अनघाची तप्तपदी ( भाग 5 )

दुसऱ्या दिवशी मम्मीच्या मैत्रिणीची घरी पार्टी होती . साहजिकच सगळ्या सूनांचे गाऱ्हाणे करत होत्या . एक मैत्रीण म्हणाली ' माझी सून आता पार्लर चा कोर्स करते आहे . त्यामुळे मला जरा शांती मिळतेय . नाहीतर उगीच आपल्याच घरात फ्रीडम नाही मिळत .' लगेच अनघाने मुद्दाम विषय काढला " छान आहे की मग , मलाही पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची इच्छा आहे . पण मम्मी काय म्हणतात बघू .तश्या त्या खूप छान , मॉडर्न विचारांच्या आहेत . मला घरात पूर्ण फ्रीडम आहे .काय हो ना मम्मी ? " सगळ्या मैत्रिणीसमोर आपण मॉडर्न आणि किती छान प्रेमळ सासू आहोत हे सांगण्याची संधी लताबाई कश्या सोडणार होत्या ? " हो ग बेटा तुला हवं ते कर , आम्ही काय अडवले आहे का तुला कधी ? घरी तर काहीच काम नसतं . पुढे शिकलिस तर चांगलंच आहे . आपल्याला नोकरीची गरज नाही पण हौस म्हणून शिक काय हवं ते . दारात दोन दोन गाड्या आहेत . घेऊन जा बिनधास्त " अनघाची युक्ती कामाला आली आणि तिच्या मनात आनंदाची लहर उठली .
अनघाने विनयचा चांगला मुड बघून पुढे शिकण्यासाठी तयार केले . फक्त प्रॉब्लम होता मम्मीचा , जर विनयने स्वतःहून सांगितलं असतं तर त्या नक्कीच तयार झाल्या नसत्या . काय करावं बरं ? अनघा विचार करत होती .

दुसऱ्या दिवशी मम्मीच्या मैत्रिणीची घरी पार्टी होती . साहजिकच सगळ्या सूनांचे गाऱ्हाणे करत होत्या .
एक मैत्रीण म्हणाली " माझी सून आता पार्लर चा कोर्स करते आहे . त्यामुळे मला जरा शांती मिळतेय . नाहीतर उगीच आपल्याच घरात फ्रीडम नाही मिळत . "

लगेच अनघाने मुद्दाम विषय काढला " छान आहे की मग , मलाही पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची इच्छा आहे . पण मम्मी काय म्हणतात बघू .तश्या त्या खूप छान , मॉडर्न विचारांच्या आहेत . मला घरात पूर्ण फ्रीडम आहे .काय हो ना मम्मी ? " सगळ्या मैत्रिणीसमोर आपण मॉडर्न आणि किती छान प्रेमळ सासू आहोत हे सांगण्याची संधी लताबाई कश्या सोडणार होत्या ?
" हो ग बेटा तुला हवं ते कर , आम्ही काय अडवले आहे का तुला कधी ? घरी तर काहीच काम नसतं . पुढे शिकलीस तर चांगलंच आहे . आपल्याला नोकरीची गरज नाही पण हौस म्हणून शिक काय हवं ते . दारात दोन दोन गाड्या आहेत . घेऊन जा बिनधास्त "
अनघाची युक्ती कामाला आली आणि तिच्या मनात आनंदाची लहर उठली .

आता अनघामध्ये वेगळाच जोश संचारला . पटकन ऍडमिशन ची तयारी करू लागली . हुशार तर ती होतीच आणि कॉन्फिडन्स सुद्धा होता तिच्याकडे त्यामुळे सहज ऍडमिशन मिळाली तिला .

सकाळी दहाला अनघाला कॉलेजला जावं लागे.घरात सगळ्या कामाला बाई असली तरी मम्मी मुद्दाम ती निघतांना काहीतरी काम काढून तिला त्रास द्यायचा . ती अभ्यासाला बसली की घरी कोणाला तरी बोलावून तिला डिस्टर्ब करायच्या . स्वयंपाक करायला मदतनीस बाई होत्या त्यांनाच अनघाने पूर्ण स्वयंपाक करायला सांगितला . त्यांनीही सगळं छान सांभाळलं . पण मम्मी मात्र मुद्दाम काहीतरी खोट काढून परत परत स्वयंपाक करायला लावत . शेवटी रोज रोजची किट किट म्हणून त्या बाई काम सोडून गेल्या . हे मम्मीच्या पथ्यावरच पडलं .आता अनघा शिक्षण सोडून देईल असं त्यांना वाटलं .

पण अनघा खंबीर होती . " शिक्षण हे आपलं आयुष्य असतं ." ही तिच्या बाबांची शिकवण तिच्या ध्यानी होती . सकाळी लवकर उठून अनघा सगळा स्वयंपाक करायची . कॉलेज संपल्यावरही लायब्ररी मध्ये बसून ती संध्याकाळ पर्यंत अभ्यास करायची .
घरी आलं की पुन्हा काही ना काही कुरबुर सुरूच असायची .थकलेल्या जीवाला आजिबात विसावा नसायचा . विनयच्या मनात सुद्धा अधून मधून काहीतरी भरवून मम्मीने अनघाच शिक्षण बंद करू पाहिलं पण आता तिने एकच ध्यास घेतला होता . आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा .त्यात तिला स्कॉलरशिप सुद्धा मिळाली त्यामुळे घरी पैसे मागण्याचाही प्रश्न नव्हता.

आपण काहीही केलं तरी ही मुलगी काही बधत नाही हे बघितल्यावर त्यांनी नवीनच भून भुन लावली " आम्हाला आता नातवंडं हवं ." विनय आणि अनघाला सुद्धा बाळ हवंच होतं पण अजून काही तसे संकेत मिळालेले नव्हते .

दोन वर्ष कसे निघून गेले कळलही नाही . अनघाने उत्तम मार्क्स मिळवून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं . तिच्या कॉलेज मध्ये तिचा सत्कार करण्यात आला . घरचे सगळे उपस्थित होते. अनघाला लगेच त्याच कॉलेज मध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळाली . पण घरून नक्की विरोध होईल याची तिला खात्री होती .

सत्कार झाल्यावर तिने बोलतांना तिच्या यशाचे सारे श्रेय विनय बरोबरच तिच्या सासूबाईंना दिले ." मम्मीमुळेच मी आज इतकी यशस्वी झाले आणि यापुढेही त्या माझ्या पाठीशी सदैव उभ्या राहतील याची मला खात्री आहे . " असे बोलून ती त्यांच्या पाया पडली . त्यामुळे नाईलाजास्तव सगळ्यांपुढे मम्मीला तिचं कौतुक करावं लागलं . आणि मोठ्या मनाने नोकरी सुरू करण्याची परवानगी सुद्धा द्यावी लागली .

अनघाची हुशारी यावेळी सुद्धा बरोबर कामी आली आणि तिची नोकरी सुरू झाली .

मधल्या काळात विनयच दुकान आजिबात चलेनास झालं . त्याच इन्कम फारच कमी झालं . धंद्यात त्यांचं आजिबात लक्ष नसायचं . आता घरात पैशांची चणचण भासू लागली होती . नुसतं " घर मोठं आणि पोकळ वासा " अशी अवस्था होऊ लागली होती . त्यामुळे अनघाचं नोकरी करणं विनयच्या पथ्यावर पडलं होतं . तो अजूनच बिनधास्त झाला होता .

" ही पोरगी फार चतुर आहे . प्रत्येक वेळी मला पुरून उरते . आता असं काहीतरी केलं पाहिजे की हिने स्वतः हुन नोकरी सोडली पाहिजे . काय करता येईल बरं ? " लताबाई मनोमन विचार करू लागल्या .

" विनय अरे अडीच वर्ष झाली ना तुमच्या लग्नाला , आम्हाला नातवंडं पहायचं आहे आमचं . ते काही नाही मला लवकरात लवकर नातू पाहिजे . तुझ्या बायकोची ही थेर कशी खपवून घेतोस तू ? ते काही नाही उद्याच्या उद्या डॉक्टरकडे जाऊया . काय समजलास ? " आईच्या बोलण्यावर मान हलवून विनयने होकार दिला .

अनघालाही मुल हवंच होतं . दोघेही डॉक्टर कडे जाऊन आले . त्यांनी अनघाच्या आणि विनयच्या काही टेस्ट करून घ्यायला सांगितल्या .

सरिता पुन्हा माहेरी निघून आलेली होती . " सासू सासरे मला काही चुकलं की खूप बोलतात . सागर सुद्धा त्यांचीच बाजू घेतो .आता मला हे नाही चालणार . सागर वेगळं राहायला तयार असेल तरच मी सासरी परत जाईन नाहीतर नाही ." सरिताने निक्षून सांगितले.

पप्पांनी आणि विनयने तिला खूप समजावले पण या वेळी ती काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती . सागरचे आई बाबा आजारी असायचे . एकुलता एक या नात्याने त्यांना सांभाळण्याची जवाबदारी सागरची होती त्यामुळे तो वेगळं राहायला तयार नव्हता . मम्मीची सरिताला फूस होती त्यामुळे ती अजुनच शेफारली होती .

पप्पा खूप काळजीत होते . अनघाने यावर एक तोडगा काढला . विनय , पप्पा आणि सागरसुद्धा प्लॅन मध्ये सामील झाले .
त्या दिवशी अनघाने मुद्दाम भाजीत तेल , मसाला कमी घातला . पप्पा , विनय सगळे घरीच होते . सागरसुद्धा आला होता. मम्मीने नेहेमीप्रमाणे कांगावा सुरू केला . अनघाला बोल लावले . ती रडू लागली . त्यांचा आवाज ऐकून विनय बाहेर आला .
झाला प्रकार मम्मीने विनयला तिखट मीठ लावून सांगितला . अनघा अजूनही रडत होती .
" मम्मी हे काय छोट्या छोट्या गोष्टीला इतकं बोलता तुम्ही मला ? मला आता सहन नाही होत . विनय आपण वेगळं राहूया नाहीतर मी जाते माहेरी निघून . प्रत्येक वेळेस इतकं घालून पडून बोलणं मला आता चालणार नाही ."

" हो मला कळलय . अनु , तू काही काळजी करू नकोस . सारखा सारखा तुझा अपमान मलाही झालेला नाही चालणार . आपण जाऊया दुसरीकडे राहायला . आपला फ्लॅट खाली करून घेऊ आणि पंधरा दिवसात जाऊया तिकडे . सामान आवर . " विनय रागात म्हणाला .

" अरे हे काय बोलतोस तू ? माझी सून आहे ना ती ,मग मला इतकही बोलण्याचा हक्क नाही का ? तिने चांगलं शिकावं म्हणूनच आईच्या मायेने बोलते मी . हे बघ राजा असा डोक्यात राग घालून घेऊ नको बरं . " मम्मी लगेच वरमल्या.

" दादा , अरे काय करतोय हे ? वहिनीची बाजू घेऊन तू मम्मी पप्पाना या वयात एकटं सोडून जाणार ? त्यांनी किती केलंय तुझ्यासाठी आणि थोडंसं बोलली तर तू इतका टोकाचा निर्णय घेणार ? अरे प्लिज असं नको करू . मी समजवते मम्मीला आणि वहिनीला . माझी शपथ आहे बघ तुला . " दादा वहिनी मम्मी पप्पा ना सोडून जाणार ही कल्पनाच सरिताला सहन झाली नाही . त्यांनी जाऊ नये म्हणून ती हरप्रकारे मदत करणार होती .

" वाह सरीता , किती छान बोललीस ग , आणि हेच आपल्या घरी घडलं तर तू त्याचा इतका मोठा इशु करून माहेरी निघून आलीस ? तुझ्या मम्मी पप्पांची बाजू तू समजून घेऊ शकतेस तशी माझ्या आई बाबांना नाही का समजून घेऊ शकत ? " सागर पोटतिडकीने बोलला .

सरिताला आपली चूक उमगली . तिने सागरची माफी मागितली .तितक्यात अनघा आतून आली . सरिताने विनयचे आणि सागरचे सुद्धा आभार मानले.
" अग सरू आभार मान वाहिनीचे. हा त्यांचाच प्लॅन होता . आम्ही फक्त ॲक्टिंग केली ." सागरने खुलासा केला . तसे सगळे आनंदले . अनघाने मम्मीची माफी मागितली . सगळ्यांनी अनघाच्या हुशारीचं खूप कौतुक केलं . इच्छा नसूनही मम्मीला आपल्या सुनेचा अभिमान वाटला .

अनघाने सगळ्यांची तोंडे गोड केली . विनय कौतुकानं आपल्या बायकोकडे बघत होता . मम्मीने अनघा आणि सरिता दोघींना जवळ घेतलं . अनघाने हळूच आपले डोळे टिपले .
सरिता आणि सागर आनंदाने आपल्या घरी गेले .

विनय अनघाच्या सगळ्या टेस्ट झाल्या . रिपोर्ट घेऊन ते डॉक्टर कडे गेले . डॉक्टरचा चेहेरा सांगत होता की काहीतरी गडबड आहे . पण काय ?

🎭 Series Post

View all