आणि हळदी कुंकू सफल झाले...
अलक...
ऋतुजा वैरागडकर
अनघाने हळदीकुंकूचा कार्यक्रम ठरवला होता, सगळी तयारी झाली. बायांचं येण सुरू झालं. अनघाने सगळ्यांना बसायला सांगितले. सगळ्या बाया बसल्या सगळ्यांच एकमेकींशी बोलणं सुरू होत, अनघा एकएकीला हळदीकुंकू लावत होती. तितक्यात शेजारची मीरा आत आली, तिला बघून बायांची कुजबुज सुरू झाली,
"अरे देवा, ही इथे काय करते?"
त्यातली एक बाई तिला बोलली.
त्यातली एक बाई तिला बोलली.
"अग आमचं हळदकुंकू खराब करशील का? काळ्या पायाची अवदसा, नवऱ्याला गिळलंस आणि आता इथे अशुभ करायला आलीस,चल निघ इथून."
बायांचं बोलणं ऐकून अनघाला खूप वाईट वाटलं.
"थांबा अहो ताई तुम्ही काय बोलताय, तिचा नवरा अक्सिडेंट मध्ये गेला त्यात तिचा काय दोष आहे? आणि हळदीकुंकूच म्हणाल तर त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही त्यांच्यापासून तो अधिकार हिरावू शकत नाही.
अनघाने तिला बसवून हळदीकुंकू केलं आणि आज खऱ्या अर्थाने हळदीकुंकू सफल झाले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा