अंगणी सुखाचा पारिजात फुलला भाग 1
" या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या . "
लताचा आर्त स्वर कानावर पडला आणि वत्सलाबाई क्षणभर थबकल्या . आजच्या जमान्यात हे गाणे नक्की कोण ऐकत असेल ?
त्यांच्या कितीतरी आठवणी ह्या गाण्यात गुंफल्या असल्याने त्या क्षणभर रेंगाळल्या .
समोरच्या बंगल्यात डोकावून पाहायचा त्यांना मोह झाला . क्षणभर त्या थबकल्या परंतु मनात उमटलेले तरंग मिटवून वत्सलाबाई पुढे चालू लागल्या . तरीही मनात उठलेली खळबळ शांत होत नव्हतीच .
समोरच्या बंगल्यात डोकावून पाहायचा त्यांना मोह झाला . क्षणभर त्या थबकल्या परंतु मनात उमटलेले तरंग मिटवून वत्सलाबाई पुढे चालू लागल्या . तरीही मनात उठलेली खळबळ शांत होत नव्हतीच .
" नयना बंद कर ते गाणे ." अमेय जोरात ओरडला आणि नयना भानावर आली .
डोळ्यातले सुकलेले अश्रू पुसत ती आत जायला निघाली . अमेय तिच्याकडे बघतच राहिला . निस्तेज खोल गेलेले डोळे , त्याभोवती काळी वर्तुळे , चेहऱ्यावर असलेले निस्तेज भाव आणि शून्यात हरवलेली नजर .
डोळ्यातले सुकलेले अश्रू पुसत ती आत जायला निघाली . अमेय तिच्याकडे बघतच राहिला . निस्तेज खोल गेलेले डोळे , त्याभोवती काळी वर्तुळे , चेहऱ्यावर असलेले निस्तेज भाव आणि शून्यात हरवलेली नजर .
प्रचंड उत्साही , भरभरून जगणारी आणि गाण्यावर प्रेम करणारी नयन हीच का ?
यावर आता कोणाचाही विश्वास बसणे शक्य नव्हते . त्याने आत यांत्रिकपणे काम करणाऱ्या नयनकडे बघितले आणि हताश होऊन कामावर जायला बाहेर पडला .
यावर आता कोणाचाही विश्वास बसणे शक्य नव्हते . त्याने आत यांत्रिकपणे काम करणाऱ्या नयनकडे बघितले आणि हताश होऊन कामावर जायला बाहेर पडला .
वत्सलाबाई संध्याकाळी फेरफटका मारायला बाहेर पडल्या . कॉलनीत खेळणारी मुले पाहून त्या मिश्किल हसत चालल्या होत्या अचानक धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज झाला . त्यांनी गरकन मागे वळून पाहिले तर एक साधारण तीस बत्तीस वर्षाची एक महिला चक्कर येऊन पडली होती .
वत्सलाबाई पटकन धावल्या . सायकल खेळणारी मुले त्यांच्या मदतीला आली . त्यांनी तिला बाकड्यावर बसवले आणि चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारला तसे त्या मुलीने डोळे उघडले .
" बरं वाटतंय का आता ? "
वत्सलाबाई मृदू आवाजात म्हणाल्या .
" राहतेस कुठे? घरी फोन करू का ? " त्यांनी काळजीने विचारले .
" नको,मी जाईन घरी."
नकारात्मक मान हलवत ती म्हणाली.
वत्सलाबाई मृदू आवाजात म्हणाल्या .
" राहतेस कुठे? घरी फोन करू का ? " त्यांनी काळजीने विचारले .
" नको,मी जाईन घरी."
नकारात्मक मान हलवत ती म्हणाली.
" नाही,तुला एकटीला जाऊ देणार नाही. मी येते तुझ्याबरोबर." त्यांनी सरळ जाहीर केले.
नाईलाजाने नयन त्यांच्यासोबत निघाली. थोड्याच वेळात सकाळी गाणे ऐकू आले त्याच बंगल्यासमोर दोघी थांबल्या .
" अय्या,इथे राहतेस का तू ? " वत्सलाबाई आनंदाने म्हणाल्या .
नयनने मान डोलावली . परंतु तिला अजूनही पूर्ण शुद्ध जाणवत नव्हती . वत्सलाबाईंनी तिच्याकडून चावी घेतली आणि गेट उघडले .
" आजी तुम्ही नका त्रास घेऊ . मी ठीक आहे आता ." हे बोलताना देखील नयन मटकन खाली बसली.
वत्सलाबाई गोड हसल्या आणि किल्ली घेऊन दरवाजा उघडला . तितक्यात त्यांचे लक्ष अंगणातील कोपऱ्यात सुकलेल्या पारिजातकाच्या झाडाकडे गेले . परंतु रेंगाळत न बसता त्या नयनला आत घेऊन आल्या . छान सजवलेली बैठकीची खोली आणि समोर लावलेला बाळकृष्णाचा सुंदर फोटो पाहून मन प्रसन्न झाले.
" आजी थँक यू,आज तुम्ही नसता तर काय झाले असते ? " नयन डोळ्यात आलेले पाणी थांबवत बोलली.
" कोणीतरी आलेच असते की मदतीला . तू काहीतरी खाऊन घे बघू आधी . "
वत्सलाबाई त्यांच्या पिशवीतून डबा काढत म्हणाल्या .
वत्सलाबाई त्यांच्या पिशवीतून डबा काढत म्हणाल्या .
" आजी सकाळी उरलेली पोळी भाजी आहे घरात . " नयन म्हणाली .
" राहू देत . हा छान लाडू खा . " त्यांनी लाडू दिला आणि म्हणाल्या," मी जवळ ठेवते खायला असे . "
" राहू देत . हा छान लाडू खा . " त्यांनी लाडू दिला आणि म्हणाल्या," मी जवळ ठेवते खायला असे . "
थोडावेळ थांबून वत्सलाबाई जायला निघाल्या . जाताना देखील तो सुकलेला पारिजातक त्यांना टोचत होता . इतकी निरागस पोर कशाने अशी निस्तेज झाली असेल ? विचारांच्या तंद्रीत त्या बाहेर पडल्या .
" अग बाई काकू तुम्ही तिथे काय करताय ? " शेजारच्या बंगल्यातून कुमुदची सून म्हणाली .
" काही नाही नयनला चक्कर आलेली . " त्यांनी उत्तर दिले .
तशी रागिणी जवळ आली .
" काकू,तिची नजर चांगली नाही . सतत खिडकीत बसून रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांना बघत असते." रागिणी कुजबुजली .
वत्सलाबाई त्यावर काहीच उत्तर न देता तिथून निघाल्या .
कॉलनीत शेवटी असणाऱ्या आपल्या बंगल्यात वत्सलाबाई पोहोचल्या . दार उघडे असलेले पाहून मंद हसत त्या आत शिरल्या आणि रवा भाजलेला सुगंध नाकात शिरला .
" आज्जो हातपाय धुवून घे . मस्त शिरा करते आपल्याला . " आतून जाई ओरडली .
वत्सलाबाई हातपाय धुवून आल्या .
" अग काय जाई, मी केला असता ना शिरा . कशाला दमतेस ." त्या हसत आत शिरल्या .
" आजी सारखा तो मेडिकलचा अभ्यास करून कंटाळा येतो ग ." जाई लाडिगोडी लावत म्हणाली .
थोड्याच वेळात शिऱ्याच्या प्लेट घेऊन जाई बाहेर आली . वत्सलाबाईंनी पहिलाच घास तोंडात टाकला आणि हाताचा मोर नाचवत म्हणाल्या," जाई,छान झालाय शिरा अगदी..."
असे म्हणून त्या थांबल्या . त्यांचे डोळे भरून आले .
थोड्याच वेळात शिऱ्याच्या प्लेट घेऊन जाई बाहेर आली . वत्सलाबाईंनी पहिलाच घास तोंडात टाकला आणि हाताचा मोर नाचवत म्हणाल्या," जाई,छान झालाय शिरा अगदी..."
असे म्हणून त्या थांबल्या . त्यांचे डोळे भरून आले .
" अगदी आई करायची तसाच ना ? अग मग इतकी गोड आठवण आली तर रडतेस कशाला ? " जाईने अलगद त्यांचे डोळे पुसले .
" आजी आज तुला खूप वेळ लागला फेरी मारून यायला . " जाईने विचारले .
तशी वत्सला बाईंनी सगळी हकीकत सांगितली . दोघी कितीतरी वेळ गप्पा मारत होत्या .
अमेय घरी आला तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते . आपल्याकडील किल्लीने दरवाजा उघडला . आत एक छोटासा दिवा चालू होता आणि सोफ्यावर नयन बसलेली होती . अमेयने दिवा लावला तशी नयन भानावर आली . आपण इथेच बसून असल्याचे तिच्या लक्षात आले .
" नयन मी ऑफीसमधून जेवून आलो आहे . तू जेवलीस ना ? " त्यावर तिने होकारार्थी मान हलवली .
अमेय फ्रेश होऊन हळूच किचनमध्ये डोकावला आणि नयनने दिलेले उत्तर खोटे असल्याचे त्याला समजले . तरीही तो शांतपणे आत आला . नयन एका कुशीवर झोपून गेली होती . आताशा त्यांच्या शयनगृहात मोगरा कुस्करला जातच नव्हता . किती रसरशीत होती नयन लग्न झाले तेव्हा . गेल्या दहा वर्षात काय झाले हे? विचार करता करता त्याला झोप कधी लागली ते समजलेच नाही.
सुट्टी असल्याने अमेय तसाच लोळत होता तितक्यात बेल वाजली . नयन अंघोळीला गेली असल्याने त्याने दरवाजा उघडला . समोर एक तरुण मुलगी होती .
" मी जाई देशमुख . काल माझ्या आजीचा चष्मा इथे विसरला आहे."
तिने हसत ओळख करून दिली .
तिने हसत ओळख करून दिली .
" चष्मा? कोण आजी ? " त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ होता . "
ते ताई सांगतील . पण माझे प्रॅक्टिकल असल्याने मला वेळ नाही . कॉलनीत शेवटचा बंगला आमचा आहे . "
त्याला बोलायला वेळही न देता ती भरकन निघून गेली .
त्याला बोलायला वेळही न देता ती भरकन निघून गेली .
नयन अंघोळ करून आल्यावर त्याने विचारले .
" अरे हा , काल एक आणि भेटल्या होत्या . त्यांचाच हा चष्मा आहे.. देईल मी नंतर ."
नयन काहीतरी लपवत होती .
" अग चष्मा नसेल तर त्यांची कामे अडतील ना . मी देऊन येतो."
नयनला आजीचे नाव विचारून अमेय बाहेर पडला देखील .
नयनला आजीचे नाव विचारून अमेय बाहेर पडला देखील .
कॉलनीत शेवटी असलेल्या दोन बंगल्यात आजीचा बंगला कोणता ? तितक्यात एक मुलगा तिथे खेळताना दिसला आणि त्याला विचारून अमेय बंगल्याच्या दिशेने निघाला.
नयन इतकी उदास का असेल ?
तिच्या अंगणात सुकलेला पारिजात पुन्हा फुलेल का ?
वाचूया पुढील भागात.
©®प्रशांत कुंजीर
अष्टपैलू 2025 स्पर्धा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा