अंधारलेल्या प्रकाशवाटा भाग 12
मागील भागात आपण पाहिले.
निर्मलाताई आणि अमेय यांना वेठीस धरून माया आणि इरावती खजिना शोधत निघाल्या. मेघा त्यांच्या मागावर येत आहे. या पाठलागात काय होईल.
निर्मलाताई आणि अमेय यांना वेठीस धरून माया आणि इरावती खजिना शोधत निघाल्या. मेघा त्यांच्या मागावर येत आहे. या पाठलागात काय होईल.
तांडा वाळवंटातून निघाला. सगळीकडे वाळूचे साम्राज्य पसरले होते.
"आजी,हजारो वर्ष झाली नदी लुप्त होऊन. आता आपल्याला कसे समजणार."
"इतिहास नेहमी वाटा सोडत असतो. त्या शोधल्या की सापडतात."
नकाशात असलेले ठिकाण जवळ आले होते. खुरटी झाडे दिसू लागली. परंतु रात्र झाल्याने सगळेजण थांबले.
"माया,खजिना सापडल्यावर ह्यांचे काय करायचे?"
"यांना तिथेच मारून टाकायचे इरावती. सॉरी,हेलन." माया असे म्हणताच दोघी हसू लागल्या.
ते ऐकून निर्मलाताई चिडल्या,"हेलन? हेलन विल्यम? पण हे कसे शक्य आहे? इरावती कुठे आहे? काय केले तुम्ही तिच्यासोबत?"
माया शांतपणे म्हणाली,"तुला आठवते निर्मला,तुझे पुस्तक मी प्रकाशित केले. तेव्हा मला ही खजिना,प्राचीन लिपी सगळे काही थोतांड वाटायचे. त्यांनतर पंधरा वर्षांनी मी इथे राजस्थान फिरायला आले.
वाढते वय माझ्या चेहऱ्यावर दिसू लागले होते. तिथे मला एक वैदू भेटला ज्याने मला एक औषध दिले. जे पिल्यावर मी पुन्हा तरूण होईल. मी अविश्वास दाखवत ते प्यायले. त्यावेळी त्याच्या हातावर एक निशाण होते. औषध पिल्यावर मी बेशुद्ध झाले. तब्बल चोवीस तासांनी मी शुद्धीवर आले ती अगदी तरुण.
पण तो वैदू गायब झाला होता. मला आता ते औषध हवे होते. तेवढ्यात त्या संध्याकाळी मी एका ऐतिहासिक लिलावात गेले. तिथे मला भेटली डॉक्टर हेलन विल्यम. जिला त्या निशाण आणि त्याबद्दल माहीत होते." माया बोलायची थांबली.
"आम्हाला हा अमूल्य खजिना शोधायला हवा होता पैसा जो मायाकडे होता आणि तिला हवे होते ज्ञान जे आमच्याकडे होते. त्यानंतर आम्ही इरावतीला पळवले. मी कायाकल्प विद्या वापरली. म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी."
"आता इरावती मॅडम जिवंत आहेत का?" अमेयने विचारले.
" जर खजिना आम्हाला दिला तर." दोघी निघून गेल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी शोध मोहीम सुरू झाली. एका ठिकाणी खजुराच्या झाडावर चिन्ह कोरलेले होते. निर्मलाताई थांबल्या आणि त्यांनी अमेयच्या गळ्यातील लॉकेट त्या चिन्हावर ठेवले. त्याक्षणी एक भव्य दरवाजा उघडला आणि आतल्या भूयाराचे दार उघडले.
माया आत जाणार एवढ्यात हेलनने तिला मागे ओढले. दरवाजावर एक चिन्ह होते.
"माया,ह्या चिन्हाचा अर्थ आहे मृत्यू. अमेय तू पुढे जा." मायाने पिस्तूल रोखले.
"माया,ह्या चिन्हाचा अर्थ आहे मृत्यू. अमेय तू पुढे जा." मायाने पिस्तूल रोखले.
अमेयने आजीकडे पाहिले. त्याने दरवाजावर असलेले राखणदार चिन्ह शोधले आणि त्यावर हात ठेवला त्याक्षणी दरवाजा पुढे असलेल्या प्रचंड धनुष्य बाणाचा भाता बंद झाला. सगळेजण आत गेले.
इकडे इन्स्पेक्टर मेघा देखील तिथे येऊन पोहोचली. तिला मदत करत होते प्रोफेसर आदित्य. त्यांनी दिलेले मार्गदर्शन घेऊन मेघा तिथवर पोहोचली.
बाहेर तांड्यातील लोक तसेच होते. त्यांच्या ताब्यात विनय आणि सुलभा होती. शिवाय एका स्त्रीला उंटावर साखळीला बांधलेले होते. दहा बारा लोक होते.
मेघा म्हणाली,"मी एका उंटाला दगड मारते उंट गोंधळ करू लागले की आपले काम करायचे. काही संकट दिसले तर हे वापरा."
दोघांना पिस्तूल देऊन मेघाने एका उंटाला लांबून दगड मारला. पटापट उंट उभे राहिले. त्याच गडबडीत सुलभा आणि विनय पळाले. तर त्या स्त्रीला बांधलेला उंट मेघाने पळवला आणि ते पटकन काटेरी झाडीमागे लपले.
तेवढ्यात आकाशात हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागले. त्यातून एक माणूस आणि त्याचे चार बॉडीगार्ड उतरले.
त्या माणसाला पाहून विनय आश्चर्याने म्हणाला," डॅड? कसे शक्य आहे?"
तोवर ते पाचही जण आत गेले. विनयला आता काही संदर्भ जुळू लागले. आजोबांची इतकी काळजी घेणारे वडील. त्याचा खास मित्र असणाऱ्या डॉक्टरचे आजोबांवर उपचार. आईला सतत कामात ठेवून आजोबांना एकटे भेटू न देणे.
तेवढ्यात मेघाने मागवलेली मदत पोहोचली. बाहेरील लोकांना पोलिसांनी पकडले. इकडे उंटावर बांधलेली स्त्री शुद्धीवर आली.
विनयचे वडील खरा सूत्रधार आहेत का? खजिना सापडणार का? मेघा सगळ्यांना वाचवेल का? उंटावर बांधलेली स्त्री कोण आहे?
वाचत रहा.
अंधारलेल्या प्रकाशवाटा.
©®प्रशांत कुंजीर.
अंधारलेल्या प्रकाशवाटा.
©®प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा