Jan 29, 2022
नारीवादी

आणी ती पुन्हा आई झाली.

Read Later
आणी ती पुन्हा आई झाली.

    आणी ती पुन्हा आई झाली

दवाखाना आटोपुन डाॅ.सिमा घरी पोहचली.तीने बेडरूमचा दरवाजा बंद करून घेतला.ती आज आल्यावर नेहमी प्रमाणे मुलींना भेटली नाही.स्वयंपाक घरात डोकावून स्वयंपाक करणा-या मावशीला, तुम्ही आता गेल्या तरी चालेल असे पण सांगीतले नाही.तीने कपडेही बदले नाही.बराच वेळ तशीच बेडवर पडून राहीली.मुलींनी आवाज दिला तर थोड थांब एवढेच म्हणाली.सतत हसत हसत येणा-या ताईंना आज काय झाले.मावशीलाही काही कळत नव्हते.त्या बेडरूमच्या बंद दारा जवळ आल्या. ताई काय झाले चहा काॅफी काही घेता का?मावशी मायेने विचारत होती.त्यांचा आवाजात  काळजी वाटत होती.

...नाही नको. तुम्ही जा. ….एवढच सिमा त्यांना म्हणाली.

ताईसाहेब जा म्हणाल्या.पण त्यांना असे सोडून कस जावू.शिवाय आज डाॅ.साहेब ही घरी नाही.

स्वयंपाकाचे सर्व आटोपल होते.त्यांनी आेटा स्वच्छ केला. मुलींना म्हणाल्या तुम्ही तरी जेवून घ्या.मग जाते मी घरी.त्या दोघीही एका आवाजात मावशीला म्हणाल्या,तुम्ही जा मावशी आम्ही आई सोबतच जेवू.

मावशीने जेवनाचे टेबलवर लावले.एकवेळ बेडरूम कडे पाहले. दार बंदच होते. नाईलाजाने त्या घरी जायला निघाल्या. त्यांचा मुलगा घरी एकटाच होता.तो वाट बघत असेल.त्या घरी निघून गेल्या.

    जेवणाची वेळ झाली तरी आई कपडे बदलून अजूनही जेवायला कशी आली नाही.म्हणुन मुलगी जुईने दार ढकलले. ते आतून बंद होते.आई. ...लवकर ये ना ग, आम्हाला भुक लागलीय.

तु आल्याशिवाय मीपण जेवणार नाही.सोफ्यावरूनच जाई म्हणाली.

   होsss हो sss म्हणत सिमा बेडवरून ऊठली.तिला माहीत होत तिच्याशिवाय मुलीपण जेवणार नाही.तीने गीझर चालू केला, गरम पाण्याने हातपाय धुवून, कपडे 

बदलवून बाहेर आली.

   टेबलजवळ खुर्ची निट करत ती खुर्चीवर बसली.जाईने तीच्या गळ्यात हात टाकत खुर्चीमागे ऊभी होत तीच्या गालावर पापे घेतले.जुई ने ताट लावायला सुरूवात केली.सिमाने त्यांना वाढले. तु पण जेव ग आई, थकलीस का आज , जुई म्हणाली.

हो ग वाटते थोड थकल्यासारखे. गोळ्या घेते. करते आराम .तुम्ही जेवून घ्या लवकर.

ईच्छा नसतांना मुलींसाठी सिमाने पण चार घास खाल्ले.

सिमाने जाई,जुईला नाईट ड्रेस दिले. टेबलवरचे भांडे आवरले. गेटला कुलूप लावले.जाई,जुई झोपायल्या गेल्या सिमाने त्यांना निट पांघरून घातल. टुबलाईट बंद केला.छोटा लाईट लावून ती तीच्या रूममद्ये गेली.

बेडवर अंग टाकल पण तिला झोप येत नव्हती.दुपारी दवाखाण्यातील दोन बायकांमधला संवाद तिला वारंवार आठवत होता.त्या दोघी पेशन्ट सोबत आलेल्या होत्या.आेळख असल्याने आपसात बोलत होत्या.

पहीली :- अग तु पण ईथेच आणते का?सुनेला…

दुसरी :- आम्ही पहील्यांदाच आलो ग,तु नेहमी येते का?कशा आहेत त्या?

पहीली :- माझा तर विश्वासच नाही.पण सुनेची मैत्रिण इथे येते तर ही म्हणाली आपण ही ईथेच जावू.

दुसरी :- का ग व्यवस्थित ऊपचार मिळत नाही का? यांच्याकडे.

पहीली :-  तस नाही ग,पण ज्याला त्या गोष्टीचा अनुभव नाही,त्याला काय कळणार त्या मधल.अग डाॅ.सिमा वांझ आहे वांझ.त्यांच बोलन एेकुन बाकी पेशन्ट आपसात कुजबुजू लागले.

नर्स :- शूs s s बोलू नका,शांतता पाळा.

एका नर्स च्या आवाजाने सगळ्या चुप झाल्या.पण रूम मधिल पेशन्टला बघायला जातांना डाॅ.सिमाने त्यांचे बोलने एेकले होते.ते विचार काही केल्या तीच्या मनातुन जात नव्हते.सतिश ही आज घरी नव्हता. तिने सतिश ला लावायला फोन घेतला.फोन करायला वेळच मिळाला नाही. सकाळी बोलू असा सतिशचा मॅसेज आलेला होता.आता तो झोपला असेल म्हणुन सिमानेही फोन केला नाही.तिला आणखीच उदास वाटु लागले.

ती डोळे मिटुन पडली पण काही केल्या झोप येत नव्हती.दुपारी एेकलेला 'वांझ' शब्द तिच्या मनावर धणासारखे आघात करत होता.

तीला वांझपण देणारी घटना एखाद्या चित्रपटा प्रमाणे तीला आठवू लागली.

रविवारचा तो दिवस होता.सतिशचा दवाखाणा बंद होता,सिमाच्या दवाखाण्यातही सकाळीच काही बाळांतपणाच्या केस आटोपल्या होत्या.म्हणुन सतिश आणी सिमाने फिरायला जावून ती संध्याकाळ सोबत घालवण्याचे ठरवले होते.त्यांच्या लग्नाला दोन वर्ष झाले होते. दवाखाण्यातून दोघांनाही वेळच मिळत नव्हता.लग्नानंतरही ते कुठे फिरायला जावू शकले नव्हते.पण अशी संधी मिळाली की, जवळच निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण दोघांनाही आवडत होत.

ती संध्याकाळ तळ्याच्या काठावर मस्त रोमँटिक मुड मध्ये घालवली.वापस येतांना वाटेच एका ढाब्यावर जेवन आटोपले.गाडी आता घराच्या दिशेने निघाली होती.सतिश गाडी चालवत होता.हवेत छान गारवा पसरला होता.सिमा गाडीत लावलेल्या गाण्यांचा आनंद घेत होती.

छोडोंगे न हम तेरा साथ, हो साथी मरते दम तक

सिमा गाण्याच्या तालावर डोलत होती.मध्येच सतिशकडे बघुन गाण गुणगुणत होती.कच्चा छोटा रस्ता संपला होता. गाडी आता मुख्य रस्त्याला होती.शहराच्या जवळ ते पोहचले होते.तेवढ्यातच एक कर्ण कर्कश आवाज झाला.समोरून येणारी गाडी सरळ सतिशच्या गाडीवर आदळी.

स ति श s s s एवढेच शब्द सिमा बोलली.नंतर तिची शुध्द हरवली.सतिशला पण बराच मार लागला होता. कपाळावर मोठी जखम झाली होती.पण त्याने स्वता:कडे लक्षच दिले नाही.

सिमा. ..सिमा..म्हणत तो सिमाला हलवत होता.क्षणभर तर त्याला वाटले,छाेडेगे न हम तेरा साथ. ...म्हणारी सिमा त्याला सोडून गेली की की काय

तो कसा बसा गाडीतुन उतरला, सिमाच्या बाजूने जावून त्याने सिमाचा हात हातात घेतला.मंद गतीने ठोके सुरू होते,पण सिमा डोळे उघडत नव्हती.त्याने 108 ला फोन केला,बाकी आेळखीच्या मित्रांना फोन करून सिमाला त्यांच्या दवाखाण्यात आणत असल्याचे सांगीतले.थोड्या वेळातच ते शहरातल्या त्या नामांकीत दवाखाण्यात पोहचले.रात्र पाळीचे डाॅक्टर, काही नर्स हजरच होत्या.सतिशने फोन केलेला असल्यामुळे बाकी डाॅक्टर मित्रही आलेले होते.ते सतिशला धिर देत होते.सिमाला आॅपरेशनच्या खोलीत घेतलेले होते. सर्व तपासण्या झाल्या. सिमाच्या पोटाला,कंबरेला मार लागला होता.तिचे एक आॅपेशन करावे लागणार होते.स्वता: डाॅक्टर असले तरी सगळी प्रक्रिया करावी लागणारच होती.सतिशने नर्स ने दिलेला फाॅर्म भरला,थरथरत्या हाताने त्यावर सही केली.रात्रभर तो दवाखाण्यातच थांबला.त्याच्यावरही ऊपचार करण्यात आले होते.गोळ्या आैषधांनी त्याला झोप येत होती.शरीरात असह्य वेदना होत होत्या.ब-याच उशिरा त्यालाही झोप लागली.

  सकाळी जेव्हा डाॅक्टर तपासणीला आले तेव्हा त्यांच्या आवाजानेच सतिशला जाग आली.

डाॅ.:-  काय म्हणता डाॅ सतिश कस वाटते आता. बेड जवळ येत ते विचारत होते

सतिश:-  ठीक वाटते सर,पण डोकं अजुनही खुप जड वाटत आहे.

माझ सोडा सर, सिमा कशी आहे.आली का तिला शुध्द.

डाॅ. :- नाही सतिश, सिमाला शुध्द यायला अजुन काही तास लागतील.मला माफ कर.

सतिश :-  अहो सर, तुम्ही कशाला माफी मागता.ती ठीक आहे न,येईल ती लवकरच शुध्दीत.

डाॅ :- हो पण

सतिश :- पण काय सर

डाॅ.:- सतिश ! अपघातात डाॅ सिमाच्या गर्भाशयाला नुकसान झाल आहे,ती आता कधिच आई होवू शकणार नाही.

सतिशचा डाॅक्टरच्या सांगण्यावर विश्वासच बसत नाही.तो ऊठला आणी सिमाच्या रूममध्ये गेला. डोळ्यात आसव दाटलेले होते त्यामुळे सार त्याला अस्पष्ट दिसत होत.

सिमा शुद्धित आल्यावरही आठ दिवस ती दवाखाण्यातच होती.डाॅ.आणि सतिश ने तिला तिच्या तब्बेती बद्दल सांगीतले.ती आता कधिच आई होवू शकणार नाही.असे जेव्हा डाॅक्टरांनी सांगीतले. तेव्हा ती सतिशला घट्ट पकडून ना.. ही.. असे जोरात किंचाळली होती.

आज परत ते सगळ आठवून  ती किंचाळली.

     तिच्या आवाजाने जाई,जुई दोघींनाही जाग आली.आई काय झाल ग म्हणत त्या दोघी सिमाच्या खोलीत आल्या.जाईने तीला पाणी दिल,जुई तीच्या बाजुला बसुन सिमाचा घाम पुसू लागली.

काही नाही ग, काहीतरी वाईट स्वप्न पडले वाटते.जा तुम्ही झोपा शांत सकाळी शाळेसाठी लवकर ऊठायच आहे ना.

नाही आई आम्ही आज तुझ्यासोबतच झोपणार,तुला आता बर वाटते का? सिमाच्या एका बाजुला जाई तर दुस-या बाजुने जुई घट्ट चिटकुन झोपल्या.सिमा त्यांना प्रेमाने जवळ घेत थोपटु लागली.

किती प्रेम करतात ना, मुली माझ्यावर.आणी मी? मी ही खुप प्रेम करते ह्या मुलींवर, दवाखाणा आणी घरी आले की मुली, ह्या मद्ये तर मी स्वतःलाही विसरून गेले.मग दुस-या कुणाचे शब्द एकुन माझ मन का सैरभैर झाले.आई होण्यासाठी फक्त जन्म देणच पुरेस असते का?की अभ्यास न करता स्वतःच बाळंतपण झालेल आहे,त्याचा अनुभव आहे. त्या अनुभवाच्या जोरावर दवाखाणा चालवला जावू शकतो का,? नाही ना. 

मग का विचार करते मी त्या बायकांच्या बोलण्याचा,जाई जुई माझ्याच मुली नाही का? सतिशनेच तर आपल नाव दिल त्यांना,फक्त नावच दिल.नाही तर सर्व कीती जबाबदारीने करतो तो मुलींच.बापच झाला तो त्या रात्री पासुन, आणी मी वाझ नाही तर आईच झाले तेव्हा पासुन.

एक दिवसाच्याच तर होत्या मुली.त्यांच करताकरता किती धावपळ व्हायची,पण त्यांचा गोड चहेरा पाहीला की सगळ थकवा क्षणात नाहीसा होत होता.त्यांचा त्या बाललिला,तो खेळकर पणा, रात्र रात्र जागुन त्यांचे कपडे बदलन,दुध देन आई बाबा होवुनच तर केल आम्ही.

वाझ मी नाही तर वांझ ते दोघे आहे. ज्यांनी त्यांना जन्म दिला ,आणी काही तासातच सोडुन गेले.वांझ हा समाज आहे जो आजही मुलगा मुलीमध्ये फरक करतो.काय कारण असेल त्यांच्या अशा वागण्याला,खरच नऊ महीणे पोटात वाढवून. बाळंतपणाच्या मरणयातना सोसुन कुणी आई अस वागु शकते का? 

किती हळहळली असेल ती असा निर्णय घेतांना, कधि समाज दखल घेईल का  अशा गोष्टीची.आजही का समाजाला वंशाला दिवाच पाहीजे ?ह्या तेजस्वि चांदण्याना सोडून सुखी असतिल का ते?कोण होते ते,कुठुन आले. कुठे गेले काहीच कळले नव्हते.त्यांच आधिच ठरलेले असावे.म्हणुन तर त्यांनी फाॅर्मवर खोटा फोन नंबर दिला ,खोटा पत्ता दिला.

सिमाचे विचार चक्र आणखीच वेगाने फिरू लागले.

त्या संध्याकाळी सिमा दवाखाण्यात रूग्न तपासत होती.तेव्हा एक नर्स घाईने आता आली .डिलेवरीचा पेशन्ट असल्याचे सांगत होती.त्या महीलेला प्रसवपिडा होत आहे म्हणुन आधी तिला पाठवावे का म्हणुन डाॅ सिमाला ती विचारून गेली.पहीला रूग्ण बाहेर जाताच एक माणुस एका गरोदर महीलेस आधार देत आत घेवून आला.ते पहील्यांदाच सिमाच्या दवाखाण्यात आले होते.सिमाने विचारले असता ते म्हणाले होतो की या भागात नातलगाकडे आलो होतो.काही वेळा आधिच माझ्या बायकोच्या पोटात दुखायला लागले,तुमचा दवाखाना जवळ दिसला म्हणुन तुमच्याकडे घेवून आलो.डाॅ लवकर बघा हो माझ्या बायकोला,.किती गयावया करून तो बोलला होता.

सिमाने त्या महीलेची तपासणी केली.बाळ बरेच खाली आलेले होते.तिने नर्सला त्या महीलेस बाळंतपणाच्या खोलितील टेबलावर घेण्यास सांगीतले होते.अाणी त्या माणसाला एक फाॅर्म भरायला दिला होता.दोन तासाच्या अथक प्रयत्न आणी असह्य वेदने नंतर तीने छान गोंडस अशा दोन मुलींना जन्म दिला.दोन्ही मुलिंची, आईची प्रकृति एकदम ठिक होती.तिला रूम नं 5 मध्ये ठेवण्यात आले होती.

   रात्रीचे जेवन आटोपुन सिमा झोपली होती.सकाळी चार पाच वाजेच्या सुमारास हास्पिटल मधुन डाॅ.सिमाला फोन येतो.रूम नं 5 मधिल बाळ खुप रडत आहे.त्या मुलींची आई कुठेही दिसत नाही.तिच्या सोबतचा तो माणुसपण ईथे नाही आहे.तेव्हा सिमा आणी सतिश लगेचच दवाखाण्यात पोहचतात.सर्वत्र शोध घेतल्या जातो पण ते कुठेही मिळत नाही.सकाळी सतिश पोलीसांना कळवतो.पण त्यांनी दिलेला पत्ता चुकीचा असतो.मुली खुपच छोट्या असल्यामुळे त्यांना काही दिवस दवाखाण्यातच ठेवण्यात येते.सिमा स्वता: त्या मुलींची लक्षदेवुन काळजी घेते.आठ सहा दिवसात सगळ्यांना त्या मुलींचा लळा लागतो.नंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करून सिमा आणी सतिश त्या मुलींना दत्तक घेतात. थाटात त्यांचे बारसे करतात.त्यांचे नाव ठेवल्या जातात जाई ,जुई. किती छान नाव आहेत न.नावा प्रमाणेच जाई जुई मुळे सिमा आणी सतिशच्या जिवनात सुगंध पसरला होता.एका उत्तम माळ्या प्रमाणे ह्या दोघानी त्यांना फुलवल, वाढवल होत.मग सिमा वांझ कशी?ती आईच आहे जाई,जुईची. पण सत्य माहीत झाल्यावर काय होईल मुली मला नाकारणार तर नाही.मुली आता मोठ्या झाल्या त्यांना सगळ सांगायलाच हवे असा निश्चय करून ती झोपते. तिच्या दोन्ही बाजुला जाई ,जुई झोपलेल्या असतात.

दुस-या दिवशी सकाळीच सतिश घरी पोहचतो.रविवार असल्यामुळे त्याला दवाखाण्यात जायचे नव्हते.सिमाने पण दवाखाण्यात फोन करून चाैकशी केली.नविन कुणी रूग्न आलेले नव्हते.म्हणुन भरती असलेले रुग्ण बघायला ऊशिरा येते असे  सांगुन तीने आज सतिश आणी मुलीसोबत वेळ घालवण्याचे ठरवले.दोन दिवसात तीची झालेली घालमेल तीने सतिशला सांगीतले.आणी आता मुलींना सर्व खर सांगण्याचा तिचा निर्णय पण सांगीतला.सतिशला पण ते पटले.जेवन आटोपल्यावर ते सर्व बसलेले असतांना सतिशने गमती गमतीने मुलींना सांगण्यास सुरूवात केली.खरी गोष्ट माहीत झाल्यावर मुलींची प्रतिक्रीया काय असेल या ऊत्सुकतेने सिमा अधिर झाली होती.मनात थोडी चलबिचल होत होती.तुम्ही खोटे सांगता अस म्हणत जाई जुई पहीले खुप चिडल्या.मग सिमा म्हणाली अग बाबा सांगतात ते अगदी खरे आहे.सतिशची शप्पथ,

आई बाबांची खोटी शप्पथ घेणार नाही.हे जाई, जुई जाणुन होत्या.त्यांचा सिमाच्या बोलण्यावर विश्वास बसला.जाई सिमाला बिलगत म्हणाला तु सांगीतलेल खर जरी असल तरी आमच्यावर त्याचा काहीच फरक पडणार नाही.कारण तुच आमची आई आहेस,होती आणी कायम राहणार आहेस.हो की हो बाबा. जुई सतिशलच्या कुशित शिरली.बाबा ते जे कुणी असतिल त्यांनी का सोडून दिल असेल आम्हाला? बिलाचे पैसे देवू शकणार नाही म्हणुन की आम्ही मुली होतो म्हणुन.पण तुम्ही बघा बाबा ह्या जाई जुई च्या किर्तीने यशाने तुमचे आणी आईचे नाव कसे सुगंधाप्रमाणे दरवडून जाईल ते.हो बेटा खुप मोठ व्हायच आहे तुम्हाला.सतिशने जुईला घट्ट छातीशी घेतल.त्याच्या डोळ्यात समाधानाचे तेज होत.सिमाचे डोळे सारखे आनंदाश्रु गाळत होते.सिमा मुलींना जवळ घेते.आज सोळा वर्षानी पुन्हा एकदा आई झाले आई. सिमाच्या मनाची घालमेल,विचारांच काहुर सार आसवांमध्ये धुवून जाते.मनावरच सार आेझ कमी झाल्यासारख वाटत.ती नव्या जोमाने तयार होते.एका आईची,एका यशस्वी डाॅक्टरची जबाबदारी निभवायला.

   

   पुष्पा प्रमोद.


 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Pushpa Pramod Bonde

Householder

Likes Reading and Writing