आणि तिची घालमेल भाग 6

And her emotions part 6 Sapna pay the bills at counter. But neha came from behind and hold her hand and ask her what is the problem now sapana also emotional so that neha take sapna on her room. And asked her now sapana cried and neha also fe

आणि तिची घालमेल भाग ६

नेहाने विचारले आणि मग काय सपना ने कितीही प्रयत्न केले तरी ती ते लपवू शकली नसतीच.  सपना ने बील दिले. आणि नेहाने सपना ला तिच्या रुमवर नेले. 

आता नेहाने आपुलकी ने विचारले म्हणून किंवा एवढे दिवसाची तिची घालमेल कमी होईल म्हणून की काय सपना बोलायचे ठरवून तिला सांगायला सुरुवात करते. परंतु तिला सांगतानाच रडू येते व नेहाला घटट बिलगून जाते तिला एवढ्या दिवसांनी हलक करायला कोणीतरी भेटलेले असते. नेहा ही तिला मनसोक्त रडू देते. थोडया वेळाने सपना शांत होते नेहा मस्त गरमागरम चहा बिस्किटे घेऊन येते. 

आणि मग सपना सगळे काही सांगायला सुरुवात करते अगदी लग्न पासून तिला सुरवातीला संजय आवडलेला नसतो कालांतराने आवडायला लागतो. सुरुवातीला तो ही ची काळजी करत. सपना लग्नाला तयार नसल्याने तो तिला स्वातंत्र्य देतो. 
ति सांगते आम्ही नावाने नवरा बायको आहोत तस आमच्या मध्ये काहीही नाही.  मलाही तो महणून जास्त आवडला. 

नेहा शांत पणे ऐकत असते. 

नंतर त्याने मला सुट्टी नाही म्हणून परतनीला  देखील लवकर नेले नाही, मी नोकरी सोडून दिल्यावर आम्ही गावी गेलो होतो. तसा तो चांगला आहे बाकी मला कसला त्रास नाही पण............ 


पण काय❓ नेहा विचारते. 

सपना-- नेहा अग  मी शॉपिंग साठी काही दिवसांपूर्वी जवळील एका मॉल मध्ये गेले होते तिथे मी संजय ला एका मुली सोबत पाहिले मला नाही आवडले आणि थोडे विचित्र होत.. 

ह्यावर नेहा हसते अग वेडा बाई त्याचा मैत्रीण असेल आणि आजकाल मुली बिनधास्त पणे वावरतात मुलांना बरोबर.. तु जसा विचार करत आहे तसेच असेल कश्यावरून.... 

सपना--- मला ही आधी असेच वाटले पण जेव्हा सगळ्या गोष्टी आठवत गेले तर मग मी गोंधळात पडले आणि हयाचा शोध लावण्यासाठी च तर जीम ग्रंथालय त जाते महणून बाहेर पडते पण मला त्या मुलीचे नाव पत्ता काही माहिती नाही... 

नेहा--महणून तू विचारात असते त्यात काय आपण शोधून काढू या. पण मला सांग तू संजय ला तिच्या शी फोन वर बोलताना ऐकले आहे का❓

सपना-- नाही

नेहा-- म तू आजपासून लक्ष ठेव तो कोणाला बोलत असेल त्यावेळी जर तूला संशयास्पद वाटले तर तो नंबर तिचाच असणार बघ.! 

सपना-- हे लक्षात नाही आले मी त्याचा फोन रात्री चेक करते. 

नेहा-- होत अग अस टेन्शन मध्ये पण सावधानता बाळगून कर सगळे उगाच त्याला संशय यायला नको.. आणि असेही मला २ आठवडे नाईट शिफ्ट आहे तर मी ही आहे तूला मदतीला.. 

सपना ला परत रडू येते ति नेहा ला मिठी मारून घड्याळात पहाते, उशीर झालेला असतो. 

सपना--  नेहा चल मी येते उदया भेटुया आणि हा माझा नंबर आता सेव्ह करून घे... 

नेहा-- ठीक आहे. काळजी घेतली! आणि फोन चेक करायला विसरू नकोस !!! 

भेटुया पुढील भागात........ 

कसा वाटला हा भाग नक्की सांगा..आवडल्यास लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका..धन्यवाद????????

**सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. साहित्यचोरी हा कायद्याने गुन्हा आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
©®Tanuja Ghodekar

🎭 Series Post

View all