दिवस  ..... आलेला दिवस फक्त पुढे ढकलायचा म्हणून ढकलत होती....

मायेची माणसं, प्रेमळ सोबत..आपल्या जवळ जर असली तर जीवनात किती पण मोठं संकट आल तर ते दुःख, ते संकट पेलण्याची ताकद आपली माणसं आपल्याला देतात.....
आपलं मन खंबीर होऊन आपण त्याच्यासोबत लढतो.... बरोबर ना???

पण जर हिच मायेची माणसं.. आपल्याकडे पाठ फिरवून गेली तर.....तेव्हा मात्र लहान-सहान, छोटा मोठा त्राससुद्धा सहन होत नाही, असं झालं तिचं...कुटुंबानेही दगा दिला होता ......अर्ध्यावर साथ सोडली तिची..

कोणाला विचारणार साथ देशील का?????

नवरा असून नसलेला...

प्रेम काय असतं???

प्रेमाच्या भावनेला कधीही स्पर्श न झालेली ती....
फक्त जगत होती....जगायचं म्हणून.....

स्वतःसाठी नाही..... नावापुरत्या असलेल्या नवऱ्यासाठी......


बंधन झुगारून पुढे जाण्याची ताकद आता तिच्यात उरलीच नव्हती.... लग्न झालं आणि लग्नाची ती रेशीमगाठ कधी लग्नाची बेडी झाली तिचं तिलाच कळलं नाही.... तिचं मन आता तिला आतून कमकुवत करत होता.....हरली होती नियतीपुढं...

कोणाकडे आपलं मन रितं करावं...

व्यक्त व्हावं कुणासमोर असं वाटायचं सतत तिला.....

पण कोणीच नसायचं सोबत ...

मायेची माणसं पारखी झाली होती......
आणि शाळेतल्या आणि कॉलेजमधल्या मित्र-मैत्रिणींसोबत चा संबंध कधीच संपला होता.....

नावाला जगत होती.....


लग्नाचं ते रेशीमतलम ती रेशीमगाठ.. आता फास बनून गळ्याला रुतू लागली होती......

सात जन्म सोबत राहण्याचे वचन दिलेला नवरा सात पावलेही चालायला कचरायचा..... त्याला तिच्याशी काही घेणं देणं नव्हतं....... त्याला फक्त गरज होती एका शरीराची...स्वतःचा माज भागवण्यासाठी.... आणि घरात फुकट काम करणाऱ्या कामवालीची.... एवढंच फक्त त्याचं तिच्याशी काम असायचं... यापुढे ती जगली व वाचली याच्याशी त्याचं काही घेणेदेणे नसायचं......


ती परिस्थितीने पिचलेली.... मनाने घायाळ झालेली...जगण्याची उमेद नाहीशी झालेली..... एक दिवस धीर एकवटून तिने त्याला नोकरी करण्याबद्दल विचारलं..... त्यानेही काही न बोलता संमती दिली... कारण एवढेच तेवढेच चार पैसे भेटतील याला मजा करायला..... एका शाळेत तिला नोकरी लागली... तशी अभ्यासात पहिल्यापासूनच हुशार होती ती .... नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द तिच्यात ...  आता नव्या जागी थोडीशी रमायला लागली होती.....कोणासमोर उलगडणं  सोडून दिल होतं तिनं..... पण सतत सोबत असणाऱ्या लोकांचा थोडाफार प्रभाव आपल्यावर पडत असतो.... तसंच झालं होतं आता तीही आजूबाजूच्या लोकांसोबत थोडी हसु लागली होती....रमू लागली होती...


पण तिच्या मनातील व्यथा आजवर तिने कुणाला सांगितली नव्हती ना ती कुणाला सांगणार होती...... आपल्या लोकांनी विश्वासघात केला मग ही तर परकी माणसं..... परक्या माणसांवर ती काय विश्वास ठेवायचा.... असा त्या भोळ्याभाबड्याचा जीवाचा विचार.....

दररोज शाळेत जाताना रस्त्यावरून मान खाली घालून जात असे.... अजून पण मनातील माणसांची भीती गेली नव्हती तिच्या... असंच अचानक एक दिवस रस्त्याने जाता जाता समोरून एका व्यक्तीने धक्का दिला.... या भोळसट  मुलीला वाटलं चुकून लागला असेल.... स्वतः त्या मूर्ख व्यक्तीला सॉरी बोलून निघून गेली.... तिच्या मनात असलेली माणसंबद्दलची भीती  त्याने बरोबर हेरली.... आता तो दररोजच कधी चुकून धक्का देऊ लागला...........ती बिथरली... कुणाला सांगावं..... रस्ता बदलावा का??? दुसऱ्या रस्त्याने जाऊ म्हणजे  मला त्याचा तो किळसवाणा स्पर्श होणार नाही.... काय करावे?? काय नाही करावे??या विवंचनेत होती.....सतत त्या लोभी लोचट माणसाचा स्पर्श तिला मनाला नवीन जखम देत होता... नवऱ्याला सांगितले तर नोकरी कायमची गमवावी लागेल.. म्हणून भीतीने त्यालाही कानावर घातलं नव्हतं...

आता नोकरी लागल्यामुळे नवऱ्याने त्याचा जुना झालेला टपरा मोबाईल तिला दिला होता.... तिने आपली जुनी डायरी शोधून त्यातील बऱ्याच मित्र-मैत्रिणींची नावं त्या जुन्या टपर्‍या मोबाईल मध्ये सेव केली..... त्यापैकी बऱ्याच जणांचे नंबर तर बदलले असतील हेही तिच्या भोळ्या मनात आलं नाही..... एक दिवस सहजच म्हणून तिने कॉलेजमधील तिच्यासारख्याच धडाडी  असलेल्या... तिच्या मैत्रिणीला कॉल केला.... पण फोन उचलण्याच्या आधीच तिने तो फोन कट केला.... एवढ्या वर्षानंतर काय बोलायचं???? ती ओळखेल का आपल्याला???? विसरली असेल तर???? असे एक ना अनेक प्रश्न मनात आले तिच्या ......पण थोड्याच वेळात त्याच नंबर वरून रिवट कॉल आला.... घाबरतच उचलला तिने.... त्या व्यक्तीने समोरच्या आवाजामुळे क्षणार्धात तिला ओळखले..... आज खूप दिवसांनी तिला आनंद झाला होता...... कोणीतरी आपलं भेटल्याचा आनंद?..... आपल्या आवाजामुळे ही कोणीतरी आपल्याला ओळखू शकतो...... ही भावना तिला सुखावून गेली होती ..... थोड्याफार गप्पा झाल्या आणि परत कधीतरी भेटू म्हणत फोन ठेवला........ रात्री आनंदाच्या भरात तिने मैत्रिणीसोबत बोललेलेच नवर्याला सांगितलं..... त्याच्याकडून उत्तर एवढंच आलं ....जास्त उडू नको.... तो मोबाईल तुला गप्पा मारण्यासाठी दिलेला नाहीये.. माझ्या कामासाठी दिला आहे.... यावर फक्त माझा फोन उचलायचा.... तुला फालतू गप्पागोष्टी करायला फोन दिला  नाही तुला समजलं ..... यावर तिने घाबरतच मान डोलवली.....

आज तो रस्त्यावरचा माणूस तिला बघून गाणं बोलू लागला होता.... चित्रविचित्र हातवारे करू लागला होता...... त्याचा तो विकृतपणा बघून ही आणखीनच बिथरली .... मनात असा हि विचार आला की नोकरी केली नसती तर बरं झालं असं निदान घरात तरी मी  safe होती.......


आज त्याने अलगद खांद्याला स्पर्श केला आणि हलकाच छातीला घसरून स्पर्श करून ......घाणेरड्या बरबटलेल्या नजरेने विचित्र हसत निघून गेला... रडत रडत शाळेत निघाली डोळ्यातलं पाणी टपटपत होतच आजूबाजूची लोकं तिला रडताना बघुन काही कुजबुजत होती... तर काही इग्नोर करून निघत होती ....
त्याच्या त्या घाणेरड्या स्पर्शाच्या लहरी तिच्या खांद्यावरून  टोचत हृदयापर्यंत गेले होत्या..... घाबरून हात पाय लटपटत होते.... आणि तशाच परिस्थितीत तिचा फोन वाजला ......नवर्‍याचा फोन असेल म्हणून घाबरतच तिने फोन डोळ्यासमोर धरला डोळ्यातले पाण्यामुळेच फोन वरचं नाव ब्लर दिसत होत.... डोळे पुसत स्वतःला सावरत..... स्वतःचा आवाज कंट्रोलमध्ये करत हळूच फोन उचलून हळूच हॅलो बोलली........

कातर आवाज आल्यामुळे मैत्रिणीला ही कळलं सध्या ती कोणत्या वाईट परिस्थितीमध्ये आहे.... मैत्रिणीने प्रेमाने विचारले....

मैत्रीण  : काय झालं वरदान????? तू ठीक आहेस ना ????

बस्स या दोन प्रेमाच्या शब्दाने तिच्या मनातलं दुःख, वेदना ,मनाची व्यथा एखाद्या वरून जोराने पडणाऱ्या धबधब्यासारखे बरसू लागले.... आत्तापर्यंतची  स्वतःची व्यथा तिने रडतच मैत्रिणीला सांगितली...अजूनही हुंदक्यांनी ऊर भरून येत होता...... समोरून मैत्रिणीचा प्रश्न ऐकू आला तिला ....

मैत्रीण :  वरदान,  अशी कशी ग हरलीस तू??? राजा... तुझ्याकडे बघून मी... साधी सोज्वळ असणारी मुलगी एवढे धीट आणि धाडसी बनली...... आणि तू अशी.... कोणाचाही विचार न करता ज्याची त्याला जागा दाखवायची तू???? काय झालं??? का घाबरतेस कोणी नाही सोबत म्हणून???? तुला कधीपासून सोबतीची गरज लागायला लागली???? आणि काय गरज आहे कोणाची सोबत म्हणून..... माणूस एकटा येतो आणि एकटाच जातो.....

सोबत हवी आहे तुला.... चल,  ठीक आहे ....मी आहे सोबत.... पण तुझी लढाई तुलाच लढायची आहे....  you are your own healer.... मला माझी पहिली धाडसी, हट्टी, कुणाला न घाबरणारी वरदान बघायची आहे.... अगदी पहिल्या सारखी....... हे असं शापीत आयुष्य जगायला जन्माला आली नाहीस तू....... ज्यांनी तुला आयुष्यात दुःख दिलं त्यांना असा धडा शिकवा की परत त्यांनी तुझ्याकडे उलटून बघू नये..... आज तिच्या मैत्रिणीचा या शब्दांनी तिच्यातील ती तिला गवसली... गालावरचे अश्रुचे ओघळ पुसद....


वरदान : नाही जगणार ....आता परत पुन्हा ते शापित आयुष्य नाही जगणार ही वरदान.... वचन देते पुन्हा तुला तुझी वरदान भेटेल पहिल्यासारखी.... तिच्या त्या दोन प्रेमाच्या शब्दांनी तिच्या मधल्या.... परिस्थितीने पिचलेल्या घाबरट मनाला उभारी भेटली..... त्या शब्दांनी मुठभर अंगावर मास चढलं...... आता हरणार नाही.... आता ज्यांनी हरवायचा प्रयत्न केला त्यांना हरवणार... या जिद्दीने उठते..... आणि दुसऱ्या दिवशी.... शाळेला निघताना....तोच विकृत रस्त्यावरून तिला घाणेरड्या नजरेने बघत अगदी निकट येत होता... त्याचा तिला स्पर्श होणार तेवढ्यातच तिने खाडकन त्याच्या कानाखाली मारली...... चार शिव्या हासडल्या.... पुरुषार्थ साध्य करायचा असतो ना त्यांना नेहमी स्वतःचा....... बरोबर त्याच्या दोन पायाच्या मध्ये निशाणा साधत एक लाथ ठेवून दिली जोरात.... आsssss ओरडून  तो नीच माणूस जमिनीवरती आडवा पडला.... त्याचा तो विकृत पुरुषार्थ आताच जमिनीवर पडला होता.... त्याची ती हावरी नजर आता व्याकूळ नजरेने तिच्याकडे बघत होती..... घाबरून त्याने अंग आकसलं.... आजूबाजूचे लोक येऊन त्यांनी पण त्याच्यावर हात साफ केला.....

त्या माणसाच्या झुंडी मधून ती आत्मविश्वासाने मोठा श्वास घेत बाहेर निघाली.... डोळ्यातून समाधान झळकत होतं....... आज ती जिंकली होती ...... तिच्या डोळ्यात पहिल्यासारखी चमक आली होती... डोळे बंद करूनच मनोमन तिच्या मैत्रिणीला धन्यवाद देऊन पुढे निघाली.......

तिचं जगणं शापित करणाऱ्या त्या नवऱ्याला आता कसा धडा शिकवायचा???
याचा विचार करतच ती हसत चालली होती............

you are your own healer......???