अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 2
मागील भागात आपण पाहिले की अमेय इतिहासात रमणारा एक मुलगा आहे. त्याची इतिहासाची आवड त्याला वेगळे शोध घ्यायला प्रवृत्त करत असते.
डॉक्टर अच्युत बोस त्याला काही सूचक बोलले. विनय आणि अमेय मित्रांना भेटायला बाहेर पडले. आता पाहूया पुढे.
डॉक्टर अच्युत बोस त्याला काही सूचक बोलले. विनय आणि अमेय मित्रांना भेटायला बाहेर पडले. आता पाहूया पुढे.
इकडे स्नेहा पेटली होती,"काय यार नेहमीच आहे हे. म्हणजे आपण काय रिकामे आहोत का इकडे वाट बघायला."
तेवढ्यात लांबूनच पळत येणारे अमेय आणि विनय दिसले. धिरजने स्नेहाला खुणेने दाखवले.
विनय लांबूनच जोरात ओरडला,"सॉरी गाइझ. जरा उशीर झाला."
विनोदने घड्याळ दाखवले,"तब्बल दोन तास आम्ही इकडे वाट बघतोय तुमची."
स्नेहा अमेयकडे पाहत म्हणाली,"अजून दहा मिनिट लेट झाला असता तर मी जाणार होते निघून."
सगळेजण गप्पा मारत कॉपी घेत होते. तेवढ्यात एक इसम जवळ आला. त्याने काही कळायच्या आत अमेयच्या गळ्यातील साखळी खेचली आणि तो पळू लागला.
त्याने एकदम खेचल्याने अमेय कोलमडून खाली पडला. परंतु विनय आणि विनोद दोघांनी चोराचा पाठलाग सुरू केला. हॉटेलातून वेगाने बाहेर पडण्याच्या नादात तो चोर काचेच्या दाराला धडकून खाली पडला. त्याबरोबर त्याने खचलेली चेन खाली पडली. परंतु गडबडीत तो चोर तसाच पळून गेला.
विनयने चेन उचलली."अमेय,ही घे चेन."
विनयने चेन अमेयच्या हातात दिली.
"हे अमेय,ही चेन वेगळीच वाटते रे. त्यात असलेले पदक पण वेगळेच आहे." स्नेहाने विचारले.
"हे अमेय,ही चेन वेगळीच वाटते रे. त्यात असलेले पदक पण वेगळेच आहे." स्नेहाने विचारले.
" ही माझ्या बाबांची एकच आठवण आहे माझ्याजवळ." अमेय भावुक झाला होता.
सगळे घरी जायला निघाले. जवळपास रात्रीचे दहा वाजले होते. अमेयने बेल वाजवली. दरवाजा सुलभाने उघडला. अमेय चोर पावलाने आत शिरला.
" आलास! आपली आई आपली वाट बघत असेल. तिला एखादा फोन करावा. घरात एक म्हातारी आजी आहे." निर्मलाताई म्हणाल्या.
"म्हातारी? कुठेय? मला तर दिसली नाही कधीच." अमेय नाटकीपणे बोलला.
तशा निर्मलाताई म्हणाल्या,"बापावर गेलाय कार्टा. सुलभा जेवायला वाढ."
तेवढ्यात अमेय म्हणाला,"आजी,तू कधीच बाबा आणि आजोबांबद्दल फार बोलत नाहीस. आईला काही सांगू देत नाहीस."
निर्मलाताई कठोर झाल्या,"इतिहास मला लाभत नाही. तेव्हा आपण वर्तमानात जेवायचे का?"
अमेय फ्रेश व्हायला गेला.
"आई,किती दिवस लपणार आहे सगळे. त्याला सांगून टाकू सगळे." सुलभाने सुचवले.
"नाही,तो परत कुठल्याही शोधा मागे जायला नको. सुलभा तुला शपथ आहे माझी." निर्मलाताई भावनिक झाल्या.
अमेय जेवण करून झोपायला निघाला. तेवढ्यात त्याला प्राध्यापक अच्युत बोस यांचे वाक्य आठवले. हडप्पा संस्कृती मधील लिपी वाचू शकणारे कोणीच नाही असे सगळेजण मानतात. पण ते खरे असेल का?
इतिहास वाटा सोडत असतो. त्या शोधायला काय हरकत आहे.
तेवढ्यात झोप येत नाही म्हणून अमेयने पुन्हा व्होलगा ते गंगा वाचायला काढले. पाने उलटत असताना अचानक एक जीर्ण पान खाली पडले. अमेयने काळजीपूर्वक ते पान पाहिले. त्यावर काही मजकूर पाली भाषेत होता.
त्याने लगेच आजोबांच्या पुस्तकातून पाली संस्कृत विश्वकोश काढला. एकेक शब्दाचा अर्थ लावत तो मराठीत लिहायला सुरुवात केली.
पेशवेकालीन सरदारांचा एक वंशज.
समुद्राच्या किनाऱ्यावरून आला त्याचा मित्र.
त्यांना जोडणारी नाजूक कडी.
सह्याद्रीच्या डोंगरातली हिरकणी.
ह्रुदयात त्याच्या गुप्त सरस्वती
शोधून काढील अमूल्य रहस्य.
सगळे लिहिताना अमेय कधी झोपून गेला समजलेच नाही.
इकडे निर्मलाताई जाग्याच होत्या.
त्या पुन्हा जयवंतरावांच्या फोटोला पुसत बोलू लागल्या,"जयवंत,अमेयच्या डोळ्यात तुझी झाक दिसते. भीती वाटते रे. मी जवळ असूनही तुला वाचवू शकले नाही. नंतर अमेयचा बाबा त्याच शोधात निघून गेला. आता मला नाही सहन होणार नवीन काही."
शब्दकोड्याचा अर्थ काय असेल? निर्मलाताईंचा भूतकाळ काय असेल? अमेयला अच्युत बोस यांनी काय सूचित केले असेल?
वाचत रहा.
अंधारलेल्या प्रकाश वाटा.
©®प्रशांत कुंजीर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा