Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 13

Read Later
अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 13

अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 13

मागील भागात आपण पाहिले खजिन्याचा रस्ता सापडला. माया आणि हेलन आत गेल्या. इकडे विनय त्याच्या वडिलांना तिथे पाहून आश्चर्यचकित झाला. इन्स्पेक्टर मेघाने सोडवलेली स्त्री शुद्धीवर आली. आता पाहूया पुढे.


प्रचंड अशक्त झालेल्या त्या स्त्रीला मेघाने पाणी प्यायला दिले. तेवढ्यात विनोद तिच्याकडे निरखून बघत होता.

"हेलन विल्यम तिला थांबवायला हवे. चला लवकर." पाणी प्यायल्यावर ती स्त्री बोलू लागली.

"प्रोफेसर इरावती राईट?"मेघाने विचारले.

"येस,आय एम. पण ते सगळे नंतर आधी आत चला."

"इरा,अग मी मेघा. मला ओळखले नाहीस? आदित्य शिर्के, वडगाव."
त्याक्षणी इरावतीने तिला मिठी मारली."आदित्य माझा पी एच डी क्लासमेट आणि बेस्ट फ्रेंड. तू त्याची मावस बहीण मेघा."

तेवढ्यात स्नेहाने दाखवले,"दरवाजा बंद होतोय. चला लवकर."

स्नेहा,विनोद आणि मेघासह प्रोफेसर इरावतीने आत प्रवेश केला.


अमेय आणि निर्मलाताई पुढे चालत होते. एका ठिकाणी शांत पाण्याचा झरा लागला आणि अचानक अमेयचे लॉकेट चमकू लागले.

"स्टॉप,ते लॉकेट इकडे आण." माया ओरडली.

"माया हेच ते चिन्ह. आपण अगदी जवळ आहोत." असे म्हणून हेलनने पुढे पाय ठेवला आणि अचानक वेगाने एक सुरा तिच्या खांद्यात घुसला.

" ओ माय गॉड." हेलन कोसळली.

मायाने हेलनला पकडले. तेवढ्यात ठोsssss असा आवाज आला आणि पुढच्या क्षणी हेलन रक्ताच्या थारोळ्यात पडली.

माया पिस्तूल रोखून मागे वळली.

" अवधूत काका?" अमेय जोरात ओरडला.

निर्मलाताई चिडून म्हणाल्या,"हाच तो नीच माणूस. ज्याला अच्युतने सर्वात जवळचा मानले. तुझ्या बाबांचा जवळचा मित्र."

अवधूत खो खो हसत म्हणाला,"गेले वीस वर्ष तुम्हा सगळ्यांना सहन करत होते कारण जयवंतराव शिंदेंनी ते हस्तलिखित कुठे ठेवले तेच सापडत नव्हते. तुझ्या आजोबांना आणि बाबांना संपवले पण ह्या दोन म्हाताऱ्या लोकांना जिवंत ठेवावे लागले."


अमेय चिडला,"तुला सोडणार नाही."

तेवढ्यात अवधुतने निर्मलाताईंजवळ जाऊन थंड आवाजात सांगितले,"तुम्हाला ठाऊक आहे मला काय हवयं."


निर्मलाताई मागे सरकल्या त्याबरोबर मायाने अमेयच्या कानावर पिस्तूल ठेवला.

"अजून दहा सेकंद आणि शिंदे घराण्यातील आणखी एक जण ह्या खजिन्याचे राखण करताना बळी जाईल."

असे म्हणाल्यावर मात्र निर्मलाताई मागे सरल्या आणि त्यांनी हातातली बांगडी काढली. बांगडीचा स्क्रू फिरवला आणि त्यातून एक चावी बाहेर आली.

"आता प्रवेशद्वार उघड क्विक." अवधूत ओरडला.

निर्मलाताई शांतपणे पुढे आल्या आणि त्यांनी अमेयचे लॉकेट घेतले आणि एका विशिष्ट चिन्हावर ठेवले आणि चावी लॉकटच्या मधोमध फिरवली. त्याक्षणी एक भव्य दरवाजा उघडला.

मायाने अमेयला सांगितले,"पुढे व्हा!"

अमेय पुढे गेला आणि त्याच्यामागे बाकीचे आत गेले.


मेघा आणि मुलांना घेऊन इरावती आत आली. "इरा,हे सगळे झाले कसे?" मेघाने विचारले.

"अच्युत सरांकडे पी. एच. डी.करत असताना मला त्यांनी विश्वासाने काही संदर्भ दिले. मी त्याप्रमाणे शोध घेत होते. तेव्हा मला हस्तलिखित कुठे आहे हे समजले. त्याच दरम्यान मला राजस्थानला यावे लागले.

इथे मला राखणदार असणारे काही लोक भेटले. त्यांनी सांगितले की नकाशा चार भागात होता. पण आता तो फक्त एकाच भागात सुरक्षित आहे. त्यासाठी हडप्पा, मेसोपटोमिया आणि इजिप्त अशा तीनही लिपी जाणकार असल्याने मी त्यांना मदत करावी असे त्यांनी विनवले.


त्याप्रमाणे मी संशोधन सुरू केले. मी सगळे संदर्भ शोधत असताना अवधूतने मला त्यांची मदत करायची ऑफर दिली. परंतु मी त्यांना धुडकावले.

त्यानंतर गेली पाच वर्षे एका प्राचीन औषधीचा वापर करून मला कैदेत ठेवले. पण आता जर अवधूत आणि माया ह्यांना खजिना सापडला तर अशी अनेक रहस्य त्यांच्या हाती सापडतील. आपल्याला त्यांना रोखावे लागेल." इरावती शांत झाली.इकडे अमेय पाठोपाठ सगळे आत गेले आणि अचानक अवधूतच्या दोन बॉडीगार्डच्या पायात खालून खिळे घुसले.

त्यासरशी सगळे जागेवर उभे राहिले."अमेय,पुढे बघ दगडावर सात तारे कोरलेले आहेत."

आजीने सांगितले. "याचा अर्थ सात योग्य चिन्हे निवडून पलीकडे जायचे आणि तिथली कळ दाबताच खजिन्याची खोली उघडेल. एकही चिन्ह चुकले तर समजायचे की मृत्यू अटळ."काय अमेय सात योग्य चिन्ह निवडू शकेल? मेघा आणि इरावती पोहोचतील का वेळेवर. पलीकडे काय खजिना असेल? पाहूया अंतिम भागात.


वाचत रहा.
अंधारलेल्या प्रकाशवाटा.
©®प्रशांत कुंजीर.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Kunjir Prashant Vishwanath

Primary Teacher

Primary Teacher In Z P Pune A Writer,A Poet An Anchor

//